Skip to main content
लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 14/03/2018 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
"चहा झालाय का ग ? " आल्या आल्या श्रीरंग मधूरावर ओरडला "अोरडायला काय झाल ? 'मी' तुमचच कपाट लावत होते. काय तो पसारा ..'मी' आहे म्हणून काय ते घर टिकलयं..नाहीतर उकीरडा करुन ठेवला असता सगळा ." "जास्त बोलू नको आता.. आधीच ऑफिसच टेंशन.. तिथे सगळेजण टिपूनच बसलेत 'मी' केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला. .." "पप्पा तुम्हाला ना घरी कसं वागायच काहीच कळत नाही. ऑफिसचा राग घरी का आणता? " राघव श्रीरंगला म्हणाला " वा..'मी' तुला या जगात आणलो आणि मला अक्कल शिकवतो ? अभ्यास कर जा.." खोलीच्या कोप-यात बसलेले आजोबा अग्निहोत्राची शांतपणे आहूती देत होते '"अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम , प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम "
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2642
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया