✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जातस त जाय

स — स्वामी संकेतानंद, Tue, 03/13/2018 - 08:02
जातस त जाय, येति रावून बी नसे काई उपाय नेजो पाच पोते तांदूर पन्नास पायल्या तूर जाता जाता हेडून घेजो मोहावरचा मोवतूर दूध देवाचा बंद करन आता तुयी गाय जातस त जाय करजो सकारी एक फोन दिसबुडता आठोन हर मैन्याले पाठवजो रुपये हजार-दोन तुयी वाट पायतीन घरवाले सप्पाय जातस त जाय सांगजो पोराले आपल्या झाडीच्या गोठी बाघ कोटी ना बावनथडी कोटी आला कई त दाखवून डाकजो अमराईतले सेंदऱ्या, गोल्या, घोटी निस्यान सोडून तं जाते वल्या खपनीमदी पाय जातस त जाय - संकेत, १० मार्च, २०१८, पुणे ------------------------------------------- हेडून म्हणजे काढून मोवतूर म्हणजे मधाचे पोळे देवाचा म्हणजे द्यायचे सप्पाय म्हणजे सगळे बाघ आणि बावनथडी या नद्या आहेत. कोटी=कुठे निस्यान =निशाण खपन म्हणजे चिखल, पाय रुततात असा थोडा घन असलेला चिखल. आमच्याकडे किचड हा चिखलाचा वेगळा प्रकार.

प्रतिक्रिया द्या
5659 वाचन

💬 प्रतिसाद (13)

भावूक करणारी

श्वेता२४
Tue, 03/13/2018 - 10:47 नवीन
आपला मूळ घर सोडून नोकरीसाठी शहरात राहणाऱ्या सगळ्यांनाच ही कविता भावूक करेल.
  • Log in or register to post comments

खुप सुरेख.

पद्मावति
Tue, 03/13/2018 - 15:05 नवीन
खुप सुरेख.
  • Log in or register to post comments

स्वामीज्जी की महान रचनांएं!

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/13/2018 - 15:42 नवीन
स्वामीज्जी की महान रचनांएं!
  • Log in or register to post comments

छान कविता!

आर्या१२३
Tue, 03/13/2018 - 16:09 नवीन
नि:शब्द!! सुरेख कविता! सांगजो, करजो.... अहिराणीच वाटली.
  • Log in or register to post comments

स्वामी संकेतानंद

तुषार काळभोर
Wed, 03/14/2018 - 07:38 नवीन
मिपावर काही नावं अशी आहेत, की नाव वाचून धागा उघडावा आणि नेहमीच भारी वाटतं.
  • Log in or register to post comments

सुंदर रचना

चांदणे संदीप
Wed, 03/14/2018 - 07:56 नवीन
स्वामीजी कीपीटप! Sandy
  • Log in or register to post comments

अर्थ दिल्याबद्दल धन्यवाद,

वीणा३
Wed, 03/14/2018 - 10:16 नवीन
अर्थ दिल्याबद्दल धन्यवाद, बरीचशी कळली, वाचायला गोड वाटली.
  • Log in or register to post comments

काय गोडवा! आवडली.

शिव कन्या
गुरुवार, 03/15/2018 - 21:10 नवीन
काय गोडवा! आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली भावपूर्ण कविता !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 03/15/2018 - 21:18 नवीन
आवडली भावपूर्ण कविता !
  • Log in or register to post comments

स्वामी तिन्ही

नाखु
Sat, 03/17/2018 - 23:13 नवीन
ठिकाणी
  • Log in or register to post comments

सुंदर!

पैसा
Fri, 03/23/2018 - 15:28 नवीन
सुंदर, अर्थपूर्ण कविता!
  • Log in or register to post comments

सुंदर.

प्राची अश्विनी
Fri, 03/23/2018 - 15:48 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

सुरेख कविता! भाषा आणि भावना

रातराणी
Wed, 04/11/2018 - 01:04 नवीन
सुरेख कविता! भाषा आणि भावना दोन्हीतला गोडवा आवडला!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा