श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ?
In reply to एकतर आधीच इथे अशा धाग्यांचे by प्रचेतस
In reply to पण हा उपविषय by माहितगार
In reply to माहीतगारजी माहीतीच्या धबधब्यात मंदाकिनी वाहुन जाऊ नये by मारवा
In reply to माहीतगारजी माहीतीच्या धबधब्यात मंदाकिनी वाहुन जाऊ नये by मारवा
धबधब्यात मंदाकिनी वाहुन जाऊ नयेबाकी विनोद पोहोचला :)
In reply to श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन by अर्धवटराव
In reply to श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन by अर्धवटराव
In reply to थोडक्यात आपल्यामते 'श्रद्धा by माहितगार
In reply to थोडक्यात आपल्यामते 'श्रद्धा by माहितगार
In reply to श्रद्धा ही नैसर्गीक भावना असेल... by अर्धवटराव
श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ?(त्रिकोणाची) निसटलेली बाजू: श्रद्धेचे समायोजन
In reply to “श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन by मामाजी
In reply to अ रा सो by नाखु
‘Maybe, I shall spend my life in prison, may be, I shall be shot or hanged. But whatever happens, I shall think of you and convey my gratitude to you in silence for your love for me… you will always live in my heart, in my thoughts and in my dreams. If fate should separate us in this life – I shall long for you in my next life.’सुभाषचंद्र बोसांचे देशावरचे प्रेम पहिले आहे पण सोबतच Schenkl वरही त्यांनी प्रेम केले. एका ध्येयासाठी आयुष्य पणाला लावताना आयुष्यातील दुसरे प्रेम अधुरे रहाण्याची शक्यता आणि झालेही तसेच पत्नीस एकटे सोडून ते कायमचे चालते झाले , तेव्हा ते पुढच्या जन्मात भेटण्याचा हवाला देतात. मृत्यू नंतर आयुष्य आहे की नाही माहित नाही पण ते तसे शक्य असण्याची श्रद्धा सुभाषचंद्र बोसांची आकांक्षा जिवंत ठेवताना दिसते . माणूस आशा आणि आकांक्षावरही जगत नाही का ? जे या जन्मी नाही जमले ते मृत्यू नंतर कदाचित शक्यही नसेल पण आशा आकांक्षांवर पूर्ण पाणी फिरवून समोर जायचे की आशा आकांक्षा शिल्लक ठेऊन पुढे जाणे श्रेयस्कर असावे ? आशा आकां़षांना काल्पनिक का असेना रुप देऊन जोपासण्याचे प्रयोजन श्रद्धेने साध्य होऊ शकते असे वाटते का ? या नाण्यास नास्तिक मताची दुसरी बाजूही आहे पण ह्या धाग्याचा उद्देश आस्तीक मताची बाजू बघणे असा ठेवला आहे.
१.१) या पहिल्या प्रश्नापुरता काही क्षणासाठी इश्वर आणि धर्म या संकल्पना बाजूस ठेऊन द्या आणि श्रद्धा या संकल्पनेचे मानवी जिवनात काही सकारात्मक प्रयोजन अथवा उपयोजन आहे असे तुम्हाला वाटते का ? वाटत असेल तर शक्य असल्यास अनुभव आणि उदाहरणे .
श्रद्धेचं माणसाच्या आयुष्यात मोठं स्थान असतं. कधी तरी फायदा आणि कधीतरी नुकसानही होत असतं. उदा. आपल्या श्रद्धा जोपर्यंत बिनबोभाटाच्या आणि अपेक्षारहित असतात तो पर्यंत श्रद्धेमुळे नुकसान होत नाही असे वाटते, म्हणजेच तेव्हा आपण श्रद्धेला सकारात्मक घेतलेले असते.
१.१) समजा तुम्हाला सकारात्मक प्रयोजन आहे असे वाटते , - यनांच्या मते काही प्रयोजने / उपयोजने ' विश्वास' या संकल्पनेवर धकवता येतात - विश्वासाच्या आधाराला श्रद्धेच्या मुलाम्याची गरज शिल्लक रहाते असे तुम्हाला वाटते का ? वाटत असेल तर फायदे सोदाहरण स्पष्ट करा.
अवघड प्रश्न आहे, पण, यनासर म्हणताहेत म्हणजे बरोबरच असेल असे वाटते....श्रद्धेच्या आधाराला विश्वास असावाच लागतो. अबक भेटल्यावर चहा नक्की पाजेल. श्रद्धा आणि विश्वास.
* विश्वास डळमळीत होणे शक्य असते श्रद्धा डळमळीत होण्यास वेळ लागतो हे आपणास पटते का ? पटत असेल तर या मुद्द्याच्या अनुषंगाने आपले मत सोदाहरण स्पस्।ट करा.
श्रद्धेचं काही खरं नसतं. श्रद्धा ही फुलावर बसणार्या फुलपाखरासारखी असते. श्रद्धा लवकर डळमळीत होते असे माझं मत आहे. गेली पाच वर्ष महादेवाचे सोमवार निरंकार उपवास केले, एक चांगल्या पॅकेजची नोकरी आणि एक सुंदर छोकरी मिळेल अशा प्रस्तावाने हे सर्व केले. पण, आजही बेकारच आहे. आता महादेव सोडला. आता महालक्ष्मीचे शुक्रवार सुरु करणार आहे. श्रद्धा अशी डळमळीत होते.
२) नितीमुल्यांच्या , संकेतांच्या नियमांच्या आणि कायद्यांच्या सामाजिकीकरणात (म्हणजे सकारात्मक निती,मुल्ये,निय्मम, नियम, आणि कायद्याच्या अभिसरणात समाजातील बहुसंख्यकांकडून अनुकरण करवून घेण्यात ) श्रद्धेची संकल्पना काही विशेष योगदान देऊ शकते का ? कि ज्यामुळे नितीमुल्यांच्या , संकेतांच्या नियमांच्या आणि कायद्यांच्या सामाजिकीकरण सुलभ होईल . सोदाहरण स्पष्ट करा.
नितीमुल्य आणि श्रद्धा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धाळु नितीमान असेलच असे काही नसते. नितीमुल्य आणि संकेत पाळणारे सामाजिक आयुष्यात अधिक आनंदी राहू शकतात, असे वाटते.
३) श्रद्धेचे विश्वास आणि निष्ठा या प्रति नेमके योगदान कोणते ?
श्रद्धेचं विश्वासाशी काहीही संबंध नाही असे वाटते. निष्ठेशी संबंध आहे.
४) जोखीमीचे निर्णय घेताना विश्वास हि संकल्पना तुम्हाला पुरेशी वाटते का की श्रद्धेमुळे जोखीमीचे निर्णय घेणे सुकर होते ?
विश्वासाच्या पाठीमागे एक लॉजीक असतं, म्हणून ती संकल्पना पुरेशी वाटते. श्रद्धा हीच जोखीम आहे.
५.१) मानसिक सुरक्षीततेची भावना निर्मितीत श्रद्धा संकल्पनेचे योगदान आहे का असेल तर कोणते ?
नै नै, श्रद्धेचा आणि सुरक्षिततेचा काहीही संबंध नाही. श्रद्धा ही भावनिक गुंतागुंतीचा एक मानसिक खेळ आहे.
५.२) मानवी नात्यात आपण एकटे पडलो तरी इतर श्रद्धायूक्त असलेली शक्ती आपल्या पाठीशी आहे हि भावना कितपत गरजेची सुखकर अथवा ऊपयूक्त वाटते ?
तात्पुरता आराम म्हणून श्रद्धायुक्त शक्ती बरी आहे. पण त्यातून माणसाने सावरले पाहिजे. नाही तर मानसिक स्थैर्य गमावण्याची शक्यता असते.
५.३) आपण जे करतोय ते योग्यच करतोय हे इतरांचे किती गैरसमज झाले, कायदाही आपल्या काठीशी नाही तरी इतर श्रद्धायूक्त असलेली शक्ती आपल्या पाठीशी राहणार आहे हा विश्वास पुरेसा आहे की इथे विश्वास आणि श्रद्धेची गरज असते ?
श्रध्दायुक्त शक्ती पाठीशी आहे, हे खूळ काढून टाकले पाहिजे.
५.४) काही अन्याय्य शक्ती विरुद्ध काहीच करता येत नाही , अशा हतबल वाटणार्या क्षणी , पृथ्वीवर मानवी जिवन न्याय देण्यास असमर्थ ठरले तरी एक अदृस्ष्य शक्ती वरील विश्वास आणि श्रद्धा , अन्याय्य शक्तींना मृत्यु ऊपरांत शिक्षा करून न्याय देईल हा विचार मनातील रागाचा निचरा होण्यास आणि स्वतःच्या हतबलतेच्या मनस्थितीतून बाहेर येण्यास ऊपयूक्त वाटतो का ?
मनाचा निचरा होण्यासाठी कामात रमवून घ्यावे असे वाटते. अन्याय्य शक्तींना मृत्यु उपुरांत शिक्षा मिळेल वगैरे हे मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न आहे.
बाकीच्या प्रश्नांची उत्तरे नंतर देतो.
In reply to माझा प्रयत्न. माझी उत्तरे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकतर आधीच इथे अशा धाग्यांचे