मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहितगार

श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ?

माहितगार ·
हा धागा यना आणि त्यांच्या समविचारी श्रद्धा संकल्पना मुदलातूनच नाकारणार्‍यांसाठी नाही. यनां आणि त्यांच्या मित्र परिवारा कडून मिपावर 'श्रद्धा' संकल्पनेवर बराच वैचारीक मार्‍याच्या धाग्यांचा रतीब पडतो आहे. श्रद्धा' या संकल्पनेच्या मर्यादा आहेत असतील नाही असे नाही, पण बाळाला न्हाउ घालताना घाण पाणी तेवढे काढले जात आहे की आपले बाळही घाण पाण्याचा विसर्ग करण्यापुर्वी कोणताही सुद्ज्ञ व्यक्ती विचार करेल. त्यामुळे श्रद्धा ही संकल्पना सरसकट नाकारण्या पुर्वी श्रद्धा या संकल्पनेची खरेच गरज शिल्लक राहीलेली नाही का ?