नमस्कार मिपाकर मंडळी ,
आज थोड्या वेगळ्या विषयावर लिहिणार आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी एसटी लव्हर्स ग्रुप तर्फे केंद्रीय बस बांधणी आणि दुरुस्ती कार्यशाळा चिखलठाण औरंगाबाद ला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत.
औरंगाबाद शहराबाहेर सिडको बस स्टॅन्ड वरून बाहेर पडला कि चिखलठाना मध्ये आपल्याला दिसते ती एसटीची विभागीय कार्यशाळा. एसटीच्या प्रचंड कारभाराची ती जणू प्रतिनिधीच. ह्याच कार्यशाळेत आम्ही म्हणजे MSRTC LOVERS GROUP च्या सदस्यांनी भेट दिली.
कार्यशाळेमध्ये असलेल्या विविध विभागांची माहिती आपण आता घेऊ.
०१: दुरुस्ती विभाग:- कार्यशाळेत शिरताच प्रथम दिसतो दुरुस्ती विभाग. एसटीच्या शहर बस आणि इतर अनेक बस गाड्या ( शहर बस-४० , हिरकणी-७४ , शिवनेरी-१४ , साधी-८० परिवर्तन-८० , यशवंती-४ शिवशाही-८) ह्यांची देखभाल दुरुस्ती होते. टायर ६०००० किमी नंतर बदलले जातात. औरंगाबाद १ आणि २ आगार च्या सर्व बसेस येथेच दुरुस्ती साठी आणि आर.सि. साठी येतात.
महाराष्ट्र राज्य परिवहन आपल्या बस चा पुरेपूर उपयोग कसा करते ते आपण पाहू.
समजा एखादी हिरकणी सलग ८ वर्षे चालवली जाते. त्यानंतर ती दापोडी , औरंगाबाद अथवा नागपूर ह्या विभागीय कार्यशाळेत आणली जाते. मग त्या गाडीचे रुपडे पूर्ण बदलून म्हणजेच आर.सी ( Reconstruction) करून पहिले परिवर्तन आणि मग शेवटी ती बस अजून ४/५ वर्षांनी भंगारात काढली जाते.
०२:इंजिन विभाग:- एंजिने विभाग म्हणजे बस चे हृदय. भारत-दोन स्टेज ची एंजिने मग ती अशोक लेलँड असोत अथवा टाटा तेथे दुरुस्त केली जातात. एसटीने यासाठी खास कामगारांची नेमणूक केली आहे. एंजिने दुरुस्त/नवीनीकरण झाल्यावर ती ड्राईव्ह वे वर चाचणी घेतली जाते. प्रचंड आकाराची ती ड्राइव्ह टेस्ट यंत्रणा एका एंजिने ला टेस्ट करायला ८ तास घेते. चाचणी मध्ये एंजिने पास झाल्यावरच मग ते परत बस मध्ये बसवले जाते. गेल्याच आठवड्यात एसटी चा कामगारांनी भारत-२ चे एंजिने यशश्वीरित्या भारत-३ प्रणाली मध्ये बदलून दाखवले आहे. भारतीय वाहतूक मानांकन मध्ये सध्या भारत-४ हेवी वाहनांसाठी आहे अशा आहे कि एसटी लवकरच भारत-४ श्रेणीचे एंजिने बस मध्ये बसवेल.
०३:भांडार विभाग:- स्टोअर्स / भांडार विभाग खरंतर स्टोअर्स हि नेहेमीच पुरुषी मक्तेदारी राहिली आहे. पण ह्या बाबतीत एसटी ने आम्हाला चकित केले. कारण एस्टिच्या ह्या विभागाचे परिचालक एक महिला अधिकारी समर्थपणे गेले ४ वर्षे सांभाळत आहेत. नट बोल्ट पासून चासी पर्यंत आणि दिव्या पासून ते पेट्रोल टाकीपर्यंत सर्वच लागनाऱ्या वस्तू भांडार विभागाच्या नियंत्रणाखाली आहेत ( ह्याची खरेदी मुख्यालय-मुंबई येथून केली जाते). भांडार विभागाकडे सध्या बस चे रूपांतर केलेले २ ट्रक्स कार्यरत आहेत जे ह्या सर्व गोष्टींची नेमाने वाहतूक करतात.
०४:बॉडी शॉप: आपल्या सर्वांना कदाचित हे माहित नसेल पण हे सत्य आहे कि आपली लाडकी एसटी बस बांधणी पण करते. होय एसटी च्या सर्व बसेस एसटी दापोली , औरंगाबाद आणि नागपूर कार्यशाळेत बांधते. असे करणारे महाराष्ट्र राज्य परिवहन हे देशातले एकमेव महामंडळ आहे. हल्लीच एसटीने एसिजिएल-गोवा कडून नवीन हिरकणीची बांधणी करून घेतल्या आहेत. बस बांधली हि पारंपरिक अलुमिनियम वापरूनच केली जात होती पण आता केंद्रीय नियम बदलल्यामुळे एसटी ने माईल्ड स्टील प्रकारातल्या नवीन परिवर्तन बस ची बांधणी पण सुरु केली आहे. सादर गाड्या ह्या अनुक्रमे नागपूर>गोंदिया , पुणे>शिर्डी आणि विजयपूर>पाटण मार्गावर यशश्वीपणे धावत आहेत. लवकरच राज्यभरातल्या सर्व आगारांसाठी १५० बस बांधणी चे काम सुरु होणार आहे.
०५:पेंट विभाग: टोमॅटो रेड हीच शेड आता एसटी च्या परिवर्तन बस साठी वापरली जाणार आहे. विविध प्रकारचे स्टंन्सील्स , लोगोचे अल्लुनिमिम चे स्टेन्सिल्स , ग्लास पैंटिंग साठी विशेष पेन्ट्स , डेपो मार्किं साथी चमकणारे रंग , तरच बस मध्ये लावायचा पिवळा आणि सीट ला देण्यासाठी हिरवा रंग पण फिक्स झाला आहे. पैं विभागात बस चा रंग नवीन दिला जातो. प्रथम एसटी चे कामगार हाताने सर्व रंग खरवडून काढतात मग त्यावर प्रिमेर चा ठार देऊन बस २ दिवस ठेवली जाते . त्यानंतरच बस वर रंग आणि गंज प्रतिरोधकचे मिश्रण पेंट केले जाते . मग बस पुढे चर्मकार विभागाकडे पाठवली जाते.
०६:चर्मकार विभाग: सीट बनवणे आणि खराब झालेल्या सीट्स दुरुस्त करणे हेच ह्या विभागाचे काम आहे. चर्मकार विभागात सध्या ३० कामगार काम करत असून दिवशाला ४० सध्या आणि २० पुश-बॅक पारावरच्या सीट चे उत्पादन होत आहे. ह्या सीट बस मध्ये बसवल्याचे काम पण पेंट विभागाचं करतो.
०७:चाचणी विभाग:- बस पूर्ण बांधून / नवी बनवून झाल्यावर त्याची पूर्ण चाचणी केली जाते यासाठी बस कार्यशाळेत चाचणी रास्ता उपलब्ध आहे.
वरील सर्व विभागांना आम्ही भेटी दिल्या. एसटीचे विभागीय प्रमुख सुद्धा आमच्या बरोबर होते . कोणाला सादर ग्रुप मध्ये यायचे असल्यास लिंक खाली देतो आहे .
फोटो काधायला मनाई असल्यामुळे कुठलेही फोटो काढलेले नाहीत अधिक माहितीसाठी youtube वर "अशी बनते एसटी " नावाची डोकमेंटरी उपलब्ध आहे
फेसबुक लिंक : ग्रुप साठी
https://www.facebook.com/search/top/?q=msrtc%20lovers%20group%20-%20st%…
वाचने
22004
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारत २/३/४ एन्जिनात काय फरक
कर्नाटक राज्य परिवहन टाटा आणि
In reply to भारत २/३/४ एन्जिनात काय फरक by कंजूस
ड्राइवरच्या मागचं पार्टिशन
हा प्रकार एसटी ने केला होता
In reply to ड्राइवरच्या मागचं पार्टिशन by कंजूस
काहितरीच दावा आहे
In reply to हा प्रकार एसटी ने केला होता by आलमगिर
कर्नाटकाच्या बसेस जास्त
In reply to काहितरीच दावा आहे by कंजूस
महा एसटीचा यूएसपी आहे तुलनेने
In reply to कर्नाटकाच्या बसेस जास्त by अभ्या..
शिवाय ते काहीतरी स्पीड लॉक का
In reply to महा एसटीचा यूएसपी आहे तुलनेने by बिटाकाका
महा एसटीचा यूएसपी आहे तुलनेने
In reply to कर्नाटकाच्या बसेस जास्त by अभ्या..
मुंबई -पुणे स्टे- सोलापूर-
In reply to कर्नाटकाच्या बसेस जास्त by अभ्या..
उत्तम लेख. एरवी ही माहिती सहज
धन्यवाद गवि
In reply to उत्तम लेख. एरवी ही माहिती सहज by गवि
चांगला लेख!(मला हल्ली मिपावर
स्पष्टीकरण
In reply to चांगला लेख!(मला हल्ली मिपावर by शब्दबम्बाळ
मस्त आहे तुमचा ग्रुप. लेख पण
खूप सुंदर माहिती! दापोडीच्या
कल्याण डोंबिवली वाहतूक
एस्टीच्या पुढील दारापाशी
In reply to कल्याण डोंबिवली वाहतूक by मार्मिक गोडसे
छान माहिती
कदंबला नाॕन इनकम रुट्स
In reply to छान माहिती by पैसा
आहे
In reply to कदंबला नाॕन इनकम रुट्स by आलमगिर
एस. टी.ला महाराष्ट्रात पर्याय
In reply to छान माहिती by पैसा
ग्रेट
ह्याच कार्यशाळेत आम्ही म्हणजे MSRTC LOVERS GROUP च्या सदस्यांनी भेट दिली.क्या बात है ! प्रेम कुणी अगदी कशावरही करु शकतो एस टी हा कोणाच्या इश्क चा विषय असु शकतो हीच माहीती मोठी रोमांचक आहे. म्हणजे या धक्क्यातुन सावरल्यावर पुढील प्रतिसाद देतो.अहो आमच्या फेसबुक ग्रुपची
In reply to ग्रेट by मारवा
पण हे सर्वच १५००० सदस्य नेहमी
In reply to अहो आमच्या फेसबुक ग्रुपची by आलमगिर
फक्त लव्ह न करता त्या
In reply to पण हे सर्वच १५००० सदस्य नेहमी by प्रचेतस
छान लेख
S T प्रोफेशनली चालवली तर
In reply to छान लेख by रीडर
डोंबलाची प्रोफेशनल.
In reply to S T प्रोफेशनली चालवली तर by शलभ
शिवशाही निदान वल्लभ नगरपर्यंत
In reply to डोंबलाची प्रोफेशनल. by अभ्या..
मग निगडी पर्यंत आणायलाही काही
In reply to शिवशाही निदान वल्लभ नगरपर्यंत by बिटाकाका
छान लेख
कालचीच लोकसत्ता बातमी
In reply to छान लेख by रीडर
उत्तम लेख ! सुंदर माहिती !
एसटी चासिस विकत घेवुन त्यावर
In reply to उत्तम लेख ! सुंदर माहिती ! by चौथा कोनाडा
>>एसटीचे दापोडी वर्कशॉप अतिशय
In reply to उत्तम लेख ! सुंदर माहिती ! by चौथा कोनाडा
छान माहिती ! धन्यवाद.
In reply to >>एसटीचे दापोडी वर्कशॉप अतिशय by नितिन थत्ते
माझे मत
>>आगारातून वेअवेगळ्या
कारण आगारे ही सरकारने
In reply to >>आगारातून वेअवेगळ्या by नितिन थत्ते
एक गोष्ट नक्की आहे की एस्टीला
In reply to >>आगारातून वेअवेगळ्या by नितिन थत्ते
बादवे जाता जाता एक सांगा.
In reply to एक गोष्ट नक्की आहे की एस्टीला by आलमगिर
त्ये जय महाराष्ट्र कायतरी
In reply to बादवे जाता जाता एक सांगा. by अभ्या..
तंत्रज्ञानाचा वापर वाढावयास हवा
In reply to एक गोष्ट नक्की आहे की एस्टीला by आलमगिर
एसटीत जे काही डोकेबाज लोक
प्रवाशाला आगरातल्या घाणेरड्या
In reply to एसटीत जे काही डोकेबाज लोक by कंजूस
मुंबई नाशिक हा एक महत्वाचा
उत्तम चर्चा! खूप महत्वाचा आणि
अगदी सहमत
In reply to उत्तम चर्चा! खूप महत्वाचा आणि by हतोळकरांचा प्रसाद
उत्तम चर्चा चालू आहे.
सर्व सुचना मा.