- डॉ. सुधीर रा. देवरे
बाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा. पण घरचा गहू असूनही कोणी रोज चपात्या खात नव्हतं.
अशा जेवणा व्यतिरीक्त कुठं वेगळं जेवण दिसलं की ती खाण्याची चैन समजली जायची. नातेवाईकांकडे- भावबंदांकडे पाहुणे आले की पाहुण्यांना जेवण सांगण्याची पध्दत होती. पाहुण्याला त्यातल्यात्यात उजवं जेवण म्हणून भजींची आमटी, भाकर, भात, लोणचं, पापड, कांदा असं ताट भरून वाढलं जायचं. ज्या पाहुण्याला जेवायला बोलवलं त्याला कोणी बाहेर विचारलं, ‘काय जेवण होतं’, तर तो पाहुणाही केवळ भजींची आमटी न म्हणता ताट भरून आलेल्या सगळ्या जीनसांची नावं सांगायचा.
भात हा अलिकडील जेवणात नैसर्गिक पदार्थ समजला जात असला तरी, खिचडी- भात त्याकाळी इथल्या जेवणाचा भाग नव्हता. लोकांकडे केवळ सणाच्या दिवशी सार सोबत भात खावा लागतो म्हणून दुकानातून तेवढ्यापुरता बिटेभर वा चिटेभर तांदुळ मागवला जायचा. तांदळाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या प्रकारानुसार त्याची किंमत ठरलेली असते हे ही त्यावेळी माहीत नसायचं. दुकानदार जो काही बिटेभर तांदूळ देईल आणि जी किंमत सांगेल तो तांदुळ भातासाठी घेतला जायचा. म्हणजे गावात तांदळाच्या व्हरायट्या दुकानदाराकडे नसत.
भाकरी सोबत आजच्या काही भाज्या त्या काळात दिसत होत्या तरी तेव्हा रानभाज्यांचे प्रमाण जेवणात जास्त प्रमाणात होतं.
ज्याला कदान्न म्हटलं जाईल अशा प्रकारचे पदार्थ त्यावेळी नाइलाज म्हणून खावे लागत असले तरी तो एक पारंपरिक खाद्य पदार्थांचा आणि लोकजीवनाचाच अविभाज्य भाग बनून गेला होता. म्हणून ते कदान्नही आवडीने खाल्लं जायचं. यापैकी काही पदार्थांना सणसणीत चव असायची.
सोलासनं बट्ट, सोलासनं तिखं, लसुननं तिखं, कोंडाळं, घाटा, बेसन, सुघरं भुगरं, मटमुंगना वडानं बट्ट, मिरचीना खुडा, कुळीदनी घुगरी, कुळीदना मुटकळा, लोंचाना खार, मिरचीना ठेचा, काळा समार, तेलगुळना काला, चिखल्या, गुळ टाकून शिजवलेले शिळ्या भाकरीचे तुकडे अशा प्रकारचे पौष्टीक नसलेले आणि काही बेचव असलेले पदार्थ कांदा तोंडी लावून भाकरी सोबत खाऊन लोक आपल्या कामाला लागायची. झिंदरं आणि वांगानं भरीत त्यातल्या त्यात चविष्ट पदार्थ असायचे.
आता सांगितलेले अनेक खाद्य पदार्थ आज एकतर नामशेष झाले आहेत वा आपल्या जीवनातून हद्दपार होण्याच्या बेतात आहेत. आजचा आहार हा समतोल आहाराऐवजी गरजेपेक्षा जास्त आणि चमचमीत चवीचा आहार दैनंदिन जेवणात घेतला जातो. मात्र हा आहार दुर्गम खेड्यातले गरीब लोक अजूनही घेत आहेत. असं कदान्न खाऊनही ते अर्धपोटीच राहतात. ज्यांची स्थिती आज मध्यमवर्गीय म्हणता येईल अशी प्रगती केलेले लोक हे पदार्थ विसरून गेले आहेत.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
वाचने
11711
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठल्या भागात?
पूर्वीच्या खान्देश चे वर्णन
In reply to कुठल्या भागात? by कपिलमुनी
बर
In reply to पूर्वीच्या खान्देश चे वर्णन by उपेक्षित
त्यांनी लेखात
In reply to कुठल्या भागात? by कपिलमुनी
उत्तर
In reply to त्यांनी लेखात by प्रसाद_१९८२
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र
In reply to कुठल्या भागात? by कपिलमुनी
सहमत
In reply to कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र by अमरेंद्र बाहुबली
:)
In reply to कुठल्या भागात? by कपिलमुनी
उत्तर
In reply to कुठल्या भागात? by कपिलमुनी
उत्तर
In reply to कुठल्या भागात? by कपिलमुनी
उत्तर
In reply to कुठल्या भागात? by कपिलमुनी
छान लेख.
धन्यवाद
In reply to छान लेख. by अमरेंद्र बाहुबली
छान
बर
In reply to छान by manguu@mail.com
लेख आवडला
बरोबर
In reply to लेख आवडला by पैसा
मस्त लेख
हुलगे म्हणजे कुळीथ ना? कुळीथ
In reply to मस्त लेख by चांदणे संदीप
हुलगे म्हणजे कुळीथच पण
In reply to हुलगे म्हणजे कुळीथ ना? कुळीथ by प्राची अश्विनी
एकुणात कुळीथ हा हुच्च शब्द
In reply to हुलगे म्हणजे कुळीथच पण by चांदणे संदीप
कोड्यास की कोरड्यास? मी इतके
In reply to एकुणात कुळीथ हा हुच्च शब्द by किसन शिंदे
कोरड्यास.
In reply to कोड्यास की कोरड्यास? मी इतके by प्राची अश्विनी
टायपो एरर
In reply to कोड्यास की कोरड्यास? मी इतके by प्राची अश्विनी
पुर्वी कोकणात
In reply to हुलगे म्हणजे कुळीथ ना? कुळीथ by प्राची अश्विनी
...
In reply to पुर्वी कोकणात by प्रसाद_१९८२
डांगर हे उडदाच्या पिठाचेच
In reply to ... by manguu@mail.com
कुळथाच्या पिठीचे पण डांगर
In reply to डांगर हे उडदाच्या पिठाचेच by सस्नेह
खरय
In reply to मस्त लेख by चांदणे संदीप
खरय
In reply to मस्त लेख by चांदणे संदीप
छान माहीती
हो अगदी खरे. पारंपारीक
In reply to छान माहीती by सुखीमाणूस
्खरय
In reply to हो अगदी खरे. पारंपारीक by जागु
खरय
In reply to छान माहीती by सुखीमाणूस
आज काल रुजुता दिवेकर ट्रेंड
धन्यवाद
In reply to आज काल रुजुता दिवेकर ट्रेंड by प्राची अश्विनी
वैद्यकीय शास्त्राप्रमाणे
खूप छान
In reply to वैद्यकीय शास्त्राप्रमाणे by सुबोध खरे
आमच्या रायगड जिल्ह्यात तांदुळ
भाताच्या तांदळाचे नाव आता
In reply to आमच्या रायगड जिल्ह्यात तांदुळ by जागु
भाताच्या तांदळाचे नाव आता आठवत नाही.कोलम.कोलम उशिरा आला. कोलम म्हणजे
In reply to भाताच्या तांदळाचे नाव आता by डॉ सुहास म्हात्रे
एकदम बरोबर.धन्यवाद
In reply to आमच्या रायगड जिल्ह्यात तांदुळ by जागु
रत्ना आणी रातांबा
In reply to आमच्या रायगड जिल्ह्यात तांदुळ by जागु
बरोबर रत्ना चे पीक असायचे.
In reply to रत्ना आणी रातांबा by इरसाल
रायगड जिल्हा: घरी पीक जया आणि
In reply to बरोबर रत्ना चे पीक असायचे. by जागु
चांगला लेख
30- 40 वर्षापूर्वीचे
In reply to चांगला लेख by मराठी कथालेखक
गहूक्रांतीची विषवल्ली
योगेंद्र यादवांचा लेख त्यात
In reply to गहूक्रांतीची विषवल्ली by मराठी कथालेखक
ज्वारी बद्दल असहमत
In reply to योगेंद्र यादवांचा लेख त्यात by सुबोध खरे
कर्नाटक मधील
In reply to योगेंद्र यादवांचा लेख त्यात by सुबोध खरे
सजुगर्याची कडक भाकरी म्हणतात
In reply to कर्नाटक मधील by प्रसाद_१९८२
एखादा बेळगाव किंवा धारवाड ला
In reply to कर्नाटक मधील by प्रसाद_१९८२
वाचतो.धन्यवाद
In reply to गहूक्रांतीची विषवल्ली by मराठी कथालेखक
आम्ही सवय लावतोय स्वतःला. मी
बाजरीची भाकरी आणि शक्य
कालच बाजरीची भाकरी लोणी
In reply to बाजरीची भाकरी आणि शक्य by गवि
वाह हुजूर. क्या बात है..
In reply to कालच बाजरीची भाकरी लोणी by सुबोध खरे
मज्जाय तुमची! भाकरीसोबत
In reply to कालच बाजरीची भाकरी लोणी by सुबोध खरे
कोकणात गहू, ज्वारी, बाजरी ही
खूप छान. धन्यवाद
In reply to कोकणात गहू, ज्वारी, बाजरी ही by डॉ सुहास म्हात्रे
बरोबर. आम्ही अजूनही कोलम
In reply to कोकणात गहू, ज्वारी, बाजरी ही by डॉ सुहास म्हात्रे