Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 02/15/2018 - 09:03
******************* पोर वेडी पोट पकडुन झोपते माय दिसता भूक विसरुन नाचते देव सांगा राहतो कुठल्या घरी? बंद दाराच्या गजातुन शोधते एकदा भेटायचे बाबा तुला पत्र कोरे रोज हटकुन टाकते ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे पोर आहे..., माय विनवुन सांगते भूक त्यां डोळ्यात आहे दाटली वेळ थोडा पदर पसरुन मागते भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा त्याचसाठी देह वाटुन टाकते रोज आत्मा खर्चते माझाच मी लाज माझी मीच उधळुन सोडते ******************* © विशाल विजय कुलकर्णी

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 02/15/2018 - 10:04

Permalink

थोड़ी आवश्यक सुधारणा..

थोड़ी आवश्यक सुधारणा.. लाज पोर वेडी पोट पकडुन झोपते माय दिसता भूक विसरुन नाचते देव सांगा राहतो कुठल्या घरी? बंद दाराच्या गजातुन शोधते एकदा भेटायचे बाबा तुला पत्र कोरे रोज हटकुन टाकते ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे पोर आहे..., माय विनवुन सांगते भूक त्यां डोळ्यात आहे दाटली वेळ थोडा पदर पसरुन मागते भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा त्याचसाठी देह वाटुन टाकते रोज आत्मा खर्चते माझाच मी लाज माझी मीच उधळुन सोडते © विशाल विजय कुलकर्णी
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on गुरुवार, 02/15/2018 - 14:05

Permalink

सुन्न :(

सुन्न :(
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on गुरुवार, 02/15/2018 - 14:52

In reply to सुन्न :( by पद्मावति

Permalink

+१

विषण्ण करून गेली कविता! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 02/15/2018 - 15:26

Permalink

_/!\_

_/!\_
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Fri, 02/16/2018 - 09:16

Permalink

सुन्न करणारी कविता!

सुन्न करणारी कविता!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 02/16/2018 - 14:53

Permalink

.

. काय प्रतिक्रिया लिहावी तेच समजत नाहीये. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by समाधान राऊत on Fri, 02/16/2018 - 15:38

Permalink

...

...
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Fri, 02/16/2018 - 16:06

Permalink

:( फार विषण्ण करणारी कविता..

:( फार विषण्ण करणारी कविता..
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 02/19/2018 - 13:49

Permalink

_/!\_

_/!\_
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 02/19/2018 - 22:50

Permalink

टोकदार

आणि भेदक अशा जखमा प्रकट आणि अव्यक्त ही अवतीभवती आहेत माणसांच्या जंगलातला नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 02/22/2018 - 11:24

In reply to टोकदार by नाखु

Permalink

धन्यवाद नाखुशेठ !

धन्यवाद नाखुशेठ !
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3947 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com