Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २२

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 12/02/2018 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार. https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-co…

वाचने 39962
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

जीनांच्या थडग्याला माथा टेकवला त्यांना कशाला अडगळीत टाकता, त्यांचे पण उदोउदो होऊ द्यात. आणखी एक कोण तरी कुलकर्णी होते पुस्तक प्रकाशन करून आले, त्यांनी काय तुमचं बोका मारलाय का ? ... यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. खाजपी देखील पाकप्रेमी आहेत हे उघड गुपित आहे.

In reply to by विशुमित

पाप हो ही.. नको तितके लाड केले आहेत एका धर्माचे फक्त ममतान्कडे बघून. भारतात बरेच पाक्प्रेमी आहेत. ते पुरोगामी आणि समाजवादी कसली कुई घालतील. पण खरच वाट्त एखादा तरी भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा. जसा म्यानमारने ऱोहिन्ग्या मुसलमान लोकांना शिकवला तसा. पण आपले अन्तर्गत विरोधक असले काही होऊच देणार नाहीत.

In reply to by सुखीमाणूस

13 Feb 2018 - 12:13 pm | सुखीमाणूस माझ्या मते प्रत्यक्ष युद्ध करण्यापेक्षा राजनैतिक डावपेच महत्त्वाचे आहेत. आणि अर्धा तासच्या आतच 13 Feb 2018 - 12:41 pm | सुखीमाणूस पण खरच वाट्त एखादा तरी भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा. जसा म्यानमारने ऱोहिन्ग्या मुसलमान लोकांना शिकवला तसा. >> :)

In reply to by एमी

एक दिवस नक्कीच पाकिस्तानला धडा मिळेल. फ़क्त भारतात अजून काही वर्ष मुस्लीम प्रेमी सरकार यायला नको. आले भाजपा आणि सुटले सगळे प्रश्न 5 वर्षात असे तर नक्कीच शक्य नाहीये. मी स्वता भाजपा किवा मोदी यांचा जो प्रौपगन्डा चालू आहे त्याची समजून उमजून समर्थक आहे (तो जरा कमी होईल आता असे वाट्ते आहे) आजवर सत्ताधारी लोकानी हेच केले. आम्हीच पुरोगामी व अल्प्सन्ख्यन्चे तारणहार असे म्हणत व हिन्दु उच्चवर्णियान्ची भीती घालत राज्य केले. स्वातंत्र्य फक्त आमच्या पक्षामुळे मिळाले असे ठसवत सतत मते मिळवली. एखादा कमी कपड्यात नाचतोय आणि एखाद्याला प्रेक्शक आपल्याकडे वळवायचे आहेत तर त्याला पण तसेच नाचावे लागणार. वाट बघायची प्रेक्शकान्ची अभिरुची कधी सुधारते त्याची!!! फक्त भीती हीच की तोच बिघडत जायचा....

In reply to by सुखीमाणूस

तथाकथित मुस्लिमप्रेमी काँग्रेसनेच तीन तीन वेळा पाकिस्तानला धडा शिकवला आहे. कालपरवा जन्माला आलेल्या दुधपित्या बच्च्यांना मात्र ते माहित नसतं.

In reply to by मेघपाल

नक्कीच चांगल केल जेव्हा जेव्हा पाक ने युद्ध लादले तेव्हा तेव्हा चांगला धडा शिकवला. पण त्याचवेळी भारतीय मुसलमान मात्र मागास ठेवले. फक्त मतपेढी एवढाच विचार केला.

हायला , गंमतच आहे.. अखंड हिंदुस्तान , नथुरामचा जयजय पण करायचं आणि पाकिस्तानवर प्रेमही करायचे नाही .. !!! गंमतच की ! अफगाणिस्तान ते मालदीव सगळ्यावर प्रेम करणारा असेल तरच तो अखंड हिंदुस्तानचा पाईक ठरेल ना ?

ओमानमध्ये पंप्र ची कॉंग्रेसवर टीका सतत प्रचारकी मोड असला की असे होते. बाहेरच्या देशात जाऊन सुद्धा काँग्रेसने यंव केला त्यांव केला, याला बघितला की शाळेमधली खेळणं हरवल की ८ दिवस रडत जाणारी पोरं आठवतात. 150 वर्षांनंतर काँग्रेस आले तेव्हा ते सुद्धा एवढे रडले नव्हते. आणि देशांतर्गत टीका करा , बाहेर जाऊन कशाला तेच दळण ?? आम्ही पंप्र चा मान राखण्या अगोदर त्यांनी स्वतः तो ठेवायला शिकला पाहिजे. मोदीजी , तुम्ही भाजपाचे नाही देशाचे पंतप्रधान आहात.

In reply to by कपिलमुनी

१. तुम्ही स्वतः टाकलेली लिंक तरी नीट वाचली का? २. त्या लिंक मधील बुलेट मध्ये कुठे काँग्रेसवर टीका केली आहे? ३. ओमान मध्ये जाऊन भारतीयांच्या मेळाव्यात पंतप्रधान आपली बाजू मांडत असतील तर भारताबाहेर वगैरे ओरडण्यात जळफळाटाशिवाय इतर काही आहे का? ४. मागच्या सरकारांनी केलेली घाण भारताच्या नागरिकांनी (मग जगात कोठेही असोत) कळू नये हि इतकी "पुरोगामी" भूमिका कशाला? काँग्रेस, सरकारमध्ये असताना भाजपाबद्दल बोलत नव्हती का? कायमस्वरूपी हिंदुत्ववादी म्हणून हिंणावताना हि पुरोगामी भूमिका कुठे गेली होती? हिंदुत्ववादी म्हणजे जणूकाही शिवी आहे अशी परिस्थिती करून स्वतःचं सरकार असताना बोंबलणारे आता त्यांच्यावर टीका केली तर का विरोध करत आहेत? ५. भाजपने आम्ही काय केले हे सांगताना मागे काय होते हे सांगितले तर एवढा जळफळाट का व्हावा? ६. मागच्या सरकारचा नाकर्तेपणा आम्हाला सांगू नका नाहीतर आम्ही मागच्या सरकारला परत आणू असली विचित्र भूमिका मांडताना स्वतःचं पितळ उघडं पडतंय हे लक्षात येत नसेल का? ७. १० पैकी एका वाक्यात काँग्रेसवर टीका केली कि पूर्ण भाषण काँग्रेसवर होतं म्हणून ओरडताना स्वतःचा दांभिकपणा उघडा पडतोय हे लक्षात येत नसेल का? ८. स्वतःला हवं तेच वाचायचं/ऐकायचं असेल तर मोदींकडे असल्या लोकांपर्यंत स्वतःचे मुद्दे पोहोचवण्याचा काय मार्ग राहतो? चितभी मेरी, पट भी मेरी!

पणजी - एका युवा संमेलनात युवकांशी संवाद साधताना (शुक्रवार) गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तरुणांच्या वाढत्या व्यसनाधिनेतबाबत चिंता व्यक्त केली. त्यावेळी मुलींनी देखील दारु प्यायला सुरुवात केली आहे, याची भिती वाटत असल्याचे पर्रीकर म्हणाले होते. परंतु, असे वक्तव्य करणे पर्रिकर यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर विशेष मोहिम सुरु करण्यात आली असून, #GirlsWhoDrinkBeer हा हॅशटॅग वापरुन आपला बिअरसोबतचा फोटो ट्विटरवर महिला आणि तरुणी पोस्ट करत आहेत. ''हो आम्ही बिअर पितो'' असे या मुलींनी सांगितले आहे. ट्विटरवर या मुली पर्रिकर यांना टॅगही करत आहेत. इतकेच नाही तर अनेकींनी त्यात चिअर्स असेही लिहीले आहे. याशिवाय महिलांनो पिणे का थांबवावे? असा सवालही काहींनी व्यक्त केला आहे. पुरुषांनीही त्यांच्या या विधानाचा समाचार घेत आपला राग व्यक्त केला आहे. (दै. सकाळ)

In reply to by प्रचेतस

आपल्या प्राचीन संस्कृती मध्ये महिला दारू प्यायच्या का ? ( प्रश्न राजकीय नाही , असा उल्लेख आहेत का अशी उत्सुकता आहे. पुरुष भरपूर प्यायचे हे वाचले आहे )

In reply to by कपिलमुनी

हो. उल्लेख आहेत पण तुरळक. रावणाच्या लंकेत हनुमान जातो तेव्हा अंत:पुरात मद्यधुंद होऊन पडलेल्या रावणाच्या कित्येक राण्यांचे दर्शन त्याला होते. राम लक्ष्मण, सीता वनवासास जाताना सीता गंगेची प्रार्थना करताना तिला वनवास संपवून परत येताना मद्याचे सहस्त्र घट अर्पण करेन असे बोलते. खांडवदाह प्रसंगी, तसेच चित्ररथ गंधर्वाच्या प्रसंगी कृष्णार्जुन त्यांच्या स्त्रियांसह मद्यधुंद अवस्थेत विहार करतानाचे उल्लेख आहेत.

In reply to by विशुमित

वाचनात आली नाहीत, खुद्द शिवाजी महाराजांचा दैनंदिन आहार काय होता ह्याचेही उल्लेख कुठे मिळत नाहीत तर स्त्रीयांच्या मद्यपानाचे कुठे मिळावेत. विजयनगरच्या परदेशी प्रवाशांच्या वर्णनात कदाचित काही उल्लेख असतील, सोमेश्वर चालुक्याच्या मानसोल्लात मद्यविषयक उल्लेख नक्कीच आहेत पण स्त्रीयांच्या मद्यपानाविषयी नाहीत. अजिंठ्याच्या भित्तीचित्रांवर मात्र राजा राणी हे दोघेही मद्यपान करतानाचे चित्र आहे उदा. विश्वंतर जातक चित्र. आणि तत्कालीन चित्रांतील, शिल्पांतील प्रसंग हे तत्कालिन समाजजीवनाचेच प्रतिक असतात असे मला वाटते. a

In reply to by प्रचेतस

मला कायम महाराज व्हेज होते की नॉनव्हेज हा प्रश्न पडतो, आता प्रचेतस उत्तर नाही म्हणालेत म्हणजे सगळ्याच आशा मावळल्या!.

हरियाणातील स्थानिक भाजपा नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघातून किमान 1,111 बाईक्स आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हरियाणात एकूण विधानसभा 90 मतदारसंघ आहेत. यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडून प्रदूषणाच्या मुद्द्यावरून या बाईक रॅलीवर आक्षेप घेण्यात आला होता. या रॅलीत तब्बल 1 लाख बाईक सहभागी होणार आहेत. परंतु, सध्या दिल्लीत प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी या बाईक रॅलीमुळे या प्रदूषणात आणखीनच भर पडेल. त्यामुळे या रॅलीतील मोटारसायकलींच्या संख्येवर निर्बंध घालावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यानंतर हरित लवादाकडून केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला नोटीस पाठवण्यात आली होती. सौजन्य- दैनिक लोकमत -------------------------------- ते प्रदूषण थोडे बाजूला ठेऊ, अशी रॅली काढून पेट्रोलच्या किमती कमी होणार आहेत का ? http://www.lokmat.com/national/amit-shah-rally-1111-bikes-each-haryana-…

In reply to by बिटाकाका

जागेवरच उभ्या का राहतील ? ८० प्लस च पेट्रोल टाकून फिरणारच ना. कृपया लॉजिक समजावता का तुमच्या प्रतिसादाचे?

In reply to by विशुमित

तुम्हीच तुमच्या रॅली आणि प्रदूषण संबंधाचं लॉजिक समजावा आधी. बादवे, मध्ये एक हल्लाबोल रॅली होऊन गेली. बऱ्याच गाड्यांचा ताफा फिरत होता म्हणे. किती प्रदूषण झाले असेल देव जाणे!

In reply to by बिटाकाका

मला वाटलेच होते तुमची प्रतिसाद वाचण्यात गल्लत झाली असणार. मी लोकमत मधील बातमी दिली आहे आणि प्रदूषण होते याला माझा विशेष आक्षेप नाही आहे. रॅली काढून पेट्रोलचे भाव कमी होणार का हा मला दैनिंदिन भेडसावणारा प्रश्न उपस्थित केला होता. उपरोधिक प्रतिसाद होता. .... बादवे, मध्ये एक हल्लाबोल रॅली होऊन गेली, पण टीव्ही वर आम्हाला जास्त दिसली नाही. कोणी तरी म्हणत होते इंटरनेट सेवा सुद्धा काही काळ बंद केल्या होत्या. त्यामुळे हल्लाबोल बद्दल विशेष माहिती नाही आहे.

In reply to by विशुमित

>>> बादवे, मध्ये एक हल्लाबोल रॅली होऊन गेली, पण टीव्ही वर आम्हाला जास्त दिसली नाही. कोणी तरी म्हणत होते इंटरनेट सेवा सुद्धा काही काळ बंद केल्या होत्या. त्यामुळे हल्लाबोल बद्दल विशेष माहिती नाही आहे. असली काही रॅली होऊन गेली हे कळले सुद्धा नाही. यातले "कोणी तरी" म्हणजे सुळेवहिनी, नबाब मलिक, अजित पवार इ. असावेत.

In reply to by श्रीगुरुजी

उद्यापासून ऊत्तर महाराष्ट्रात चालू होतो आहे हल्लाबोल.... मागील रॅली कळली नव्हती म्हणून ही पुढील चुकू नये यासाठी माहिती. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1205146972952269&id=5527869…

In reply to by विशुमित

रॅलीचे मिनिटामिनिटाचे अपडेट्स टाका. आमची तेवढीच करमणूक. मागच्या रॅलीत तोंडी तलाकला पाठिंबा जाहीर करून मुल्लामौलवींची परवानगी घेण्याचा पुरोगामी सल्ला देण्यात आला होता. या रॅलीत बहुतेक कंजारभाट जातीतील कौमार्य चाचणी किंवा बोहरींमधील female circumcision ला उस्फूर्त पुरोगामी पाठिंबा जाहीर केला जाईल.

स्वयंघोषित फुरोगाम्यांना येऊन-जाऊन सारखे ‘अघोषित आणीबाणी’च्या नावाने गळे काढून फक्त रडता येते. केरळ, बंगाल येथे स्वयंसेवकांच्या होणाऱ्या हत्येबद्दल फुरोगामी नेहमीच मूकदर्शक राहतात. ‘आधी आपलं घर सुधारू मग त्यांचं’ असा आविर्भाव आणणाऱ्या फुरोगाम्यांना स्वत:च्या विचारधारेतील दोष सुधारूया असे कधीच वाटत नाही. आता तर नवीच टूम काढली आहे. सरसंघचालकांनी स्वयंसेवकांची तुलना लष्कराशी केलेली आहे, असा खोटा आरोप करून हेच कालपर्यंत दगडफेक्यांचे समर्थन करणारे फुरोगामी आता लष्करासोबत कोरडी सहानुभूती दाखवित आहेत. फुरोगामी जमात हा पुरोगाम्यांमधील एक वाट चुकलेला वर्ग असून ह्यांच्यामुळे पुरोगामी व फुरोगामी यांदरम्यान एक बारीक रेघ आखल्या जाऊन त्यांच्यातील फरक कळेनासा होतो.

In reply to by विशुमित

हेच लॉजिक जवानांना लावणार का तुम्ही? नाही म्हणजे पराक्रम आणि सहकाऱ्यांचे प्राण वाचवणे याच्या संबंधाचं लॉजिक समजावून सांगता का?

In reply to by बिटाकाका

हे लॉजिक नाही लावणार. ते पराक्रम गाजवून पुन्हा वचपा काढतात, स्वयंसेवकांनी कशा प्रकारे बदला घेतला ते सांगता का ? जवान म्हणत नाहीत, आम्ही शाहिद होतो म्हणून लोकांनी आमच्यासाठी गळे काढावेत. त्यांचे ते स्वयम्भू असतात. बायदवे केरळ मध्ये पुरोग्यम्यांबरोबर पार हत्या होई पर्यंत कसले पराक्रम करत आहेत स्वयंसेवक ?

In reply to by विशुमित

ते पराक्रम गाजवून पुन्हा वचपा काढतात, स्वयंसेवकांनी कशा प्रकारे बदला घेतला ते सांगता का ?
त्यांनी घ्यायला पाहिजे होता अशी आपली अपेक्षा दिसते, काहींच्या काही!
जवान म्हणत नाहीत, आम्ही शाहिद होतो म्हणून लोकांनी आमच्यासाठी गळे काढावेत. त्यांचे ते स्वयम्भू असतात.
संदर्भ देता का संघाने काही गळा काढला असेल त्याचे? आणि कोणाच्या शाहिद होण्यावर कोण गळे काढतंय हे दिसतंच असते अधूनमधून. लोकशाहीची हत्या, चौथ्या खांबावर हल्ला, पुरोगाम्यांवर हल्ला, मेणबत्ती मोर्चा ई. ई. ऐकले असेलच (नाही, म्हणजे ऐकायचे असेल तर). असे गळे उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या हत्यांबाबत निघताना दिसले का कधी?
बायदवे केरळ मध्ये पुरोग्यम्यांबरोबर पार हत्या होई पर्यंत कसले पराक्रम करत आहेत स्वयंसेवक ?
ते संविधानाला धरून चालत होते! तुमची अपेक्षा आहे का कि त्यांनी त्यांच्या हत्यांचे बदल घ्यायला पाहिजे होते? पाकिस्तानचा बदला घेणे आणि देशांतर्गत हत्यांचा बदला घेणं एकाच आहे जणू आपल्या मते!

In reply to by बिटाकाका

हा फरक समजला ना जवान आणि स्वयंसेवकांमधला. बस्स एवढेच मला सांगायचे होते. बायदवे हे पुरोगामी का फुरोगामिनी मोर्चे नाही काढले तर तीन दिवसात आर्मी उभी करणाऱ्यांनी किमान तेवढे तरी करायला पाहिजे, संविधानाच्या चौकटीत राहून. नाही का ?

In reply to by विशुमित

कोणता फरक? जरा नीट इस्कटून सांगता का? आणि तुम्ही म्हणता तो फरक कोणी कधी नाकारलंय हेही जरा सांगा? त्यांनी मोर्चे काढायला पाहिजे होता का कोर्टात जाऊन केस लढ्याला हवी होती हा त्यांचा त्यांचा आणि त्य्नाच्या संघटनेचा प्रश्न आहे. इतरांचा त्याच्याशी काय संबंध? जवान म्हणत नाहीत कि आम्ही शाहिद होतो म्हणून लोकांनी आमच्यासाठी गळे काढावेत तर मग असे कोण म्हणते याबद्दल आपलं काय मत आहे?

In reply to by बिटाकाका

प्रतिसाद करता म्हणतोय : स्वयंघोषित फुरोगाम्यांना येऊन-जाऊन सारखे ‘अघोषित आणीबाणी’च्या नावाने गळे काढून फक्त रडता येते. केरळ, बंगाल येथे स्वयंसेवकांच्या होणाऱ्या हत्येबद्दल फुरोगामी नेहमीच मूकदर्शक राहतात. तुम्ही म्हणताय : असे गळे उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या हत्यांबाबत निघताना दिसले का कधी ? === आता इथे पुरोगाम्यांनी यांच्यासाठी का म्हणून गळे काढावेत ? जे त्यांच्या विचारसरणीचे नाही आहेत. खेद वाटत असावा. पण बोलून दाखवले नसेल. सिम्पल लॉजिक आहे. मग याठिकाणी त्या डाव्या पुरोगाम्यांचा वचपा काढायला/बदल घायला मी कुठे म्हंटले कि बंदुका घ्या (काठ्या घ्या ). डोकी फोड. कोणत्या प्रकारे बदल घेतला हे तुम्हाला विचारले. जे काही कायदेशीर मार्ग आहे त्यानुसारच करा. आर्मी देखील संविधानाच्या चौकटीत राहूनच सीमेवर काम करत असते. उजव्यांनी किमान मोर्चा काढून झालेला प्रकार निंदनीय आहे असे ठणकावून सांगायला पाहिजे. मी तरी अजून मिसळपाववर कोण्या स्वयंसेवकाची हत्या झाली म्हणून श्रद्धांजलीचा धागा / प्रतिसाद टाकलेला पाहिला नाही .(माझ्या नजरेतून सुटला असेल असेल तर कृपया दाखवा) ..... बायदवे केरळ मध्ये पुरोग्यम्यांबरोबर पार हत्या होई पर्यंत कसले पराक्रम करत आहेत स्वयंसेवक ? हे अनुत्तरीतच ठेवलेत. (खरंच मला तिथली परिस्थिती माहित नाही आहे म्हणून विचारतो आहे. गैरसमज नसावा.)

In reply to by विशुमित

तुम्हाला बहुतेक मूळ मुद्दा समजलेला नसावा! तर मला समजलेला मूळ प्रतिसादातील मुद्दा असा आहे कि पुरोगाम्यांना हे समजणे आवश्यक आहे कि जेव्हा अशा हत्या होतात तेव्हा तो एक गुन्हा असतो. उगाच लोकशाहीवर हल्ला वगैरे गळे काढायचे आणि जेव्हा अशाच हत्या जेव्हा आपल्या विचारसरणीच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या होतात तेव्हा मुकदर्शक बनायचे हा दांभिकपणा आहे. अशा हत्या जेव्हा होतात, तेव्हा लेट लॉ टेक इट्स कोर्स! कायद्याला आपलं काम करू द्या! उगाच लोकशाही आणि बाकीच्या गोष्टी करून स्वतःच्या दांभिकपणाचं प्रदर्शन कशासाठी? याउलट तुम्ही म्हणताय कि संघाने किंवा उजव्या विचारसरणीवाल्यानीही असं दांभिक प्रदर्शन करावं. हे पटत नाही. आणि हो उजव्यांनी ते केलं तरी ते दांभिक प्रदर्शनच असेल! यात तुमच्या बादवे चं उत्तर आलं असेल अशी अपेक्षा करतो! स्वयंसेवक हत्या रोखू शकण्यासाठी काय करू शकतात? (आणि म्हणून मी म्हणालो कि पराक्रम आणि स्वतःच्या सहकार्यांना वाचवणे याचा बादरायण संबंध कशाला जोडायचा - म्हणून सैनिकांचं उदाहरण!) ते संविधानात राहतात आणि ते कायद्याला त्याचा न्यायनिवाडा करण्याबद्दल पाठपुरावा करू शकतात! माझ्यामते उजवे हेच करत आहेत केरळ मध्ये!

In reply to by विशुमित

आता इथे पुरोगाम्यांनी यांच्यासाठी का म्हणून गळे काढावेत ? जे त्यांच्या विचारसरणीचे नाही आहेत. खेद वाटत असावा. पण बोलून दाखवले नसेल. सिम्पल लॉजिक आहे.
तुम्हांला नक्की फुरोगामी म्हणायचं आहे की पुरोगामी? सर्व समान, सगळे सारखेच असा स्वघोषित दंभ मिरवणाऱ्यांनी “आपल्या विचारसरणीचे नाहीत” म्हणून इथे समान न्याय लावू नये हे जरा खटकते.

In reply to by बिटाकाका

संदर्भ देता का संघाने काही गळा काढला असेल त्याचे?>>> ==>> बीटाकाका काय होतंय तुम्ही मूळ प्रतिसादकर्ता काय म्हणतोय आणि त्याला दिलेल्या उप प्रतिसादात मी काय म्हणतोय हे नीट वाचताना दिसत नाही आहात. गळे का काढले नाही असे प्रतिसादकर्ता म्हणतोय, संघ नव्हे. वाचताना "दक्ष राहा" हि आर्जव...

In reply to by manguu@mail.com

वर्षानंतर परत दक्ष का?

In reply to by सचिन७३८

खांग्रेसी लष्कराबद्दल कायमच आदरपूर्वक बोलतात. उदा. लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा 'सडकछाप गुंड' असा खांग्रेसी संदीप दिक्शितने केलेला गौरव.

In reply to by तर्राट जोकर

व्यक्तीलक्ष्य तर्कदोष मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते. मराठी विश्वकोशातील लेखक मे. पुं.रेगे ह्यांच्या मतानुसार 'विरोधकाच्या मतांचे खंडन न करता त्याच्या स्वभावावर किंवा वर्तनावर टीका करण्यात आलेली असते; विशेषतः विरोधकाचे वर्तन त्याने प्रतिपादन केलेल्या मतांविरुद्ध आहे असे दाखवून देण्यात आले असते. उदा., दारूबंदी असावी ह्या मतांवर टीका करताना दारूबंदीचे पुरस्कर्ते स्वतः दारू पीत असतात हे दाखवून देणे. व्यक्तिगत आरोप व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ("व्यक्तिगत आरोप " अथवा "व्यक्तिगत हल्ला") सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो. एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही. उदाहरणे " महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते." " तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही." "डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?" "तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही." "सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षाही महाराष्ट्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अधिक प्रेमात पडलं आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने मोदींवरील चार-पाच हजार नव्हे तर १.५ लाख पुस्तकांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ५९.४२ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी भाषेतील ही पुस्तके जिल्हा परिषदांच्या ग्रंथालयात ठेवण्यात येणार आहेत . चांगली पुस्तके घ्यायचे सोडून भंकस पुस्तके घेतात आणि त्याहून वाईट हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषातील पुस्तके ?? मराठी ग्रंथालयात मराठी पुस्तके ठेवणे उचित झाले असते . पण फडणवीसांना दिल्लीकरांना खुश करायचे असेल. असे वाचले की भाजपा हा काँग्रेसचा दुसरा चेहरा आहे हे पटते

In reply to by कपिलमुनी

माझ्या फेबू वर आलेला हा मेसेज. वाचा अाणि माध्यमे केवढा गोंधळ उडवून देतात हे लक्षात येईल. _*मोदींच्या पुस्तकांआडून विशिष्ट प्रकाशकांचा सरकारवर दबाव*_ - राजेश प्रभु साळगांवकर मुंबई, दि. 13 फेब्रुवारी 2018 : नरेंद्र मोदी यांच्यावरची लाखो पुस्तके घेतली असा खोटा प्रचार करत काही प्रसिद्धीमाध्यमातून येत असलेल्या बातम्यात काही तथ्य नसून काही विशीष्ट विचारसरणीचे नाराज प्रकाशक या बातम्यांच्या मागे असल्याचे कळते. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून काही विशिष्ट विचारांचे साहित्य समाजात पसरविण्याचे चाललेले "वैचारिक उद्योग" नवीन सरकार आल्यावर बंद पडल्याने हे विशिष्ट प्रकाशक सैरभैर झाले आहेत. मात्र राज्यातील प्रकाशकांच्या संघटनेने सरकारला पत्र लिहून नवीन निकष आणि प्रक्रियेबद्दल सरकारचे कौतुक केले आहे. यापूर्वी राज्याबाहेरचे अनेक प्रकाशक आपली सुमार पुस्तके राज्य सरकारच्या गळ्यात मारत होते. शिक्षण विभागातील अतिशय उच्चपदस्थ सूत्रांच्या म्हणण्यानुसार यातील अनेक पुस्तकांची मजकूर आणि निर्मितीमुल्ये यातील गुणवत्ता अत्यंत सुमार दर्जाची होती. यासंदर्भात राज्यातील अनेक प्रकाशकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात एक समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार सप्टेंबर 2017 मध्ये काढलेल्या निविदांप्रक्रियेत सुधारणा केली गेली आणि नवीन अटींसह तीच निविदा प्रक्रिया 13 जानेवारी 2018 रोजी पुढे राबवली गेली. त्यामुळे राज्याबाहेरचे अनेक प्रकाशक या प्रक्रियेतून बाहेर गेले. त्यांनी सादर केलेली पुस्तके दर्जा आणि शैक्षणिक मूल्ये या दोन्ही निकषांवर नाकारण्यात आली. त्यातील अनेक पुस्तके मूळ कुठल्या पुस्तकावरून तयार (भाषांतरित / आधारित) केली आहेत किंवा ती पूर्णतः नवीन सृजन आहे, हे ही कळत नव्हते. त्यातील विषयांचे नीट आकलनही होत नव्हते. तर अनेक पुस्तके ही एक विशिष्ट विचारसरणी प्रसारित करण्यासाठीच आहेत असे वाटावे, अशी स्थिती होती. यापूर्वी राज्यातील केवळ वीस प्रकाशक राज्य सरकारला ही अवांतर वाचनाची पुस्तके पुरवीत होते. आणि बहुसंख्य प्रकाशक हे राज्याबाहेरचे होते. मात्र आता राज्याबाहेरचे प्रकाशक नाहीत. राज्यातील प्रकाशकांचे संख्या चाळीसने वाढली आहे. निवड समितीने निवडलेली पुस्तके विषयाची मांडणी, वैचारिक दर्जा आणि निर्मिती मूल्ये या निकषांवर उत्कृष्ट आहेत, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. शिक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार मोदींवरची लाखो नव्हे तर केवळ 69 हजार पुस्तके खरेदी करण्यात अली आहेत. तर त्याच जोडीला छ.शिवाजी महाराजांवरची साडेचार लाख पुस्तके, अब्दुल कलाम यांच्यावरची अडीच लाख पुस्तके आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर आणि म.फुले यांच्यावरची 2 लाख पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत. ----------------------- *एका विशिष्ट विचारांचा प्रसार* एका विशिष्ट विचारसरणीचा प्रसार मागील सरकार कसे करत होते याचे उदाहरण सांगताना शिक्षण विभागातील एक उच्च पदस्थ अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले की पुण्यातील एका समाजवादी साप्ताहिकाच्या दीड लाख प्रती प्रत्येकी 40 रुपये या दराने पूर्वीचे सरकार घेत होते. (बाजारात ते साप्ताहित 15 ते 20 रु.च्या दरम्यान विकले जाते !) त्यातील विचारसरणी, त्यातील आराजकवादी आणि समाजाच्या श्रद्धा दुखवणारी तिखट भाषा याबद्दल तक्रारी प्राप्त होऊनही आधीच्या सरकारने हे पाक्षिक सरकारी खर्चाने शाळांना पाठवणे सुरू ठेवले होते. तावडेंकडे याविषयातील तक्रारी गेल्यावर तावडेंनी या साप्ताहिकाचे काही अंक पाहून ते नियतकालिक शाळांना न पाठविण्याचा निर्णय घेतला. सरकारी खर्चाने शाळांना जाणारी पुस्तके व नियतकालिके यातून राजकीय विचार नव्हे तर शैक्षणिक संस्कार आणि सकारात्मक विचार पोहोचले पाहिजेत हा तावडेंचा आग्रह आहे, असे या उच्च पदस्थाने सांगितले. त्यामुळे आजवर या सरकारी योजनांवर जगणाऱ्या ज्या विशिष्ट विचारसरणीच्या प्रकाशकांचे आणि राजकीय विचाराधारांचे नुकसान झाले आहे, त्यांनी काही माध्यमांना हाताशी धरून या विषयात गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा थेट आरोपही या उच्च अधिकाऱ्याने केला.

झोपेत घोरणे हे इतरांना त्रासदायक आणि नकोसं वाटतं. मुंबईहून सुटलेल्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांनाही असाच वाईट अनुभव आला. त्यांनी जोरजोरानं घोरणाऱ्या आणि सगळ्यांची झोप उडवणाऱ्या एका प्रवाशाला अजब 'शिक्षा' दिली. त्यांनी घोरणाऱ्या प्रवाशासोबत वाद घातला. सहप्रवाशांचा रुद्रावतार पाहून या प्रवाशाला प्रवासादरम्यान जागं राहावं लागलं.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर , बघा कसे निट झाले आहे आता. श्रीगुर्जीचा प्रतिसाद त्याखाली माहितगारचा प्रतिसाद त्याखाली सुबोध खरे... परफेक्ट फिट. हेच हवे होते. ते तसेच आले आहे. =)) =))

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुर्जीचा प्रतिसाद त्याखाली माहितगारचा प्रतिसाद त्याखाली सुबोध खरे अरे वा माझं नाव नीट लिहिता आलं तर. पण भाषा अजूनही सभ्य आणि सुसंस्कृतच आहे

https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/TimesOfIndia/# रोड रेज ची एक दुर्दैवी घटना. क्षुल्लक कारणावरुन एकाचा जीव गेला. टाइम्स ने फ्रंट पानावर ही बातमी देउन तीचे महत्व अधोरेखीत केले आहे. त्याच बातमीत, पुर्वी घडलेल्या अशा घटनाही संक्षीप्त स्वरुपात दिल्या आहेत. आपला समाज हिंसक होत चालला आहे का ? त्याच पानावर दुसरी घटना . मदत केल्याचे बक्षीस (?) https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/grp-scolds-man-who-save…

चैन्नई दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात एकीकडे व्हॅलेंटाइन्स डे जोरात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रेमदिवसाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. या विरोधाच्या प्रदर्शनार्थच अनेक ठिकाणी प्रेमी युगुलांना पळवून लावले जात आहे तर काही ठिकाणी प्रेमाचे पोस्टर्स फाडले जात आहेत. तामिळनाडूची राजधानी चैन्नईत मात्र एका विचित्र पद्धतीने व्हँलेंटाइन्स डेला विरोध करण्यात आला. व्हॅलेंटाइन्स डेला विरोध करताना चैन्नईतील छुलई भागात भारत हिंदू फ्रंट मोर्चाच्या सदस्यांनी एका कुत्र्याचे लग्न गाढवासोबत लावून दिले. त्यावेळी त्यांनी कुत्रा आणि गाढवाच्या गळ्यात फुलांचे हार घातले. त्यांच्या डोक्याला हळद कुंकू लावले. व्हॅलेंटाइन्स डे विरोधात त्यांनी घोषणाही दिल्या. नंतर निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान दुसरीकडे गुजरातमध्ये साबरमती रिव्हरफ्रंटमध्ये बजरंग दलाच्या सदस्यांनी काही प्रेमी युगुलांना मारपीट केल्याची घटनाही समोर आल्या आहेत. इथेही पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. a (दै. मटा)

A video, claiming to show Crown Prince of Abu Dhabi Mohamed bin Zayed al Nahyan chanting 'Jay Siya Ram' during Indian Prime Minister Narendra Modi's visit to Abu Dhabi, was shared by mainstream Indian media houses, ahead of the PM's visit. The video, as has later been turned out, is fake, and more than a year old. The video, shared by mainstream channel Times Now and Zee News ahead of Modi's visit to the UAE claimed that Shaikh Mohammad Bin Zayed had chanted “Jai Siya Ram” while addressing a Hindu spiritual programme. A report by the Gulf News busted the fake news with true facts. https://www.outlookindia.com/website/story/indian-news-channels-run-fak…

In reply to by श्रिपाद पणशिकर

इंग्लिश कळत नाय तर मराठीत सांगू का ? ...... महिन्याभरापूर्वी हज अनुदान बंद करणाऱ्या भाजपनं नागालँडमध्ये सत्ता आणण्याकरिता येथील ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आकर्षक घोषणा करायला सुरुवात केली आहे. सत्तेत आल्यास ख्रिश्चनांना पवित्रभूमी असलेल्या 'जेरूसलेम'ची मोफत वारी घडवून आणण्याचं आश्वासन भाजपनं दिलं आहे. मात्र देशातील सर्वच ख्रिश्चनांसाठी हे आश्वासन आहे की केवळ उत्तर-पूर्वेतील राज्यांपूरतं ते मर्यादित आहे, याबाबतचं कोणतंही स्पष्टीकरण भाजपनं दिलेलं नाही. https://m.maharashtratimes.com/india-news/north-east-elections-bjp-offe…

In reply to by manguu@mail.com

भाजपा ने असे का केले असावे. कारण भाजपला मते तर हवी आहेत. बर ह्या सीमेवरच्या राज्यात हिन्दु संख्या कमी होऊन तो भाग ख्रिश्चनबहुल होण्यामागे आजवर ची चुकीची धोरणे कारण नाहीत का? बहुमतात निवडून आल्याशिवाय चांगले बदल करणे शक्य आहे का? साध तीन तलाकचे प्रकरण राज्य सभेत बहुमताशिवाय लटकल. मुस्लिम महिलांना निदान दुसरा तरी न्याय मिळावा म्हणुन भाजपा सरकारने हज यात्रेची रक्कम मुस्लीम महिलांच्या शिक्षणासाठी वळवली. भाजपा काय आणि कौन्ग्रेस्स काय मतासाठी सगळेच वाट्टेल ते करतात. पण कौन्ग्रेस्स च्या राजकारणामुळे देश ही संकल्पना धोक्यात येण्याची वेळ येते आहे. भाजपा ला स्पष्ट बहुमत मिळून समान कायदे होण्याची शक्यता आहे.