Skip to main content

अयोध्या राममंदिर

लेखक मंदार कात्रे यांनी शनिवार, 10/02/2018 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
अयोध्या राममंदिर संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका नेहमीच वादग्रस्त अन संशयास्पद राहिली आहे. कोर्टाने निष्पक्ष पणे समोर उपलब्ध तथ्ये , पुरावे अन घटनांचा आढावा घेवून त्वरित निकाल देणे अपेक्षित असते . गेल्या महिन्यात घडलेल्या जजेस च्या पत्रकार परिषदे सारख्या घटनांमुळे संशयाची सुई कोर्टाकडेच वळत आहे. कोणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठी अथवा अल्पसंख्यांकांच्या हिंसक प्रतिक्रिया येतील या भीतीपोटी अथवा दडपणाखाली सुप्रीम कोर्ट ह्या प्रकरणात चालढकल व वेळकाढूपणा करत आहे . अनेक बिनमहत्त्व्वाच्या बाबींवर रात्री अपरात्री देखील सेशन बोलावून चुटकीसरशी "निकाल" लावणार्‍या कोर्टाला या बहुसंख्य हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निकाल द्यायला ६०-७० वर्षे पुरत नाहीत याला काय म्हणावे ? घोर कलयुग !

वाचने 41146
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

धागालेखकाचे माहिती नाही, परंतु मला स्वत:ला प्रभु श्रीरामांच्या अस्तित्वाबद्दल पूर्ण विश्वास, श्रद्धा व खातरीसुद्धा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

विश्वास, श्रद्धा एकवेळ ठिक आहे पण खातरी कशावरुन? गंमत म्हणून विचारत नाहीये, गांभीर्याने म्हणतोय. माझे वैयक्तिक मत म्हणाल तर रामायण अतिशयोक्तीने भरलेले आहे. खुद्द श्रीराम अस्तित्वात होता की नाही हे सांगता येणार नाही, वादग्रस्त जागेवर मंदिर होतेच ह्याची मात्र खातरी आहे कारण तसे अवषेष तेथे आहेत पण मंदिर रामाचेच ते सांगता येणार नाही. श्रीरामाची स्वतंत्र मंदिरे साधारण ११/१२ व्या शतकानंतर बांधण्यात येऊ लागली त्यामुळे रामाचे मंदिर असलेच तर ते ह्या काळाच्या आसपासचे असावे अन्यथा ते विष्णू, शिव मंदिर असण्याचीच शक्यता अधिक.

In reply to by प्रचेतस

>>> विश्वास, श्रद्धा एकवेळ ठिक आहे पण खातरी कशावरुन? काही पूर्णपणे वैयक्तिक अनुभव आहेत. >>> माझे वैयक्तिक मत म्हणाल तर रामायण अतिशयोक्तीने भरलेले आहे. अतिशयोक्ती सर्वच कथातून असते (उदा. शिवाजी महाराजांचे चरीत्र). लोककथा, पोवाडे इ. मधून अनेक नवीन गोष्टी घुसडल्या जातात. पण म्हणून मूळ कथानक घडलेच नाही असे म्हणता येणार नाही. >>> श्रीरामाची स्वतंत्र मंदिरे साधारण ११/१२ व्या शतकानंतर बांधण्यात येऊ लागली त्यामुळे रामाचे मंदिर असलेच तर ते ह्या काळाच्या आसपासचे असावे अन्यथा ते विष्णू, शिव मंदिर असण्याचीच शक्यता अधिक. हा वाद जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून फक्त श्रीराम मंदीराचाच उल्लेख होतो. त्यामुळे ते विष्णू, शिव मंदीर असण्याऐवजी श्रीराम मंदीर असण्याचीच शक्यता अधिक आहे.

In reply to by प्रचेतस

रामायण काल्पनिक ?? इराक मध्ये दगडावर कोरलेली राम आणि हनुमान यांची ६००० वर्षे जुनी चित्रे सापडली. https://t.co/LrqC9WVYHr श्री लंका आणि भारत यामधील रामसेतूचा काही भाग मानव निर्मित आहे असे अमरीकन शास्त्रज्ञानी शोधले. ही मानव निर्मितीही साधारण सहा हजार वर्षांपूर्वीची असावी असे इतर संशोधनावरून वाटते. https://www.youtube.com/watch?v=Mifj1F6rW

In reply to by रमेश आठवले

रामसेतुवरील खडक हे वाळूपेक्षा जुने आहेत म्हणून ते माणसाने आणून ठेवले असावेत असे हे "संशोधन" म्हणते. आता कुठल्या नैसर्गिक शक्तीमुळे जसे सुनामी, वादळ असल्या गोष्टीमुळे हे खडक तिकडे आले नाहीत हे कशावरून? माणसानेच आणले असतील हे कशावरून? ह्या तथाकथित संशोधनातील मुद्दे अत्यंत संदिग्ध प्रकारे मांडलेले आहेत. त्यातून काही सिद्ध होत नाही. आणि मानवनिर्मित असलेच तरी ते राम व वानरसेनेनेच आणले असतील असे तरी अमेरिकेत सिद्ध झालेले नाही. रामायणाबद्दल कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही. गाडगी, मडकी, दागिने, नाणी, शिलालेख, काही नाही. निव्वळ राम लक्ष्मणाचे चित्र कोरले म्हणून खरोखर असे कुणी होते असे म्हणता येत नाही. रामायणाच्या वर्णनावरून ती एक अत्यंत प्रगत संस्कृती होती असे दिसते. तुलनेने मागास असणार्‍या मोहन्दजरो वगैरे संस्कृतींचे कितीतरी पुरावे सापडले आहेत. मग रामायणाचे का नाही सापडत? अमुक एक राजा झाला, त्याने अमुक एक देऊळ बांधले, अमक्याला इतकी देणगी दिली, किंवा त्याच्या काळातील नाणी हे काही सापडत का नाही? निव्वळ महाकाव्य वा त्यातील प्रतिमा हा ठोस पुरावा म्हणवत नाही. ज्या काळात रामायण घडले त्या काळात भारतात कुठली संस्कृती होती ह्याचा उत्खननातून काही तरी पुरावा मिळाला आहे का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. अर्थात म्हणून लोकांच्या श्रद्धेचा अनादर करणे पटत नाही. राम हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. बाबर नाही. त्यामुळे जरी काल्पनिक असला तरी रामाचे देऊळ बनवायला परवानगी मिळायला हवी.

In reply to by हुप्प्या

खडक वाळूपेक्षा जुनेच असणार ना ? खडक झिजून वाळू होते ना ? पण राजघराणी ( इक्ष्वाकु आणि बाबर ) तर कधीच लोप पावले आहेत. दोन्ही धर्मांसाठी थोडी जागा वापरून उर्वरीत जागा जनतेने आपल्या भल्यासाठी वापरावी. लोकशाहीत जनता हेच आता राजघराणे.

In reply to by रमेश आठवले

सेतू आहे , हे सिद्ध झाले , तरी अमके तमके ठिकाण हीच जन्मभूमी होती , हे कसे सिद्ध होणार ?

In reply to by रमेश आठवले

डिस्कव्हरी चॅनेल हा प्राचीन ऐतिहासिक अवशेषांचा तज्ञ आहे का? ते एक मनोरंजनाचे माध्यम आहे. त्यांचे कार्यक्रम हे किती जाहिराती मिळतील ह्यावर ठरतात. ह्या लेखातील भाषाही अत्यंत संदिग्ध आहे हे स्पष्ट दिसते आहे. समुद्रातले खडक मानवनिर्मित आहेत का हे तपासायला हजारो मैल उंचीवरील सॅटेलाईटच्या प्रतिमा अभ्यासणे हे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे नाही का? बोट समुद्रात नेऊन तिथले खडक तपासणे जास्त उपयुक्त नाही का? भारत श्रीलंकेदरम्यानचा समुद्र म्हणजे काही मंगळ वा शुक्र ग्रहाप्रमाणे अफाट अंतरावर नाही. आणि प्रत्येक गोष्टीला नासाची साक्ष का काढायची? नासा ह्या संस्थेचे उद्दिष्ट प्राचीन इतिहासाचे संशोधन (तेही भारताच्या इतिहासाचे) असे म्हटल्याचे मला तरी आढळलेले नाही. अशा प्रकारे काही कार्यक्रम सादर केला तर भारतातील लोकांमधे आपल्या चॅनेलची लोकप्रियता अफाट वाढेल असा अंदाज व्यक्त करुन हा कार्यक्रम बनवला असेल. अशा प्रकारे सुतावरुन स्वर्ग गाठणे बंद करावे. भारत सरकारने आजवर त्या समुद्रात उतरुन त्या खडकांचा अभ्यास का केलेला नाही? इतके अवघड आहे का?

In reply to by हुप्प्या

या संशोधनात सेतूवर ड्रीलींग करुन मिळविलेले दगड आणि मृत जिवाणू यांच्या वरील अध्ययनाचे परिणाम सांगितले आहेत. http://bharatkalyan97.blogspot.com/2018/01/rama-setu-18400-years-old-st…

In reply to by रमेश आठवले

की हे खडक १८४०० वर्षे जुने आहेत म्हणून? त्यातून काय सिद्ध होते? आणि मग डिस्कव्हरी चॅनेलच्या पुराव्याचे काय? त्यांनी तर काहीतरी वेगळेच सांगितले होते. आणि ह्या लेखात हा सेतू मानवनिर्मित असल्याचे म्हटलेले नाही. निव्वळ वय सांगितले आहे. ह्या विधानाचा रामायण खरेच घडले होते ह्याच्याशी नक्की काय संबंध आहे?

In reply to by श्रीगुरुजी

चमकदार वाक्य हेही पुरावा म्हणता येत नाही! रामायणाचा ठोस पुरावा नाही उलट महाकाव्यातील उल्लेख हाच पुरावा आहे. तेव्हा पुरावा नाही असे ह्या बाबतीत नाही. उलट जो आहे तो निव्वळ साहित्यिक पुरावा आहे सबब ही व्यक्तिमत्त्वे निव्वळ साहित्यातली आहेत असा निष्कर्ष काढता येतो.

In reply to by श्रीगुरुजी

तसं समजा म्हणजे काय? अहो ह्या व्यासपीठावर वाद चर्चा चालू आहे. एका विचाराच्या लोकांना दुसर्‍या विरुद्ध विचाराच्या लोकांना पटवून द्यायचे आहे. रामायण काल्पनिक आहे हा माझा मुद्दा आहेच. त्यामुळे तसे समजा काय? तसे समजूनच मी माझे मुद्दे मांडत आहे. आपण आपले मुद्दे मांडा. मी काय समजायचे ते आधीच समजलो आहे. असो.

In reply to by हुप्प्या

एका विचाराच्या लोकांना दुसर्‍या विरुद्ध विचाराच्या लोकांना पटवून द्यायचे आहे.
मी कोणत्याही एका बाजूने नाही; पणे डावेतर बाजू पैकी एक अभ्यासक Meenakshi Jain आहेत त्यांच्या बाजू खालील प्रमाणे

In reply to by हुप्प्या

मी आणि इतर काही जणांनी आधीच मुद्दे मांडले आहेत. रामायण काल्पनिक आहे अशा तुमची ठाम समजूत असल्याने नवीन काही लिहिण्यात अर्थ नाही. म्हणूनच "बरं, तसं समजा" असं लिहिलं.

In reply to by श्रीगुरुजी

गोवा स्थित समुद्र विज्ञान संस्थेने भारताच्या किनाऱ्या जवळ समुद्र सपाटीत गेल्या १४,५०० वर्षात झालेल्या बदलाचा आलेख दिला आहे. त्या आलेखावरून असे दिसते की ९५०० वर्षा पूर्वी समुद्र सपाटी सध्याच्या पेक्षा ३० मीटर खाली होती आणि त्या खोलीवर त्यांना मनुष्य वस्तीचे पुरावे मिळाले. त्या नन्तर समुद्र सपाटी झपाट्याने वाढत गेली . याचा मी असा अर्थ लावतो की रामायण काळी सेतू जवळ समुद्र खोल होता आणि सेतूचा बराचसा भाग समुद्र पातळीच्या वर होता आणि काही भाग उथळ पाण्यात असावा. ह्या पाण्याखालील भागात धोंडे टाकून मानवाने ( मी रामाने किंवा त्याच्या वानर सैन्याने असे म्हणत नाही आहे ) तो मार्ग सुकर करून घेतला असावा. http://www.nio.org/index/option/com_nomenu/task/show/tid/85/sid/92/id/74 २. रामायणाचा काळ ७००० वर्षा पूर्वीचा असावा असे खगोलविद मानतात. http://serveveda.org/?p=87 ३. आता आपण हुप्प्या यांच्या पहिल्या प्रतिसादातील दुसऱ्या विधाना कडे वळू. हे विधान आहे " निव्वळ राम लक्ष्मणाचे चित्र कोरले म्हणून खरोखर असे कुणी होते असे म्हणता येत नाही." पहिली गोष्ट ही की हे चित्र राम आणि हनुमान यांचे आहे . दुसरी आणि महत्वाची गोष्ट ही कि हे चित्र ६००० वर्षा पूर्वीचे आहे असे ख्यातनाम ब्रिटिश पुरातत्ववेत्ते लेओनार्ड वुली म्हणतात. हे कुण्या पुराणातली वांगी खाणाऱ्या आणि बुरसटलेल्या विचाराच्या हिंदूंचे मत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Leonard_Woolley ४. मूळ लेख राममंदीरावर आहे तरीही हा एक रामसेतूचा मुद्दा विस्ताराने मांडण्या मागे माझा हेतू: माझ्या मते मूळ रामायणात नन्तर मनोरंजनात्मक आणि मसाला म्हणून काहि गोष्टिंचा भरणा वेगवेगळ्या भाषांतील आवृत्तीत केला गेला असेल. पण तरीही त्याच्या मूळ गाभ्यात तथ्य आहे आणि ते पडताळून पाहणे श्यक्य आहे. सगळच काही कपोलकल्पित आणि भाकडकथा नाही.

In reply to by रमेश आठवले

आपण आपल्या पुराव्यांना ढिसाळ म्हणून माझे काम सोपे करत आहात त्याबद्दल आभार! वाल्मिकी रामायणातील ग्रहस्थानांच्या वर्णनावरून रामायणाचा काल ७००० वर्षे जुना मानतात. इथेही अनेक त्रुटी आहेत. वाल्मिकी हा स्वतः खगोलविद होता का? वाल्मिकीने रामायण नंतर कधीतरी लिहिले असणार? का तो स्वतः असा कुणी महाथोर जन्माला येणार म्हणून खगोलमितीची उपकरणे घेऊन अयोध्येत तळ ठोकून बसला होता? जर तो अयोध्येत नसेल तर त्याला ही ग्रहतार्‍यांची मोजमापे कुणी दिली? शनी तूळ राशीत, लग्न राशीत कर्क इत्यादी वर्णने ही ग्रहांची व राशींची अचूक मोजमापे सांगतात का? आकाशाचे १२ भाग करुन त्यातला एक लग्न मानतात. इतक्या मोठ्या भागात कुठेतरी शनी होता इतक्या जोरावर कुठल्यातरी सॉफ्टवेअरने कालनिर्धारण कसे केले बरे? आणि कुठल्याशा सॉफ्टवेअरने तसे केले म्हणून तमाम खगोलविद रामायणाचा काल अमुक मानतात असे ठोकून देणे कितपत योग्य आहे? खगोलशास्त्रज्ञ हे प्राचीन घटनांचा अभ्यास करतात असे आपण समजता का? उलट ते इतिहासातील धूमकेतू वगैरेचे उल्लेख वाचून खगोलाशास्त्रीय उलथापालथींची माहिती मिळवतात. आणि पुन्हा हे सगळे केवळ लिहिले आहे. प्रत्यक्ष पुरावा म्हणता येत नाही. समुद्र कधी आणि किती खोल होता ह्याचा रामायण खरोखर घडले ह्याच्याशी काहीही संबंध नाही.

In reply to by हुप्प्या

१. आपल्या ' अत्यन्त ढिसाळ प्रतिसाद ' या कुत्सित प्रतिसादाचा मी उपरोधाने उल्लेख करत होतो. हे आपल्या लक्षात येऊ नये हे माझे दुर्दैव आहे. २. वाल्मिकी खगोलविद होता असे मी म्हटलेले नाही. आजकालच्या ज्योतिषांना तिथी,मास आणि ग्रह नक्षत्रे यांच्या खगोलातील स्थितीविषयीचे ज्ञान असते. तेव्हढे ज्ञान वाल्मिकीला असू नये का ? ३. http://serveveda.org/?p=87 या लेखात सांगितलेले software चूक कि बरोबर हे सांगण्याची माझ्यात कुवत नाही. आपल्यात असेल तर तसे सिद्ध करा. ४. आपल्याशी आणखी वाद घालण्यात मला स्वारस्य नाही. बाकी मिपाचे वाचक या संवादावरून काय समझायचे ते समजतीलच.

In reply to by रमेश आठवले

१. आपल्या उपरोधाला मी प्रति उपरोधाने उत्तर देत आहे हे आपल्या लक्षात येऊ नये हे माझे दुर्दैव. असो. २. एका कवीला आजकालच्या ज्योतिषांइतके तिथी , मास आणि ग्रह नक्षत्रे ह्यांचे ज्ञान का बरे असेल? ३. कुठल्याशा सॉफ्टवेअरने कालनिर्धारण केले. आता कुंडली वगैरे अत्यंत ढोबळ मानाने ग्रहांची स्थाने सांगते. अचूक नाही. तितक्या माहितीच्या जोरावर अचूक कालनिर्धारण होते ह्यावर माझा विश्वास नाही. आणि केवळ कुठल्याशा ग्रंथात काहीसे लिहिले आहे हा ठोस पुरावा असू शकत नाही. उदा. हॅरी पॉटरच्या पुस्तकात लंडनच्या रेल्वे स्टेशनबद्दल काहीतरी चमत्कारिक वर्णन आहे. आता लंडन स्टेशन खरे आहे म्हणून हॅरी पॉटर खरा ठरत नाही. ४. तमाम खगोलविद रामायणाच्या कालनिर्धारणाबद्दल छातीठोक्पणे सांगतात हे आजिबात खरे नाही. रामायण हे खरोखर घडले ह्या सिद्धांताकरता हे अत्यंत अपुरे, चुकीचे आणि ढिसाळ पुरावे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

निव्वळ डायलॉग फेकण्यापेक्षा माझे मुद्दे खोडा. निदान प्रयत्न करा. कदाचित मतपरिवर्तन होईल. चोख मुद्दे असल्यामुळे त्यांचा प्रतिवाद करण्यापेक्षा आपण वैयक्तिक हल्ले करणे सोपे आहे हे ओळखून ते करत आहात असा डायलॉग मीही मारू शकतो.

In reply to by हुप्प्या

सर्व प्रतिसाद पुन्हा वाचा. समजून घ्यायची प्रामाणिक इच्छा असेल तर आपोआप शंकानिरसन होईल.

In reply to by हुप्प्या

बरोबरच आहे. रामगढ नावाचे एक गाव खरेच अस्तित्वात आहे म्हणून शोले हा इतिहास होत नाही आणि गब्बर ही ऐतिहासिक व्यक्ती होत नाही. १९६१ साली पुण्यात मोठा पूर आला होता हे खरेच, आणि तो संदर्भ वापरुन मी एक कथा लिहिली तर ती कथा खरी ठरत नाही, ती काल्पनिकच असते , संदर्भ वास्तव असतात.

In reply to by मराठी कथालेखक

१९६१ साली पुण्यात मोठा पूर आला होता हे खरेच,
आपत्तीत सापडलेल्याला मदत करताना प्रत्येक वेळी लेखी पुरावे देणे शक्य नसते तेव्हा अफिडेव्हीट इतर लोकांची साक्ष यावर विसंबून राहून न्यायही द्यावा लागतो .

In reply to by प्रचेतस

माझ्या माहितीप्रमाणे अधिकृतरीत्या रामायण हे एक लोककाव्य म्हणूनच गणलेले आहे , हा इतिहास नाही. अर्थात त्यामुळे मंदिर असूच नये असे काही नाही. जसे इतर काल्पनिक देव-देवतांचे मंदिर असते तसेच रामाचेही असू शकते. अयोध्येतील विशिष्ट ठिकाणी पुर्वी राममंदिर होते आणि नंतर ते पाडून काही शतकांपुर्वी मशीद बांधली गेली असा दावा आहे. कदाचित खराही असेल. पण त्यामुळे न्यायालयाने आजच्या काळात मशीद पाडणे कायदेशीर मानावे आणि मंदिर बांधण्यास परवानगी द्यावी हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य ठरेल असे मला वाटते. कायदेतज्ञ यावर भाष्य करतीलच, पण मला वाटते की सामाजिकदृष्ट्याही ते चुकीचे ठरेल. पुर्वी जे झाले ते झाले आता त्याकरिता नवीन वादळ उठवणे , तोडफोड करणे अयोग्य ठरेल. झालेच तर खरेच हा प्रश्न ६०-७० लाख हिंदूंच्या जिव्हाळ्याचा आहे का ? मला तरी वाटत नाही...

In reply to by मराठी कथालेखक

माझ्या माहितीप्रमाणे अधिकृतरीत्या रामायण हे एक लोककाव्य म्हणूनच गणलेले आहे , हा इतिहास नाही.
वर श्रीगुरुजी चा प्रतिसाद Absence of evidence is not evidence of absence! :) ऐतिहासिकता सिद्ध करण्यासाठी तर्कसुसंगत प्रमाण साधनांद्वारे आधार द्यावे लागतात हे खरेच, पण एखाद्या गोष्टीस आज पुरावा नाही म्हणून उद्या उपलब्ध होणारच नाही असे नाही. (उदाहरणार्थ सविस्तर उत्खननानंतर बाबरी च्या खाली (कोणत्या का असेना) मंदिराचे अवशेष मिळाले. जो पर्यंत एका ढाचा खाली आला नाही तो पर्यंत त्या श्रद्धेला वस्तुस्थिती चा आधार नव्हता पण त्यांचा जो काही ऐकीव विश्वास असेल त्याला त्यांच्या कृतीने आधार प्राप्त झाला हेही नाकारता येत नाही . - पण म्हणून अनधिकृत कृतिंचे समर्थनही करता येत नाही पण अधिकृतपणे निष्पक्ष अभ्यास आणि तपासाच्या पद्धतीची गरजही अधोरेखित होते किंवा कसे)
खरेच हा प्रश्न …. हिंदूंच्या जिव्हाळ्याचा आहे का ? मला तरी वाटत नाही…
कदाचित उद्या करणी सेना स्टाईल फ्लॉप शो होईल पण एखाद्या व्यक्ती , समूह किंवा संघटनेच्य फ्लॉपशो होण्यातून जिव्हाळा मोजता येतोच असेही नसावे. कोणत्याही बाजूला काहीच जिव्हाळा अथवा आस्था नसता तर अशा चर्चा सहभागाची वेळ आली नसती, नाही का ?
काही शतकांपुर्वी मशीद बांधली गेली असा दावा आहे. कदाचित खराही असेल. पण त्यामुळे न्यायालयाने आजच्या काळात मशीद पाडणे कायदेशीर मानावे आणि मंदिर बांधण्यास परवानगी द्यावी हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य ठरेल
अनेकविध पदर आहेत . अशी विधाने करणे सोपे असते पण इतर लोक अशा विधानांना कसे वाचतात आणि त्याचे परिणाम सहज लक्षात येत नाहीत. हेच विधान जरा बदलून असे लिहू विरोधाभास लक्षात येतो का पहा काही (वर्षा/शतकां)पुर्वी अबकड (समूहा)वर अन्याय झाला असा दावा आहे. कदाचित खराही असेल. पण त्यामुळे न्यायालयाने आजच्या काळात अन्याय दूर करून न्याय द्यावा हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य ठरेल. अन्यायाची भावना मनात ठेवून दाखवलेली उदारता हि उदारता नसते. क्षमा शिलता चांगला गुण आहे पण ज्याने चुक कबूल केली अथवा पश्चात्ताप झाला आणि पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली त्याला क्षमा केली जाते . अन्यथा त्याला बोटचेपी भूमिका म्हटले जाते . अर्थात काही कारणाने कायदशीर मार्गाने यश आले नाही तर, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपुचा उपयोग करावा असा अर्थ होत नाही . याला दुसराही पदर आहे , माझ्या तुमच्या मनातील राम कसाही असो काही लोकांच्या मनातील राम अन्यायाचे परिमार्जन करणारा आहे आणि ज्याने अन्यायाच्या परिमार्जनार्थ कष्ट घेतले त्याच्यावरच्या अन्यायाचे चित्र उभे रहात असेल तय त्या बाजूला येशू ख्रिस्थ्त स्टाईल सहानुभूती स्वाभावीक पणे पोहोचते त्यामुळे झाला तर काय झाले अशी भूमिका या मंडळींकडून स्विकारली जाण्याची अपेक्षा रास्त ठरत नसावी त्याच वेळी जी व्यक्ती न्यायाच्या बाजूने होती त्याच व्यक्तीचे नाव घेऊन कुणावर अन्याय करणे -आदी श्रद्धेचा हवाला देऊन - , न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने आला नाही तरी श्रद्धे खातर आम्ही हे करुच ही काही मंदिर समर्थकांची भूमिका रास्त ठरत नसावी किंवा कसे .

In reply to by माहितगार

अन्यायाची भावना मनात ठेवून दाखवलेली उदारता हि उदारता नसते. क्षमा शिलता चांगला गुण आहे पण ज्याने चुक कबूल केली अथवा पश्चात्ताप झाला आणि पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली त्याला क्षमा केली जाते . अन्यथा त्याला बोटचेपी भूमिका म्हटले जाते .
पण आता कबूल कोण करणार ? बाबर मेला ना ... त्याचे वारस आहेत का कुणी ? आणि पुन्हा असे कसे होईल ? एकूणातच आता सगळे संदर्भ बदलले आहेत. मग अन्यायाचे परिमार्जन,सूड/बदला या गोष्टींना आता अर्थ रहात नाही असे वाटते. सुप्रीम कोर्ट कायद्याच्या चौकटीत जो काही निर्णय देईल तो सगळ्यांना मानावा लागेलच. असो.. जाता जाता काही काळापुर्वी एक बातमी वाचनात आली की जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल ब्रिटीश सरकारने की पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला पण माफी मागितली नाही. (बातमी आता शब्दशः आठवत नाही , पण साधारण अर्थ असाच होता)

In reply to by मराठी कथालेखक

काही काळापुर्वी एक बातमी वाचनात आली की जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल ब्रिटीश सरकारने की पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला पण माफी मागितली नाही. (बातमी आता शब्दशः आठवत नाही , पण साधारण अर्थ असाच होता)
मागच्या शतकाच्या पुर्वार्धात शीखांचे स्थलांतर इच्छूकांना घेऊन गेलेले एक जहाज तत्कालीन कॅनडाने रेशिअल कारणावरुन परतवले पण या शतकात चुक झाल्याची कबूली दिली . आणि सर्व स्तरावर शीखांना सामावून घेतले. चुका कबूल केल्या की विश्वास वाढण्यास मदत होते असे मला वाटते.
...एकूणातच आता सगळे संदर्भ बदलले आहेत. मग अन्यायाचे परिमार्जन,सूड/बदला या गोष्टींना आता अर्थ रहात नाही असे वाटते.
काळा नुसार संदर्भ बदलले तरी प्रमाण साधनांनी सिद्ध होणारा इतिहास बदलणे किंवा उभ्याटाकणार्‍या प्रश्न चिन्हां ना नाकारणे अशक्य नसले तरी कठीण ठरु शकते. न्याय्य अधिकार घटनात्मक पद्धतीने मागणे हा सूड किंवा बदला ठरत नसावा. अर्थात वाफ दाबून दबत नसते, न्याय्य मार्ग वाफ योग्य मार्गाने बाहेर पडू देतात, ते बंद केले तर वाफ नको त्या मार्गाने बाहेर पडण्याचा धोका असतो किंवा कसे.
...आणि पुन्हा असे कसे होईल ?
'पुन्हा असे होणार नाही'; असे विधान आश्वस्त करत असते. प्रश्नार्थक विधान आश्वासकता कितपत देते या बद्दल साशंकता वाटते.
...पण आता कबूल कोण करणार ? बाबर मेला ना ... त्याचे वारस आहेत का कुणी ?
बाबर मेला पण इतिहासातील अपकृत्ये लपवू इच्छिणारी जी काही मंडळी आहेत त्या सर्वांची नैतीक जबाबदारी बनते. नैतीक जबाबदार्‍या टाळण्याचा अंगचोरपणा मांजरीने डोळे झाकले म्हणून वास्तव दिसायचे थांबत नाही तसे दिसत रहाते. खदखद थांबत नाही , वाफ नको तेथून बाहेर पडण्याचा आणि नको त्या क्रिया प्रतिक्रीयांचे धोके चक्र दीर्घकाळ चालू रहाण्याची शक्यता संभवते. Truth and reconciliation commission स्वरुपाची एक संकल्पना आहे, भारतात अशी संकल्पना राबवण्याची आवश्यकता असावी असे वाटते. त्या बद्दल माझा हा मिपा धागा लेख पुर्वीच येऊन गेलेला आहे.

In reply to by माहितगार

बाबर हा बाहेरून आला होता. एतद्देशीय राजे जनतेकडून टॅक्स घेत होते .. त्यानी बाबराशी हातमिळवणी केली / युद्धात कमी पडले .. जे असेल ते .. पण देशाचे / प्रांताचे रक्षण करणे ही एतद्देशीय राजामहाराजांची जबाबदारी होती. त्यामुळे झालेल्या पाडापाडीला तेच जबाबदार ठरतात.

In reply to by manguu@mail.com

सीतेसाठी असो वा जनतेसाठी युद्ध करण्याची रामाची जबाबदारी असतेच, पण समजा राम युद्धात रावणाशी हरला तरी रामाची बायको पळवून नेण्याचा अथवा रामाच्या प्रजेस लुटण्याचा अथवा रामाच्या राज्यातील मंदीर पाडून दुसरे काही बांधण्याचा नैतीक परवाना रावणास मिळत नसतो .
आता आपल्यासारखे काहीजण राम झाल्याचा पुरावा नाही म्हणतील त्यासाठी सीता राम रावण या जागी अबकड हळक्षज्ञ वापरल्यास विधान खालील प्रमाणे होते.
घरातील स्त्रीयांसाठी असो वा जनतेसाठी युद्ध करण्याची अबकड राजाची जबाबदारी असतेच, पण समजा अबकड राजा युद्धात हळक्षज्ञशी हरला तरी अबकडच्या घरातील स्त्रीया पळवून नेण्याचा अथवा अबकडच्या प्रजेस लुटण्याचा अथवा अबकडच्या राज्यातील मंदीर पाडून दुसरे काही बांधण्याचा नैतीक परवाना हळक्षज्ञास मिळत नसतो .
कुणीतरी येऊन तुमचे घर किंवा तुमची अब्रु लुटते आणि स्वसंरक्षण न करु शकल्या बद्दल तुम्हालाच दोष देते याला व्हिक्टीम ब्लेमींग असे म्हणतात . Victim blaming

In reply to by माहितगार

जनता राजाला त्याच कामासाठी पैसे देत असते .. काश्मिर गिळल्याबद्दल लोक गांधी नेहरु काँग्रेसलाही जिम्मेवार मानतात ना ? मग राममंदिर कुणी जरी पाडले तरी त्यावेळच्या राजामहाराजांची थोडी तरी जबाबदारी ठरतेच ना ? पैसे देवून जनता व्हिक्टिम. पैसे घेऊन राजाही व्हिक्टिमच ? सगळेच व्हिक्टिम ... मग आन्सरेबल कोण ?

In reply to by manguu@mail.com

सगळेच व्हिक्टिम ...
सगळेच या शब्दात अन्याय करणार्‍ञांनाही तुम्ही मोजताय का ?
... मग आन्सरेबल कोण ?
नैतीकदृष्ट्या, आधी अन्यायास अन्याय न म्हणता सगळे हा शब्द वापरुन अन्याय करणर्‍याला व्हिक्टीमहूड देऊन व्हिक्टीम्सच्या जखमेवर मीठ चोळणरे .
पैसे घेऊन राजाही व्हिक्टिमच ?
तिबेट मधील मॉनेस्ट्ट्री तोडणारे चीनचे उदाहरण पहावे. एखादे राज्य आणि राजा छोटा असू शकतो , पैसे , शक्ती आणि प्राण लावूनही जिंकेल याची शाश्वती देता येत नाही इराक अफगाणीस्तानने किती हातपाय मारले तरी आमेरीकेसारख्या बलाढ्य सत्तेपुढे जिंकु शकत नाही . त्याला हरवून त्याच्या जागी येतो त्याला ही टॅक्स मिळणार असतोच आणि अशा पराजीत राजाची जनता त्याची स्वतःची जनता म्हणून काळजी घेणे अभिप्रेत असते तसे न करता तो जनतेवर अन्याय करत असेल तर आधिचा राजा हरला म्हणून आधीचा राजा नंतरच्याने केलेल्या पापात वाटेकरी ठरु शकत नाही. एखादा राजा किंवा देश हरण्याची अनेक कारणे असू शकतात, युद्धनिती बद्दल एरर ऑफ जज्मेंट होऊ शकते . काही देशद्रोही व्यक्तीगत स्वार्था पोटी खाल्ल्या थाळीला छेद देऊ शकतात , एखाद्या प्रदेशात दुष्काळ पडला असेल राजा चांगला असेल तर तो संरक्षणावर खर्च करण्या आधी जनतेचे पोट भरण्याकडे लक्ष देऊ शकतो. प्रत्येक राजा वाईट आणि ऐय्याश असेल असे गृहीत धरुन सरसकटीकरण करता येत नाही. भारताच्या एकसंघतेच्या अभावामुळे परकीय राजवटींशी लढण्यात असमर्थ ठरणे , राजे महाराजांच्या आपापसातील दुफळी , धर्मसंस्थेचे सामाजिक विषमतेस खतपाणी घालणे , काही राजांची अय्याशी अशी भारतीय राज्यांच्या अपयशाची कारणे असू शकतात . तो विचार करुनच ब्रिटीशोत्तर काळात भारत देश एकसंघ आणि समान संधीवर आधारीत लोकशाही असावा असा विचार केला गेला. हि सुधारणा केलेल्या भारतीय नेतृत्वास दोष देता येत नाही पण भारतीय एकात्मतेस छेद देणार्‍या नव्या काळातील काही शहाण्यांच्या अती शहाणपणाबद्दल साशंकता कायम रहाते किंवा कसे. आणि आधी म्हटल्या प्रमाणे एक राजा हरला आणि समजा तो अयोग्य होता तरीही त्याची जागा बळकवणार्‍या परकीयाच्ने केलेल्या अन्यायाचे समर्थन होत नाही.

In reply to by माहितगार

त्यात परकीय वगैरे मुद्दे अननेसेसरी आहेत. कोणत्याही राजाला आपले राज्य कितीही वाढवायची मुभा होती, त्यानुसार ते युद्ध करुन वाढवत होते. -------------------- त्या काळात त्या त्या राजामहाराजाना जनतेने अमाप कर ( फक्त आर्थिक कर, इतकाच मुद्दा चर्चेला घेतोय, रक्त मांस वगैरे गोष्टी सध्या गणत नाही. ) दिलेला आहे. यातली बरीच घराणी नष्ट झालेली आहेत. इंग्रजानी या देशावर एक मोठे उपकार केलेले आहेत. राजाचा वंश संपला की राज्य खालसा. त्यानिमित्ताने नंतर ते जनतेलाच / स्वतंत्र भारतालाच मिळाले. अन्यथा फुकट राजघराणी अन त्यांचे मानमरातब पोसत बसले असते. https://scroll.in/article/673168/these-ten-historical-monuments-earn-in… गमतीची गोष्ट ही आहे की मुसलमानानी जनतेकडून त्या काळात पैसा घेऊन त्या काळी जे बांधले, ते आज देशाला करोडोंचा रेव्हेन्यु जनरेट करुन देत आहे. याउलट , जुन्या इमारतींचे तर जाऊच द्या, हिंदुनी आजही नव्याने काय बांधायचे म्हटले की जनतेला पदरमोड करावा लागतो. भारतामध्ये रेवेन्यु जनरेट करणारे मुख्य हिस्टॉरिकल प्लेसेस मुसलमानी इमारती आहेत ! आम्ही रामाचे वंशज आहोत, असे राजस्तानची कुणीतरी एक राणी सांगत असते. तिला म्हटले तुमच्या पूर्वजांचे स्मारक / देऊळ बांधू , १०० एकर जागा द्या अन २०० कोटी रुपये द्या. त्या देतील का ? राजामहाराजांचे जे वंशज लाखो करोडोंची इस्टेट भोगतात, ३०००० हजार एकर शेतीचे मालक आहेत, ते देतात का ४०० एकर जागा अन ६०० कोटी ? ऊठ्सूठ जनतेने किती काळ पदरमोड करायची ?

In reply to by manguu@mail.com

बहुधा परकीयांना परकीय न समजणार्‍या देशद्रोह्यांच्या फितुरीमुळे भारतीय राजे हरले असावेत .

In reply to by माहितगार

हितल्या राजानी त्याना जेवणापासून , जागा जमिनीपासून पार लग्नाला मुलीही दिल्या आहेत. जावई परकीय कधीपासून झाले ?

In reply to by manguu@mail.com

सानिआ मिर्झाचा नवरा असो की राजीव गांधीची बायको ते भाजपात असते तरी देशाच्या राज्यकारभाराच्या चाव्या त्यांच्या स्वाधीन करण्या बाबत साशंकता बाळगण्या एवढा परकेपणा जपणे श्रेयस्कर वाटते.

In reply to by manguu@mail.com

ब्रह्मदेशच्या थिबा सम्राटाची कन्या सरदारी रिश्त्यांची वाट न पाहता , ब्रह्मदेशात वापस जाण्याची संधी धुडकावून रत्नागिरीतल्या महालाच्या वॉचमनशी प्रेम करुन सर्वसामान्या प्रमाणे भारतीय सर्वसानान्य जिवनातले खाच खळगे आनंदाने झेलते तेव्हा ती भारतीय झालेली असते.

In reply to by तर्राट जोकर

राग फक्त केवळ तेवढ्यासाठी नाही - आणि जो आहे तो तर्क सुसंगत आहे केवळ भावनिक नाही- अजून एक महत्वाचे कारण घराणेशाही ! अ ते ज्ञ कोणत्याही राजकीय पक्षातील रुचत नाही -घराणेशाही छत्रपतींची असो अथवा पेशव्याम्ची की राजकारण्यांची रुचत नाही - त्यासाठी अ‍ॅडीषनल राग नक्कीच आहे . खोटे कशास बोलावे ? सोनीआ गांधीनी ब्रह्मदेशच्या राजकन्ये प्रमाणे सामान्य माणसासारखे टक्के टोणपे भारतात खाल्लेले असते तर राग नक्कीच राहीला नसता. तुम्ही स्थानिक सर्वसामान्या प्रमाणे जगून पहात नाही तो पर्यंत सर्वसामान्यांच्या वेदनांचा अदमास कसा येणार . आंध्रचे कठोरतेन विभाजन करण्याचा निर्णय इतरही भारतीयास कठोर पणे घ्यावा लागला असता नाही असे नाही पण त्याला आंध्रच्या माणसाची त्या वेळी होणारी मानसिक वेदना समजू शकली असती. जी व्यक्ती भारतात वाढलीच नाही त्यांना ती वेदना समजणे शक्य आहे का ? बाबराने बांधलेल्या ढाचाने काही शतकानंतर सुद्धा काही मने दुखावलेली आहेत . स्थानिक प्रत्येक वेळी सुज्ञपणे वागतात असे नव्हे . पण स्थानिकांना स्थानिकांच्या भावनांची कल्पना असण्याची किमान शक्यता असते ती परक्यांना नसते. आणि राजमहालात वाढले कि ते शक्य होत नाही मग ती बाबराची मुले असोत अथवा इंदिराजींची मुले नातवंडे , स्बस्टँशीअल सेक्शन ऑफ पिपल मनात परकेपणा बाळगतात तो त्यामुळे आणि हा परके पणा तर्कसुसंगत , प्रांजळ आणि रास्त असतो ते त्यामुळे. बाकी आमच्या देशप्रेमाच्या जाजवल्याचा रंग बेगडी रंगा प्रमाणे दिसला तरी उर्जा रांगड्या अग्नीचीच आहे ह्याचे विस्मरण न झालेले बरे.

In reply to by माहितगार

जी व्यक्ती भारतात वाढलीच नाही त्यांना ती वेदना समजणे शक्य आहे का ? >> हाच न्याय अमेरिकेत जन्माला आलेल्या भारतीय लोकांना लावणार का? किंवा इथून अमेरिकेत गेलेल्यांना? तुमचा काँग्रेसवर राग आहे, सोनियावर राग आहे तो द्वेष आहे फक्त. त्याला उगाच भावनिक आणि नैतिक कसली कसली झुलं चढवून उपयोग नाही.. आता राहूल गांधी इथल्याच मातीत जन्मला ना? त्याला काय डोक्यावर नाचवता का तुम्ही? सगळे राजकारणी लोकांची यादी काढा, कोण किती महालात राहतात आणि किती मातीत राहतात ते कळेल. फालतू कारणं शोधायची द्वेष करायला आणि उगाच शब्दांच्या फुसनळ्या सोडून आम्हीच काय ते देशभक्त च्या डुरक्या मारायच्या, तुम्हाला त्यातच आत्मानंद असेल मिळत बाकी काय...? उदाहारणार्थः आमदार बच्चू कडुबद्दल इथंच किती गरळ ओकल्या गेली कधी वाचली का? याच मातीतला माणूस तो त्याच मातीतल्या माणसांसाठी राबराब राबतोय, त्याला इथे मिसळपाववर शिव्या घातल्या गेल्या, का तर त्याने तुमच्या लाडक्या भाजपसरकारविरोधी काहीतरी वक्तव्य केले, पण त्याचे काम आणि त्याची लोकप्रियता याला काही मान दिला का इथल्या ढुड्ढाचार्यांनी. तुम्ही देशबिश काही मानत नाही, फक्त संघ आणि भाजपच्या हिंदु हिंदु करणार्‍या बेगडी, खोट्या स्वर्थी हिंदुत्वाचे गुलाम आहात. देशभक्तीच्या गप्पा आरशासमोर मारत जा, आत्मानंद मिळेल.

In reply to by तर्राट जोकर

हाच न्याय अमेरिकेत जन्माला आलेल्या भारतीय लोकांना लावणार का? किंवा इथून अमेरिकेत गेलेल्यांना?
पहिले , आमेरीकेत (युएसए) राष्ट्राध्यक्षपद परदेशात जन्म झालेल्यांना मिळू शकत नाही. Eligibility फोर President of the United Statesअ‍ॅस्ज पर Article II, Section 1, Clause 5 of the Constitution of USA sets the following qualifications for holding the presidency: be a natural-born citizen of the United States; आणि माझ्या सख्ख्या नातेवाईकाची तिथे जन्म न घेता तिथला किंवा इतर कोनत्या देशाचा अध्यक्ष पंतप्रधान होण्याची इच्छा असेल तरीही मुळीच समर्थन करणार नाही.
तुमचा काँग्रेसवर राग आहे,
त्या पक्षाचे सर्वोच्च पद घराणे शाहीने ग्रासलेले आहे तो पर्यंत नक्कीच आणि तो प्रत्येक पक्ष ज्याचे सर्वोच्च पद घराणेशाहीने ग्रासले आहे. घराणेशाही भारतीय लोकशाहीचा हा अपमान आहे जो प्रसंगी लोकशाही तत्वे बाजूस ठेऊन कठोरतेने निपटण्याची गरज आहे.
सोनियावर राग आहे तो द्वेष आहे फक्त.
सत्तेची अपेक्षा अथवा नियंत्रण करु इच्छिणारी प्रत्येक परदेशात जन्मलेली व्यक्ती आणि त्यांना सत्ता देऊ करणारे मग माझी नातेवाईक अथवा मित्र का असेनात मी त्यांची प्रछन्न निंदा करतो.
त्याला उगाच भावनिक आणि नैतिक कसली कसली झुलं चढवून उपयोग नाही..
देशासाठी गरज पडल्यास उघड वैरा पत्करण्यास लाजू नये त्यात इतर झुली बिली पांघरण्या जोगे लाजण्यासारखे काही नाही
आता राहूल गांधी इथल्याच मातीत जन्मला ना? त्याला काय डोक्यावर नाचवता का तुम्ही?
घराणेशाही आहे . सर्वच राजकीय पक्षातील घराणेशाही भारतीय लोकशाहीचा हा अपमान आहे जो प्रसंगी लोकशाही तत्वे बाजूस ठेऊन कठोरतेने निपटण्याची गरज आहे.
सगळे राजकारणी लोकांची यादी काढा, कोण किती महालात राहतात आणि किती मातीत राहतात ते कळेल.
महालात रहाणार्‍यांनी चालवल्ल्या शाहिस लोकशाही संबोधणे कठीण जाते हे खरेच.
उदाहारणार्थः....
ज्याच्याशी माझा संबंध नाही ते मला लागू होत नाही . आपल्या व्यक्तीगत आरोपबाजीकडे दुर्लक्ष करतो.

In reply to by माहितगार

महाशय, इथून कायमचे अमेरिकेत गेलेल्या, किंवा अमेरिकेत जन्माला आलेल्या भारतीयांना भारतातल्या गोष्टींबद्दल बोलायचा अधिकार मान्य करता का?

In reply to by तर्राट जोकर

महाशय, इथून कायमचे अमेरिकेत गेलेल्या, किंवा अमेरिकेत जन्माला आलेल्या भारतीयांना भारतातल्या गोष्टींबद्दल बोलायचा (* भारतीय निर्णय प्रक्रीयेत नाक खुपसणे याअर्थाने) अधिकार मान्य करता का?
(* भारतीय निर्णय प्रक्रीयेत नाक खुपसणे याअर्थाने) मुळीच मान्य करत नाही

In reply to by माहितगार

ज्याच्याशी माझा संबंध नाही ते मला लागू होत नाही . आपल्या व्यक्तीगत आरोपबाजीकडे दुर्लक्ष करतो. >> उत्तर देता येत नाही म्हणून पळतोय असे म्हणा की. तेवढं मराठी सम्जेल मला. नको तिथे नाक खुपसत असता म्हणून म्हटलं बच्चुकडू प्रकरणाबद्दलही तुमचे मत जाणून घ्यावे. पण तिथे तुमची वरची महान मते अडचणीत सापडतात.

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही देशबिश काही मानत नाही, फक्त संघ आणि भाजपच्या हिंदु हिंदु करणार्‍या बेगडी, खोट्या स्वर्थी हिंदुत्वाचे गुलाम आहात. देशभक्तीच्या गप्पा आरशासमोर मारत जा, आत्मानंद मिळेल.
याच धागा चर्चेत काही संघीय निष्ठांवर अंशत टिका केली आहे. इतर टिका केलेले माझे स्वतंत्र धागे आहेत. दुसरी कडे मुस्लीम धर्मातील काय चांगले घेता येईल या बद्दलही धागा आहे, धार्मीक सहिष्णूते बद्दलचा माझा धागा आहे. त्यातले तुम्हाला काहीच दिसत नाही की आपण इतरांप्रमाणे नको असलेली टिका टाळण्यासाठी अद्वा तद्वा आरोप करण्यावर विश्वास ठेवता ? देशाबद्दल प्रांजळपणे भक्ती व्यक्त करुनही देशबिश मानत नाही अशी देशहीताशी तडजोड करणारी उलटी मखलाशी वाचली (तीन बोटांची दिशा कुणीकडे आहे ते सुज्ञांना उमगेलच), तर नको तीथे देशभक्तीचे गाणे वाजवून आप्ल्ल्याच लोकांकडून देशाचा अपमान करुन घेण्यापेक्षा, आरशासमोरा देश भक्तीच्या गप्पा मारुन आत्मानंद घेणे बरे वाटते हे खरेच आहे. आपल्या सल्ल्यासाठी अनेक आभार पण देशभक्तीचे आमचे प्रेम स्वंतत्र आणि पूर्ण पवित्र आहे ते बिनदिक्कत व्यक्त होत राहील . बाकी बच्चुकडू बद्दल मला सविस्तर कल्पना नाही- त्यांचा या चर्चेशी संबंध काय हेही माहित नाही. आपल्याला कोणत्या धागा चर्चेत माझे प्रतिसाद हवेत त्याचा दुवा द्या . विषयाचा अभ्यास करुन मी माझी मते मांडेन.

In reply to by माहितगार

अमक्या तमक्याने टक्केटोणपे खावेत ही का अपेक्षा म्हणे ? त्यांचे सासू सासरे, नवरा जर श्रीमंत असतील तर त्याचा फायदा त्याना मिळणारच. आपल्यापेक्षा पुढची पिढी जास्ती आरामात असावी , असेच सर्वाना वाटते ना ? की टक्केटोणप्याच्या नावाने त्याना पाथरवटीचे काम , विहिरीतून पाणी शेंदायचे काम द्यायचे ?

In reply to by manguu@mail.com

....की टक्केटोणप्याच्या नावाने त्याना पाथरवटीचे काम , विहिरीतून पाणी शेंदायचे काम द्यायचे ?
अगदी द्यावयास हवे .लाएल तर जबरदस्तीने करुन घ्यावे . हि एक चांगली गोस्।ट चीनच्या कम्युनीस्ट पक्षा कडून घेण्यासारखी आहे.

In reply to by माहितगार

बाबर मेला पण इतिहासातील अपकृत्ये लपवू इच्छिणारी जी काही मंडळी आहेत त्या सर्वांची नैतीक जबाबदारी बनते.
नेमके कोण हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. 'आम्ही बाबराचे समर्थक आहोत' अशी भूमिका कुणी घेतली आहे का ?

In reply to by माहितगार

'ऐतिहासिकता सिद्ध करण्यासाठी तर्कसुसंगत प्रमाण साधनांद्वारे आधार द्यावे लागतात हे खरेच, पण एखाद्या गोष्टीस आज पुरावा नाही म्हणून उद्या उपलब्ध होणारच नाही असे नाही.' या माहितगार यांच्या विधानाला दुजोरा देण्यासाठी ह्या दोन माहिती उपलब्ध करत आहे. १. आपण सरस्वती नदी लुप्त झाली असे कैक पिढया मानत आलो आहोत. त्या मान्यतेची सत्यता पटवणारे बरेच संशोधन गेल्या पन्नास वर्षात झाले आहे आणि त्यावर लेख व पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्याचा गोषवारा येथे वाचता येईल. http://serveveda.org/?p=166 २.. श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली असे आपल्या कैक पीढ्या मानतात . एस. आर. राव या पुरातत्ववेत्त्यांनी द्वारके जवळच्या समुद्रात संशोधन केले आणि या विषयावर पुस्तक लिहिले आहे. त्या बद्दलची माहिती येथे वाचता येईल. http://blog.abhinavagarwal.net/2013/09/lost-city-of-dvaraka-sr-rao.html

In reply to by मराठी कथालेखक

पण त्यामुळे न्यायालयाने आजच्या काळात मशीद पाडणे कायदेशीर मानावे आणि मंदिर बांधण्यास परवानगी द्यावी हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य ठरेल असे मला वाटते. कायदेतज्ञ यावर भाष्य करतीलच, पण मला वाटते की सामाजिकदृष्ट्याही ते चुकीचे ठरेल. पुर्वी जे झाले ते झाले आता त्याकरिता नवीन वादळ उठवणे , तोडफोड करणे अयोग्य ठरेल. झालेच तर खरेच हा प्रश्न ६०-७० लाख हिंदूंच्या जिव्हाळ्याचा आहे का ? मला तरी वाटत नाही.. >> +७८६

In reply to by एमी

:)

In reply to by मराठी कथालेखक

>>> अयोध्येतील विशिष्ट ठिकाणी पुर्वी राममंदिर होते आणि नंतर ते पाडून काही शतकांपुर्वी मशीद बांधली गेली असा दावा आहे. कदाचित खराही असेल. पण त्यामुळे न्यायालयाने आजच्या काळात मशीद पाडणे कायदेशीर मानावे आणि मंदिर बांधण्यास परवानगी द्यावी हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य ठरेल असे मला वाटते. सर्वात आधी तिथे श्रीराम मंदीर होते. बाबराने ते पाडून मशीद बांधली. १९९२ मध्ये वापरात नसलेली मशीद इतिहासजमा झाली व तिथे २५ वर्षांहून अधिक काळ मंदीर उभे आहे. न्यायालयाचा निर्णय काहीही लागला तरी आता तिथून मंदीर हटणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सर्वात आधी तिथे श्रीराम मंदीर होते. बाबराने ते पाडून मशीद बांधली. १९९२ मध्ये वापरात नसलेली मशीद इतिहासजमा झाली व तिथे २५ वर्षांहून अधिक काळ मंदीर उभे आहे.
उत्खनानाचा दाखला घेतला तर बाबरीय ढाचाखाली मंदिराच्या भिंती होत्या हे सिद्ध होते. अयोध्येत आहे म्हणून राममंदिर असण्या ची शक्यता जास्त असली तरीही राममंदिरच होते असे म्हणण्यासाठी अधिक सबळ पुराव्याची आवश्यकता असावी. तसे नसते तर न्यायालयाच्या निर्णयाबाबत अधिक आस्वस्तता वाटली असती आणि नंतरचे विधान आपण कदाचित लिहिले नसते.
न्यायालयाचा निर्णय काहीही लागला तरी आता तिथून मंदीर हटणार नाही.
न्यायालयाचा निर्णय तुमच्या बाजूने लागला नाही तर तुम्ही अन्याय ठरली तरी अन्याय् भूमिकेचे समर्थन तेही अशा देवतेच्या नावाने की ज्या देवतेच्या अवतारात न्याय्य बाजूचा आग्रह आहे म्हणून देवता मानले जाते त्या देवतेचे नाव घेऊन न्यायालयाने केलेला निकाल नाकारु इच्छिणे जरा अतीच होत नाही का ?

In reply to by माहितगार

>>> न्यायालयाचा निर्णय तुमच्या बाजूने लागला नाही तर तुम्ही अन्याय ठरली तरी अन्याय् भूमिकेचे समर्थन तेही अशा देवतेच्या नावाने की ज्या देवतेच्या अवतारात न्याय्य बाजूचा आग्रह आहे म्हणून देवता मानले जाते त्या देवतेचे नाव घेऊन न्यायालयाने केलेला निकाल नाकारु इच्छिणे जरा अतीच होत नाही का ? हिंदूंची भूमिका सुरवातीपासूनच न्याय्य होती. न्यायालय न्याय्य/अन्याय्य भूमिका न बघता, व्यावहारिकता न बघता फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या आधारे निकाल देतात. आता ते मंदीर तिथून हलविणे अशक्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हिंदूंची भूमिका सुरवातीपासूनच न्याय्य होती. न्यायालय न्याय्य/अन्याय्य भूमिका न बघता, व्यावहारिकता न बघता फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या आधारे निकाल देतात. आता ते मंदीर तिथून हलविणे अशक्य आहे.
'गृहीत धरणे' असा वाक्प्रचार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

व तिथे २५ वर्षांहून अधिक काळ मंदीर उभे आहे
मग आता कोणतं मंदिर उभारण्याचा निर्धार अधूनमधून बोलला जात असतो...

In reply to by मराठी कथालेखक

तिथे उभे असलेले छोटे मंदीर भव्य स्वरूपात निर्माण करण्याचा निर्धार बोलला जातो.

In reply to by मराठी कथालेखक

६०-७० लाख ? सामान्य जनतेच्या माहितीसाठी भारताची लोकसंख्या १३० कोटी असून त्यात हिंदू ८०% मुस्लिम १४% ख्रिश्चन २% बौद्ध २% आणि इतर २% आहेत . याचा अर्थ जिंदू जनसंख्या ९० कोटीच्या आसपास आहे . अशा परिस्थितीत बहुसंख्य हिंदून्च्या हिताचे रक्षण करणे हे कोणत्याही सरकारचे आद्यकर्तव्य ठरते . परंतु यापूर्वीच्या सरकारानी बेगडी धर्मनिरपेक्षतेचे बुरखे पांघरून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले . या अभद्र अन्यायाचे परिमार्जन त्वरित होणे क्रमप्राप्त आहे... हिंदू मुस्लिम सिक्ख इसाई मिल रहते यहा भाई भाई हे ऐकल्यावर संतापाची एक तिडीक डोक्यात जाते .... कुणाला कुणाच्या रांगेत बसवत आहात? ९० % आणि १४% समसमान ? का म्हणून?

In reply to by झपाटलेला फिलॉसॉफर

सर्व भारतीयांनी स्विकारलेल्या राज्यघटनेनुसार सर्व भारतीय समसमान आहेत. पटत नसेल तर देश सोडू शकता.

In reply to by तर्राट जोकर

>>> सर्व भारतीयांनी स्विकारलेल्या राज्यघटनेनुसार सर्व भारतीय समसमान आहेत. गैरसमज आहे. गैरसमज दूर करण्यासाठी वाचन व अभ्यास वाढवावा.