Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २०

ताज्या घडामोडी - भाग २०

Published on 25/01/2018 - 22:38 प्रकाशित
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले. १) आजतक - कार्वी सर्वेक्षण हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील. म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-poll-is-narendra-modi-still-india-s-first-choice-as-pm-1154288-2018-01-25 २) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-elections-were-held-today-abp-news-csds-survey-639813-639813?rs_type=internal&rs_origin=section&rs_medium=article&rs_index=4

याद्या 43222
प्रतिक्रिया 217

ईनाडू वृत्तसंस्थेची Published 21-Jan-2018 22:57 IST | Updated 22:59 IST एक हेडलाईन
म्हणून, पालकांनी विवाहित शिक्षकांकडेच मुलीला शिकवणीसाठी पाठवावे - शरद पवार
वरील प्रमाणे आहे . बातमीतून याचा नेमका काँटेक्स्ट समजला नाही. शरद पवारांसारख्या 'पुरोगामी' वक्त्याच्या तोंडी असे वाक्य असलेली निव्वळ हेडलाईन प्रश्न चिन्ह / साशंकता निर्माण करते .

In reply to by माहितगार

ओके चेष्टेनी केलेल्या वाक्याची हेडलाईन करायची आणि चेष्टेने म्हटले आहे हे नमूदही करयचे नाही हे आजकलच्या पत्रकारांचे वाग्णे विचीत्र आहे.

In reply to by माहितगार

कॉंटेक्स्ट पूर्ण वेगळा आहे. आ ह साळुंख्यांची पत्नी त्यांची पूर्वाश्रमीची विद्यार्थिनी होती. त्यामुळे आपल्या मुलीला शिकवणीसाठी अविवाहीत शिक्षकांकडे पाठवू नका असे त्यांनी गंमतीने सांगितले. बादवे, पवार 'पुरोगामी' आहेत हा गैरसमज आहे.

In reply to by माहितगार

कोणते गामी आहेत ?
पुरोगामी म्हणजे नक्की कोण याची व्याख्या काय यावर बरेच काही अवलंबून असेल. गोपाळराव आगरकर इत्यादींच्या पंगतीतले खरोखरचे पुरोगामी या भूतलावर आता अस्तित्वात नाहीत. आणि सध्या ज्यांना पुरोगामी म्हटले जाते ते एक नंबरचे लुच्चे, लबाड, लफंगे असतात. तेव्हा सध्याचा पुरोगामी शब्दाचा अर्थ घ्यायचा असेल तर पवार पुरोगामींचे सरताज आहेत. पण जुना अर्थ घ्यायचा असेल तर ते पुरोगामी नक्कीच नाहीत.


In reply to by श्रीगुरुजी

हे विनोदी आहे खरे , खास करून काँग्रेस वर्कींग कमिटी मध्ये त्यांची माता वगळता एकच स्त्री सदस्य आहे. काँग्रेस सारख्या पुरोगामी पक्षात घराणेशाही ची गच्छंती होऊन ५० % स्त्रीया आणि ५० खासदार स्त्रीया एवढी प्रगती आता पर्यंत होण्यास हरकत नव्हती . पण त्याच वेळी काँग्रेसची मर्यादा म्हणजे संघाचे भूषण होऊ शकत नाही. संघात आणि शंकराचार्य पदावर स्त्री आणि सर्व जातीत जन्मलेल्यांना समान संधीची गरज नक्कीच असावी

In reply to by माहितगार

मला तर आपलेही बोलणे तितकेच विनोदी वाटत आहे (कि तुम्हाला वरच्या टिवटिवाटातील विनोदच कळला नाही?). आरएसएस हि स्वयंसेवकांची पुरुष आघाडी आहे तर आरएसएसची स्त्री आघाडी राष्ट्रीय सेविका समिती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तो वरचा टिवटिवाट विनोदापेक्षा वेगळं काही नाही.

In reply to by बिटाकाका

दुसर्‍यांकडे बोट नक्कीच दाखवा तीन बोटे आपल्याकडे निर्देश करतात हा विनोद वाटत असेल तर ठिकच आहे. स्त्री - पुरुश समानते पासून संघ दूर आहे हे आपण का नाकारत आहोत ? स्त्री पुरुषांच्या शाखा एकत्र होतात का ? सघ आणि संघ परिवारातिल सर्व पदे स्त्रीयांना समान संधी साठी खुली आहेत का ? सामाजिक आणि सांस्कृतिक जिवनात स्त्री -पुरुष समानतेसाठी संघाचे नेमके योगदान कोण कोणते खासकरून शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ?

In reply to by माहितगार

आधी काही काळ संघात व्यतीत करा, संघ समजून घ्या आणि नंतर बोलता येईल. पोहणे काय आहे हे काठावर उभे राहून नाही शिकता येत. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते.

In reply to by श्रीगुरुजी

:) इथे व्यक्तिलक्ष्य तर्कदोष आणि गोल पोस्ट शिफ्टींगचा प्रयत्न तर्कदोष येतो. पहिले आपण काँग्रेस कम्यूनीस्ट रिपब्लीकन, तृणमुळ द्रविड मुन्नेत्र मुस्लिम लीग अशा वेगवेगळ्या पक्षात किती काळ घालवला आहे माहित नाही. दुसरे समोरच्या मिपाकर व्यक्तिस संघाची जवळून माहिती नाही असे आपण गृहीत धरता आहात हे ठिक पण विरोधकां ना कच्चे दाखवणे आणि समजणे यात फरक असतो. राहुल गांधी ( घराणेशाहीवर काडिचे प्रेम नाही माझे) सध्या व्यवस्थीत अभ्यास करुन भरवले जाताहेत . उणीवा झाकण्यापेक्षा मान्य करणे आणि काळाच्या ओघात होण्याची अपेक्षा करणे अधिक श्रेयस्कर असते नाही तर दुध किती डोळे झाकुन पिले तरी समोरच्यांना समजतेच. स्त्री सरसंघचालक , स्त्री शंकराचार्य, आणि स्त्रीयांच्या बाजूच्या सामाजिक सुधारणात सरसंघचालकाम्चा सक्रीय पुढाकार कधी पहाण्यास मिळणार हा रोखथोक आणि रास्त प्रश्न आहे.

In reply to by माहितगार

आपणास संघाची माहिती असती तर असे प्रश्न पडलेच नसते. मनुस्मृती प्रमाणेच शंकराचार्य ही कालबाह्य संस्था आहे़. त्यावर संघाचे नियंत्रण नाही. डॉ. ख-यांचे प्रतिसाद नीट वाचल्यास उलगडा होईल.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणायला तसे एकमेकांच्या दृष्टीने काँग्रेस , कम्यूनीस्ट , संघ लीग सगळ्याच कालबाह्य संस्था असतीलही. त्या प्रत्यक्षात नामशेष होतील तेव्हा होतील सध्या आहेत तो पर्यंत स्त्रीयांना समान संधी का असू नयेत . खास करून तुम्ही (म्हणजे संघ) ज्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करण्याची भाषा करतो त्या संस्कृतीत स्त्री देवता होण्यास पात्र असू शकते तर सरसंघचालक होण्यास पात्र होऊन आता पर्यंत किमान अर्ध्या किंवा जास्तही सरसंघचालकांची यादीतील नावे स्त्रीयांची असावयास नको होती किंवा कसे . तुम्ही (म्हणजे संघ) जेव्हा सांस्कृतीक प्रतिनिधीत्वाची भाषा करता तेव्हा अप्रत्यक्षपणे जबाबदारी नेतृत्वाची असते नेतृत्वाकेडे समन्याय समसंधी दृष्टी असणे , आपल्यातील (संस्कृतीतील ) चांगल्याचे भूषण बाळगताना आपल्या लोकांना अयोग्या पासून दूर रहाण्यास सांगण्याची जबाबदारी नेतृत्वावर असते की नाही, अशी नैतीक जबाबदारी संघ या संघटनेवर नाही / नव्हती हे दिशाभूल करणारे आणि कातडी बचावू नाही किंवा कसे . या बाबतीत स्वा. सावरकरांच्या बाबतीत टिकेस संधी कमी मिळते समाजसुधारणे बाबत सावरकर सक्रीय पुढाकारात दिसतात . तसे संघाचे नेतृत्व सक्रीय पुढाकारात दिसते का ? बाबा आढावांनी एग गाव एक पाणवठाचे आंदोलन केले की सरसंघचालक त्यांच्या मांडीला मांडीलावून चला मी येतो तुमच्या सोबत असे म्हणाले का किंवा अशा कोणत्याही सामाजिक सुधारणा चळवळीत चला आम्ही येतो तुमच्या सोबत ही सकारात्मक कमी तर पडत नाही ना हा चिंतनाचा विषय असावा. डॉ. खर्‍यांना माझा समतोल संपल्या सारखे वाटले कदाचित आपणासही तसे वाटेल पण योग्य जागी टिका करणारा मिपा टिकाकारांचे विचारावर चिंतन करावे की करू नये हा निर्णय ज्याचा त्याचा.

In reply to by माहितगार

>>> खास करून तुम्ही (म्हणजे संघ) ज्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करण्याची भाषा करतो त्या संस्कृतीत स्त्री देवता होण्यास पात्र असू शकते तर सरसंघचालक होण्यास पात्र होऊन आता पर्यंत किमान अर्ध्या किंवा जास्तही सरसंघचालकांची यादीतील नावे स्त्रीयांची असावयास नको होती किंवा कसे . सरसंघचालक ज्या संघटनेचे प्रमुख आहेत ती मिश्र संघटना नसून फक्त पुरूषांची संघटना आहे. महिलांसाठी वेगळी राष्ट्रसेविका समिती आहे. ज्याप्रमाणे पुरूष व महिलांचे क्रिकेट संघ वेगळे आहेत तशाच या संघटना आहेत. >>> तुम्ही (म्हणजे संघ) जेव्हा सांस्कृतीक प्रतिनिधीत्वाची भाषा करता तेव्हा अप्रत्यक्षपणे जबाबदारी नेतृत्वाची असते नेतृत्वाकेडे समन्याय समसंधी दृष्टी असणे , आपल्यातील (संस्कृतीतील ) चांगल्याचे भूषण बाळगताना आपल्या लोकांना अयोग्या पासून दूर रहाण्यास सांगण्याची जबाबदारी नेतृत्वावर असते की नाही, अशी नैतीक जबाबदारी संघ या संघटनेवर नाही / नव्हती हे दिशाभूल करणारे आणि कातडी बचावू नाही किंवा कसे . या बाबतीत स्वा. सावरकरांच्या बाबतीत टिकेस संधी कमी मिळते समाजसुधारणे बाबत सावरकर सक्रीय पुढाकारात दिसतात . तसे संघाचे नेतृत्व सक्रीय पुढाकारात दिसते का ? हे काय लिहिलंय ते समजलंच नाही. एकच सांगू शकतो की संघ आपल्या कामांची जाहिरातबाजी करीत नाही. >>> बाबा आढावांनी एग गाव एक पाणवठाचे आंदोलन केले की सरसंघचालक त्यांच्या मांडीला मांडीलावून चला मी येतो तुमच्या सोबत असे म्हणाले का किंवा अशा कोणत्याही सामाजिक सुधारणा चळवळीत चला आम्ही येतो तुमच्या सोबत ही सकारात्मक कमी तर पडत नाही ना हा चिंतनाचा विषय असावा. संघात कधीही अस्पृश्यता पाळली जात नाही. त्यामुळे असल्या दिखाऊ कार्यक्रमात जाण्याची संघाला गरज पडली नाही. समजा संघवाले तिथे गेले असते तर आढावांनी पाल अंगावर पडल्यासारखे त्यांना झटकले असते कारण हिंदुत्ववादी हे समाजवाद्यांच्या दृष्टीने अस्पृश्य आहेत.

In reply to by माहितगार

एखाद्या स्त्रीने शंकराचायांचे पद भूषवावे ह्यासाठी सरसंघचालक काय करणार ? ह्या दोन संस्थांचा-पदांचा एकमेकांशी संबंध काय ?

In reply to by माहितगार

माहितगार साहेब रा स्व संघ आणि त्यांची स्त्री आघाडी "राष्ट्रसेविका समिती" आहे मग त्या साठी रा स्व संघात महिलांना कशाला पद हवंय. ज्यांना काम करायचंय त्या स्त्रिया "समितीत" काम करतीलच कि. हि संस्था "स्वयंसेवकांची" आहे "पदाधिकाऱ्यांची" नाही. बाकी रा स्व संघातील सर्व "पदे" हि केवळ प्रशासनिक सोयीसाठी आहेत. आणि यातील बहुसंख्य माणसे आयुष्यभर कार्यकर्ते म्हणून खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून निरलस पणे २४ तास कार्यरत राहूनच मोठी झालेली आहेत. रा स्व संघात "घराणेशाही" नाही. त्यातील कोणीही "युवराज" नाही किंवा आजोबाच्या, काकाच्या किंवा बाप कमाईवर मोठे झालेले नाही. एकही सरसंघचालक आपल्या बापाच्या पुण्याईवर "वर चढलेला" नाही. एवढे आपण समजून घेतले तरी पुष्कळ होईल. अन्यथा विविध ठिकाणी चालू असलेली घराणेशाही(मुंबई,बारामती, नांदेड,,उ. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश पासून दिल्ली पर्यंत) दिसते आहेच आणि या सर्व घराण्यातील युवराजांची एकंदर बौद्धिक आणि वैचारिक पातळी सुद्धा दिसून येतेच.

In reply to by माहितगार

असमानता लपवूनही लपत नाही. :)) स्त्री पुरुष समान आहेत याचा अर्थ असा नव्हे कि स्त्रियांनी पण काश्मीरमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तंबूत राहून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. त्या आदिवासी क्षेत्रात स्त्रियांना शिक्षण देणे कुटुंब नियोजनाबद्दल माहिती देणे इ कामे करीत असतील तर ती कामे पण पुरुषांनीच करायला हवीत जाऊ द्या. तुम्ही एकांगी (चष्मा लावून) विचार करीत आहात. तेंव्हा तुम्हाला समजावणे माझ्या मर्यादित बुद्धीच्या पलीकडचे आहे. क्षमस्व

In reply to by सुबोध खरे

माझ्या पूर्ण प्रतिसादातील तेवढीच ओळ तुम्ही शोधून काढून जितं मया म्हणत आहात. बाकी पुरोगामी आपटार्ड डावे इ करतात तसाच छिद्रान्वेष करून मुद्द्याला बगल देऊन दाखवलीत ठीक आहे तुमचंच खरं. मला तुम्ही समतोल आहात असे वाटत होते. हा हन्त असो

In reply to by सुबोध खरे

स्त्री पुरुष समान आहेत याचा अर्थ असा नव्हे कि स्त्रियांनी पण काश्मीरमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तंबूत राहून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे.
धर्म संस्कृतीच्या गप्पा करता त्यात स्त्रीला देवता होण्याचा मान काय कोनाड्यात बसवून ठेवण्यासाठी दिला जातो ? काश्मिरात स्त्रीयांनी काम न करण्यासारखे काय आहे ? संघीष्ट विचारप्रणाली या बाबतीत खर्‍या समतेच्या धर्माला पारखी झालेली आहे ह्या आक्षेपात तथ्य असावे आणि समता सिद्ध करण्यासाठी स्त्रीयांप्रती असलेले असामातचे लपवलेले अ‍ॅटीट्यूड मधून बाहेर पडण्यासाठी सरसंघचालकपद आणि शंकराचार्य पद स्त्रीयांना मिळावयास हवेच . ( मी इतर धर्मीय संघटनांसाठीही हाच आग्रह मांडेन) स्त्री देवता असू शकते तर सरसंघचालक किंवा शंकराचार्य का असू शकत नाही ? इथे म.गांधी प्रणित काँग्रेस वैचारीक दृष्ट्या पुढे दिसते .

In reply to by माहितगार

>>> संघीष्ट विचारप्रणाली या बाबतीत खर्‍या समतेच्या धर्माला पारखी झालेली आहे ह्या आक्षेपात तथ्य असावे आणि समता सिद्ध करण्यासाठी स्त्रीयांप्रती असलेले असामातचे लपवलेले अ‍ॅटीट्यूड मधून बाहेर पडण्यासाठी सरसंघचालकपद आणि शंकराचार्य पद स्त्रीयांना मिळावयास हवेच . ( मी इतर धर्मीय संघटनांसाठीही हाच आग्रह मांडेन) स्त्री देवता असू शकते तर सरसंघचालक किंवा शंकराचार्य का असू शकत नाही ? इथे म.गांधी प्रणित काँग्रेस वैचारीक दृष्ट्या पुढे दिसते . बरं, तसे समजा.

In reply to by माहितगार

काश्मिरात स्त्रीयांनी काम न करण्यासारखे काय आहे ? हे वाक्य "जितं मया" म्हणण्यासाठी पुरेसे आहे. __/\__

In reply to by सुबोध खरे

शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ? रा स्व संघ हा हिंदू महासभा/ हिंदू राष्ट्रीय संघ नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे जो हिंदू हित रक्षण यासाठी "पण" काम करतो. याचा अर्थ असा नव्हे कि हिंदू धर्माबद्दल कुठेही काहीही झाले कि संघाने त्यात पडावे शंकराचार्य काय करतात यात त्यांनी का लुडबुड करावी? . उद्या तुम्ही हेही म्हणाल कि हिंदू धर्म सुधारणेच्या कामात ते का काम करत नाहीत?किंवा अनिस बरोबर काम का करत नाहीत रा स्व संघाने काय काम करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे? तेंव्हा शंकराचार्याच्या पदात त्यांनी भाग का घेतला नाही हा प्रश्न संपूर्ण गैरलागू आहे.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजींना दिलेला प्रतिसाद पान बदलल्याने दिसणार नाही म्हणून कॉपी पेस्टवतो म्हणायला तसे एकमेकांच्या दृष्टीने काँग्रेस , कम्यूनीस्ट , संघ लीग सगळ्याच कालबाह्य संस्था असतीलही. त्या प्रत्यक्षात नामशेष होतील तेव्हा होतील सध्या आहेत तो पर्यंत स्त्रीयांना समान संधी का असू नयेत . खास करून तुम्ही (म्हणजे संघ) ज्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करण्याची भाषा करतो त्या संस्कृतीत स्त्री देवता होण्यास पात्र असू शकते तर सरसंघचालक होण्यास पात्र होऊन आता पर्यंत किमान अर्ध्या किंवा जास्तही सरसंघचालकांची यादीतील नावे स्त्रीयांची असावयास नको होती किंवा कसे . तुम्ही (म्हणजे संघ) जेव्हा सांस्कृतीक प्रतिनिधीत्वाची भाषा करता तेव्हा अप्रत्यक्षपणे जबाबदारी नेतृत्वाची असते नेतृत्वाकेडे समन्याय समसंधी दृष्टी असणे , आपल्यातील (संस्कृतीतील ) चांगल्याचे भूषण बाळगताना आपल्या लोकांना अयोग्या पासून दूर रहाण्यास सांगण्याची जबाबदारी नेतृत्वावर असते की नाही, अशी नैतीक जबाबदारी संघ या संघटनेवर नाही / नव्हती हे दिशाभूल करणारे आणि कातडी बचावू नाही किंवा कसे . या बाबतीत स्वा. सावरकरांच्या बाबतीत टिकेस संधी कमी मिळते समाजसुधारणे बाबत सावरकर सक्रीय पुढाकारात दिसतात . तसे संघाचे नेतृत्व सक्रीय पुढाकारात दिसते का ? बाबा आढावांनी एग गाव एक पाणवठाचे आंदोलन केले की सरसंघचालक त्यांच्या मांडीला मांडीलावून चला मी येतो तुमच्या सोबत असे म्हणाले का किंवा अशा कोणत्याही सामाजिक सुधारणा चळवळीत चला आम्ही येतो तुमच्या सोबत ही सकारात्मक कमी तर पडत नाही ना हा चिंतनाचा विषय असावा. डॉ. खर्‍यांना माझा समतोल संपल्या सारखे वाटले कदाचित आपणासही तसे वाटेल पण योग्य जागी टिका करणारा मिपा टिकाकारांचे विचारावर चिंतन करावे की करू नये हा निर्णय ज्याचा त्याचा.

In reply to by माहितगार

बाबा आढावांनी एग गाव एक पाणवठाचे आंदोलन केले की सरसंघचालक त्यांच्या मांडीला मांडीलावून चला मी येतो तुमच्या सोबत असे म्हणाले का किंवा अशा कोणत्याही सामाजिक सुधारणा चळवळीत चला आम्ही येतो तुमच्या सोबत ही सकारात्मक कमी तर पडत नाही ना हा चिंतनाचा विषय असावा.
आपण संघाला हे का सुचवत नाही ? बाकी बाबा आढावांनी आदिवासींच्या प्रश्नांवर काय केले, नरेंद्र दाभोलकरांनी काश्मिरी विस्थापितांच्या प्रश्नावर काय केले, मुक्तांगण चे अनिल अवचट ह्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय केले हे असे अनंत प्रश्न मलाही पडले आहेत. थोडक्यात काय, कोणी काय करावे ह्यावर आपले नियंत्रण नसते.खाजगी संस्था आणि वैयक्तिक आयुष्य ह्यावर तर नाहीच नाही.

In reply to by तेजस आठवले

नरेंद्र दाभोलकरांनी काश्मिरी विस्थापितांच्या प्रश्नावर काय केले, मुक्तांगण चे अनिल अवचट ह्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय केले हे असे अनंत प्रश्न मलाही पडले आहेत.
सहमत आहे.

In reply to by माहितगार

बाबा आढावांनी एग गाव एक पाणवठाचे आंदोलन केले मग त्यांनी काश्मीर प्रश्नावर काहीच काम का केलं नाही? किंवा पुर्वांचलात आदिवासी प्रश्नावर काही का केलं नाही? त्यांचं सगळं सगळं फुकट गेलं म्हणायचं का?

In reply to by सुबोध खरे

मुळात मला एक वेगळा प्रश्न आहे, संघातील बरेचसे कार्यकर्ते सामान्यपणे आपले घर सोडून एका विशिष्ट ध्येयाने कार्यप्रवण होऊन येत असतात, आपल्या समाजाचा भाग बघता संघासारख्या सामाजिक संघटनेसाठी पूर्णवेळ घरदार सोडून काम करण्याची सवय अजून स्त्रियांमध्ये असेल असे वाटत नाही, विशेषतः संघकार्यकर्ते ज्या कुटुंबामधून येतात तिबे तर नाहीच नाही. राष्ट्रसेविका त्यांचे काम घर सांभाळून करतात, संघाचे कोणतेही पदाधिकारी घर सांभाळून काम करत नाहीत त्यामुळे हि तुलनाच apple to orange आहे. संघाची पॉलिटिकल विंग भाजपमध्ये असे का नाही हे मात्र तुम्ही विचारू शकता, पण तिथे विचारलेत तर तोंडघशी पडण्याची शक्यता जास्त.

In reply to by माहितगार

बघा हं पटतंय का, एक शिक्षण संस्था आहे, तिची दोन शाळा / कॉलेज आहेत. एक फक्त मुलींसाठी आणि एक फक्त मुलांसाठी. ह्या दोनही संस्थांची घडण वेगवेगळी आहे. ही शिक्षण संस्था ह्या दोन्ही शाळेतल्या विद्यार्थी/विद्यार्थिनी एकत्र येतील असे एकही कार्यक्रम घेत नाही.इतकंच काय, एखादा प्रचंड हुशार असलेला विद्यार्थी मुलगा मुलींच्या शाळेत प्रवेश मिळवू शकत नाही तसेच एखादी हुशार मुलगी मुलांच्या शाळेतल्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.बरं असहिष्णुता फोफावली नसल्याने ह्या दोघांनाही आपल्यावर अन्याय होत आहे असे ओरडून जगाला सांगता येत आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक जिवनात स्त्री -पुरुष समानतेसाठी संघाचे नेमके योगदान कोण कोणते खासकरून शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ?
माहित नाही. तुम्ही संघाच्या संपर्क कार्यालयाला हे प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तरे आम्हालाही सांगा.

In reply to by तेजस आठवले

सामाजिक आणि सांस्कृतिक जिवनात स्त्री -पुरुष समानतेसाठी संघाचे नेमके योगदान कोण कोणते खासकरून शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ?
शंकराचार्य पदावर नव्या नियुक्त्या नक्की कशा करतात याची कोणाला माहित आहे का? तिथे प्रायमरी, इलेक्शन वगैरे होतात का? त्यात संघाचा किंवा कम्युनिस्टांचा किंवा काँग्रेसचा किंवा ते मठ-आखाडे बाहेरच्या कोणाचाही किती रोल असतो याविषयी कोणाला काही माहिती आहे का? मला तरी नाही. दुसरे म्हणजे वेगवेगळ्या चार पीठांचे वेगळे शंकराचार्य आहेत हे माहित आहे. मागे जयललितांनी कांचीपीठाच्या जयेंद्र सरस्वतींना अटक केली होती तेव्हा त्यांचे आणि द्वारका पीठाचे स्वरूपानंद सरस्वती मधूनमधून अयोध्या प्रश्नावर बोलत असतात म्हणून त्यांचे अस्तित्व कळले. बाकीचे दोन शंकराचार्य नक्की कोण आहेत याविषयी मला तरी काहिही माहित नाही. या पदावरील व्यक्तीचे काम काय, जबाबदार्‍या काय वगैरे गोष्टीही माहित नाहीत. त्या माहितगारांना माहित असल्यास त्यांनी लिहावे ही विनंती. म्हणजे त्यात संघ कुठून आला आणि संघाने त्याविषयी काही करावे का याविषयी काहीतरी मत मांडता येईल. नाहीतर जो काही चालू असेल तो हवेतलाच गोळीबार.

In reply to by तेजस आठवले

ज्या मूढाला महिलांच्या आणि पुरूषांच्या स्वच्छतागृहातील फरक समजत नाही तो मंदच असला पाहिजे.

माहितगार, शंकराचार्य पद स्त्री आणि ब्राह्मणेतर जन्मियांना संधी मिळावी म्हणून संघाने नेमकी कोणती सकारात्मक पावले उचलली ? संघाबद्दल आपले मत कळले. क्रु प या खालिल बातमिबद्दल आपले बहुमोल विचार सांगाल का? https://www.hindustantimes.com/india-news/kerala-muslim-woman-who-led-friday-prayers-now-faces-threat/story-GqW65QTABkiyd5SjZQ9YZM.html

In reply to by अर्जुन

स्त्रीयांना समान संधी नाकारण्यात कोणतेच धर्मिय मागे नसतात. ख्रिश्चनांमध्ये पोपची पदे श्रद्धावंतांच्या खलिफ ते मुल्ला मौलवी ते प्रेषित ते ईश्वर या जागा ( सोबलॉपर्सनल लॉ बोर्ड ते वक्फ बोर्ड) अजूनही पुरुषांसाठी राखीव असतात कम्युनिस्ट पार्टीतही वरच्या लेव्हलवर स्त्रीयांचेप्रतिनिधीत्व जेमतेम असते. ते आता मी चर्चा करत असलेली ह्यांची पदे राखीव कुरणे आहेत. काम तर मुख्यत्वे बौद्धीक अथवा संघटन कौशल्याचे दिसते आणि स्त्रीयांमध्ये संघटन कौशल्य अथवा बौद्धीकतेचे गुणसूत्रे ट्रान्सफर होण्याची प्रोबॅबीलीटी पुरुषांपेक्षा वेगळी नसावी तरीही ... समान संधी नाकारणारी विषमता प्रगतीस मारक असते.

माहितगार साहेब, स्त्री आणि पुरुष आघाड्या वेगळं असणं हे स्त्री पुरुष समानतेच्या विरोधात आहे हा निष्कर्ष कसा काय काढला? वेगळी स्त्री समिती - स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली - असणं हे तर उलट स्त्री सक्षमीकरणातील महत्वाचं पाऊल नाहीये का? मुळात महिलांना पुरुषांच्या बाजूला बसवले म्हणजे समानता आणि सक्षमीकरण झाले हा निष्कर्षच चुकीचा आहे.

In reply to by बिटाकाका

महिलांना पुरुषांच्या बाजूला बसवले म्हणजे समानता आणि सक्षमीकरण च्या संधी निर्माण होतात. मुख्य म्हणजे अ‍ॅटीट्यूड बदलण्या च्या दिशेने सकारात्मक पाऊल पडते.

In reply to by माहितगार

सक्षमीकरणाच्या संधी फक्त त्यानेच निर्माण होतील हा अट्टाहास कशाला? स्त्रियांना स्वतंत्र नेतृत्व करण्याची संधी दिली तर त्या सक्षम होणार नाहीत का? महिला बचत गटाचा प्रमुख स्त्री असताना महिलांना सक्षम होण्याची जास्त संधी आहे कि प्रमुख पुरुष असताना? तुमचा ऍटिट्यूडचा मुद्दा बरोबर आहे पण तो संघाच्या बाबतीत वापरून तुम्ही संघ स्त्री पुरुष समानतेच्या विरोधात आहे हे सिद्ध करू पाहत आहात कि काय असे वाटू लागले आहे. संघात पुरुष आणि स्त्रिया वेगळ्या असण्याची करणे खाली आलेली आहेतच आणि वेगळे असूनही सक्षमीकरण कसे साधले जातेय हेही आलेच आहे.

In reply to by बिटाकाका

......संघात पुरुष आणि स्त्रिया वेगळ्या असण्याची करणे खाली...
पुरुषांचा स्त्रीयांवर विश्वास नाही म्हणून कि स्त्रीयांचा पुरुषांवर विश्वास नाही म्हणून , स्त्रीला देवी , परस्त्री माते समामा, किमान भाऊ बहीणी राखी अशा परंपराचा अभिमान सांगणार्‍यांचा आत्म्यांचे अद्वैत सांगणार्‍यांच्या संघटनेत अशा अविश्वासास जागा असावयास नको.
सक्षमीकरणाच्या संधी फक्त त्यानेच निर्माण होतील हा अट्टाहास कशाला?
रामनाथ कोविंदांना राष्ट्रपती पद दिले म्हणजे दलितांचे सक्षमीकरण पूर्ण होते असे नाही पण तुम्ही तुमचे इंटेशन स्वच्छ आहे आणि तुम्ही मन मोकळेपणाने दलितांना स्विकारु इच्छिता हे स्पष्ट होत असते. मोदींना किंवा त्यांच्या मंत्र्यांना रामनाथ कोविंदांच्या जाणार्‍या फोनला किंवा मोहन भागवतांच्या फोनला एक मुल्य प्राप्त होत असते . तेच मुल्य समितीच्या संचालिकेच्या फोनला प्राप्त होईल याची गॅरंटी देता येऊ शकते का ? पण तिच संचालिका भागवतांच्या जागी सरसंघचालक असते तेव्हा तिच्या फोनला अधिक मुल्य प्राप्त होते हे वेगळे सांगावे लागावे का ? त्याही पेक्षा महत्वाचे पुरुष सरसंघचालकांपेक्षा काही महिला संचालिका अधिक प्रगल्भ राहील्या असू शकतीलही केवळ संघीय पुरुष प्रधान प्रभावामुळे एखाद्या संचालिकेचे अधिक चांगले विचार दृस्।टीकोण संधी पासून वंचित राहिल्यास नुक्सान कुणाचे अधिक होते हिंदूंचेच होते ना ? अटलजी दुर्गा कुणास म्हणाले तर संघाच्या एखाद्या संचालिकेकडे बोट जात नाही क्रेडीट चक्क काँग्रेसकडे जाते ! सक्षमीकरण आणि नेतृत्व संधीचा संबंढ याचे बाकी उत्तर मी गा पैंसाठी खाली लिहिले आहे त्याच्या पुर्नावृत्तीची आवश्यकता नसावी.

In reply to by माहितगार

तुम्ही सतत गोलपोस्ट चेंज करत आहात. आता सेविका समितीच्या प्रमुखांचा फोन मोदींना किती महत्वाचा आहे किंवा नाही याची खात्रीपूर्वक काही माहिती आहे का आपल्याकडे? मोदींनी कुणाचा फोन उचलला यावरून सक्षमीकरण ठरणार का? उद्या संघाचे प्रमुखपद (फक्त तुमच्या म्हणण्याखातर) बदलून महिलेला दिले आणि उद्या काँग्रेसचे सरकार आले तर त्यांचे पंतप्रधान सरसंघचालकांचा फोन उचलतीलाच याची खात्री आहे का? मुळात संघात महिला असण्याचा आणि नसण्याचा तुम्ही सक्षमीकरणाशी लावलेला संबंध हास्यास्पद आहे. खाली कोणीतरी विचारलेल्या प्रश्नांकडे तुम्ही सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले दिसते. वर्षानुवर्षे खेळत असलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघात महिला का नाहीत हा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी? तिथेही तर महिलांच्या संघाला पुरुषांइतके स्थान, मान नाही. एखादी महिला कदाचित गांगुली, धोनी, विराटपेक्षा जास्त चांगले कर्णधारपद भूषवू शकली असती. हा प्रश्न पडलाय का कधी तुम्हाला? शिवाय, महिलांना स्वतंत्रपणे नेतृत्व दिल्याने त्यांचे सक्षमीकरण जास्त होईल कि पुरुषांसमोर लढण्याचे स्थान दिल्याने त्यांचे जास्त सक्षमीकरण होईल हा प्रश्नही तुम्ही दुर्लक्ष केलेला दिसतोय. जर महिलांना फक्त उमेदवारी देण्याने त्या सक्षम होणार असतील तर फक्त उमेदवारी देणे बंधनकारक करायला हवे होते, महिला राखीव मतदारसंघांची काय गरज होती? तुम्ही फक्त संघात महिलांना स्थान नाही म्हणून संघ स्त्री पुरुष समानता मनात नाही असा धोशा लावून बसला आहात. ते तसे का आहे याच्याबद्दल काहीही मत न व्यक्त करता तसे आहे म्हणजे समानतेला विरोध आहे असे मत आपण व्यक्त करत आहात.

In reply to by गामा पैलवान

एखाद्यास शंकराचार्यपदावर बसवणं हे संघाचं काम नाही.
ऐक्य असल्या शिवाय हित कसे साधेल ? आणि जिथे विषमता आहे तिथे ऐक्य कसे साधेल ? विषमता असेल तर हित कसे साधेल ?

रा स्व संघात महिलांना पद का नाही? भारतीय क्रिकेट पुरुष संघाची कप्तान मिथिला राज का नाही? भारतीय हॉकी पुरुष संघाची कप्तान सुशीला चानू का नाही? मिस्टर वर्ल्ड स्पर्धेची विजेती मानुषी चिल्लर का नाही? किती दिवस चालणार ही स्त्री-पुरुष असमानता?

In reply to by श्वेता व्यास

....रा स्व संघात महिलांना पद का नाही? भारतीय क्रिकेट पुरुष संघाची कप्तान मिथिला राज का नाही?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व हिंदूंसाठी आहे कि केवळ पुरुष असलेल्या हिंदुंसाठी चे राखीव कुरण आहे ? हे कुरण राखीव का आहे याचे काही तारतम्य असलेले कारण पुढे येताना दिसत नाही . जेनेटिकली संघटना कौशल्यात केवळ पुरुष सुपीरियर असतात कि संघाला द्यावयाच्या बौद्धिकांसाठी जेनेटिकली केवळ पुरुष सुपीरियर असतात ? कि एखाद्या देवीचे नेतृत्व स्वीकारण्याने संघिष्टांची झोप उडते ? टेनिस मध्ये जशा मिक्स मॅचेस असतात तशा क्रिकेट हॉकी आणि इतर खेळातही असाव्यात आणि त्याची केप्टनशिप काही वेळा महिलांना मिळण्यास काय हरकत आहे ? हॉकी इंडियाला किमान एकवेळा स्त्री अध्यक्ष मिळाली बोर्ड फॉर कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियास खेळात कर्तृत्व नसलेली मंडळी चालतात पण ९० वर्षाच्या इतिहासात एकही स्त्री अध्यक्ष सापडू नये हि लाजिरवाणी गोष्ट नाही का ?

In reply to by माहितगार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व हिंदूंसाठी आहे कि केवळ पुरुष असलेल्या हिंदुंसाठी चे राखीव कुरण आहे ? हे कुरण राखीव का आहे याचे काही तारतम्य असलेले कारण पुढे येताना दिसत नाही . जेनेटिकली संघटना कौशल्यात केवळ पुरुष सुपीरियर असतात कि संघाला द्यावयाच्या बौद्धिकांसाठी जेनेटिकली केवळ पुरुष सुपीरियर असतात ? कि एखाद्या देवीचे नेतृत्व स्वीकारण्याने संघिष्टांची झोप उडते ? इतक्या जणांनी वेगवेगळ्या प्रकारे अनेकवेळा सांगूनही तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही याचे आश्चर्य वाटते. संघ हा सर्व हिंदूंसाठी आहे. त्यासाठी संघाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी अनेक संघटना तयार केल्या आहेत. काही संघटनांमध्ये फक्त पुरूष सदस्य आहेत, काहीत फक्त महिला आहेत तर काहींमध्ये महिला व पुरूष असे दोघेही असतात. विश्व हिंदू परीषद ही संघटना धार्मिक क्षेत्रात काम करते व यात महिला व पुरूष हे दोघेही असतात. अखिल भारतीय विद्यार्थी परीषद ही विद्यार्थी संघटना असून यात विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत. राष्ट्रसेविका समिती ही महिलांची संघटना असून यात फक्त महिला असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने ओळखल्या जाणार्‍या संघटनेत फक्त पुरूष असतात. याव्यतिरिक्त वनवासी संघ, भारतीय मजदूर संघ, बँक कर्मचार्‍यांची संघटना अशा अनेक संघटना आहेत ज्यात फक्त पुरूष, फक्त स्त्रिया किंवा पुरूष व स्त्रिया असे दोघेही असू शकतात. अजूनही लक्षात येत नसेल तर जास्त डोक्याला ताप करून न घेता सोडून द्या. टेनिस मध्ये जशा मिक्स मॅचेस असतात तशा क्रिकेट हॉकी आणि इतर खेळातही असाव्यात आणि त्याची केप्टनशिप काही वेळा महिलांना मिळण्यास काय हरकत आहे ? हॉकी इंडियाला किमान एकवेळा स्त्री अध्यक्ष मिळाली बोर्ड फॉर कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियास खेळात कर्तृत्व नसलेली मंडळी चालतात पण ९० वर्षाच्या इतिहासात एकही स्त्री अध्यक्ष सापडू नये हि लाजिरवाणी गोष्ट नाही का ? चांगली अभिनव कल्पना आहे. कल्पना भारतीय क्रिकेट महामंडळ, हॉकी महासंघ इ. संघटनांना पाठवा. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेलाही ही कल्पना पाठवा. म्हणजे ऑलिंपिकमध्ये पुरूष व स्त्रियांचे वेगवेगळे सामने न होता एकत्रित सामने होतील. परंतु त्यात एक धोका आहे. उदाहरणार्थ १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुरूष व महिला अशा दोघांचीही एकत्रीत शर्यत घेतली तर महिलांना एकही पदक न मिळण्याची शक्यता आहे. २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर अशी कोणत्याही अंतराची शर्यत एकत्रित घेतली तर सर्व पदके पुरूष खेळाडूंनाच मिळतील व त्यामुळे महिलांवर अन्याय झाल्याचा आरडाओरडा सुरू होईल. त्याच्या आधी मिपापासूनच सुरूवात करूया. मिपा संपादकांशी संपर्क करून अनाहिता या महिलांच्या गटात सर्वांना प्रवेश द्यायला सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

...मिपा संपादकांशी संपर्क करून अनाहिता या महिलांच्या गटात सर्वांना प्रवेश द्यायला सांगा.
गोलपोस्ट शिफ्टींग - मिपा हे संस्थळ संपादक पद देताना स्त्री पुरुष असा भेद करत नसावे म्हणजे पैसा किमान काही काळ संपादक होत्या असे आठवते. अनाहिता सारखा पुरुषांना वेगळा कोनाडा असावयास माझी हरकत नाही. पण कॉमन मिसळपाव वर संपादक पदा साठी मिपा मालकांनी स्त्री - पुरुषांना समान संधी दिल्या आहेत त्याचा आदर वाटतो. संघाने हा चांगला गूण मिपा मालकांकडूण घेऊन पैसा ताईनां सरसंघचालक केल्यास आम्ही संघ आणि पै ताईंचे अभिनंदन करण्यास अग्रभागी असू : ) क्रिडा वेग वेगळ्या टिम्स बंद करण्यासाठी नव्हे पण एकत्रित टिम आणि एकत्रित खेळ टेनिस बॅटमींटन प्रमाने असावेत . धावण्याच्या किंवा इतर क्रिडा शर्यतीत किती पुरुष स्त्रीयांपेक्षा अधिक चांगले पळू शकतात आणि किती स्त्रीया किती पुरुषां ना मात देऊ शकतात हे पहाणे रोचक आणि स्त्रीयांची प्रगती मानवी उत्क्रांतीस सबळ करणारी ठरेल .
अजूनही लक्षात येत नसेल तर जास्त डोक्याला ताप करून न घेता सोडून द्या.
ताप कुणाला कशाला होतोय ;)) - असा ताप होण्याचे कोणत्याच बाऊस काही कारण नाही खरे तर- स्त्रीयांना ही अशा पदांमध्ये उत्साह असता तर त्यांना ताप झाला असता पण असा ताप करुन घेण्या पेक्षा बहुतेक सुज्ञ लोक सघंटना पंथ आणि धर्मापासून दुरावतात अशा दुरावण्याने नुक्सान कुणाचे होते ? विषमता राबवल्याचा पश्चाताप कुणास व्हावयास हवा ? बाकी कुणाला किती लक्षात येते आहे किंवा नाही हे पहाणे मी माझ्या बाजूने बापड्या वाचकांवर सोडतो. :)
....राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने ओळखल्या जाणार्‍या संघटनेत फक्त पुरूष असतात.
असे का ? याला काहीही तार्कीक आधार नाही :). जेनेटिकली संघटना कौशल्यात केवळ पुरुष सुपीरियर असतात कि संघाला द्यावयाच्या बौद्धिकांसाठी जेनेटिकली केवळ पुरुष सुपीरियर असतात ? याचे उत्तर अद्याप आलेले नाही . आणि बहुतेक येणारही नाही तेव्हा असो.

In reply to by माहितगार

गोलपोस्ट शिफ्टींग - मिपा हे संस्थळ संपादक पद देताना स्त्री पुरुष असा भेद करत नसावे म्हणजे पैसा किमान काही काळ संपादक होत्या असे आठवते. अनाहिता सारखा पुरुषांना वेगळा कोनाडा असावयास माझी हरकत नाही. पण कॉमन मिसळपाव वर संपादक पदा साठी मिपा मालकांनी स्त्री - पुरुषांना समान संधी दिल्या आहेत त्याचा आदर वाटतो. संघाने हा चांगला गूण मिपा मालकांकडूण घेऊन पैसा ताईनां सरसंघचालक केल्यास आम्ही संघ आणि पै ताईंचे अभिनंदन करण्यास अग्रभागी असू : ) हद्द झाली. दुर्दैवाने तुम्हाला अजूनही समजत नाहीय्ये (किंवा समजत नसल्याचा आव आणताय). मिपा हे संयुक्त संस्थळ आहे. त्यामुळे या संस्थळाचा संपादक स्त्री किंवा पुरूष असा कोणीही असू शकतो. अनाहिता हा फक्त महिलांसाठी असलेला वेगळा गट आहे. मुख्य संस्थळ संयुक्त असले तरी हा गट फक्त महिलांसाठीच आहे. या गटासाठी पुरूष संपादक असण्याचा आग्रह वेडगळपणाचा होईल. संघाचे तसेच आहे. संघाच्या अनेक संघटनांपैकी संघ ही फक्त पुरूषांसाठी असलेली, राष्ट्रसेविका समिती ही फक्त महिलांसाठी असलेली व अभाविपसारखी संयुक्त संघटना आहे. हे अनेकवेळा सांगूनही का समजत नाही? क्रिडा वेग वेगळ्या टिम्स बंद करण्यासाठी नव्हे पण एकत्रित टिम आणि एकत्रित खेळ टेनिस बॅटमींटन प्रमाने असावेत . धावण्याच्या किंवा इतर क्रिडा शर्यतीत किती पुरुष स्त्रीयांपेक्षा अधिक चांगले पळू शकतात आणि किती स्त्रीया किती पुरुषां ना मात देऊ शकतात हे पहाणे रोचक आणि स्त्रीयांची प्रगती मानवी उत्क्रांतीस सबळ करणारी ठरेल. धावण्याच्या स्पर्धेतील पुरूषांचे व स्त्रियांचे टाईमिंग पहा. अनेक पुरूष खेळाडूंनी १० सेकंदांपेक्षा कमी वेळात १०० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण केली आहे. पुरूषांची विक्र्मी वेळ ९.५८ सेकंद आहे तर महिलांची सर्वोत्तम वेळ १०.४९ सेकंद आहे. जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीतील जवळपास सर्व ८ पुरूष खेळाडू १०.४९ सेकंदांपेक्षा कमी वेळात शर्यत पूर्ण करतात. अशी शर्यत संयुक्त घेतली तर महिलांना एकही पदक न मिळण्याची शक्यता आहे. इतर अंतरांच्या धावण्याच्या/पोहण्याच्या शर्यतीत असेच चित्र दिसते. काही क्रीडाप्रकार संयुक्त न खेळविले जाता वेगळे खेळविले जाणेच योग्य असते. ताप कुणाला कशाला होतोय ;)) - असा ताप होण्याचे कोणत्याच बाऊस काही कारण नाही खरे तर- स्त्रीयांना ही अशा पदांमध्ये उत्साह असता तर त्यांना ताप झाला असता पण असा ताप करुन घेण्या पेक्षा बहुतेक सुज्ञ लोक सघंटना पंथ आणि धर्मापासून दुरावतात अशा दुरावण्याने नुक्सान कुणाचे होते ? विषमता राबवल्याचा पश्चाताप कुणास व्हावयास हवा ? बाकी कुणाला किती लक्षात येते आहे किंवा नाही हे पहाणे मी माझ्या बाजूने बापड्या वाचकांवर सोडतो. :) परत तेच! असे का ? याला काहीही तार्कीक आधार नाही :). जेनेटिकली संघटना कौशल्यात केवळ पुरुष सुपीरियर असतात कि संघाला द्यावयाच्या बौद्धिकांसाठी जेनेटिकली केवळ पुरुष सुपीरियर असतात ? याचे उत्तर अद्याप आलेले नाही . आणि बहुतेक येणारही नाही तेव्हा असो. परत तेच! सांगून कंटाळा आला आता.

In reply to by श्रीगुरुजी

सरसंघहा सर्व हिंदूंसाठी आहे. ...........संघ ही फक्त पुरूषांसाठी असलेली,............... हे अनेकवेळा सांगूनही का समजत नाही?
आधी सर्व हिंदूसाठी आहे म्हणायचे पण कुरण पुरुषांसाठी राखीव आहे हे निक्षून सांगायचे :)))))), सरसंघचालक पदी स्त्री का नाही किंवा राष्ट्रसेविका समिती च्या प्रमुख स्त्री कडे सरसंघचालक पद आलटून पालटून का मिळू शकत नाही याचे कारण देणे टाळायचे ;)) संघातच स्त्रीयांना समान प्रवेश का नाही याचे पटण्या जोगे उत्तर नाहॉ. त्या समितीच्या संस्थापक बाई आणि बाकी हिंदू स्त्रियाना गरज वाटली - पुरुष हिंदूंना स्त्री सहकार्याची गरज नव्हती पुरुषाचे बौद्धिक घेण्यास स्त्रिया लायक नसतात ; म्हणून त्यांनी वेगळी संघटना काढली त्याना वेळोवेळी साहाय्य करून त्यांच्यावर उपकार केले. स्त्रियांच्या खांद्याला खांदा लावून योगदानाची संघातील पुरुषांना गरज नाही . संघटना कौशल्य नेतृत्व कर्तृत्वाची सामान संधी दिल्याने पुरुष हिंदुंना कमी पणा येत असणारा तेव्हा समान संधीची भाषा गुन्हा असली पाहिजे नाही का ? असे विपरीत अर्थ काढण्याची इच्छा नसली, तरीही संघाच्या स्त्रीयांना समान संधी न देण्याच्या संस्कृतीतून असे विपरीत अर्थ निघण्यास जागा निर्माण होत नाहीना अशी साशंकता वाटते. पुरुष संघाच्या तुलनेत घराणेशाही शिवायच्या राष्ट्रसेविका समिती पैकी किती स्त्रियांना भाजपा सत्तेतील वाट्यात संधी मीळाली याचा राज्यशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय हा स्वतंत्र रोचक अभ्यास विषय ठरेल नाही का ;) :)) असो .

In reply to by माहितगार

धन्य आहे. इतक्या जणांनी, इतक्या प्रकारे, इतक्या वेळा समजावल्यानंतर अगदी पप्पूच्या डोक्यात सुद्धा प्रकाश पडला असता. पण . . . असो.

माहितगार, अगदी राहवत नाही म्हणून हा प्रतिसाद देतोय. तुम्ही म्हणता की :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व हिंदूंसाठी आहे कि केवळ पुरुष असलेल्या हिंदुंसाठी चे राखीव कुरण आहे ? हे कुरण राखीव का आहे याचे काही तारतम्य असलेले कारण पुढे येताना दिसत नाही . जेनेटिकली संघटना कौशल्यात केवळ पुरुष सुपीरियर असतात कि संघाला द्यावयाच्या बौद्धिकांसाठी जेनेटिकली केवळ पुरुष सुपीरियर असतात ? कि एखाद्या देवीचे नेतृत्व स्वीकारण्याने संघिष्टांची झोप उडते ?
अहो, हे काय लिहिलंय तुम्ही! हा सरळ फेमिनिस्ट दृष्टीकोन आहे. फेमिनिझमच्या चळवळीचा उगम कम्युनिस्ट विचारसरणीत आहे. संघ डाव्या भूमिकेवरून का म्हणून चालवायचा? स्वत:चं तत्त्वज्ञान असतांना संघाने उसनवारी कशाला करायची? आणि संघ जर डाव्या भूमिकेवरून चालवायचा तर मग डावे विचारवंत काय करणार? स्त्रियांचे प्रश्न ह्यँव आहेत आणि त्यांची उत्तरं त्यँव आहेत म्हणून बोंबलंत फिरणार? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोत महिला किती प्रमाणांत आहेत? १६ पैकी २! त्या दुसऱ्या तुकड्याची काय गत आहे? तिथेही उल्लेखनीय नेत्यांमध्ये महिला किती? ३४ पैकी १. संघाच्या नावाने बोंबलणाऱ्यांची लायकी कुठे सुरू होते आणि कुठे संपते ते लोकांना चांगलंच माहितीये. तुम्ही त्यांतले एक नका होऊ. तुमची मराठीप्रती एकंदरीत तळमळ आणि ध्येयनिष्ठा पाहता तुम्हाला खरंतर संघ जवळचा वाटायला पाहिजे. प्रत्यक्षात मात्र कसलाही वैचारिक शेंडाबुडखा नसलेल्या डाव्या बरळणुकीस तुम्ही प्रमाण धरून चालता याचं आश्चर्य वाटतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

.....डाव्या बरळणुकीस तुम्ही प्रमाण धरून चालता याचं आश्चर्य वाटतं.
पहिले "ऐक्य असल्या शिवाय हित कसे साधेल ? आणि जिथे विषमता आहे तिथे ऐक्य कसे साधेल ? विषमता असेल तर हित कसे साधेल ?" हे उत्तर आपणास आधिच दिले आहे. स्त्रीया तुमच्याच धर्माच्या ( हिंदू) आहेत त्यांना समान संधी देण्याचा प्रश्न आहे. विषमता नको असणे आणि समान संधीचा आग्रहाशी डावेपणा असण्या नसण्याशी काही देणे घेणे नाही. (आपण लिहिण्या आधीच माझ्या आधीच्या प्रतिसादातून मी कम्यूनीस्टांवरही टिका केलेली आहे माझे आधीचे प्रतिसाद अभ्यासावेत) फ्रेंच राज्यक्रांतीने समतेचे मुल्य सांगितले भांदवलशाही पूर्ण समानता संभव नाही पण किमान संधीं च्या उपलब्धतेत समान संधी असली पाहिजे अशी अपेक्षा भांदवलशाहीतही रास्त ठरते. हिंदूंच्या अध्यात्मिक तत्वज्ञानात अद्वैत असले आणि स्त्रीयांना देवीचा दर्जा दिला तरीही परंपरावादी व्यवहारात स्त्रीयांना दुय्यम स्थान च देतात आणि संघाच्या स्थापनेपासून स्त्रीयांना संघात प्रवेश नसणे वेगळी संघटना काढायला लावणे त्याचे दुय्यम वागणूकीचे सरळ सरळ रूप आहे. या दुय्यमतेचा प्रभाव गूगलचा वापर न करता स्त्री समितीच्या संचालकांची नावे किती संघ समर्थक सांगू शकतील? मोदी किंवा राम माधवांना ज्या राजकीय संधी मिळतात त्या प्रमाणावर समितीत राबणार्‍या स्त्रीयांना मिळतात का ? स्त्री समैतीच्या अध्यक्षा आईच्या जागीच असणार ना ! त्यांच्या कडून पुरुष शाखांमध्ये संघाच्या रास्।ट्रीय शिबीरात बौद्धीके घेतली जाण्यात समस्या नसावयास हव्यात ? किती पुरुष शाखांमध्ये संघाच्या रास्।ट्रीय शिबीरात स्त्री समितीच्या अध्यक्षांकडुन बौद्धीके दिली घेतली जातात ? संघाकडूण सरकार साठी ज्या राजकीय सल्लागारांची नेमणूक होते त्या नेमणूकी ठरवण्यात स्त्री समितीस किती आणि काय संधी मिळते. मोहन भागवतांना मिळते ती प्रसिद्धी स्त्री समितीच्या संचालिकेस लाभते का ? कॉम्ग्रेस मध्ये सोनीया गांधींकडे रिमोट कंट्रोल असला की कशी संधी मिळते तसा मोदी किंवा कोणत्याही राज्य सरकारवर स्त्री समितीचा रिमोट चालतो का ? पण तीच संधी भागवतांना मिळते की नाही ? मग जी संधी भागवतांना मिळते ती संघी स्त्रीयांना का मिळू नये ?

श्री दा कृ सोमण या प्रसिद्ध खगोल तज्ज्ञांना मी विचारलं होतं कि ग्रहांचा मानवी जीवनावर काही परिणाम होतो का? त्यांचं उत्तर -- हो. दुराग्रहाचा बराच परिणाम होतो.

In reply to by सुबोध खरे

ग्रहणच्या धाग्याएवजी अनवधानाने इकडे आले असेल तर ठिकच आहे. बाकी आता या इथे चालू चर्चेच्या दृस्।टीने आग्रहातील 'दूरता' सापेक्ष असावी किंवा कसे.

http://abpmajha.abplive.in/movies/sharad-ponkshe-announced-to-stop-he-ram-nathuram-508624 काँग्रेसच्या काळात , आम्हाला हे नाटक करु देत नाहीत , असा आक्रोश करून पोंक्षे , गोडसेप्रेमी हे नाटक करत होते. आता भाजपाचेच सरकार आले आहे , तर आता मात्र हे नाटक बंद केले .. मोदीनी सतत गांधींचे पुतळे , फोटो यांच्यासोबत फोटो काढल्याने नथुरामाची लोकप्रियता कमी झाली की काय ?

In reply to by manguu@mail.com

बातम्या तरी नीट वाचत चला हो! नाहीतर ते "मोदींच्या लोकप्रियतेत घट" वाल्या बातमीसारखं होतं. त्याबातमीच्या प्रतिसादातून दिसलेला अन्धद्वेष परत दिसून येतोय. तरी बरं भाजपचे सरकार येऊन चार वर्षे झाली आणि या चारवर्षात नाटक टकाटक चालू होतं!

In reply to by बिटाकाका

त्या मोगा खानला कुठे सिरियसली घेताय? नुसतं पिचक्या टाकत असतंय ते. त्यातून आज शुक्रवार सोडून द्या.

माहितगार, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो. १.
पहिले "ऐक्य असल्या शिवाय हित कसे साधेल ? आणि जिथे विषमता आहे तिथे ऐक्य कसे साधेल ? विषमता असेल तर हित कसे साधेल ?" हे उत्तर आपणास आधिच दिले आहे. स्त्रीया तुमच्याच धर्माच्या ( हिंदू) आहेत त्यांना समान संधी देण्याचा प्रश्न आहे.
तुम्ही म्हणता ते हित साधणारं ऐक्य म्हणजे समान उद्दिष्टांचं ऐक्य आहे. त्याचा समान संधीशी काहीही संबंध नाही. स्त्रीपुरुष समतेशी तर नाहीच नाही. २.
फ्रेंच राज्यक्रांतीने समतेचे मुल्य सांगितले भांदवलशाही पूर्ण समानता संभव नाही पण किमान संधीं च्या उपलब्धतेत समान संधी असली पाहिजे अशी अपेक्षा भांदवलशाहीतही रास्त ठरते.
फ्रेंच राज्यक्रांती व/वा भांडवलशाही यांचा संघाशी थेट संबंध नाही. फ्रेंच राज्यक्रांतीची मूल्ये अंगीकारावीत असं कुठलंही बंधन संघाने स्वत:वर घालून घेतलेलं नाही. संघाचा संबंध भारतीय मूल्यांशी आहे. भांडवलशाहीच्या चौकटीत भारतीय मूल्यं बसवायचा खटाटोप करण्यात संघाला स्वारस्य नाही (असं मला वाटतं). ३.
हिंदूंच्या अध्यात्मिक तत्वज्ञानात अद्वैत असले आणि स्त्रीयांना देवीचा दर्जा दिला तरीही परंपरावादी व्यवहारात स्त्रीयांना दुय्यम स्थान च देतात
स्त्रियांचं मन पुरुषांहून वेगळं असतं. त्यामुळे स्त्री आपणहून संसारात दुय्यम भूमिका स्वीकारते. किंबहुना लग्नाच्या बाजारात उभी राहतांना स्त्रीची आपल्याहून वरचढ नवऱ्यास अधिक पसंती असते. हा स्त्रियांवर निसर्गाने केलेला अन्याय असू शकतो. ४.
संघाच्या स्थापनेपासून स्त्रीयांना संघात प्रवेश नसणे वेगळी संघटना काढायला लावणे त्याचे दुय्यम वागणूकीचे सरळ सरळ रूप आहे.
मी नेमकं उलटं म्हणेन. निसर्गाने दिलेल्या क्षमतांचा पुरेपूर वापर व्हावा म्हणून स्त्री व पुरुषांच्या संघटना वेगवेगळ्या ठेवल्या आहेत. ५.
गूगलचा वापर न करता स्त्री समितीच्या संचालकांची नावे किती संघ समर्थक सांगू शकतील? मोदी किंवा राम माधवांना ज्या राजकीय संधी मिळतात त्या प्रमाणावर समितीत राबणार्‍या स्त्रीयांना मिळतात का ? स्त्री समैतीच्या अध्यक्षा आईच्या जागीच असणार ना ! त्यांच्या कडून पुरुष शाखांमध्ये संघाच्या रास्।ट्रीय शिबीरात बौद्धीके घेतली जाण्यात समस्या नसावयास हव्यात ? किती पुरुष शाखांमध्ये संघाच्या रास्।ट्रीय शिबीरात स्त्री समितीच्या अध्यक्षांकडुन बौद्धीके दिली घेतली जातात ? संघाकडूण सरकार साठी ज्या राजकीय सल्लागारांची नेमणूक होते त्या नेमणूकी ठरवण्यात स्त्री समितीस किती आणि काय संधी मिळते.
हे प्रश्न संघ व समितीचे अंतर्गत प्रश्न आहेत. संघ यांची उत्तरं द्यायला बांधील नाही. कुणाकडून काय शिकायचं हे संघाचे नेते ठरवतील. राजकीय संधींचं म्हणाल तर संघ व समिती मुळातून बिगर राजकीय संघटना आहेत. राजकीय संधींच्या तराजूने बिगर राजकीय संघटनांना तोललं जाऊ नये. ६.
मोहन भागवतांना मिळते ती प्रसिद्धी स्त्री समितीच्या संचालिकेस लाभते का ? कॉम्ग्रेस मध्ये सोनीया गांधींकडे रिमोट कंट्रोल असला की कशी संधी मिळते तसा मोदी किंवा कोणत्याही राज्य सरकारवर स्त्री समितीचा रिमोट चालतो का ? पण तीच संधी भागवतांना मिळते की नाही ? मग जी संधी भागवतांना मिळते ती संघी स्त्रीयांना का मिळू नये ?
स्त्रीचा रिमोट कंट्रोल चालवायला राज्य सरकार म्हणजे लैंगिक मनोराज्ये ( = सेक्शुअल फ्यांटश्या ) आहेत का? प्रसिद्धीचा प्रश्न प्रसारमाध्यमांना विचारला पाहिजे. प्रत्येक माध्यमात स्त्रियांना ५० % आरक्षण द्यायला हवंय. सोनियाकडे रिमोट आहे म्हणून काँग्रेस स्त्रीपुरुष समतेचा आदर करणारी आहे असा काहीसा अर्थ सूचित होतो आहे. या न्यायाने ममतादीदींचा व मायावतींचा पक्षही स्त्रीहितवादी ठरतो. प्रत्यक्षांत या तिघींनी स्त्रीहिताचे काय निर्णय घेतले आहेत? याउलट मोदींनी तिहेरी तलाकावर बंदी आणून मुस्लीम स्त्रियांना धीर दिला आहे. सांगायचा मुद्दा काये की स्त्री संचालिका असेल तर स्त्रियांचं हित राखलं जाईलंच याची हमी नाही. शिवाय संघात उघडपणे एकचालकानुवर्तित्व आहे. मुळांत रिमोट कंट्रोलला जागाच नाही. त्यामुळे भागवतांना मिळालेली संधी वगैरे मुद्दे निरर्थक आहेत. आ.न., -गा.पै.

श्री पवार यांनी (थोरल्या) तलाकबद्दल आपले मौलिक विचार मांडले मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तीन तलाकचा कायदा करण्याचा विचार असेल. तर मुस्लिम समाजातील धर्मगुरूंना विश्वासात घेऊन बदल करायला हवा. तलाक हा कुराणच्या माध्यमातून इस्लाम धर्मात दिलेला संदेश आहे. एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील असा हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याची राज्यकर्त्यांना नाही. त्यामुळे समाजातील लोकांना विश्वासात घेऊन बदल करायला हवा. मात्र, धर्माला विश्वासात न घेता तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असाल आणि एका धर्माच्या लोकांना वेगळ्या ठिकाणी पोचवत आसाल. तर आम्ही पाठिंबा देणार नाही, असे मत पवार यांनी औरंगाबाद येथे झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप प्रसंगी केले. आता बोला स्तोत्र दैनिक लोकसत्ता