डॉ सत्यपाल सिंग :उत्क्रांती सिद्धांत

A.N.Bapat's picture
A.N.Bapat in काथ्याकूट
23 Jan 2018 - 5:57 pm
गाभा: 

डॉ सत्यपाल सिंग यांची उत्क्रांती सिद्धांताबाबतची टिप्पणी :
याची माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे .
या विषयी काही प्रश्न :
१. असं काही आहे का ?
२. ते नक्की काय म्हणाले याचे ट्रान्सक्रिप्ट कोणाकडे उपलब्ध आहे का ?
३. त्यांनी डार्विन चा सिद्धांत नाकारताना काही शास्त्रीय कारणे देऊन नाकारला का ? असेल तर ती कोणती ?
४. डार्विन च्या सिद्धांताला मर्यादा आहेत असे अभ्यासू तज्ञ् लोकं सांगतात .( हे ऐकीव आहे . मी तज्ञ् नाही )
३. डॉ सत्यपाल सिंग यांनी मांडलेल्या डार्विन च्या सिद्धांताला पर्यायी सिद्धांताची माहिती कोणाला आहे का ?(म्हणजे जर तसा काही मांडला असेल तर )
धन्यवाद

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

23 Jan 2018 - 6:14 pm | गॅरी ट्रुमन

डार्विनच्या सिध्दांताचा खुळखुळा सगळ्यांच्या हाती देऊन मोदी डाव्होसला गेले सुध्दा. तिथे किनोट अ‍ॅड्रेस करून आघाडीच्या कंपन्यांच्या सी.ई.ओंना भेटणारही आहेत. तुम्ही आहात कुठे?

मार्मिक गोडसे's picture

24 Jan 2018 - 12:09 am | मार्मिक गोडसे

डाव्होस मध्ये 600 कोटीचा नादखुळा.

गॅरी ट्रुमन's picture

24 Jan 2018 - 8:59 am | गॅरी ट्रुमन

बोलण्याच्या ओघात कोटी आणि मिलिअनमध्ये ही चूक झाली आहे हे लक्षात यायला हरकत नसावी. आणि ते लक्षात आले नसेल तर ६०० कोटींचा हा एक दुसरा खुळखुळा हातात घ्या आणि पाहिजे तितका वेळ खेळत बसा.

मार्मिक गोडसे's picture

24 Jan 2018 - 9:31 am | मार्मिक गोडसे

पंतप्रधान हिंदीमधून बोलत होते इंग्रजीतून नव्हे. बढाया मारायच्या सवयीमुळे होत असाव्यात अशा चुका. रडक्या बाळाला असे अजून किती खुळखुळा लागणार कोणास ठावूक.

बिटाकाका's picture

24 Jan 2018 - 12:23 pm | बिटाकाका

ते सहाशे कोटींच्या चुकीच्या व्यतिरिक्त ते काय बोलले हे अगदी गौणच असावे बहुतेक! आपल्याला हवे तेच ऐकणे आणि अर्थ काढणे सोपे असते नाही?

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 3:25 pm | श्रीगुरुजी

त्याचं असं आहे काका, मोदींविरूद्ध बोलायला मोदीद्वेष्ट्यांना कोणतेही मुद्दे मिळत नाहीत. म्हणून मग असलं काहीतरी बोलावं लागतं.

कोणी म्हणतं की मोदी आपले गाल गुलाबी ठेवण्यासाठी रोज ४ लाखांचे मशरूम्स खातात. कोणी म्हणतं की मोदींनी २ वर्षात ७५ कोटींचे झब्बे वापरले. कोणी मोदींना चहा विकायचा सल्ला देतात. कोणी म्हणतं की मोदी १० लाखांचा सूट घालतात. कोणी म्हणतं की प्रत्येकाला १५ लाख देणार असं मोदींनी आश्वासन दिलं होतं. कोणी म्हणतं की मोदी भित्रे आणि मनोरूग्ण आहेत. कोणी म्हणतं की मोदी अस्वच्छ आहेत. कोणी म्हणतं मोदींच्या पदव्या बनावट आहेत. कोणी म्हणतं की मोदी नीच आहेत. कोणी म्हणतं की मोदी खोटारडे आहेत. कोणी म्हणतं की मोदी हुकुमशहा आहेत. कोणी म्हणतं की मोदींनी देश विकला . . .

अशा या मतामतांच्या गलबल्यामध्ये एका गोष्टीवर मात्र सर्व मोदीद्वेष्ट्यांचं एकमत आहे. ते म्हणजे "मोदींच्या कारकीर्दीत विचारस्वातंत्र्य लयाला गेले असून मोदींविरूद्ध बोलायला बंदी आहे.".

मार्मिक गोडसे's picture

24 Jan 2018 - 4:41 pm | मार्मिक गोडसे

आपल्याला हवे तेच ऐकणे आणि अर्थ काढणे सोपे असते नाही?

धन्यवाद! कपाळावर गोंदवून घेतो आता हे वाक्य.

पंतप्रधान काहीही विशेष बोलले नाही. मागील सरकारला FDI व GST ला विरोध केला व आज त्याच्याच बढाया मारत आहेत. तुम्हाला काय विशेष आढळले तेही कळवा.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 5:05 pm | श्रीगुरुजी

मागील सरकारमधील वसेक विधेयकाला १५ राज्यांचा विरोध होता. त्याचं काही खांग्रेसशासित राज्ये सुद्धा होती. २०१७ मधील वसेक विधेयक व २०१३ मधील वसेक विधेयक यात खूप फरक आहे.

बाकी नेहमीचंच चालू द्या.

बिटाकाका's picture

24 Jan 2018 - 5:16 pm | बिटाकाका

अतिशय अवांतर होतंय धाग्यापासून पण एखादा संबंधित धागा असेल तर खालील गोष्टींवर चर्चा करता येईल.

१. गोंदवणे चांगले नसते म्हणे, जरा काळजीपूर्वक.
२. जीएसटी ला विरोध होता कि काँग्रेसप्रणित सरकारने आणलेल्या जीएसटीला विरोध होता?
३. एफडीआयला सरसकट विरोध होता कि काही स्पेसिफिक गोष्टींना? आणि समजा केला विरोध तेव्हा आणि आता असेल आवडत त्यांना तर यात बिघडले कुठे? तुम्हाला जीएसटी आणि एफडीआय आवडते कि नाही?
४. तुमच्यामते काय बोलणे म्हणजे विशेष बोलणे आहे?

अनुप ढेरे's picture

24 Jan 2018 - 5:25 pm | अनुप ढेरे

मल्टी ब्रांड एफ्डिआयला विरोध होता असं आठवतय ब्वॉ.

मार्मिक गोडसे's picture

24 Jan 2018 - 8:41 pm | मार्मिक गोडसे

@ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे.

बिटाकाका's picture

25 Jan 2018 - 1:50 pm | बिटाकाका

@ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे.

याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!

लगेहाथ वरील प्रश्नांसोबत डू-आयडी म्हणजे आपल्यामते काय हेही सांगून टाका. डू -आयडी-चिखलफेक गॅंगमध्ये नाहीयेत ना तुम्ही?

गामा पैलवान's picture

24 Jan 2018 - 1:35 pm | गामा पैलवान

मा.गो.,

मोदींनी कसल्याही बढाया मारल्या नाहीत. आणि जरी मारलेल्या असल्या तरी त्या बढायांचा या चुकीशी निर्विवाद संबंध प्रस्थापित झालेला नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

:) :) . वेगळे विषय आहेत हो . मोदी साहेबांना कशाला यात आणायचं ?

मनुष्यबळ विकास मंत्रालयासाठी असे नमुने का निवडतात मोदि कोण जाणे.

मोदीच नाही हो. मनुष्यबळविकास मंत्रालयाला शापच लागला आहे बहुतेक. एकेक नगच येतात बहुतेक तिथे. यापूर्वीचे मनुष्यबळविकास मंत्र्यांची यादी बघितली तर मला नक्की काय म्हणायचे ते समजेल. या यादीत अर्जुनसिंग, शशी थरूर, कपिल सिब्बल अशा सारख्यांचाही समावेश होतो.

विकास's picture

24 Jan 2018 - 7:50 am | विकास

कदाचीत अपवाद पहीले मनुष्यबळ विकास मंत्री असतील - पि व्ही नरसिंहराव. (राजीव गांधींच्या कारकिर्दीत एच आर डी मिनिस्ट्री तयार झाली. त्या आधी शिक्षणमंत्री असायचे!)

बिटाकाका's picture

24 Jan 2018 - 12:20 pm | बिटाकाका

जावडेकरांबद्दल काय मत आहे आपलं? शिवाय स्मृती इराणींच्या बाबतीत विचहंटिंग (लौकिकार्थाने, शब्दशः: नाही :)) झाले असे वाटत नाही का?

गॅरी ट्रुमन's picture

24 Jan 2018 - 12:47 pm | गॅरी ट्रुमन

जावडेकरांविषयी आतापर्यंत कुठचेच मत नाव्हते. डार्विनच्या सिध्दांताप्रकरणी त्यांनी केलेला हस्तक्षेप आणि स्मृती इराणींच्या आय.आय.बिलाच्या घोळानंतर त्यांनी केलेले बदल यामुळे चांगले मत नक्कीच झाले आहे.

एच.आर.डी मंत्रालयाअंतर्गत देशातील आघाडीच्या शिक्षणसंस्था येत असतील तर त्या खात्याचा मंत्री त्या तोलामोलाचे शिक्षण घेतलेला असावा असे माझे वैयक्तिक मत आहे. कायदामंत्री हा स्वतः वकिल असावा अशी अपेक्षा असते त्याच प्रकारची ही अपेक्षा. शैक्षणिक पदव्यांना एका मर्यादेपर्यंतच महत्व असावे. माणूस शिकला म्हणजे लै शाना झाला असे अजिबात नाही. पण तरीही अशा शिक्षणसंस्था हाताळायच्या असतील तर त्या संस्थांच्या नक्की गरजा काय आहेत याचा स्वतः त्या वातावरणात राहिले नसेल तर अंदाज कितपत येईल याविषयी साशंकता आहे. स्मृती इराणी एच.आर.डी मंत्री असताना मंत्रालयाने बनवलेल्या आय.आय.एम बिलाचा घोळच झाला होता आणि संस्थांकडून त्या बिलाला विरोध झाला होता. मंत्री अशा कुठच्या संस्थेत कधीच विद्यार्थी म्हणून राहिला नसेल तर अशी अडचण उभी राहू शकेल असे वाटते. शेवटी पी.एम.ओ ने हस्तक्षेप केला आणि नंतर जावडेकरांनी त्या बिलाच्या मसुद्यात बदल केले म्हणून ठिक झाले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2018 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

सद्यातरी, मोदींसाठी, विरोधी पक्षांपेक्षा त्यांच्याच पक्षातील वाचाळ आणि नाठाळ मंडळी जास्त धोकादायक आहेत ! :) :(

नाखु's picture

24 Jan 2018 - 5:58 pm | नाखु

अडचणीत आणण्यासाठी विरोधक कमी पडत असल्याने ते कार्य हेच गणंग करीत असतील

भाजपचे आणि मिपाच्याही अहितचिंतकांनी त्रस्त नाखु

नक्की काय प्रकार आहे ... कोणी डिटेल मध्ये समजावून सांगेल का

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Jan 2018 - 11:45 am | माईसाहेब कुरसूंदीकर

सत्यपाल सिंग ह्यानी खालील विधान केले आहे ग जेसीने.
He also claims that Charles Darwin's theory of evolution is scientifically wrong and should not be taught in schools and colleges because "no one saw an ape turning into a man".

https://en.wikipedia.org/wiki/Satyapal_Singh
पूर्वी भारतात प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होतीअसे खुद्द पंतप्रधानही म्हणाले होते. तेव्हा ह्याचे काही विशेष नाही असे आमचे मत.
https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2015/01/04/indians-inv...

तेव्हा ह्याचे काही विशेष नाही असे आमचे मत.

तुमचे मत की तुमच्या "ह्यां"चे मत?

बेअरिंग सुटतेय असे आमचे मत :)

अनुप ढेरे's picture

24 Jan 2018 - 11:56 am | अनुप ढेरे

तुटकी नाकं वगैरे दुरुस्तं केली जायची भारतात सैनिकांची. एका भागावरची त्वचा दुसरीकडे लावणे वगैरेपण होते. सुषृत संहितेमध्ये याचे संदर्भ आहेत असं म्हणतात ब्वॉ. सो पं.प्रंचे विधान चूक नव्हते. असो... एकदा नावंच ठेवायची ठरवलं असेल तर सत्य-असत्याने काय फरक पडतो विचारवंतांना.

( फक्त त्या प्लास्टीक सर्जरीचा गणपतीशी संबंध लावणे जरा जास्तंच होतं. )

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2018 - 4:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

पूर्वी भारतात प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होतीअसे खुद्द पंतप्रधानही म्हणाले होते.

माईसाहेब,

"सुश्रुत" हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे काय ?

प्लास्टिक सर्जरीचे उल्लेख भारतात इसविसनपूर्व ८०० पासून सापडतात. सुश्रुत ऋषी (इ स पूर्व ६ वे शतक) यांना आजच्या वैद्यकीय क्षेत्रात, जागतिक स्तरावर केवळ प्लास्टिक सर्जरीचेच नव्हे तर सर्वच सर्जरीचे जनक समजले जाते. जेव्हा युरोपात अंधारयुग चालू होते, त्या काळात भारतात सुश्रुताने प्लास्टिक सर्जरी, मोतीबिंदू , इत्यादी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया शेकडोने केल्या. त्यांची माहिती व प्रक्रिया "सुश्रुतसंहिता ($)" या ग्रंथात शब्दबद्ध झाली आहे. सुश्रुतानंतर आलेल्या अनेक वैद्यकिय तज्ज्ञांनी या ग्रंथातिल ज्ञानसंपदेत अधिकाधिक भर टाकलेली आहे.

मोदीविरोधाच्या भरात निदान भारताचा खरा इतिहास विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हा अंधत्वाचा कळस झाला ! अश्या खर्‍या इतिहासाची हेटाळणी करणे, हे मानसिक गुलामगिरीचे व Self-flagellationचे लक्षण असते.

अवांतर :
माहित नसलेल्या विषयाबाबत जालावर थोडाशी विचारणा करून मगच किबोर्ड वापरला तरी सपशेल तोंडघशी पडणे सहज टाळता येईल... नाही तर "उचलली जीभ..." हे आहेच, म्हणा ! =)) =)) =))

*********************************

$ :
The Suśruta-saṃhitā, in its extant form, in 184 chapters contains descriptions of 1,120 illnesses, 700 medicinal plants, 64 preparations from mineral sources and 57 preparations based on animal sources. The text discusses surgical techniques of making incisions, probing, extraction of foreign bodies, alkali and thermal cauterization, tooth extraction, excisions, and trocars for draining abscess, draining hydrocele and ascitic fluid, removal of the prostate gland, urethral stricture dilatation, vesicolithotomy, hernia surgery, caesarian section, management of haemorrhoids, fistulae, laparotomy and management of intestinal obstruction, perforated intestines and accidental perforation of the abdomen with protrusion of omentum and the principles of fracture management, viz., traction, manipulation, apposition and stabilization including some measures of rehabilitation and fitting of prosthetic. It enumerates six types of dislocations, twelve varieties of fractures, and classification of the bones and their reaction to the injuries, and gives a classification of eye diseases including cataract surgery.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jan 2018 - 1:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुश्रुतसंहितेत नोंदलेली काही शल्यक्रिया साधने...

    
(जालावरून साभार)

राही's picture

25 Jan 2018 - 2:33 pm | राही

सुश्रुत हे नाव सुप्रसिद्ध आणि प्लास्टिक सर्जरीचे प्रणेते म्हणून जगन्मान्य आहे. सुश्रुत हे त्या काळातले निष्णात वैद्य होते. शालेय अभ्यासक्रमातही चरकसंहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट, नागार्जुन, आर्यभट अशा संशोधकांचा नामोल्लेख असतोच. आपल्याकडे ही अशी दैदीप्यमान परंपरा होती. दुर्दैवाने ती खंडित झाली. आजही डॉक्टर रवीन थत्तेंसारखे अनेकानेक अभ्यासू संशोधक आपल्याकडे या क्षेत्रात आहेत. पण आज जी सर्जरी केली जाते ती सुश्रुतसंहितेनुसार नाही. आजच्या शल्यकर्माला उपयोगी आणि साहाय्यभूत अशी अनेक शास्त्रे, तंत्र, उपकरणे, पद्धती, कौशल्ये, उपचारपद्धती, निदानपद्धती मधल्या काळात जगभर विकसित झाल्या. अनेक इम्प्रोवाय्ज़ेशन्स, इम्प्रूव्मेंट्स जगभर झाली जी आपल्याकडे झाली नाहीत. आपण या सुधारणा आणि बदलांपासून दूर राहिलो. पूर्वसंचित होते ते त्या काळाला पुरेसे होते. त्यात काहीच वाढ आपण केली नाही किंवा अगदी नाममात्र वाढ केली. ते संचित सध्याच्या काळास कसे पुरेल? पूर्वसूरींचा नावलौकिक सद्यकालासाठी पुरेसा नाहीय. काहीतरी नवनिर्माण हवे आहे. विसाव्या शतकात थोडीफार चालना मिळाल्यासारखी दिसते. हा प्रवाह जोमदार व्हायला हवा.
आपल्याकडे विद्यमानात सुधारणा आणि नव संशोधन झाले नाही ही खरी मुद्द्याची गोष्ट आहे.

मुक्त विहारि's picture

25 Jan 2018 - 5:52 pm | मुक्त विहारि

सहमत...

"आपल्याकडे विद्यमानात सुधारणा आणि नव संशोधन झाले नाही ही खरी मुद्द्याची गोष्ट आहे."

प्रचंड सहमत....

आणि एकूण राजकीय पाठबळ पाहता, पुढे-मागे होईल असेही वाटत नाही.शिवाय कुठल्या तरी फालतू गोष्टीतच आपला समाज जास्त गुंतून राहतो. क्रिकेट आणि सिनेमे ह्यांच्यात होणार्‍या आर्थिक उलाढालीत, किमान १०-१५ उत्तम संशोधन संस्था भारतात निर्माण होवू शकतात.पण आंधळ्या, मुक्या, बहिर्‍या आणि ढोंगी समाजाला जास्त सांगण्यात काही हशील नाही.

असो,

तुम्ही नोंदवलेले निरीक्षण एका धाग्याचा विषय मात्र नक्कीच होवू शकतो.

माहितगार's picture

25 Jan 2018 - 6:25 pm | माहितगार

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2018 - 12:15 am | डॉ सुहास म्हात्रे

पूर्वसूरींचा नावलौकिक सद्यकालासाठी पुरेसा नाहीय. काहीतरी नवनिर्माण हवे आहे. विसाव्या शतकात थोडीफार चालना मिळाल्यासारखी दिसते. हा प्रवाह जोमदार व्हायला हवा.

याबद्दल वाद असूच शकत नाही. पण सद्या दोन प्रकारचे एकेरी लोकच फार दिसतात... एक तर ते इतिहासाचे अतिशयोक्त वर्णन करणारे असतात किंवा आपला सर्व इतिहास अत्यंत क्षूद्र आणि लाजिरवाणा असल्याचे मानणारे. माझ्यामते दोन्हीही तितकेच निषिद्ध आहेत.

आपल्या खर्‍या इतिहासाकडे दुर्लक्ष किंवा त्याची उपेक्षा करण्यापेक्षा, त्यातून (आपणही बरेच काही केले आहे / करू शकतो) हा बोध घेऊन आताच्या काळात काही उत्तम करण्यासाठी प्रेरणा घेणे जास्त योग्य होईल.

तसेच, माझ्या प्रतिसादाचा मूळ रोख माईसाहेब या आयडीच्या प्रतिसादाच्या संदर्भात (आधीच लिहिल्याप्रमाणे) असा होता...

मोदीविरोधाच्या भरात निदान भारताचा खरा इतिहास विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हा अंधत्वाचा कळस झाला ! अश्या खर्‍या इतिहासाची हेटाळणी करणे, हे मानसिक गुलामगिरीचे व Self-flagellationचे लक्षण असते.

डार्विनचा सिद्धांत मांडला होता तेव्हा देखील शास्त्रिय नव्हता.
=============
आजच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतांचा आणि डार्विनच्या सिद्धांतांचा काही संबंध नाही. डार्विनला कचरापेटीत टाकला आहे.
==================
आजचा उत्क्रांतीचा सिद्धांत देखील सिडोसायन्स आहे.

माहितगार's picture

24 Jan 2018 - 2:02 pm | माहितगार

@ अ . जो . आणि इतर, या विषयाचा फारसा ट्रॅक न ठेवल्यामुळे विचारतोय . आपला डार्विन आणि उत्क्रांतीवादावर विश्वास नसेल तरीही विश्वास असलेल्यांच्या दृष्टीकोणातून डार्विनची मांडणी ते आजचा उत्क्रांतीवाद यात कोणते फरक झाले आहेत ते जाणून घेणे आवडेल.

आजच्या सर्वसाधारण विज्ञानाच्या अभ्यासकांना आजच्या उत्क्रांती वादातील सहज स्वीकार्य भाग कोणता आहे . आणि साशंकता किंवा अद्यापही संशोधनास वाव असलेला भाग कोणता आहे असे वाटते .

मुक्त विहारि's picture

24 Jan 2018 - 3:40 pm | मुक्त विहारि

शेतकर्‍यांचा एक नंबरचा शत्रू म्हणजे माकडे. माणूस नामक प्राणी, ज्या वेगाने निसर्गाचा र्‍हास करत आहे, ते बघता, माकडाच्या आणि माणसाच्या स्वभाव धर्मात अजिबात फरक नाही.

१. माकडांना पण नेते लागतात आणि माणसाला पण.

२. माकडांना पण वेळी-अवेळी खायला लागते, तसेच माणसांना पण लागते.

३. माकडे खातात कमी पण विध्वंस जास्त करतात.माणसात पण हा गूण आहेच.रस्ते बांधणी असो किंवा कुठलेही सरकारी काम.अंदाजपत्रकात तूट ही आहेच.

४. शिवाय कुठल्याही शूल्लक गोष्टीवरून वाद-विवाद घालणे, युद्धे करणे, एकमेकांना चावणे, बोचकारणे आणि बहू पत्निकत्वाची चाल, इ. गोष्टी माकडांपासून आल्या असतील असा माझा संशय आहे.

असो,

डार्विनने हेच गूण ओळखलेअसतील आणि माणसांत आणि माकडात अजिबात फरक नाही, असे सांगीतले असेल.

(माणसाची शेपटी म्हण्जे विचारशक्ती.काही लोक आपल्या अशा शेपटीने अशी काही करामत करतात की, भल्या-भल्या माणसांची मती पार बाराच्या भावात जाते.)

वरील प्रतिसाद हा निव्वळ विनोदी आहे.माकडांचा अपमान झाल्या असल्यास, आम्ही दिलगीर आहोत.

होय, डार्विनचा सिद्धांत खराच असणार.

माणूस नक्कीच माकडांपासून तयार झाला असणार.
शेपट्या अजूनही न झडलेले कित्येक जन दिसतात समाजात ते उगीच?

डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरणे/न ठरणे हे विज्ञानाच्या कक्षेत येणारे काम आहे. निरनिराळ्या अनेक विद्याशाखांत उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्याचे काम सध्या चालू आहे. काही विद्याशाखांत बर्‍यापैकी प्रगतीही अंतिम सत्याकडे जाण्यापर्यंत झाली आहे. सध्या डार्विन म्हणतो त्यातील काही गोष्टी निश्चितच कालबाह्य झालेल्या दिसतात. त्यामूले डार्विनला काही तरी सार्वकालिक सत्य सांगणारा समजून पुज्य ठरवणे मुर्खपणाचे आहे तसेच त्याला पूर्णपणे मोडीत काढणे देखिल. सत्यपाल सिंगांनी उत्क्रांतीची थियरी डार्विनने सांगीतली ती तशीच्या तशी स्विकारणे योग्य नाही आणि तिच्यावर अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे असे म्हटले असते तर आक्षेप कुणीच घेतला नसता. नविन संशोधनांना आधारून उत्क्रांतीविषयक पोर्शन बदलला जाईल असे मह्टले असते तरी ते योग्य होते.
मात्र त्यांनी हे म्हटले.

1. "Darwin's theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum.
2.Since the man is seen on Earth he has always been a man,"
3. "Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man,"
4. "No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,"

यातल्या पहिल्या वाक्यावर फारसे आक्षेप घेण्यासारखे काही नाही(अर्थात डार्विनची थियरी पूर्णपणे मोदीत निघाली नाही. आणि पुर्वी कोणती थियरी होती हे विज्ञानाच्या इतिहासात अंतर्भूत केल्याने अभ्यासक्रमात असणे क्रमप्राप्तच आहे).
दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या वाक्यांना आक्षेप घ्यायलाच हवा. कारण ती तीन वाक्य पहिल्या दोन वाक्यांचा अन्वय लावण्यासाठी सत्यपालांनी दिलेली कारणे आहेत. जर राज्य शिक्षणमंत्री असणारा मनुष्य अशाप्रकारे भोंगळपणे शिक्षण धोरण बदलण्याविषयी बोलत असेल तर ते चुकीचेच आहे.

यावर जावडेकरांनी घेतलेली भुमिका अशी..

Intervening in the row over the remarks, Javadekar said there are no plans for a national seminar to prove Darwin wrong.
"I have discussed the matter with my MoS and I have asked him to refrain from making such comments. We should not dilute science. This is the advice I have given him," Javadekar said.
"We are not going to fund any event or don't have any plan for a national seminar to prove Darwin wrong. It is the domain of scientists and we should let them free to continue their efforts for progress of the country," he added.

हे स्वागतार्ह आहे.

अमितदादा's picture

25 Jan 2018 - 1:40 pm | अमितदादा

ज्यांना हा विषय अधिक समजावून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सकाळ मध्ये प्रदीप रावत ह्या जैविक उत्क्रांतीचे अभ्यासक यांचा छोटाखाणी लेख आला आहे. त्यतिल काही वाक्ये
उत्क्रांतीची चित्तरकथा आणि सत्यपाल सिंह...
"विज्ञानात सर्वाधिक विरोध कशाला झाला असेल तर तो जैविक उत्क्रांतीच्या सिद्धांताला. चार्ल्स डार्विनने तो मांडला १८५९मध्ये. गेल्या दीडशे वर्षांत जी नवनवी शास्त्रे उदयाला आली त्यातून या सिद्धान्ताला बळकटीच मिळाली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या तो खोडून काढण्यात आल्याचा केंद्रीय मनुष्यबळविकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांना भास झालेला दिसतो! त्यांनी केलेला हा दावा सपशेल चुकीचा आहे. त्यांच्या खात्याचे कॅबिनेटमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारची ही भूमिका नसल्याचे सांगून शास्त्रज्ञांना आणि विज्ञानप्रेमींना दिलासा दिला, हे बरे झाले. "

"डार्विनच्या काळात उपलब्ध पुरावा त्याच्या सिद्धांताबद्दल विश्‍वसनीयता निर्माण करू शकत होता; परंतु संपूर्णपणे निर्णायक नव्हता. त्यामुळे डार्विनने प्रथम प्रतिपादले तेव्हा उत्क्रांती हे प्रमेय होते. (भले भरभक्‍कम पुराव्यांवर आधारित होते, तरीसुद्धा!) पण १८५९ पासून पुराव्यांचे ढीग साचू लागले, तसतसे पायरी पायरीने तो सिद्धांतपदाला पोहोचला. तो सिद्धांत आहेच; वास्तवाचे प्रतिबिंबही आहे, हे विशेष."

सत्यपाल सिंह यांना विरोध करणारे पत्र देशातील वैज्ञानिकांनी लिहिले, त्यावर तब्बल २००० शास्त्रज्ञांच्या स्वक्ष्यार्या होत्या त्यात ते म्हणतात (संधर्भ> इंडिअन express)
1. We, the scientists, science communicators and scientifically-oriented members of the public, are deeply pained by your claim. It is factually incorrect to state that the evolutionary principle has been rejected by the scientific community. On the contrary, every new discovery adds support to Darwin’s insights.

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Jan 2018 - 2:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत ज्या शब्दांमध्ये मांडले ते नक्कीच चुकीचे होते. अर्थात हा सिद्धांत मांडल्यापासून याला विरोध होतच आला आहे. सुरुवातीला वैज्ञानिकांनी केला नंतर बहुतांशी धार्मिक संघटनांनी केला (किंबहुना अजूनही केला जातो). त्यामुळे सत्यपाल सिंह ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीवर आक्षेप घेणे संयक्तिक आहे पण त्याला काही प्रमाण, मर्यादा? तुम्ही वर दिलेल्या परिच्छेदात वैज्ञानिक म्हणतात कि त्यांना अतीव दु:ख झाले. कैच्या कै! का बरे अतीव दुःख व्हायला हवे? सह्यांची मोहीम वगैरे कशाला चालवायला हवी? हे जरा जास्तच नौटंकी प्रकारात जात नाहीये का?

बाकी, डिस्कवरी इन्स्टिटयूट च्या टिच दि काँट्रावर्सि मोहिमेबद्दल या वैज्ञानिकांचे (आणि आपलेही ) काय मत आहे? त्यानेही या वैज्ञानिकांना अतीव दुःख वगैरे झाले/होत असेल का? नुसते सिद्धांत शिकवण्यापेक्षा त्यासोबत त्याबद्दल असलेली मतमतांतरे का बरे शिकवली जाऊ नयेत? खासकरून या उत्क्रांती सिद्धांतासारख्या "सिद्धांत " या व्याख्येत न बसणाऱ्या गोष्टींमध्ये या सिद्धान्तावरील आक्षेप का बरे शिकवले जाऊ नयेत? जर उद्या भारतात कोणी (आणि खासकरून भाजपशी संबंधित व्यक्तीने :)) टिच दि काँट्रावर्सि मोहीम सुरु केली आणि शाळांमध्ये काँट्रावर्सि (आणि खासकरून या उत्क्रांती सिद्धान्ताबद्दल) शिकवा असे म्हणाले तर तेव्हाही हि अशीच सह्यांची मोहीम चालेल का? ते योग्य असेल का? या सह्यान्च्या मोहिमेला इंटॉलरन्स प्रकारात टाकून माझं शाळेतलं एखादंतरी प्रशस्तिपत्रक परत करता येईल का असा विचार करतोय.

सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत ज्या शब्दांमध्ये मांडले ते नक्कीच चुकीचे होते.

नक्कीच हेच तर सगळे जण सांगतायत आणि तेच माझे म्हणणे आहे. यावरती एकमत होणे खूप महत्वाच आहे.
काही शास्त्रज्ञांनी ह्या सिद्धांताला विरोध केला आहे, त्यांच्यामते हा परिपूर्ण नाही, यात संशोधनाची गरज आहे, हे असे ते म्हणाले असते तर माझा तसेच अनेक लोकांचा काहीच आक्षेप नसता. परंतु ते म्हणतात हि गोष्ट वेदात लिहिलेली नाही, आपल्या पूर्वजांनी माकडाचा माणूस झालेला पाहिला नाही म्हणून डार्विन चुकीचा.

सह्यांची मोहीम वगैरे कशाला चालवायला हवी? हे जरा जास्तच नौटंकी प्रकारात जात नाहीये का?

माझ्या मते नाही, याच कारण हे मंत्री HRD शी संबंधित आहेत, जर ते इतर खात्याचे मंत्री असते किंवा फक्त भाजप पदाधिकारी असते तर एवडा विरोध झाला नसता.

बाकी, डिस्कवरी इन्स्टिटयूट च्या टिच दि काँट्रावर्सि मोहिमेबद्दल या वैज्ञानिकांचे (आणि आपलेही ) काय मत आहे?

याब्बदल काही कल्पना नाही काय आहे हा कार्यक्रम ते. परंतु काँट्रावर्सि शिकविताना दुसर्या बाजूचे वैज्ञानिक पुरावे देत असतील, ती गोष्ट वेदात नाही किंवा पूर्वजांनी माकडाचा माणूस झालेला पाहिलं नाही अशी बाळबोध कारणे देत नसावेत.

मराठी कथालेखक's picture

30 Jan 2018 - 7:43 pm | मराठी कथालेखक

प्रतिसाद आवडला.

प्रसाद साहेब , आपण डिसकव्हरी इन्स्टिट्यूट म्हणजे विकी वर जे येतंय त्याबद्दलच लिहीत आहात का ? ( त्यातील पहिला परिच्छेद कॉपी पेस्ट करत आहे ) '

"The Discovery Institute (DI) is a politically conservative[4][5][6] non-profit think tank based in Seattle, Washington, best known for its advocacy of the pseudoscientific principle[7][8][9] of intelligent design (ID). Its "Teach the Controversy" campaign aims to permit teaching of anti-evolution, intelligent-design beliefs in United States public high school science courses alongside accepted scientific theories, positing that a scientific controversy exists over these subjects.[10][11][12][13][14][15][16]"

intelligent-design
हे म्हणजे कर्मठ उजव्या ख्रिश्चन धर्माची लोकं जी थिअरी सांगतात तीच थिअरी हे मांडतात का ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Jan 2018 - 3:47 pm | हतोळकरांचा प्रसाद

हो विकीवरही येत आहे आणि हल्लीच चेपू आणि कुठल्यातरी वर्तमानपत्रातील लेखातही याबद्दल उल्लेख वाचला. ते कर्मठ उजव्या लोकांची थिअरी मांडतात कि नाही हे मला नक्की माहित नाही पण त्यांच्यातील बरेच वैज्ञानिक किंवा त्या क्षेत्राशी संबंधित आहेत. मला त्यांची नक्की मते किंवा आक्षेप माहीत नाहीत पण त्यांची टिच दि काँट्रावर्सि हि मोहीम पटते.

कुठल्याही गोष्टींवरचे आक्षेप हे फक्त धार्मिक संदर्भात आहेत म्हणून सरसकट चुकीचे ठरवले जावेत का? मला असे वाटते कि मुळात आक्षेप शिकवले जावेत, त्यासोबत ते आक्षेप कसे चुकीचे आहेत हेहि शिकवले गेले तर उत्तमच, मग विचारसरणी उजवी असो कि डावी.

माहितगार's picture

25 Jan 2018 - 5:45 pm | माहितगार

क्षेत्र/ अभिव्यक्ती कोणतेही असो आक्षेपांची दखल आणि खोडावयाचे असल्यास त्या प्रतिवादासहीत असे स्वरुप असणे सुद्धा योग्य होईल का ? पद्मावत आणि त्यासारख्या अनेक वादांवरुन वाटते. हे असोत अथवा ते कुणिही असो एकांगी माहिती देण्यावर मर्यादा हवी दुसर्‍या बाजू माहित कर घेण्याचा आणि त्यात उणीवा / मर्यादा असाल्यास त्या समजून घेण्याचा अधिकार हवा.

विशुमित's picture

25 Jan 2018 - 4:44 pm | विशुमित

<<< त्यामुळे सत्यपाल सिंह ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीवर आक्षेप घेणे संयक्तिक आहे पण त्याला काही प्रमाण, मर्यादा?>>>
==>> hasun hasun pure vaat lagli...!!

विशुमित's picture

25 Jan 2018 - 4:49 pm | विशुमित

sampadak mandal ha pratisad krupaya hatava. chukun taypo zala ahe.

चौकटराजा's picture

25 Jan 2018 - 6:17 pm | चौकटराजा

एकूणात काय पदमावती असो , आनंदीबाई असो , वा उत्क्रांती भारतीयाना इतिहासात रामायची नशा चढली आहे.आनंद आहे !! खरे तर उत्क्रांती वादावर खल करण्यापेक्षा आजची मोठी काळजी अधुनिक रसायन युगामुळे मानवावर व इतर जीवामात्रावर काय विपरित परिणाम होत आहे यावर विचार झाला पाहिजे .

माहितगार's picture

25 Jan 2018 - 6:28 pm | माहितगार

आनंदी सोबत आनंद येतोच म्हणूनच आनंदीआनंद असा शब्दही आहे ! ;)

पगला गजोधर's picture

25 Jan 2018 - 6:39 pm | पगला गजोधर

भारतीयाना इतिहासात रमायची नशा चढली आहे.आनंद आहे !!

१+
बरं इतिहास असला तर संशोधन तरी करता येते, परंतु
पद्मावती ते रामजन्मभूमी (रामायण), अश्या काल्पनिक
कालाकृतीद्वारे सुद्धा भारतात काही शक्ती वाद निर्माण करतात...
नसलेल्या इतिहासात रमायची ही अफू कोण वाटत फिरत आहे भारतभर ???

आनन्दा's picture

25 Jan 2018 - 11:35 pm | आनन्दा

जाम इच्छा आहे बोलायची, पण अवांतर नको म्हणून गप्प बस्तो.

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2018 - 10:57 am | श्रीगुरुजी

खरे आहे. तो प्रतिसाद म्हणजे पराकोटीचा मूर्खपणा आहे.

गामा पैलवान's picture

25 Jan 2018 - 6:47 pm | गामा पैलवान

अमितदादा,

.... ती गोष्ट वेदात नाही किंवा पूर्वजांनी माकडाचा माणूस झालेला पाहिलं नाही अशी बाळबोध कारणे देत नसावेत.

अधिक संशोधन व्हायला पाहिजे यावर तुमच्याशी एकमत आहे. डॉक्टर सत्यपाल सिंहांचं विधान थोडं विवाद्य आहे हे ही मान्य. मात्र वेद हे काही बाळबोध कारणांचे जनक मानले जाऊ नयेत. पुंजवादाचे ( = क्वांटम फिजिक्स) एक प्रणेते वर्नर हायझेनबर्ग यांचे हे उद्गार सुप्रसिद्ध आहेत :

"After the conversations about Indian philosophy, some of the ideas of Quantum Physics that had seemed so crazy suddenly made much more sense"

त्यामुळे वेदांचा उल्लेख प्रेरणादायी साहित्य म्हणून केला जावा असं माझं मत आहे. वेद हे बाळबोध कारणांचे जनक मानले जाऊ नयेत. अर्थात हे मत डॉक्टर सत्यपाल सिंहांना सुद्धा लागू पडतं. त्यामुळे त्यांचं विधान थोडं दुरुस्त करून म्हणेन की डार्विनला ज्या प्रकारची उत्क्रांती अपेक्षित होती तिचा मागमूस पारंपरिक वैदिक साहित्यांत आढळून येत नाही.

आ.न.,
-गा.पै.

कंजूस's picture

26 Jan 2018 - 9:57 am | कंजूस

१) " माकडापासून माणूस उत्क्रांत झाला" या वाक्यास विरोध आहे का?
२) सरसकट डार्विनचा उ०वाद संपूर्ण खोटा आहे?
३ ) क्रमांक एक यास विरोधी शारिरीक कारण म्हणजे मानवाच्या पायास हातासारखा अंगठ नाही,पायाने तो फांदी धरू शकत नाही. शेपूट नाहिसे झाल्याची छोटीशी हाडाची खूण दिसते तसा कोणत्या मानवाचा हाडाचा सापळा मिळालेला आहे का की जिथे अंगठ्याचे हाड बाजुस आहे?
४) सत्यपाल अथवा इतर कोणास तूर्तास बाजूला ठेवून उत्तरे शोधा.

कंजूस राव , विरोध डार्विन ला किंवा डार्विन विरोधालाही नाही . विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे .
विरोध आहे तारतम्याच्या अभावाला.
कुठल्याही शास्त्रीय प्रमेयाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात काही वावगे नाही . परंतु हे प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्याला त्या विषयाचे पुरेसे ज्ञान/ अभ्यास असेल, आणि प्रश्नचिन्ह तार्किक असेल तर च ते संयुक्तीक ठरेल , असे वैयक्तिक मत अन्यथा ती वायफळ बडबड . ( तुम्हाला पटतंय का मी लिहिलेलं हे ?)

जावडेकरांनी योग्य केले .

कंजूस राव , विरोध डार्विन ला किंवा डार्विन विरोधालाही नाही . विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे .
विरोध आहे तारतम्याच्या अभावाला.
कुठल्याही शास्त्रीय प्रमेयाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात काही वावगे नाही . परंतु हे प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्याला त्या विषयाचे पुरेसे ज्ञान/ अभ्यास असेल, आणि प्रश्नचिन्ह तार्किक असेल तर च ते संयुक्तीक ठरेल , असे वैयक्तिक मत अन्यथा ती वायफळ बडबड . ( तुम्हाला पटतंय का मी लिहिलेलं हे ?)

जावडेकरांनी योग्य केले .

गामा पैलवान's picture

26 Jan 2018 - 1:33 pm | गामा पैलवान

A.N.Bapat,

विरोध डार्विन ला किंवा डार्विन विरोधालाही नाही . विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे . विरोध आहे तारतम्याच्या अभावाला.

या न्यायाने डार्विनच्या थियरीला पण विरोध व्हायला हवा ना?

आ.न.,
-गा.पै.

जरूर . फक्त याची जाणीव हवी की हा वैज्ञानिक सिद्धांत आहे . त्याचा अभ्यास असावा व मग त्यातील त्रुटी शोधाव्यात . सापडल्यास त्या त्रुटींबद्दल पिअर रिव्युड जर्नल्स मध्ये लिहावे . जिथे या तुम्हाला सापडलेल्या त्रुटींवर इतर या सिद्धांताचा अभ्यास केलेले ज्ञानी पुरुष भाष्य करतील ., तुमच्याशी सहमत किंवा असहमत होतील , आजवर ज्ञात असलेल्या शास्त्राधारे .हा सर्वमान्य राजमार्ग . शास्त्रीय संशोधनाबाबत खरे खोटे करण्याचा .
तुमच्या मूळ प्रश्नाचे उत्तर : विरोध जरूर करावा . कुठल्याही शास्त्रीय सिद्धांताला पण ...
सत्यपाल सिंह यांनी त्यांच्या निष्कर्षाप्रति पोचण्यापूर्वी या सिद्धांताचा अभ्यास केला होता का याबद्दल साशंक आहे . त्यांनी दिलेल्या कारणमिमांसेवरून . अशा परिस्थितीत
त्यांनी या विषयावर भाष्य करणे गरजेचेच होते का ?
जबाबदारी च्या पदावर असताना बोलताना तारतम्य बाळगणे जरुरी असे वैयक्तिक मत .
जावडेकर साहेबांनी योग्य केले .

गामा पैलवान's picture

26 Jan 2018 - 7:38 pm | गामा पैलवान

A.N.Bapat,

तुमचा संदेश वाचला. त्यावरची माझी मतं सांगतो.

१.

फक्त याची जाणीव हवी की हा वैज्ञानिक सिद्धांत आहे

नेमका इथेच तर घोळ आहे. डार्विनचा नियम हा खरोखरीच वैज्ञानिक सिद्धांत आहे, की केवळ एक मतप्रदर्शन आहे.

२.

सत्यपाल सिंह यांनी त्यांच्या निष्कर्षाप्रति पोचण्यापूर्वी या सिद्धांताचा अभ्यास केला होता का याबद्दल साशंक आहे . त्यांनी दिलेल्या कारणमिमांसेवरून .

वेदांचा उल्लेख हा कारणमीमांसा म्हणून होऊ नये, तर एक प्रेरणा म्हणून व्हावा. त्यामुळे डॉक्टर सत्यपाल सिंहांचं विधान थोडं दुरुस्त करून म्हणेन की डार्विनला ज्या प्रकारची उत्क्रांती अपेक्षित होती तिचा मागमूस पारंपरिक वैदिक साहित्यांत आढळून येत नाही.

३.

त्यांनी या विषयावर भाष्य करणे गरजेचेच होते का ?

हो. याचं कारण असं की (माझ्या माहितीनुसार) डार्विनने कुठेही माकडापासून माणूस निर्माण झाला असं विधान केलेलं नाहीये. तरीपण असंकाही विधान जर पाठ्यपुस्तकात आलं असेल तर त्याचा छडा लावायला हवाय.

४.

जबाबदारी च्या पदावर असताना बोलताना तारतम्य बाळगणे जरुरी असे वैयक्तिक मत .

एक सर्वसाधारण नियम म्हणून मान्य. प्रस्तुत प्रसंगात डॉक्टर सिंहांचं शब्दांकन अपरिपक्व आहे. मात्र त्यांच्या विधानामागील हेतू समजावून घेणं फारसं कठीण नाही.

५.

जावडेकर साहेबांनी योग्य केले .

सहमत आहे. अर्थात जावडेकर साहेबही या विषयातले तत्ज्ञ नाहीत. त्यामुळे त्यांच्या विधानातनं निश्चित दिशेने मार्गदर्शन होत नाही. परंतु एक सर्वसाधारण शिस्त म्हणून ते योग्य बोललेत.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2018 - 3:18 pm | श्रीगुरुजी

विरोध आहे तो स्वतःचा सखोल अभ्यास नसताना आणि गरज नसताना एखाद्या विषयावर बोलण्याची हौस भागवण्याला आहे . विरोध आहे तारतम्याच्या अभावाला.

सखोल अभ्यास कोणाचाच नाही. सत्यपाल सिंगांच्या विधानानंतर अनिकेत सुळे नावाच्या शास्त्रज्ञाने एक ऑनलाईन पिटीशन तयार करून सत्यपाल सिंहांनी आपले विधान मागे घेण्याची त्यात मागणी केली आहे. एका वाहिनीवर बोलताना अनिकेत सुळे म्हणाले की मी अंतराळ संशोधक आहे. मला जीवशास्त्रातले फारसे कळत नाही. परंतु डार्विनचा सिद्धांत पुराव्याने सिद्ध झाला आहे. जीवशास्त्राचा फारसा अभ्यास नसताना एक अंतराळ शास्त्रज्ञ ठामपणे डार्विनच्या सिद्धांताच्या बाजूने बोलू शकतो तर रसायनशास्त्रात द्विपदवीधर व एम फिल असलेले सत्यपाल सिंह डार्विनच्या सिद्धांताच्या विरूद्ध का बोलू शकत नाहीत?

मुळात डार्विनचा सिद्धांत म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयासारखा गणिती सिद्धांत नाही जो कोणत्याही प्रकारच्या काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत सिद्ध होतो. डार्विनचा सिद्धांत हे त्याच्या निरीक्षणावर आधारीत एक दावा आहे जो दावा अजून सर्वमान्य नाही व निर्विवाद सिद्ध झालेला नाही. अशा दाव्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असेल तर त्यासाठी एवढा आकांडतांडव करण्याची गरज नव्हती. ऑनलाईन पिटीशन सारखे हास्यास्पद मार्ग चोखाळण्याऐवजी एखाद्या जैवशास्त्रज्ञाने विज्ञानाचा आधार घेऊन सत्यपाल सिंहांचे विधान खोडले असते तर ते जास्त योग्य ठरले असते. असे करण्याऐवजी ऑनलाईन पिटीशन वगैरे करून सत्यपाल सिंहांना आपले विधान मागे घेण्याची विनंती करणे ही शुद्ध दडपशाही व झुंडशाही झाली.

कुठल्याही शास्त्रीय प्रमेयाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात काही वावगे नाही . परंतु हे प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्याला त्या विषयाचे पुरेसे ज्ञान/ अभ्यास असेल, आणि प्रश्नचिन्ह तार्किक असेल तर च ते संयुक्तीक ठरेल , असे वैयक्तिक मत अन्यथा ती वायफळ बडबड . ( तुम्हाला पटतंय का मी लिहिलेलं हे ?)

सत्यपाल सिंहांना विरोध करणार्‍यांपैकी किती जणांना या विषयाचे पुरेसे ज्ञान व अभ्यास आहे. वर अनिकेत सुळे यांचे उदाहरण दिलेच आहे. त्यांच्या बरोबरीने काही विज्ञानकथा लेखकही आले होते. विज्ञानकथा लेखकांना तरी विज्ञानाचे पुरेसे ज्ञान व अभ्यास असतो का? जर सत्यपाल सिंहाचे विधान वायफळ बडबड असेल तर त्यांना विरोध करणारेही तशीच वायफळ बडबड करीत आहेत.

जर डार्विनचा सिद्धांत निर्विवाद सिद्ध झाला असेल तर तसे वैज्ञानिक दृष्ट्या दाखवून द्या व सत्यपाला सिंहांना वैज्ञानिक मार्गाने विरोध करा. ऑनलाईन पिटीशन करून, सत्यपाल सिंहांवर आगपाखड करून डार्विनचा सिद्धांत सिद्ध होणार नाही. असे केलेत तर त्यामागे निव्वळ राजकारण आहे असा वास आल्यावाचून राहणार नाही.

जावडेकरांनी योग्य केले .

कशावरून? जावडेकरांचा या विषयातील अभ्यास व ज्ञान किती?

सत्यपालांचे एक शास्त्रीय निवेदन,शिवाय ते एक मंत्री असा विषय आहे हे ध्यानात ठेवून पुढे काही डार्विन सिद्धांतावर लिहित नाही.

मागे एकदा एका मंत्र्याने परळच्या केइएम हॅास्पिटलातल्या रेडिओलजी केन्द्राचे उदघाटन करून भाषण ठोकले - " इथल्या लोकांना आता रेडिओचे कार्यक्रम सुस्पष्ट ऐकू येतील ~~~~~"

चालायचंच.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2018 - 12:54 am | मुक्त विहारि

आमच्या डोंबोलीतल्या खासदाराने एका कॅरम स्पर्धेचे उद्-घाटण करतांना नारळ फोडला आणि सर्व नारळपाणी कॅरम बोर्डावर ओतले.

असो,

मेरा भारत महान.

manguu@mail.com's picture

28 Jan 2018 - 10:28 am | manguu@mail.com

नारळ फोडून पाणी फिरवले व त्या पाण्याने ज्या मशीनचे उद्घाटन केले , तेच बंद् पडले. अशीही उदाहरणे आहेत.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2018 - 5:51 pm | मुक्त विहारि

तशा स्वभावाच्या व्यक्ती, आजूबाजूला बघीतल्या की, माणसापासूनच माकड झाला असावा, अशी पण शंका मनांत येते.

राही's picture

28 Jan 2018 - 12:53 pm | राही

१)वेदांचेच प्रामाण्य पुन्हा प्रस्थापित करायचे तर मधली बदलांची अडीज तीनहजार वर्षे वायाच गेली म्हणायची.
२)सांगे वडिलांची कीर्ति तो येक मूर्ख.(दासबोध)
३)जुने जाऊं द्या मरणालागुनी, जाळुनि किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका, सावध, ऐका पुढल्या हाका.(केशवसुत)
४) आजच्या मानवाचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज आणि आजच्या माकडांपैकी एका जातीचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज यांत पुष्कळ साम्य होते. नंतर या जातींचे विकसन वेगवेगळ्या प्रकारे होत गेले आणि आजची माकडे आणि मानव घडत गेले. (आजच्या) माकडातून (आजचा) मानव निघाला असा सिद्धांत कोणीच मांडत नाही. किंवा माकडातून मानव निघाला असेही म्हणणे योग्य नव्हे. जसे की नीॲंडर्थल मानव याच्या प्रजातीविषयी एकमत नाही. अनेक तज्ज्ञ त्याची प्रजाती सध्याच्या मानवाहून वेगळी मानतात.
५) अंगठा बाजूला असलेल्या प्राण्याचा सांगाडा समजा जरी मिळाला तरी तो मानव या प्रजातीचा नसेल. कारण ' मानव' या प्रजातीत अंगठा बाजूला असत नाही.
६) वरील मुद्द्याबाबत भाषाशास्त्रातले एक जवळचे उदाहरण देण्याजोगे आहे. कोंकणी आणि मराठी या भाषा अपभ्रंश या एका मधल्या टप्प्यावरील भाषेतून निर्माण झाल्या. ही अपभ्रंश म्हणजे आजची कोंकणी नव्हे किंवा आजची मराठीसुद्धा नव्हे. म्हणून मराठीतून कोंकणी निर्माण झाली हा समज चुकीचा आहे.
असो.

गामा पैलवान's picture

28 Jan 2018 - 5:47 pm | गामा पैलवान

राही,

तुमच्या गाडीने चुकीच्या जागी वळण घेतलंय. काल कोल्हापुरात दुर्दैवी बसने पुलावरून कलंडण्याआधी घेतलं तसं.

१.

१)वेदांचेच प्रामाण्य पुन्हा प्रस्थापित करायचे तर मधली बदलांची अडीज तीनहजार वर्षे वायाच गेली म्हणायची.

वेद प्रेरणामयी आहेत. तुम्ही त्यांचं प्रामाण्य काढताय. चुकीचं वळण.

२.

२)सांगे वडिलांची कीर्ति तो येक मूर्ख.(दासबोध)

विषयांतर.

३.

३)जुने जाऊं द्या मरणालागुनी, जाळुनि किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका, सावध, ऐका पुढल्या हाका.(केशवसुत)

विषयांतर.

४.

४) आजच्या मानवाचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज आणि आजच्या माकडांपैकी एका जातीचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज यांत पुष्कळ साम्य होते. नंतर या जातींचे विकसन वेगवेगळ्या प्रकारे होत गेले आणि आजची माकडे आणि मानव घडत गेले. (आजच्या) माकडातून (आजचा) मानव निघाला असा सिद्धांत कोणीच मांडत नाही. किंवा माकडातून मानव निघाला असेही म्हणणे योग्य नव्हे. जसे की नीॲंडर्थल मानव याच्या प्रजातीविषयी एकमत नाही. अनेक तज्ज्ञ त्याची प्रजाती सध्याच्या मानवाहून वेगळी मानतात.

मात्र तरीही शालेय पाठ्यपुस्तकांत 'माकड व माणसाचा पूर्वज एक आहे' हे अंतिम सत्य म्हणून शिकवलं जातं. निदान डॉक्टर सत्यपालसिंहाची तशी समजूत आहे.

५.

५) अंगठा बाजूला असलेल्या प्राण्याचा सांगाडा समजा जरी मिळाला तरी तो मानव या प्रजातीचा नसेल. कारण ' मानव' या प्रजातीत अंगठा बाजूला असत नाही.

हा काय प्रकार आहे ते कळलं नाही.

६.

६) वरील मुद्द्याबाबत भाषाशास्त्रातले एक जवळचे उदाहरण देण्याजोगे आहे. कोंकणी आणि मराठी या भाषा अपभ्रंश या एका मधल्या टप्प्यावरील भाषेतून निर्माण झाल्या. ही अपभ्रंश म्हणजे आजची कोंकणी नव्हे किंवा आजची मराठीसुद्धा नव्हे. म्हणून मराठीतून कोंकणी निर्माण झाली हा समज चुकीचा आहे.

अपभ्रंश नावाची भाषा अस्तित्वात असल्याचे पुरावे (बहुधा उपलब्ध) आहेत. परंतु माणूस व माकडाचा समान पूर्वज अस्तित्वात असल्याचा कसलाही पुरावा (माझ्या मते) उपलब्ध नाही. कुणाकडे असल्यास मी माझी समजूत बदलावयास तयार आहे.

शिवाय भाषेचे नियम जीवसृष्टीस थेटपणे कितपत लागू करता येतील हा वेगळा मुद्दा आहे.

आ.न.,
-गा.पै.

कंजूस's picture

29 Jan 2018 - 6:47 am | कंजूस

राही, क्रमांक ५) -
पाय असलेला साप आहे तो उत्क्रांतीतील एक अवस्था धरू तसं माकडाचा पाय आणि माणसाचा सपाट पाय यामधली एक अवस्था दाखवणारा मनुष्य सांगाडा मिळणे फार महत्त्वाचं आहे.

सुबोध खरे's picture

29 Jan 2018 - 10:26 am | सुबोध खरे

@ राही
येथे गवतास फाटे फुटतात

मराठी कथालेखक's picture

30 Jan 2018 - 7:55 pm | मराठी कथालेखक

प्रतिसाद आवडला.
वेदाच्यांच सहाय्याने आजही प्रत्येक गोष्टीच आकलन करण्याचा प्रयत्न करणं चुकीचंच ठरेल.
वेद लिहणारे ज्ञानी असतील पण त्यांच्या त्यावेळच्या ज्ञानाला मर्यादाही असू शकतात हे मान्य केलं नाही तर आपली अधोगती निश्चित.

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2018 - 7:17 pm | श्रीगुरुजी

>>> मात्र तरीही शालेय पाठ्यपुस्तकांत 'माकड व माणसाचा पूर्वज एक आहे' हे अंतिम सत्य म्हणून शिकवलं जातं. निदान डॉक्टर सत्यपालसिंहाची तशी समजूत आहे.

शालेय पुस्तकात डार्विनच्या सिद्धांताबरोबर एक चित्र असते. त्यात डाव्या बाजूला गुडघ्यांवर वाकून चालणारे माकड असून ते क्रमाक्रमाने उत्क्रांत होत शेवटी त्यांचे रूपांतर ताठ चालणा-या मानवात होते असे दाखविले होते.

गुरुजी, मुळात उत्क्रांतीचा सिद्धांत समजायला अत्यंत किचकट आहे.. त्यामुळे मुलांना समजायला सोपे म्हणून कदाचित तसे चित्र काढले असतील.
पण त्या चित्रामुळे अनएक गैरसमज निर्माण होतात हे मात्र खरे. उत्क्रांती बद्दल इथेच एक लेखमालिका आली होती, म्हात्रे काका किंवा घासुगुर्जी यांची.

आपल्याला शाळेत शिकवलेला (किंवा आपल्याला समजलेला) डार्विनचा सिद्धांत आणि आजचे त्याचे स्वरूप यात प्रचंड तफावत आहे (डार्विनचा सिद्धांत बहुधा भांडवलशाहीला पाठबळ देण्यासाठी वापरला गेला, आजचा सिद्धांत अगदीच वेगळा आहे त्या बाबतीत).. सैद्धांतिक स्वरूपात तरी तो पूर्ण आहे, पुरावे येत जातील तसा तो अधिकाधिक स्थिर होत जाईल.

आनन्दा's picture

29 Jan 2018 - 1:48 am | आनन्दा

जाता जाता, परवाच माझ्या ५ वर्षांच्या मुलीने माकडाचा माणूस कसा झाला म्हणून विचारले.. तिला उत्तर देताना चांगलीच भंबेरी उडाली होती ते आठवले.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2018 - 2:06 am | मुक्त विहारि

जिथे खूप माकडे असतील अशा शेतात न्या (कोकणात अशी बरीच शेते आहेत.) आणि मग एखाद्या बफेला न्या.

माकडे शेतात जशी नासधूस करतात, तशीच अन्नाची नासधूस माणूस बफे मध्ये करतो.

शेपटी सुटली तरी स्वभावधर्म जात नाही. असे सांगायचे.

प्रतिसाद हलकाच घ्या.

स्वगत : माणसा पासूनच माकड झाले असावे का? असाच विचार मनांत येत आहे.

आनन्दा's picture

29 Jan 2018 - 4:27 am | आनन्दा

हसून हसून मेलो..
सांगलीतल्या एक लग्नाचा बफे आठवला..

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2018 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

तुम्ही उगाचच शेतीत गेलात आणि जग एका थोर मानववंशशास्त्रज्ञाला मुकले की हो ! ;)

मुक्त विहारि's picture

31 Jan 2018 - 5:17 am | मुक्त विहारि

निरिक्षण केले की, "नेत्याला सगळे समजते," हा माणसांचा आणि माकडांचा गुणधर्म, समजायला जास्त वेळ लागत नाही.

पण एक आहे, टोळीतला नेता मरण पावला की, माकड टोळीत, नेता वंशपरंपरेने निवडला जात नाही.

नेता निवडी बाबतची, "माकडांची प्रगल्भता", सर्व माणसांत यायला खूप वेळ लागेल.काही काही समाजात ही सुधारणा आहे.पण ती अपवाद म्हणूनच.

असो,

दीपक११७७'s picture

30 Jan 2018 - 4:49 pm | दीपक११७७

http://www.darwinconspiracy.com/

दीपक११७७'s picture

30 Jan 2018 - 4:50 pm | दीपक११७७

मुवि काका यांना हा प्रतिसाद

नाखु's picture

30 Jan 2018 - 11:16 pm | नाखु

इकडे शहरातील माकडांना प्रशिक्षण देण्यात वेळ काढायचा, शिक्के मारत प्रत्येक विषयात मोदी, भाजपा गेलाबाजार हिंदू (ओढूनताणून) आणायचं ,तर बसलेत खेड्यात शेती करत!!

हा प्रीतीसाद फक्त मुवींना आहे

मिपावरील आमची माणसं आणि (त्यांनी) केलेली आपलीच माती या मालिकेचा प्रत्यक्ष अनुभवी प्रेक्षक नाखु

मुक्त विहारि's picture

31 Jan 2018 - 4:27 am | मुक्त विहारि

ह्यांच्यात दोनच फरक...

शेपूट दिसत नाही...हा प्रत्यक्ष आणि "आपल्या टोळीतील सदस्याला सांभाळून घ्यायचे " हा निरिक्षण केले तर दिसणारा दुसरा फरक.

बादवे,

माकडाला पकडून परत त्याला काही दिवसांनी सोडले तर, त्याला परत आपल्या टोळीत घेत असतील का? ह्याचा पण प्रयोग कुणीतरी करून बघायला पाहिजे.

"मिपावरील आमची माणसं आणि (त्यांनी) केलेली आपलीच माती या मालिकेचा प्रत्यक्ष अनुभवी प्रेक्षक नाखु"

ह्याबाबत काय बोलणार?

सुबोध खरे's picture

29 Jan 2018 - 10:24 am | सुबोध खरे

एका माणसाने माकड पाळले होते.
पण आचरटपणात दोघांत इतकी स्पर्धा लागली होती कि कुणी कुणाला पाळले होते याबद्द्दल शंका यावी --पु ल

दीपक११७७'s picture

30 Jan 2018 - 4:57 pm | दीपक११७७

The human Y chromosome has twice as many genes as the Chimpanzee Y chromosome. Humans have at least 78 genes and Chimpanzees have only 37.

The Y chromosomes of Chimpanzees and humans are radically different in the arrangement of their genes.

Both of these facts make it impossible for apes to have evolved into humans because there are no genetic mechanisms that would account for the vast differences between the ape and human Y chromosomes.

Below are maps of the Chimpanzee and human Y chromosomes:
CH

The top map is the Chimpanzee Y chromosome and the lower map is the human Y chromosome.

"Ape to human evolution" theory asserts that the Chimpanzee Y chromosome (top one) evolved into the human Y chromosome (the lower one) and few changes were necessary.

That is obviously baloney - there is no way that could have happened.

There is no genetic mechanism that could have rearranged the genes in the Chimpanzee Y chromosome to become the human Y chromosome.

The two chromosomes are so different it is like comparing the chromosomes of humans to those of chickens.

The regions of both chromosomes are color coded to identify the gene family or DNA type as follows (MSY means male specific region of the Y chromosome):

darwinconspiracy वरुन साभार

दीपक११७७'s picture

30 Jan 2018 - 5:07 pm | दीपक११७७

Darwinians also were determined to hide any evidence that contradicted their beloved evolution theory. That is why atheist scientists simply concocted a lie and told us apes and humans both have 24 pairs of chromosomes. An atheist scientist named Theophilus Painter took the lead and published a paper in 1921 claiming humans have 24 pairs of chromosomes. Other atheist scientists “confirmed” this in other scientific papers. It was not until 1956 that the fraud came to an end because evolution theory had gained enough support to not need to be buttressed by the 24 chromosome lie. The “apes and humans have the same number of chromosome lie” had done its damage to the truth - Adolf Hitler, Joseph Stalin, Mao Tse-Tung all pointed to the “24 chromosome lie” as a reason for them to ban the teaching of creationism from German, Russian and Chinese schools.

We bet you did not know that atheists claimed that “apes and humans have the same number of chromosomes.”

Unless you were studying genetics before 1956, you probably never knew that scientists used to claim humans and apes both had 24 pairs of chromosomes so we should offer you some evidence for this. Below is a link to Wikipedia – the link gets you to the Wikipedia biography of Theophilus Painter, the atheist scientist who published a “scientific paper” incorrectly claiming humans have 24 pairs of chromosomes.

https://en.wikipedia.org/wiki/Theophilus_Painter

It is worthy to note that even now, scientists are prevaricating about this matter and they insist they did not lie to us about humans having 24 pairs of chromosomes. Instead they tell us they made an “understandable mistake” and it was very difficult to accurately count all the way up to 24 pairs of chromosomes.

It is absurd for atheists to assert that the counting of just 23 pairs of chromosomes was so difficult that none of them could do it correctly for over 30 years. Guess what? They had no trouble counting the much larger number of chromosomes for other animals, such as dogs who have 39 pairs.

darwinconspiracy वरुन साभार

मराठी कथालेखक's picture

30 Jan 2018 - 8:01 pm | मराठी कथालेखक

बरं उत्क्रांतीवाद खरा नाही असं म्हणायचं तर मानव (आणि इतर बहूपेशीय सजीव) नेमके कसे अस्तित्वात आलेत याची दुसरी /पर्यायी थिअरी काय आहे ?

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2018 - 11:11 pm | श्रीगुरुजी

श्याम मानव यझ प्रकारातला आहे.

बरं उत्क्रांतीवाद खरा नाही असं म्हणायचं.........

सध्यातरी Ape to human evolution थेरीशी सहमत नाही