Skip to main content

भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा

लेखक अंतरा आनंद यांनी शनिवार, 06/01/2018 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय" अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे. (१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो. (१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं? ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्‍या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का? (२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं. जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्‍या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते. (३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती? बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना? (४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात. (५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? ) (६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही. प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?) (७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का? [२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला (२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला (३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं इतके किमान पर्याय संभवतात तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती (२) नव्ह्ती इतके किमान पर्याय संभवतात मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ] एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का? हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं. ’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत? अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे (१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते. सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय. आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्‍यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.

वाचने 123661
प्रतिक्रिया 327

प्रतिक्रिया

In reply to by राही

काय बिघडतं हे कम्युनिस्टांचा इतिहास पाहिल्यास समजतं. कम्युनिस्ट आयडिऑलोजीने ऑलरेडी भारतात हजारो लोकांच्या हत्या घडवलेल्या आहेत ज्यात भरपूर दलित/आदिवासी देखील आहेत. नक्षली हे कम्युनिस्टच आहेत. सो कम्युनिस्ट आयडीऑलॉजीने काय बिघडतं हा प्रश्न फार भाबडा वाटला.
देश फोडण्याचे आदेश देणार्‍या या पक्षांबरोबर युती करूनही देश फुटला नाही....आपला देश असा लेचापेचा नाहीय. जो इतक्या मोठ्या तुफानाला तोंड देऊन उरला तो या छोट्याशा वावटळीने उडून जाणार?
देश ऑलरेडी एकदा फूटुन झालेला आहे. ४७ ला. पण तो वादग्रस्त मुद्दा बाजुला ठेऊ. देश लेचापेचा नाही तरी वगैरे वगैरे म्हणून हे व्हायलंट लोक दुर्लक्षित कसे ठेवता येतील. हे म्हणजे समाज एवढा लेचापेचा नाही की चार गौ रक्षकांनी तुटेल म्हणण्यासारखं आहे.
दलितांना त्यांच्या तुलनात्मक अल्प लोकसंख्येमुळे सदैव माय्नॉरिटीमध्येच राहावे लागणार आहे.. तेव्हा कोणाशी ना कोणाशी युती करणे ही त्यांची अपरिहार्यता आहे. आतापर्यंत केलेल्या युत्यांमुळे जर सन्मान मिळाला नसेल तर दुसरा जोडीदार ते शोधणारच.
दलित हे अल्पसंख्य नाहीत. भारतात २३-२४% दलित/आदिवासी आहेत. एक चतुर्थांश लोकसंख्या असलेले अल्पसंख्यांक नाहीत. दलित हा एक गॄप आहे असं गृहितक आहे तुमच्या प्रतिसादाचं. जे बरोबर आहे असं वाटत नाही मला. त्यात भरपूर उतरंडी आणि मतभिन्नता आहे. जात विरहीत = वर्ग विरहीत हा प्रचार बरोबर नाही. गंडवागंडवीचा आहे. इथेही काही दलित नेते कम्युनिस्टांबरोबर चूल मांडत आहेत त्यावर टीका आहे. द्रविड पक्ष / खलिस्तानी तरी देश तोडण्याचा प्रयत्न करणारे होते. कम्युनिस्ट लोक देश पोखरणारे वाटतात आणि म्हणून त्यांचा प्रभाव कमीत कमी रहावा असं वाटतं.
फार मोठ्या दूरदृष्टीने आणि विचाराने त्यांनी जो भारतीय मूळ असलेला बौद्धधर्म स्वीकारला, तो देश विनाशाप्रत नेण्यासाठी नव्हे.
विनाशाप्रत नेणारे सरसकट दलित किंवा बौद्ध आहेत हे मी अजिबात म्हटलेलं नाही. इथे दलित कम्युनिस्ट अशी युती नसून प्रकाश आंबेडकर कम्युनिस्ट अशी चूल आहे. जी घातक आहे.

In reply to by अनुप ढेरे

प्रवीण तोगाडिया यांना बहुतेक कम्युनिस्ट /नक्षलवाद्यांकडून जीवाची भीती असावी ...

In reply to by अनुप ढेरे

,
मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.
हा लढा काही दशके किंबहुना शतके मागचा आहे. "चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)" https://www.misalpav.com/node/29040

जेव्हा जेव्हा जातीव्यवस्था वर्णद्वेष याबाबत "मनुस्मृती समर्थक" विचारसरणी वर टीका केली जाते किंवा सध्याच्या भारतातील मनुस्मृतीच्या अजेंडा उघड/छुपा राबविणाऱ्या संघटनेविरुद्ध काहीही लिहिले जाते, तेव्हा मनुवादी लोकं अलगदपणे तो रोख/ती टीका, ही जणू ब्रह्मणांवरच केली आहे, असा त्याला स्पिन देतात.
अय्या हो? मग लेखात ही दोन विधानं नक्की कशाला टाकली आहेत? १.
कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी.
पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.
आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामाजी, तुम्हाला, वरील दोन हायलाईट केलेली वाक्ये , माझ्या कुठल्या लेखात/प्रतिक्रियेत आढळली ?? ते जरा सांगा...

In reply to by पगला गजोधर

प.ग., अहो, तुम्ही नाही हो. मूळ लेखातली वाक्यं आहेत ही. त्यामुळे लेखिकेस ब्राह्मणांचा उल्लेख नक्की कशासाठी करायचाय असा प्रश्न पडतो. असंच भाष्य मी अगोदरही केलं आहे. कृपया इथला मुद्दा क्रमांक २३ व २४ पहाणे. आ.न., -गा.पै.

अॅमी, तुमचा इथला संदेश वाचला. १.
म्हणजे घटनापूर्व काळात इंग्रजांनी/काही राजांनी आपापल्या राज्यात शिक्षण, नोकरीत आरक्षण दिलं होतं, मग १९४७ ते १९८२ शून्य आरक्षण होतं आणि १९८२ ला परत ते आरक्षण चालू झालं असं का?
इंग्रजांनी दलितांना नोकरी व शिक्षणात कसलंही आरक्षण दिलेलं नव्हतं. शाहू महाराजांनी नोकरी (वा उपजीविका) व शिक्षणांत आरक्षण दिलं होतं, पण तो अखिल भारतीय प्रयोग नव्हे. शिवाय हे आरक्षण सरसकट अब्राह्मणांसाठी होतं (संदर्भ : विकी). इंग्रजांनी जे आरक्षण दिलं ते केवळ राजकीय स्वरूपाचं आहे. हेच धोरण स्वातंत्र्योत्तर काळात चालू राहिलं. नोकरी आणि शिक्षणांत आरक्षण १९८२ सालीच सुरू झालं. मात्र असं आरक्षण देण्यास शासनास कोणीही प्रतिबंध घालू शकंत नाही अशी तरतूद घटनेत बऱ्याच अगोदरपासून (बहुधा १९५० पासून) अस्तित्वात होती. २.
तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली?
शोधा म्हणजे सापडेल. विकिवर एण्ट्री आहे : https://en.wikipedia.org/wiki/Reservation_in_India ३.
तुम्ही मअंजावर बरेच जुने आहात, आरक्षणावरच्या बऱ्याच चर्चा वाचल्या असणार, सहभाग घेतला असणार तरी असे काहीतरी बोलताय याचं आश्चर्य वाटतंय....
मी कसाही असलो तरी वस्तुस्थिती बदलंत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बाकी अँमीजी, कोरगाव भीमा या विषयाला मनुवाद्यांनी, आरक्षणाचा धागा बनवून टाकलाय हे तुमच्या लक्षात आले असेलंच.

In reply to by पगला गजोधर

प.ग., कोरेगाव-भीमा या विषयात धागाकर्तीने जानवं, निरुपण आणि राममंदिर कसं ओढून ताणून आणलं. तसंच मनुवाद्यांनी आरक्षण खेचडत आणलं. आ.न., -गा.पै.

आता अजून किती दगडफेक होणार आहे या धाग्यावर.. २०० होतील बहूधा !! मित्रांनो , कृपया झाल्या घटनेवरुन आपापसात त्वेषाने वाद नको घालूयात. हीच वेळ आहे सर्वांनीच एकमेकांना समजून घेण्याची. काही जखमा, वेदना असतील तर त्या कधीतरी व्यक्त होणे ठीक आहे..पण मनाने एकमेकांपासून दूर जाण्याचे टाळा. सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल मनात ममत्व असावे.

In reply to by मराठी कथालेखक

मित्रांनो , कृपया झाल्या घटनेवरुन आपापसात त्वेषाने वाद नको घालूयात. हीच वेळ आहे सर्वांनीच एकमेकांना समजून घेण्याची. काही जखमा, वेदना असतील तर त्या कधीतरी व्यक्त होणे ठीक आहे..पण मनाने एकमेकांपासून दूर जाण्याचे टाळा.
असं कोणी केलेलं दिसत नाही.
सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल मनात ममत्व असावे.
सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल माझं ममत्व जास्त का तुझं जास्त अशी हमरीतुमरी लागलेली आहे. किमान इथल्या सदस्यांबद्दल हेच म्हणता येईल.

In reply to by arunjoshi123

सर्व जाती धर्माच्या लोकांबद्दल माझं ममत्व जास्त का तुझं जास्त अशी हमरीतुमरी लागलेली आहे. किमान इथल्या सदस्यांबद्दल हेच म्हणता येईल.
१+ बरोबर आहे सहमत. आम्ही इथे (मिपावर) फक्त व्हर्च्युअल हमरीतुमरीवर वाद घालतो. प्रत्यक्ष कट्ट्यावर एक चाय, वन बाय टू करून, कुठे जेवायला जायचं हेचं ठरवत असतो.

अत्यंत सकस लेख.. आवडला आणि बव्हांशी पटलादेखील..

श्री.अंतरा आनंद यांचा हा लेख उत्कृष्ट आहे. समाजाची मानसिकता , समुदायाच्या विचारशक्तीच्या मर्यादा यांचे भान ठेवून भीमा-कोरेगाव घटनेचे समंजसपणे विश्लेषण केले आहे. या लेखनातून वैचारिक प्रगल्भता तसेच काही चांगले घडावे याची आंतरिक तळमळ या गोष्टी दिसून येतात. ....यनावाला

काहींना जानव्याच्या उल्लेखामुळे मी ब्राम्हण समाजाला दोष देतेय असं म्हटलय. सव्यापसव्य करणे हा प्रचलित शब्द्प्रयोग आहे. "भीमा कोरेगावला काय घडलं?" या लेखात जो उहापोह चालला होता त्याचा मूळ गोष्टीशी काहिही संबंध नव्हता. या लेखाखालील प्रतिक्रियेत कोणी तरी आम्हालाही ब्राम्हण म्हणून चिडवत होतेच हे म्हटलेलं त्याचा उल्लेख दुसर्‍या ठिकाणी आहे. लेखातले मूळ मुद्दे टाळून अनावश्यक गोष्टींवर भार देणार्‍यांना मला कोणतीही उत्तरे दयायची नाहीत. फक्त आपल्याला एका कालबाह्य रूढीबद्द्ल बोललेलं एवढं लागतं तर दुसर्‍यांच्या अभिमानविषयाबद्द्ल आपणही न बोलण्याचं पथ्य पाळावं. (१)दलित लोकांनी ब्रिटिशांची गुलामी एवढी अभिमानाने सांगावी ह्या इतका मूर्खपणा दुसरा काहीही नाही. (ते ब्रिटीशांची गुलामीबद्द्लचा अभिमान नाही तर पूर्वजांच्या लढवय्येपणाचा अभिमान सांगतात एवढं भान या लिहीणारीला नक्की आहे पण आपल्याला हवं तेच तोडून मोडून सांगायचं) (२) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच (३) ज्या प्रकारे एकूणच दलित समाजाची वाटचाल आहे त्यावरून ते असेच मूर्ख बनत राहणार असे वाटते. (रामंमंदिराच्या मागे लागून किती दश्कं मूर्खपणात घालवली ते मोजा ते झालं की गोमाता, लव्हजिहाद, राष्ट्रगीत ही न संपणारी यादी आहे . बसा मोजत.) (४) ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची शेखी मिरवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. (५) दलितांनी आंबेडकरांचे पुतळे आणि स्मारक इत्यादींचा नाद सोडून त्यांच्या प्रमाणे चांगले शिक्षण घेतले आणि उद्योग धंदे केले तरच त्यांना काही भवितव्य आहे नाही. (६) काही दिवस थांबा कुणी दलिताने युरोप मध्ये जाऊन वास्को द गामा ला भारतांत समतेची गुढी उभारायला बोलावले होते असे ऐकू येईल. (६)या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात. (७) द्यायला लोकां पासून आधी चोरून घ्यायला पाहिज. फुकटचंबू लोक म्हणजे समाजाचा कॅंसर आहेत बंद, तोड्फोड करुन तो हक्क " अर्न" करतात त्यांच्या पुढार्‍यांकडुन. अशी वाक्ये असलेले प्रतिसाद निव्वळ दलित समाजाबद्द्लच्या कळकळीतून आलेत की त्यांना काही जास्त मिळतय या मळमळीतून आलेत हे कळत नाही का? महार वतन चार जणांना मिळाली म्हणून महारांची स्थिती चांगली होती अस नाही पण ते उगाळून उगाळून त्याचे वळसे देत बसायचं. असो, माझा मुद्दा अतिशय थेट आहे. कळत नसेल तर पुन्हा एकदा, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. आपले नेते जसे पूज्य असतात तसे दुसर्‍याचे नेतेही काही त्यांना पूज्य असतात. त्यांना थेट "नक्ष्यलांचे हस्तक" वैगेरे म्हणणं अति होतं. आरक्षणाचा मुद्दा कुठेही नसताना तो आणला गेलाच. क्रमशः

In reply to by अंतरा आनंद

अशी वाक्ये असलेले प्रतिसाद निव्वळ दलित समाजाबद्द्लच्या कळकळीतून आलेत की त्यांना काही जास्त मिळतय या मळमळीतून आलेत हे कळत नाही का? >> केवळ मळमळ! आणि ती नेहमीच चालू असते वेगवेगळ्या रुपात :-(

In reply to by एमी

केवळ मळमळ! आणि ती नेहमीच चालू असते वेगवेगळ्या रुपात
=== इतरांनी लिहिले कि मळमळ ? मग तुम्ही ब्राम्हणांबद्दल जे लिहिताय त्याला ओकार्‍या म्हणावे काय?

In reply to by अंतरा आनंद

बंद, तोड्फोड करुन तो हक्क " अर्न" करतात त्यांच्या पुढार्‍यांकडुन. हे वाक्य मीच लिहीलय. आणी ते फक्त आणी फक्त दलितांसाठीच लिहीलय असा समज करुन घेतलाय. असे तोडफोड करणारे कोणत्याही समाजाचे, पक्षाचे, पार्टीचे असु शकतात. (पुढारी फक्त दलितांचेच असत नाहीत) हा मुद्दा अंगावर ओढुन घेवुन तुम्ही माझ्या, मी दलितांबद्दल न बोललेल्या म्हणण्याला दुजोरा देत आहात अस नाही वाटत तुम्हाला. (ज्याय्ला काय वेळ आलीय, ज्यात काही विचीत्र अर्थ नाही अश्या वाक्याला सुद्धा लोक आपल्याला सोयीस्कर अर्थ लावुन घेतात आणी इकडे जस्टीफिकेशन द्यावे लागतय)

In reply to by अंतरा आनंद

ते ब्रिटीशांची गुलामीबद्द्लचा अभिमान नाही तर ...
कशावरून? डॉ. आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं आहे? डॉ. आंबेडकरांनी भीमा कोरगावचा उत्सव चालू केला. त्यांनी जेव्हा चालू केला तेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते. स्वातंत्र्यानंतर हा उत्सव त्यांनी बंद केला नाही. करा म्हणून लोकांना सांगीतलं नाही. ================ तर इथे अनेकांनी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे महार सैनिक होते, त्यांनी देखील अनेक लढाया लढल्या, जिंकल्या, त्यात मर्दुमकी गाजवली, मग शिवाजींनी लढलेली लढाई का नाही निवडली उत्सव साजरा करायला? पूर्वजांचा लढवय्येपणा नेमका भारताचे लोकल सेकंड लास्ट मोठे सार्वभौम राज्य बुडतानाच कसा आठवला? ===================== भारतात केवळ आदिवासींनी ब्रिटीशांविरोधात २५ उठाव केलेले आहेत. यातला कोणताही आंबेडकरांना निवडता आला असता. https://en.wikipedia.org/wiki/Tribal_revolts_in_India_before_Indian_ind… ============================ आधुनिकतेचा स्पर्श न झालेल्या काळात पूर्वाश्रमीचा क्षत्रीय वा ब्राह्मण जातीशी संबंध नसलेल्या लोकांनी राज्य केले आहे. https://www.quora.com/Was-there-ever-a-Dalit-King-in-India थेट सत्ताधारी बनलेल्या या लोकांचा उत्सव करणं जास्त लॉजिकल असलं असतं.

मुंबई : 'ऍक्शन हिरो' म्हणून बॉलिवूड मध्ये नामांकित असलेला अक्षय कुमार 'पॅड मॅन' नंतर आता 'केसरी' या चित्रपटाची तयारी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारचा 'फर्स्ट लुक' आज प्रदर्शित झाला. यात अक्षय कुमार शूरवीर "शीख" लढवैय्याच्या भूमिकेत दिसला आहे. अक्षयने चित्रपटाचे पहिले चित्र ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की "चित्रपटाच्या पहिल्या चित्राच्या माध्यातून तुमच्या पर्यंत पोहोचताना मला खूप अभिमान वाटतोय. २०१८ वर्षाची सुरुवात मी केसरीने करत आहे. मी आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपट अतिशय महत्वाकांक्षी असून यासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबर १८९७ साली, अफगाण ओराक्झाई आणि ब्रिटिश भारतीय सेना (शीख रेजिमेंट)यांच्यात झालेल्या 'सारगढी' युद्धावर आधारित आहे.
. . Celebrating Bhima Koregaon is unpatriotic? So why not other British victories in India too? The Battle of Saragarhi is commemorated with a holiday in Punjab and the British Indian Army’s role in World War I is widely celebrated.

In reply to by पगला गजोधर

या दोन्हीत तुम्हाला काहीच फरक वाटत नाही? मला समजावता येतंय का ते बघतो. पेशव्याच्या काळात: जनता - मराठा, महार आणि समस्त इतर जाती राज्यकर्ते - पेशवे बाहेरचे - ब्रिटिश लढाई - ब्रिटिश विरुद्ध पेशवे काय झालं - अंतर्गत भांडणामुळे महार ब्रिटिशांना जाऊन मिळाले आणि पेशव्यानां हरवलं. पर्यवसान: ब्रिटिशांचा भारतावर कब्जा सुकर झाला सरगढीच्या लढाईत: जनता - समस्त हिंदुस्थानी (ब्राम्हण, क्षत्रिय, मराठा, महार आणि इतर सर्व जाती) राज्यकर्ते - ब्रिटिश बाहेरचे - अफगाण सैन्य लढाई - ब्रिटिश काय झालं - ब्रिटिशांच्या अमलाखाली असलेले शीख सैनिकांनी अफगाणी सैन्याला जोरदार प्रतिकार केला. पर्यवसान - २१ विरुद्ध १०००० असा रेशिओ असल्याने २१ शीख सैनिक मारले गेले आणि अफगाणी सैन्याने त्या पोस्टवर कब्जा मिळवला. दोन दिवसांनी ब्रिटिश हिंदुस्थानी सैनिकांनी तो पोस्ट परत मिळवला. तुम्हाला फरक समजला असेल अशी आशा करतो.

In reply to by ट्रेड मार्क

व्वा काय जस्टीफिकेशन दिलंय ! ब्रिटिश "बाहेरचे" असं होण्यासाठी, "भारत देश" ही संकल्पना होती का ? मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें, निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...

In reply to by पगला गजोधर

मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें,
पगला गजोधर*, तुमचं अक्षय कुमारच्या चित्रपटाचं नि त्या लढाईचं लॉजिक क्षणभर मान्य करू. महार नि शीखांच्या उत्सवांत भेद करू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे नि ते योग्य आहे. ========== वरील कोटच्या संदर्भात आपली नक्की काय भूमिका आहे? आज देखील ब्राह्मणवादी, मनुवादी संघ/बीजेपी यांचं राज्य आहे नि ते तितक्याच दुष्टपणे आपला जातीयवादी, मनुवादी, मध्ययुगीन अजेंडा राबवतच आहेत. आज एखाद्या चीन, ब्रिटन वा अमेरिका सारख्या देशाने भारतावर आक्रमण केले तर तुम्ही/दलितांनी/महारांनी/पुरोगामी शक्तींनी/या उत्सवास समर्थन देणारांनी अशा आक्रमणकर्त्यास जाऊन मिळावे काय? अर्थातच इतकी प्रबल झालेली हि जातीयवादी ताकद उदा. चीनचे राज्य आले तर पुरती नेस्तनाबूत होणारच, कायमची पिछाडिला जाणार आहे आणि यात दलितांचे कल्याण समावलेले आहे. मग काय करावे? =================== * तुम्ही काहीतरी छानपैकी नाव धारण करा राव, असं कोणाला पगला म्हणून संबोधायला नको वाटतं.

In reply to by arunjoshi123

मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें, निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...
मी तर म्हणतो जगात जिथे जिथे युरोपियन गेले तिथे तिथे त्यांनी अख्खे खंडच्या खंड कापून काढले. उत्तर अमेरिकेत युरोपीय लोकांनी कत्तली केल्या नसत्या तर आज रेड इंडियन लोकांची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपेक्षा जास्त राहीली असती. द. अमेरिकेत संपूर्ण स्थानिक कापले गेले. ऑस्ट्रेलियामद्धे पण तेच झाले. द. आफ्रिकेत पण मिलियन्स लोकांच्या कत्तली केल्या. जिथे मारणं त्यांना नको होतं तिथे गुलाम बनवलं आणि त्यांचा व्यापार केला. या गुलामांचा एकदा इतिहास वाचा. ज्यांच्या बाबतीत ते शक्य नव्हतं त्यांना मजूर म्हणून नेलं. ज्यांच्याबाबतीत ते शक्य नव्हतं त्यांना युद्धात तोफेचे बळी बनवलं. ================= भारतात मात्र ते असलं काही करू शकले नाहीत. याचं श्रेय इथल्या जातीयवादाला जातं. युरोपीय लोक अवर्ण लोकांना आधुनिक वैद्नानिक आधारे अमनुष्य वा कमी मनुष्यत्व असलेले मनुष्य मानायचे. ============================ थोडक्यात, भारतात ब्राह्मण नसते तर युरोपीय लोकांनी सर्व स्थानिकांना संपवून टाकलं असतं नि हा एक गोर्‍या लोकांचा देश असला असता.

In reply to by पगला गजोधर

एक बहुत घनघोर वामपंथी थे सोमनाथ चटर्जी। जो 2004-09 तक लोकसभा अध्यक्ष थे। तो हुआ यूं कि सुषमा स्वराज और सोमनाथ चटर्जी किसी डिबेट में हिस्सा ले रहे थे। सोमनाथ साहब बड़े जोश में बोल गए कि भारत कभी एक राष्ट्र था ही नही! सुषमाजी मुस्कुराते हुए बड़ी शान्ति से बोली, 'अगर भारत एक राष्ट्र ना होता ना सोमनाथ दा, तो बंगाल की एक माँ गुजरात के सोमनाथ के नाम पर अपने पुत्र का नामकरण कभी ना करती!' सोमनाथ बाबू पूरी बहस में बस हकलाते ही रह गए।

In reply to by पगला गजोधर

सुंदर!
निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं...
काय दुर्दम्य निराशावाद आहे!

In reply to by पगला गजोधर

मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें, निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला पंचतंत्रातील एक कथा आठवली. एकदा एका विहिरीत बेडकांचा राजा त्यांच्यावर जुलूम करीत होता. त्याला कंटाळून एका बेडकाने त्याचा काटा काढण्यासाठी एका सापाला आमंत्रण दिले. सापाने येऊन त्या बेडकांच्या राजाला खाल्लेच पण हळूहळू एक एक करीत सर्व बेडूक हि खाल्ले आणि त्या विहिरीत एकही बेडूक उरला नाही. .

In reply to by पगला गजोधर

आपलं बोलणं मराठा एम्पायर बद्दल चाललं आहे, जे त्यावेळेला पेशवे सांभाळत होते. यात ब्रिटिशांचा काही सहभाग होता का? असता तर ब्रिटिशांनी पेशव्यांवर आक्रमण कशाला केलं असतं? हे महार लोक ब्रिटिश होते का? माझ्या मते ते मराठा एम्पायर मधेच राहणारे होते पण त्यांना त्यांच्यावर अन्याय होतोय असं वाटत होतं. त्यामुळे ते बाहेरून आक्रमण करणाऱ्या ब्रिटिश लोकांना जाऊन मिळाले आणि स्वतः रहात होते त्याच राजाविरोधात लढले. एक सोप्प उदाहरण देतो - कदाचित समजायला मदत होईल. एका जुन्या बिल्डिंगमध्ये सर्व जातीचे लोक रहात होते. यातल्या काही लोकांना वाटायचं की बाकीचे लोक आपल्यावर अन्याय करत आहेत. म्हणून त्यांनी एका बिल्डरशी संधान बांधलं आणि त्याला बिल्डिंग पाडायचा प्रस्ताव ठेवला. त्या बिल्डरचा या जागेवर डोळा होताच आणि आता तर आयतीच संधी चालून आली. बिल्डरने या फुटीचा फायदा घेतला आणि स्वतःचा स्वार्थ साधला. मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें, निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं... म्हणजे 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' ब्रिटिशांमुळे सुटला असं तुमचं म्हणणं आहे? काय बोलणार यावर! माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही, अॅमी किंवा अंतरा आनंद यापैकी कोणीच दिलं नाही. प्रश्न असा - महार जर एवढे शूर होते तर त्यांनी स्वतःच पेशवाई का उलथवून टाकली नाही? ब्रिटिशांच्या कुबड्या घ्यायची काय गरज होती?

In reply to by पगला गजोधर

जातीभेदाचा वादावादीत तुम्ही थेट भारत देशाच्या संकल्पनेवर प्रश्न उपस्थीत करावा प.ग. ??? सॉरी टु से, पण अत्यंत हीन पातळीचं प्रदर्शन झालं हे. मिपावरच्या एखाद्या ग्रेटथिंकर टाईप आयडीने असं काहि टंकलं असतं तर एक वेळ समजु शकलो असतो. पण तुमच्यासारख्याने असले तारे तोडावे ??

बरेच मुद्दे वादग्रस्त असले तरी लेख चांगला आहे. कारण दलितांच्या दृष्टीकोनातून अत्यंत योग्य लिहीलेले आहे. अनेक मुद्द्यांत काही वाद नाही. पण याबद्दल दोष देताना टीकेचा सगळा रोख ब्राह्मणावरच जाणवला.

हे असे जे लिहीले आहे, त्याच्याशी पूर्ण सहमत आहे. अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. पण या अशा वाक्यांची गरज नव्हती. मूळ प्रॉब्लेम तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडला आहे पण ते करता करता खवचट जातीवाचक शेरे कंट्रोल केले असतेत तर जास्त आवडले असते. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी.

In reply to by फारएन्ड

(१) दुसर्‍या धाग्यावर समाजाच्या एका वर्गाला चोर म्हटलं गेलं. (२) st, बेस्ट ,रेल्वे यांनी आपल्या ताफ्यातील २५ टक्के गाड्या या फक्त दलित आंदोलकांना तोडफोड करण्यासाठी स्वखुशीने उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी वेगळ्या बजेट ची योजना करावी. अशी सर्रास विधानं केली गेली तेव्हा नाही का निषेध नोंदवावा वाटला? ही वाक्य माझ्या वाक्यांपेक्षा जास्त लागट होती. पण हा टिकेचा रोख थेट एका वर्गावर का? असं विचारलंत? त्या धाग्यावर कोणीही हे चुकीचं बोललं जातय असं म्हणताना दिसलं नाही. सगळेजणं जानवं कानावर ठेवून गेला होतात का? जर, मूळ प्रॉब्लेम वेगळा मांडलेला दिसतोय तर त्यावर बोला ना? (१) दगडफेक करणारे कोण असतील ते त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. ( म्हणजे त्याचा निषेधही कोणी कराय्चा नाह)? करणारे थेट नक्षल्यांचे हस्तक? ) असं म्हणणारे भिडे समाजसेवा करत असल्याची सर्टीफिकेटं का वाटत सुटलेत? सरकार बघेल काय ते? प्रकाश आंबेडकरांनी कायद्याच्या चौकटीत मागणी केलीय. गौरक्षकांसारखं हातात कायदा तर घेतलेला नाहीय ना? हा सरळसरळ दुटप्पीपणा दिसत नाहीय का?

In reply to by अंतरा आनंद

>> धाग्यावर कोणीही हे चुकीचं बोललं जातय असं म्हणताना दिसलं नाही. सगळेजणं जानवं कानावर ठेवून गेला होतात का? अजून किती द्वेष शिल्लक आहे? अजून किती खालची पातळी गाठायची आहे? ५-७ वर्षापूर्वीचे बीग्रेडी ब्लॉग्ज असे चिप लिखाण करायचे (ब्राह्मणांच्या बायका वैगेरे), तेही काही मनात असेल तर लिहून टाका.

In reply to by अंतरा आनंद

बाकी इतरांनी काय भंपक लिहीले आहे त्यावरून तुमचे जानव्याचे उल्ल्केख जस्टिफाय होत नाहीत. ते आणखी दोन धाग्यांवर आणि आणखी पन्नास संस्थळांवर कोण काय म्हणत आहे याबद्दल गावागावात जकात दिल्यासारखा निषेध नोंदवत नोंदवत येत तुमचा लेख वाचून मगच तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात काय? लेखातील टोन वरून तुम्हाला सेन्सिबल समजून विचारले होते. तुमच्या उत्तरातून तुम्हाला हा वाद काय लेव्हलला घालायचा आहे ते लक्षात आले. विचारणार्‍याच्या मुद्द्यापेक्षा त्याचे जानवे काढायची तुम्हाला गरज दिसते म्हणजे यापुढे वाद घालण्यात अर्थ नाही.

In reply to by फारएन्ड

हो, माझं ते वाक्य निखालस चुकीचं आहे. पण मुद्दाम घातलं मी ते. खोडून पुन्हा घातलं . मलाही या लेव्हलला जायचं नव्हतं मी कधीही गेले नाहीय. पण हेच दाखवायचं होतं की तुमच्या एका कालबाह्य रुढीबद्द्ल नुसतं साधं विधान सहन होत नाही तर तुम्ही दुसर्^यांच्या रुढी किती कालबाह्य आहेत किंवा चुकीच्या आहेत हे कोणत्या अधिकारात बोलता? (तुम्ही म्हणजे व्यक्तिशः तुम्ही नाही). अजून दिसतीलच किता जणांना लागेल ते. तुम्ही माझ्या एकाच उल्लेखाला दोनदोनदा कोट करताय तो उल्लेख म्हणजे मुळ मुद्दा कुठेही नसताना. त्यातून "ब्राम्हणांनीच दगडफेक केली" असं मला म्हणायचं आहे असाही अर्थ काहीजणं काढत आहेत. पण आम्ही एका समाजगटाला 'चोर' म्हणतोय हे चुकलं असं कोणी म्हणतय का? मी जो मुद्द ठळक केलाय त्याबद्द्लही काही बोलं जात नाहीय. आणि जे जस्टीफाय होतय त्याबद्दलच बोला. काहीच जस्टीफाय नसेल होत तर तसं बोला. मलाही या क्षुल्लक मुद्द्यावर वाद घालायचा नव्हता आणि घालणारही नाही.

In reply to by अंतरा आनंद

कसली रूढी? जानव्याच्या रूढीबद्दल नाहीये ते. जानव्याच्या उल्लेखाने तुम्ही दलितांविरूद्ध बोलणार्‍यांपैकी फक्त ब्राह्मणांनाच टार्गेट केले आहे म्हणून लिहीले आहे ते. आणि काय दोन दोन दा कोट केले? प्रतिक्रियेवर उत्तरे देताना तोच विषय परत येणारच. तुम्ही प्रतिक्रियेत जानवे कानाला लावले का विचारले नसते तर पुन्हा लिहायची वेळ आली नसती. जे जस्टिफाय होते त्याबद्दल बोला? मग माझ्या आधीच्या प्रतिक्रियेमधे तेच लिहीले आहे की. जे पटले त्याचा स्वतंत्र उल्लेखही केलेला आहे. माझा आधीचा पहिला प्रतिसाद बघा. मग न पटलेली वाक्ये काही विशिष्ठ हेतूने लिहीलेली होती इतके सांगून भागले असते, रोख फक्त ब्राह्मणांवर असण्याचा हेतू नव्हता इतका खुलासा पुरला असता. पण तुम्हाला इतरत्र दिसलेल्या व इतरांनी लिहीलेल्या वाक्यांबद्दल मला जाब विचारायची हुक्की आली. इतरांनी जे काय लिहीले आहे त्याच्याशी माझा काय संबंध? चुकीच्या आहेत हे कोणत्या अधिकारात बोलता? (तुम्ही म्हणजे व्यक्तिशः तुम्ही नाही) >>> मग ते ज्यांना आक्षेप आहे त्यांना सांगा. मला उत्तर देताना माझ्या प्रतिक्रियेबद्दल बोला. तुम्हाला हे लक्षात आलेले नाही की दलितेतरांनी केलेल्या घाउक व सवंग टीकेचा रास्त समाचार घेताना तुम्ही ब्राह्मण या एकाच वर्गावर तशीच टीका करायचा मोह आवरलेला नाही.

In reply to by फारएन्ड

मी ते लिहीण्याआधी दोनदा. ओके. मलाही जो मुद्दा नाही त्यावर चर्चाच करायची नाही. मग न पटलेली वाक्ये काही विशिष्ठ हेतूने लिहीलेली होती इतके सांगून भागले असते, >> खुलासा मी आधी दिलेला असताना पुन्हा पुन्हपु तेच उगाळलं जातय याचा संताप येऊन मी ते लिहीलं. माझ्या डोक्यात मी लिहीलेला लेख आणि त्याला आलेला प्रतिसाद ह्या दोन गोष्टी असतात, तर तुमच्याकडे लेख आणि तुमचा प्रतिसाद, त्यातून एकाचा राग दुसर्^यावर काढला जाऊ शकतो. भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व. तुम्हाला हे लक्षात आलेले नाही की दलितेतरांनी केलेल्या घाउक व सवंग टीकेचा रास्त समाचार घेताना >> ओके.

In reply to by अंतरा आनंद

आता वादाचे मुद्दे बाजूला ठेवून पुन्हा लिहीतो - बाकी ८०% लेख पटलेलाच आहे. खेडेगावात सर्वसामान्य दलित व्यक्तीला पुढे येताना कशाकशाचा सामना करावा लाग्तो याची कल्पना आहे. त्या स्मारकाला भेट द्यायला जाणार्‍या सर्वसामान्य लोकांबद्दल कसलाही आकस नाही.

In reply to by फारएन्ड

खेडेगावात सर्वसामान्य दलित व्यक्तीला पुढे येताना कशाकशाचा सामना करावा लाग्तो याची कल्पना आहे. त्या स्मारकाला भेट द्यायला जाणार्या सर्वसामान्य लोकांबद्दल कसलाही आकस नाही. >> हे एवढेच अपेक्षीत आहे. ते लिहणार कोणीच नव्हत (अजूनदेखील नाही) म्हणून हा लेख आला...

आजच्या प्रासत्ताक लोकशाही भारताची, आणि पेशवाई भूभागाची, स्थळ काळ विपरीत अशी तुलना मनुवादी तुलना करून, असे भासवू इच्छितात.... इंग्रज यायच्या आगोदर हा भूभाग प्रजासत्ताक लोकशाही देश होता....की जे चुक आहे... आजचा प्रजासत्ताक लोकशाही देश हा घटनेच्या आधारावर चालतोय, "बरे झाले पेशवाई बुडाली", असे म्हणणे, आजच्या भारतावर आक्रमण झाल्यावर परकीय शक्तीला जाऊन मिळणे, ह्या अजिबात संबंध नसलेल्या गोष्टी आहेत.... सॅम्युअल जॉन्सनचा कोट इथं परत द्यायचा मोह मी टाळतोय... असो युरोपियन जिथे गेले तिथे त्यांनी स्थानिकांना हटवून स्वतः ताबा घेतला हे तुमचे म्हणणे मान्य, मात्र कालावधी हा प्राचीन आहे, कारण कोकेशस पर्वतराजीतून आलेले आर्य, ग्रीस तटा वरून आलेले आर्य, यांनी स्थानिक लोकांना हटवूनच ही ऑफशोर युरोपियन वसाहत आणली... अजून उदा हवे तर, कोल्हटकर यांचा कंबोडिया लेख १ वाचा, या भूमीला नंतर आर्यप्रदेश असे नावं दिले होते, व मनु धर्माचे पालन कर्ते होते, त्यांनी भारतात स्थानिक पराजीतं नागवंशियाना दलित/गुलाम/शुद्र बनवून ठेवले, पुढे ते समुद्र मार्गे कंबोडियाला गेले, तिथे सुद्धा स्थानिकांना गुलाम केले व आपल्या हिशोबाने मंदिरे बांधली....

In reply to by पगला गजोधर

कैच्याकै आर्यन इन्व्हेजन थियरी हे एक मिथ आहे. सुरकोटलाचा अश्व माहीत नाही काय? झालंच तर राखीगढी, धौलविरा, हडप्पा येथील उत्खननं.

In reply to by प्रचेतस

नुसत तुम्ही प्रतिसाद देऊन आम्ही का मानू? पण खर सांगायचे तर ह्यावर अधिक वाचावयास आवडेल. बामसेफ आणि ब्रिगेडी लोकांचा तो मोठा मुद्दा आहे लोकांना स्वताकडे ओढून घ्यायचा. मी बर्‍यापैकी आळशी असल्यामुळे स्वता सन्दर्भ शोधायचा कंटाळा करते आहे. आयता सन्दर्भ मिळाला तर पुराव्यासकट दाखवता येईल.

In reply to by सुखीमाणूस

ह्याविषयावर लिहायचं म्हणजे एक मोठा लेख लिहायला लागेल, अर्थात सध्या तितकी सवड नाही आणि बी-ग्रेडी घाणीत उतरायची इच्छा पण नाही.

In reply to by प्रचेतस

लेखक: आनंद मोरे http://www.misalpav.com/node/35013 उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।। म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे. आणि मग महाभारताच्या युगांतकारी युद्धानंतर तर छोटी छोटी राज्ये किंवा गणराज्ये किंवा स्वत:च्या सीमेत तुष्ट रहाणारे नंदांचे मगध साम्राज्य, हाच या भूमीच्या लोकांचा स्थायीभाव झाला होता. या स्थायीभावाला प्रवाही केले ते कुठल्या हिंदूने नव्हे तर एक यवन राजा अलक्स्येन्द्र किंवा अलेक्झांडरने. आणि त्यानंतर मोडक्या राज्य, गणराज्यांतून एकसंध राष्ट्र बनवण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला चंद्रगुप्त - चाणक्य या जोडीने. पण जर अनुक्रमे मौर्य, चेरा - चोला - पंड्या, सातवाहन, शुंग, महामेघवाहन, गुप्त, वाकाटक, कदंब, हूण, चालुक्य, राष्ट्रकूट, पल, चोल, गुर्जर - परिहार, चालुक्य, घोरी, दिल्ली, मुघल, मराठा आणि अगदी शेवटच्या ब्रिटीश साम्राज्यांच्या वेळच्या भारतीय नकाशांवर नजर टाकली तर आपले भारत हे राष्ट्र आसेतुहिमाचल असे कधी नव्हतेच किंबहुना ते तसे होते ही पुराणातली वानगी आहेत हे लगेच लक्षात येऊ शकते. आपण ज्याला भारत देश म्हणतो आणि ज्याच्या राष्ट्रवादाच्या्ा हाका आपल्या कानातून घुमू शकतात किंवा ज्या तश्या घुमताहेत म्हणून काही जणांना त्रास होऊ शकतो त्या भारताचा इतिहास खरा सुरु होतो तो १९४७ पासूनच. त्या आधीचा इतिहास हा "आर्यावर्ते, रेवाखंडे, जम्बुद्वीपेच्या" भूमीचा इतिहास आहे. हिंदुस्थान नामक काल्पनिक राष्ट्राचा नाही. भारत नामक देशाचा तर अजिबातच नाही.

In reply to by पगला गजोधर

पगसाहेब, भारताच्या आताच्या सीमांना वा संकल्पनेला तुम्ही म्हणता तसा ऐतिहासिक अर्थ नाही हे क्षणभर मान्य करू. ========================= जगात कुठे म्हणे "अखंड स्थिर सीमांचे सातत्यशील" राष्ट्र होते जे आताही आहे? म्हणून आताच्या सर्वच राष्ट्रांची कल्पना मूर्खपणाची आहे? मागे चीन कुठे दिसायचा आभिंतहिम? वा ते महान मानवतावाद्यांचे प्रसूतीग्रह युनायटेड किंगडम ? ते तरी असे दिसले आहे का? --------------- अगदी सतत २००० वर्षे एकाच खानदानाची एकाच राजधानीतून सत्ता असलेले मणिपूर, त्रिपूरा यांना पण तुमचा महान क्रायटेरिया बसत नाही. दया करा राव, तुमच्या आजच्या निष्ठा भारताशी आहेत कि नाहीत? जर आहेत तर आज ज्यांच्याकडून भारताने स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा इतका पुळका का? -------------- ब्रिटिश आपले शत्रू होते. आपण त्यांची सत्ता उलथावली. तुम्हाला त्यांचा, त्यांनी आपल्या केलेल्या पराभवाचा आनंद असेल तर तो राष्ट्रद्रोह का मानू नये? आणि राष्ट्रनिष्ठा पातळ असल्या, स्वार्थासाठी मोडित घालायच्या असल्या तरी ते लाजेकाजेनं करावं (किमान संभ्रमानं करावं.), पण थेट देशाच्या शत्रूचं समर्थन करायचं नि वर ते सद्गुण म्हणून मिरवायचं? त्याचं रेटून समर्थन करायचं? --------------- पेशव्यांनी अन्याय केला, जातीयवाद केला (आणि तसेही ब्राह्मण ५००० वर्षे तेच करत आलेत) तर एखाद्या महाराने शनिवाड्यात घूसून स्वतःच्या हिमतीवर पेशव्यांना त्या मुद्द्यावर बडवून काढून यायला पाहिजे होते. ही कृती फार सन्माननीय राहीली असती. याच्या स्मृतीदिनाच्या उत्सवात यायला मलाही आवडलं असतं. पण हे ब्रिटिश कुठून आले मधे? भाऊ आवडत नाही म्हणून घर सावकाराला फुकट देणार? संख्येने इतके जास्त असलेल्या दलितांना ब्राह्मणांनी बलःपूर्वक दाबून ठेवलं नव्हतं. होती सामाजिक मानसिकता. ही पांगळी करणारी सामाजिक मानसिकता गळून पडली नि ब्राह्मणांना धडा शिकवणं गरजेचं वाटलं इतकं कळलं तर ब्रिटिश हे भारताचे शत्रू आहेत हे का नाही कळलं?

In reply to by arunjoshi123

Around 1940, Dr. Ambedkar quotes as
“There are many who look upon this conduct of the Untouchables in joining the British as an act of gross treason. Treason or no treason, this act of the Untouchables was quite natural. History abounds with illustrations showing how one section of people in a Country have shown sympathy with an invader, in the hope that the new comer will release them from the oppressions of their countrymen.”

In reply to by पगला गजोधर

अहो भाऊ, त्यांचं तत्त्व तेव्हा लागू होतं नि म्हणून १९४० ते १९४७ मधे अस्पृश्य लोक ब्रिटिश सेनेत गेले. पण तो हिशेब तिथेच संपला. आज कोण्या अन्यायासाठी कोण्या इन्व्हेडरचं स्वागत करायचं आहे? का ते ब्रितिश होते तेव्हापर्यंत ठिक होते नि आता पुन्हा ब्राह्मणी चालू झालेत आणा त्यांना परत असाच समर्थनाचा अर्थ होत नाही का? ----------------- कि ब्राह्मणांना "नियंत्रित" ठेवणार्‍या ब्रिटिशांचे गेले ते गोड दिवस असं रुदन चालू आहे?

In reply to by पगला गजोधर

इंग्रज यायच्या आगोदर हा भूभाग प्रजासत्ताक लोकशाही देश होता....की जे चुक आहे... इंग्रज यायच्या आगोदर हा भूभाग प्रजासत्ताक लोकशाही देश होता असं कोण म्हणालं? त्या काळात विविध राजे त्यांच्या राज्यात राज्य करत होते. जरी राज्य वेगळी असली तरी धर्म आणि संस्कृती एक होती आणि त्यांनी हा खंड बांधला गेला होता. अगदी एखाद्या सम्राटाचा एकछत्री अंमल जरी असता तरी त्याला प्रजासत्ताक लोकशाही देश म्हणता येत नाही. पण भरतखंड हा मुख्यतः हिंदू राजांच्या अमलाखाली होता त्यामुळे एकत्र मानला जायचा.

लेखाचं मूळ गृहितक असं आहे कि कोरेगाव भीमाला जे लोक उत्सव साजरा करतात त्यांचे विरोधक हे दलितविरोधी आहेत. उत्सवविरोधकांना सर्व प्रकारचा दलितद्वेष आहे. त्या उत्सवाचा विरोध हा वैचारिक नि तात्विक असू शकत नाही का? विरोधकांचा विरोध हा वैचारिक नि तात्विक पण असू शकतो नि त्याच्या विरोधाचं निरसन प्रेमानं करू इच्छिणार्‍या उत्सव समर्थकाचा आवाज ऐकू यावा इतकं तांडवाचं डेसिबल खाली ठेवावं हे लेखिकेला कळलेलं नाही. ================== १८१८ ला पेशवाई संपली. १८५७ ला पहिले बंड झाले. त्यात शिख आणि गोरखा पलटणी ब्रिटीशांच्या बाजूने लढले नि देशाचे स्वातंत्र्याचे स्वप्न भंगले. "तेव्हाच्या" शीख आणि गोरखा पलटणी "आता" जर १८५७ च्या भारताच्या (पहिले "भारतीय" स्वातंत्र्ययुद्ध असे आम्हाला शिकवले आहे.) पराजयाचे गुणगान गाऊ लागले तर अवघड आहे. आम्हाला शाळेत १८५७ च्या "बाजूने" शिकवले गेले. गांधी, नेहरू, पटेल, बोस, भगत सिंग, इ लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढले. त्यांना त्यांच्या या लढ्यासाठी पूज्य मानायला आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे. आम्हाला कोणत्याही शिक्षकाने असं शिकवलं नाही ब्रिटिशांच्या सत्तेअगोदरचे, ब्रिटिशांची सता आणणारे सगळे लढे हे एत्तदेशीय सामाजिक अन्याय मिटवायला कारणीभूत झाले, म्हणून आम्ही ते ब्रिटिशांच्या "बाजूने" बघावेत. आम्हाला सारी कुशाण, इस्लामी नि विदेशी आक्रमणं ही आमच्या बाजूनं बघायचं शिकवलं आहे. पोरसच्या दरबारातले ब्राह्मण देखील जातीयवादी असतीलच. आणि अलेक्झांडरच्या राज्यात जन्माधारित जात नव्हती. पण तरीही अंभीने जातीयवादी राज्य संपवण्यासाठी त्याची मदत केली अशी मांडणी केली जात नाही. सर्व विद्यार्थ्यांची सहानुभूती पोरसलाच असे. ===================== काही लोकांना ब्रिटिश बाहेरचे कि आतले याने फरक पडत नसेल. ते चांगले का वाईट असा प्रश्न पडत असेल. पण ब्रिटिशांचे जागतिक पातळीवरील वर्तन पाहिले तर त्यांचा नि मानवतेचा काही संबंध नव्हता असे सिद्ध होते. म्हणून १८१८ च्या लढाईचा आणि मानवतेच्या विजयाचा काही संबंध नाही. उलट तो पाशवी लोकांचा विजय होता. यासाठी लोकांनी ब्रिटिशांनी जगभर केलेल्या अनेक वंशांच्या कत्तली नि गुलामगीर्‍या अभ्यासल्या पाहिजेत. ================== भारतीय सेनांना हरवून ब्रिटिश विजयी झाले. नंतर हीच ब्रिटिश सेना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे भारतीय सेना झाली. मग स्वतंत्र भारताच्या सेनेच्या निष्ठा भारताशीच असायला हव्यात ना? समजा स्वातंत्र्यापूर्वी या रेजिमेंट्सच्या काही प्रथा असतील तर स्वातंत्र्यानंतर (जे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढून मिळाले) त्या ब्रिटिशांशी निष्ठा दाखवणार्‍या नि एत्तद्देशीयांशी वैर दाखवणार्‍या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. आताही राणीला सलाम कसा करता येईल? आणि समजा रेजिमेंटची प्रथा विशुद्ध शौर्याच्या कौतुकासाठी असेल तर ती सैनिकांपर्यंत, अधिकार्‍यांपर्यंत सिमित असायला पाहिजे. तो सामाजिक उत्सव कसा काय असू शकतो? ============== डॉ. आंबेडकरांना दलितांना हवं तितकं सबल करायचं होतं. त्यांनी महार रेजिमेंटसाठी प्रयत्न केले नि ती स्वातंत्र्यपूर्व काळात अस्तित्वात आली. त्या राज्यात तो उत्सव होणं, आणि स्वराज्य हे प्राधान्य नसलेल्या आबेंडकरांनी तो चालू करणं समजलं जाऊ शकतं. कदाचित त्या उत्सवामुळं तेव्हा त्या रेजिमेंटचा गौरव वाढत असेल नि त्याचा दलित समाजाला फायदा होत असेल. पण स्वातंत्र्यानंतर आंबेडकरांनी ही प्रथा बंद का केली नाही? ती त्यांनी बंद करायला पाहिजे होती नि स्थानिकांच्या विजयाची दुसरी लढाई निवडायला पाहिजे होती. ====================== थोडक्यात, स्वतंत्र भारतात, जिथे पावलापावलाला आम्हाला ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारांचे कौतुक करत मोठे केलेले आहे तिथे अचानक एके दिवशी एका ब्रिटिशांच्या विजयाचे समर्थन उचित आहे असे शिकवले जात आहे. एक समूह याला शुद्ध शौर्याच्या कौतुकाची प्रथा म्हणत आहे. दुसरा याला सामाजिक अन्यायाचा बदला घ्यायच्या भावनेचा स्फोट म्हणत आहे. या लॉजिकने भारताचा इतिहासला प्रत्येक पराभव हा एक उत्सवाचा दिन होइल. कारण आपण इतिहासात जितके मागे जाऊ, तितके पराजय जास्त साजरा करायच्या पात्रतेचे असतील. ================== हेच लॉजिक मुस्लिम देखील लावतील. हल्दी घाटीचा राणा प्रतापाचा पराजय भारतातील सामाजिक अन्याय कमी होण्यास कारणीभूत ठरला म्हणून तो एक उत्सवदिन होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. ========================== अशा अनेक कारणांनी हे उत्सव प्रकरण मला सत्कृतदर्शनी आवडलेलं नाही. ====================== मला तरी व्यक्तिशः यात भयंकर संभ्रम झाला आहे. राजकीय स्वार्थ वा जातीय द्वेष नसलेले पण उत्सवाला हो आणि नाही म्हणणारे लोक नक्की कसा संवाद करत असतील? यात आपण, परके, तेव्हाचे, आताचे, देश, निष्ठा, लष्कराची प्रथा, लष्कराचे निष्ठांतर, इ इ संकल्पनांची चर्चा कशी होईल? इथे कोणी या उत्सवाचं समर्थन सयंतपणे मांडेल काय?

In reply to by arunjoshi123

धन्यवाद ! लेख सुरुवातीला जिव्हारी लागला म्हणून प्रतिक्रीया देण्याचे टाळले. थोड्या काळाने प्रतिसाद लिहू म्हणून बाजूला ठेवले, तुमचा प्रतिसाद पाहून त्यात मला अभिप्रेत असलेल्या बर्‍याच गोष्टी आल्याने इथेच +१ देतो. बाकी अ‍ॅमी किंवा प.ग यांच्या इतस्ततः पसरलेल्या विचार मौक्तिकांवर काहीच प्रतिसाद देववत नाही. नुस्तेच भोंगळ शब्दचळ.

In reply to by arunjoshi123

पानीपतच्या मराठा राजवटीच्या पराभवाचे समर्थन असे कोणी केले तर त्या धारातिर्थि पडलेल्या सैनिकाच्या आत्माला फार क्लेश होतील, पेशवा नाही मराठा हरले होते त्या लढाईत!

In reply to by प्रचेतस

आताचे निकष २०० वर्षापूर्वीच्या इतिहासाला लावून अनेक चुकीचे निष्कर्ष काढले गेले आहेत. इतिहासाची मोडतोड याबद्दल बोलून तर काही उपयोग नाहीच. फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, २०० वर्षापूर्वी महार काय कोणतीच जात एकजीव संघटित समूह म्हणून वावरत नव्हती त्यामुळे "अन्यायाचा बदला घेण्यासाठी महार इंग्रजांबरोबर गेले" हे गृहीतकच साफ चुकीचे आहे. पगार देईल त्याची चाकरी हे तेव्हाचे तत्त्व होते. अगदी राजालोकांचे जवळचे नातेवाईक सुद्धा त्यांच्या शत्रुकडे चाकरीत असत. त्यात काही वावगे नाही. आताही दलित पेटून उठले वगैरे असे सहज होत नसते. आपण किंवा आपल्या ओळखीतले लोक असे अचानक कोणाच्या गाड्या-दुकाने यांची मोडतोड करत सुटत नाहीत. ते काम भाडोत्री गुंडांचे असते. डोके ठिकाणावर असलेला कोणीही माणूस या प्रकाराचा निषेधच करील. एकूणच सगळेच कै च्या कै चालू आहे. असो.

पगला गजोधर, ब्रिटिश "बाहेरचे" असं होण्यासाठी, "भारत देश" ही संकल्पना होती का ? मी तर म्हणतो, बरें झालें, ब्रिटिशांनी ह्या भूभागावर राज्य केलें, निदान 'माणूस' म्हणून जगण्याचा चान्स बहुजनांना मिळाला, नाहीतर 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' काही सुटलं नसतं... बापरे, काय भयंकर लिहिलंय हो तुम्ही. दलितांची स्थिती वाईट होती यावर दुमत नाही. पण 'गळ्यात मडकं पाठीला झाडू' ही सरळ थापेबाजी आहे. बाकी, इंग्रजी राज्यात महारांची काय थोर प्रगती झाली? भारत एक राष्ट्र होता का यावर पूर्वी मायबोलीवर उत्तर दिलं होतं. तेच परत देतो. अगदी इजिप्तपासून थेट दक्षिण अफ्रिकेपर्यंत सलग पट्टा ब्रिटीश साम्राज्याचा भाग होता. मग त्यातून का एक राष्ट्र उभं राहिलं नाही? इजिप्त ते कुवेत हाही पट्टा ब्रिटीश साम्र्याज्यात मोडत असे. त्याचं का झालं नाही एकराष्ट्र? अगदी भारतीय उपखंडाचं उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलंका का वेगळी आहे? सांगण्याचा मुद्दा काये की भारत हे ब्रिटीश येण्याच्या आगोदरपासून एक राष्ट्र होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

झोपेत असता तुम्ही. अहो, ते येमेन, ओमान, यु ए ई, म्यानमार हे सगळे ब्रिटिश इंडीयात होते नि ते आजही सार्वभौम भारताचा भाग आहेत. पाकिस्तान देखील फक्त २० वर्षे वेगळं असणार आहे असं जस्टिस कटजू म्हणालेत. ------------------- आता बघा ना, डॉ. आंबेडकरांना जिथे जिथे ब्रिटिशांचे राज्य होते तिथे तिथे सर्वत्र पददलितांचे नेते मानतातच ना. दॅट इज कॉल्ड द युनायटिंग इफेक्ट ऑफ द ब्रिटीश! त्यांचं जगभर राज्य होण्यापूर्वी उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या भ्रमणकक्षा वेगवेगळ्या होत्या!!!

In reply to by गामा पैलवान

>>>अगदी भारतीय उपखंडाचं उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलंका का वेगळी आहे? ब्रिटीश साम्राज्य असले तरी वसाहती वेगवेगळ्या होत्या आणि त्या वसाहतींना स्वातंत्र्य दिले गेले. ब्रिटीशांनी भारतीय वसाहतीला स्वातंत्र्य दिले तेव्हा श्रीलंका किंवा बर्मा इत्यादी भाग या ब्रिटीश इंडीया वसाहतीच्या भाग नव्हत्या, वेगळ्या क्राऊन्ड कॉलनीज होत्या. त्यामुळे भारतीय वसाहत स्वतंत्र करताना इथल्या नेत्यांना फक्त ब्रिटीश इंडीयामधील भूभागावर हक्क सांगण्याची आणि इथल्या प्रिंस्ली स्टेटस ना सामावून घेण्याची परवानगी मिळाली. धाग्याच्या विषयाशी या प्रतिसादाचा देखील संबंध नाही त्याबद्दल क्षमस्व.

ब्रिटिश राज्य चांगले होते असे ज्यांना वाटते त्यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केलेले भाषण पाहावे. https://www.youtube.com/watch?v=hwhtDXSN0XM एक उदाहरण - दुसऱ्या महायुद्धात बंगालमध्ये पडलेला दुष्काळ. ४० लाख लोक या एका दुष्काळात मरण पावले. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी धान्य बंगाल ऐवजी ग्रीसमध्ये 'राखीव' साठ्यात पाठवले. अर्धपोटी भुकेल्या बंगाली जनतेपेक्षा धडधाकट ग्रीक लोकांची भूक ब्रिटिश सरकारसाठी महत्वाची आहे असा खुद्द चर्चिल यांचा शेरा आहे. जेंव्हा भारतातल्या अधिकाऱ्यांनी चर्चिल याना या निर्णयामुळे अनेक लोक मरण पावले आहेत, पुनर्विचार व्हावा अशी विनंती केली तेंव्हा चर्चिल यांनी स्वतः मारलेला शेरा - 'मग अजून गांधी जिवंत कसे आहेत?'

In reply to by मनो

''ब्रिटिश आले ती इष्टापत्ती ठरली'', अश्या अर्थाच्या वाक्याचा विपर्यास, ''ब्रिटिशांचेचं राज्य हवं होतं कॅन्टीन्यू'' असा होत नाही, असो. परंतु ब्रिटिश विरोध दाखवायला भक्तांना काँग्रेसच्या व्यक्तीच्या भाषणाचा रेफ द्यावा लागला, अरेरे.... जाता जाता भारतीयत्वांचा तिरस्कार करणाऱ्या चर्चिलच्या डोळ्यातही जिवंत महात्मा गांधीच खुपावे, आणि हेगडेवार सावरकर वैगरे नाही, यांतच काय ते आलं.....

In reply to by पगला गजोधर

काँग्रेसच्या भक्तांना काँग्रेसच्याच माणसाचा रेफरन्स द्यावा लागतो

In reply to by पगला गजोधर

मार्शल रेसेस चा शोध/वापर करणारे तत्कालीन ब्रिटिश जातीसंस्थेच्या निर्मूलनासाठी इष्टापत्ती ठरले - वाहवा महापुरुष व नेते वाटून घेतले पाहिजेत हा आग्रह लक्षात येतोय. थोडक्यात तुमच्या "वाट्यातल्या" महापुरुष/नेत्यांनी काही बरी गोष्ट केली तरी काही तुम्ही ती अपरिशिएट / मान्य करणार नाही तर - आनंद आहे (जाता जाता : ब्रिटीश आले असते वा नसते - आंबेडकर, फुले आणि बाकी सुधारक जन्मणार होतेच)

In reply to by sagarpdy

ब्रिटिश नसते व हे सुधारक जन्मले असते तर पेशवाईत कदाचित त्यांना हत्तीच्या पायी देऊन मारून टाकलं असतं... एके ठिकाणी डॉ आंबेडकर लिहितात (महाड येथे सार्वजनिक रित्या मनुस्मृतीचे दहन कार्यक्रमा दरम्यान हल्ला झाला होता) (जसं वर्तमानात कोरेगावभीमा च्या कार्यक्रमा दरम्यान हल्ला झाला आहे, on same lines....) " In June 1927, after five orthodox Hindus, who were part of a mob that attacked the dalits at Mahad, were sentenced by the (colonial) district magistrate to four months’ rigorous imprisonment, he(Dr. Ambedkar) said: “Had the chief officers in the district been Hindus, justice would have been denied. Under Brahmin Peshwa rule I would have been trampled to death by an elephant.” " तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीतील दलित चळवळीचे उर्ध्वयु, थास (१८४५-१९१४) , जेव्हा ब्रिटिश नेटिव्ह लोकांना डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पद द्यावे का ? याबाबतीत जनमत चाचपून पाहत होते तेव्हा थास लिहितात.. "“The self-styled Brahmins migrated to this country from alien lands… If we give the power of District Magistrate to these people, they will employ the people of their caste and cheat common Hindus. There will be endless troubles if high positions are given to those who call themselves ‘higher caste’ .… They regard even the British as inferior to them. They don’t have intellectual, physical, economic or even numerical strength. They have only the strength that comes from calling themselves people of high caste.”

In reply to by पगला गजोधर

तुमचा ब्राह्मणांवर खूपच विखारी द्वेष दिसतोय. त्यांनी नक्कीच तुमचे काहीतरी बिघडवलेले असावे :)

In reply to by प्रचेतस

:) प्रचेतस सर स्मायली टाकली म्हणून प्रत्युत्तर देतोय... माझा कोणावरही द्वेष नाही. व्हर्चुअल पर्सोना व रिअल, यांत फरक असतो. माझे वैयक्तीक निरीक्षणाप्रमाणे मिपावर एकांगी मते खुप आहेत, नेहमी तेच झुंडीने येऊन डोमीनेट/बुलीयिंग करतात(तुमची आयडी तशी नाहीये) , व मला तर नेहमी विक टीमकडुन खेळायला आवडते. . असो, सर अवांतर करतोय क्षमस्व.. कधी भेटू एक कप चहा वन बाय टू करून पियुया...

In reply to by पगला गजोधर

तुमच्या अलीकडच्या बऱ्याच प्रतिसादामधून ब्राह्मणविद्वेषी सुर सतत जाणवतोय म्हणून प्रतिसादप्रपंच. बाकी १ बाय २ चहाच कशाला, जेवायलाच भेटूयात की :)

In reply to by प्रचेतस

काय सर ! तुम्ही पण नं, निरागस व भोळ्याभाबड्या आयडीच्या मागे लागता.... बाकी जेवणाच्या प्रस्तावास अनुमोदन...