नमस्कार मंडळी,
आताच लोकसत्तामध्ये किशोरी आमोणकर यांनी लिहिलेल्या 'स्वरार्थरमणी' ग्रंथाबद्दल वाचले. किशोरीताईंनी त्या ग्रंथात रागसंगीताबद्दलचे त्यांचे विचार आणि संगीताच्या रसग्रहण प्रक्रियेबद्दल विचार मांडले आहेत असे समजले.
लोकसत्तातील बातमीमधून .......
रागसंगीतात रसनिर्मिती होते म्हणजे नेमके काय होते, त्यामागे कोणती मानसिक आणि बौद्धिक प्रक्रिया घडते, याचा अभ्यास गेली पन्नास वर्षे किशोरीताई करीत आहेत. संगीतावरील अनेक ग्रंथांचे वाचन आणि अभ्यास करत असताना साहित्यातील रससिद्धांताकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्यातून हा नवा विचार जन्माला आला. हे लेखन करताना मी स्वत:ला त्यातून पूर्ण बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. राग संगीतातील अनेक अवघड प्रश्न मला गेली अनेक वर्षे सतावत होते. मी स्वत: संगीत निर्माण करत असताना त्या मागील प्रक्रियेचा सातत्याने मागोवा घेत होते. संगीतातील राग सादर करत असताना कलावंताने रागमय होणे मला अधिक महत्त्वाचे वाटते. सैद्धान्तिक विवेचन करताना त्यातील प्रत्येक बारकाव्यांचा मला माझ्या संगीतात कुठे कुठे पुरावा मिळतो आहे, याची तपासणी मी नेहमी करत आले आहे. त्यामुळेच या प्रश्नांचा मागोवा घेताना मिळालेल्या ज्ञानाची मांडणी या ग्रंथात करण्याचा मी प्रत्यत्न केला आहे. असे किशोरीताई या वेळी म्हणाल्या.
या ग्रंथाचे प्रकाशन पुण्या-मुंबईत कधी आहे ते बातमीत दिले आहेच. आपल्या पैकी कुणी त्या सोहळ्यास गेल्यास कृपया इथे लिहावे. तसेच तो ग्रंथ कुणी वाचला तर त्याबद्दलसुद्धा काही लिहावे ही विनंती. ग्रंथाबद्दल उत्सुकता आहे.
--लिखाळ.
वाचने
2864
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
असेच म्हणतो...
मलाही माहिती हवी
Exactly मुद्दा
पुस्तकाची वाट पाहत आहे!
साहित्यातील रससिद्धांत
लेखन
In reply to साहित्यातील रससिद्धांत by भडकमकर मास्तर
वा वा वा!
In reply to लेखन by लिखाळ
मलाही ह्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल.
मलाही
कोणी हे
महतभाग्य!
वा वा .. फार
In reply to महतभाग्य! by नंदा
शब्दान्च्या पलिकडले