Skip to main content

(रांधण्याची शिकवणी)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/03/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा मागल्यासारखंच! हे रामदास काही उ(हु)च्च लिहून जातात आणि आमचा धर्म आम्हाला सोडवत नाही हो! त्यांची 'गाण्याची शिकवणी' वाचली आणी आमच्या वेगळ्याच शिकवणीचे तास डोळ्यांसमोर येऊन गेले! ;) मी म्हटलं चुकून, मलाही शिकव ग रांधायला. तर म्हणते कशी माझ्या मनातलं बोललात. कितीतरी दिवसात बघा गवार निवडली नाहीत रसाच्या भाजीसाठी! * * * * म्हणे, आधी थोडंच तेल जेमतेम मग हिंग हळद मिरची. जिरं टाकून ठेवा आचेवर नंतर ठेवणीतला अनवट गरम मसाला. म्हटलं राग राग करुन स्वयंपाक शिकवतात का ? म्हणे, तुम्हाला म्हणजे उरक कसा बिलकूल नाही गडे. जिथेतिथे बघावं तर तेल अन हळदीचे सडे! चतुरंग

वाचने 4361
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

मस्त लिहिलेत रंगराव! रंगदादा से बातां: तुमच्याकडे विडंबन करणे शिकायला यावे म्हणतो .. कसे? :? (विद्यार्थी)मुमुक्षु

तुम्हाला म्हणजे उरक कसा बिलकूल नाही गडे. जिथेतिथे बघावं तर तेल अन हळदीचे सडे!
कमाल आहे. मिसळणाचा डबा हळूच उघडला पाहिजे.. नाहितर मोहरी-हळद-तिखट एकत्र होतं :) -- लिखाळ.

च्यायला हे एक गृहस्थ आहे भो मिपावर...आली कविता की कर दळण. यांच्याच धाकाने माझ्यातला कवी मेला...:) तुम्हाला म्हणजे उरक कसा बिलकूल नाही गडे. जिथेतिथे बघावं तर तेल अन हळदीचे सडे! च्यामारी...हहपुवा झाली ! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा धाक नसून प्रेरणा समजावी! म्हणजे वडिलधार्‍याचा प्रेमळ धाक असतोना तसे! ;) तुमच्या कविता येऊद्यात हो प्राडॉ. चतुरंग

In reply to by चतुरंग

चारोळी,आरोळी, मुक्तछंद...काही तरी टाकतोच. फक्त तुम्हाला कामामुळे मिपावर कधी यायला जमणार नाही तेवढे कळवा...:) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेसरांची प्रतिक्रिया म्हणजे कवीचे प्रामाणीक प्रतिपादन वाटले. चालु द्यात, मज्जा येते आहे ... बाकी रंगाशेठ, समजा बिरुटेस्रांनी कविता टाकली आणि दैवयोगाने तुम्ही इथे नसाल तर "विडंबन खतरे मे है " म्हणुन आम्ही स्वतःच ह्यात उतरु व एक विडंबन लिहुन टाकु. आणि हो, विडंबन मस्त ह्यात वादच नाही. शॉल्लेट मज्जा आली, चालु द्यात ... ------ ( हंगामी विडंबक + स्वयंपाकी ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by शितल

ह्येच मन्तो... ... ब्येष्ट कविता आहे... फक्त मूळ कवितेतलं श्रुंगाराचं ( किंवा इथे अजून कसलं) सेकंड डायमेन्शन कुठे सापडतंय का पाहत होतो... :) तसं काही झालं असतं तर अजूनच मजा आली असती... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बहुतेक रोज होत असेल रांधण्याची अशी शिकवणी! मस्तच केलय विडंबन. नंतर तेल हळदीचे सडे पण स्वच्छ करावे लागत असतील ना? क्रान्ति

बिये किंवा एमेच्या अभ्यासक्रमात येणार तुमची विडंबनं. चला या निमीत्तानी लोकं वाचतील अडगळीतल्या कविता

अरे भौ रंगा कीती करतोस रे दंगा विडंबन करुन रामदासांना दाखवला ठेंगा

तुम्हाला म्हणजे उरक कसा बिलकूल नाही गडे. जिथेतिथे बघावं तर तेल अन हळदीचे सडे! डोळ्यासमोर चित्र उभे राहिले :) काय खरं नाही!

In reply to by चित्रा

डोळ्यासमोर चित्र उभे राहिले काय खरं नाही! खरंच डोळ्यासमोर चित्रं आलं, पण कोणाचं खरं नाही? ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असे नक्की कोणाचे खरे नाही, ते खरे खरे सांगून का बरे पुढच्या वेळी चांगलेचुंगले (आयते) खाण्याचे आमंत्रण चुकवू? ;)

आवडलं रे.. >> माझ्या मनातलं बोललात. कितीतरी दिवसात बघा गवार निवडली नाहीत >> तुम्हाला म्हणजे उरक कसा बिलकूल नाही गडे. जिथेतिथे बघावं तर तेल अन हळदीचे सडे! हे तर विशेष आवडलं :)

खरं आहे.... आली कविता की कर विडंबन... आणि ती पण एकदम कडक.... कौनसी चक्की का आटा खाते हो, ठाकूर? बिपिन कार्यकर्ते

रंगाशेठ, जोरात चालू आहे..चालू दे.. (अंमळ उशिरा प्रतिसाद देणारा) केशवसुमार