आज श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जयंती आहे. त्यानिनित्ताने मी आरती लिहिली आहे.
आरती श्री अवधूताची | माझ्या दत्तात्रेयाची ||धृ.||
कलियुगी दाखविण्या चमत्कार
नृसिंह सरस्वती अवतार |
घेऊया आले पृथ्वीवर
उद्धरिले जनांसी अपार || १ ||
श्री पाद वल्लभ गाणगापूरी
मध्यान्हकाळी मागती माधुकरी |
अन्नछत्र अन्नदान भक्त करी
दर्शन देती ज्याच्या मनी इच्छा खरी ||२ ||
तीर्थक्षेत्र पीठापूर कुरवपूर
औदुंबर पर्वत गिरनार |
दत्त स्थानी वास निरंतर
गुरूंचा मुक्त संचार ||३ ||
पांघरी अंगी भगवे वस्त्र
हाती धरी चक्र त्रिशूल अस्त्र |
धरुनिया आम्हावरी कृपाछत्र
तारिले बहुत सत्पात्र ||४ ||
तरण्यास्तव भवसागराला
नाव माझी न्यावी पैलतीराला
ऐशा श्री गुरू दत्ताला
जोडोनी कर नमितो वैभव पदाला ||५ ||
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3390
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम लिहीलय
कॅलेंडर गुंडाळून ठेवतो.
In reply to उत्तम लिहीलय by दुर्गविहारी
स्वामी स्वामी
पैजारबुवा, अशी कशी
In reply to स्वामी स्वामी by ज्ञानोबाचे पैजार
ळॉळ
In reply to स्वामी स्वामी by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद
वैभवजी छान आरती.
In reply to धन्यवाद by वैभवदातार
आरती आवडली.
आरती आवडली. आरती टिकेकर ?
In reply to आरती आवडली. by एस
आरतीची रचना सुंदर आहे. आवडली.
आरती आवडली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]हे काय काल नाताळानिमित्त