मार्केट मुळे मी बरबाद झालो... काहींचे काम गेले तर काहीचे ते काम गेले, काहीचीं नोकरी गेली काहींची लंगोटी पण गेली.. मिपावर वेळोवेळी होणा-या अर्थ चर्चे मध्ये हे झालं की हिमालयात जाउ ते झालं की जाऊ चा जो गजर होतं असे ते सर्व झाले, सगळ्यांनी मला बकरा केला व म्हणाले तु दिल्लीचा तुला हिमालय जवळच तुच बघ जमीन आश्रमासाठि.. मी त्यांना हिमालयातील एका अनोळखी जागी आश्रम बांधणे व राहणे ह्यासाठी घेऊ गेलो... त्यानंतर काय घडलं त्याचा हा वृंतांत.
***
च्यामायला ह्या जैनाच्या कार्ट्याला हीच जागा मिळाली होती आश्रमासाठी - पिडा आजोबा एका दगडाला लात मारत म्हणाले.
पिडाआ, असे काय करताय राव, लै भारी जागा हाय ही आश्रमसाठी - मी साळसुद पणे म्हणालो.
हट तुझ्या, ह्या डोंगर कपारीच्या हिमालयावर गावठी पण नाही मिळणार - पिडाआ रागाने माझ्या कडे बघत म्हणाले.
तुम्ही सन्यांसी होण्यासाठी आला आहात ना हिमालयात, सर्व भैतिक सुखांचा त्याग करुन. - सहज आपले *भोगा कडून समाधीकडे वाचत म्हणाले.
राजे खुप छान आहे जागा आवडली, ती नदिच्या बाजुला दगडाची जागा माझी पक्की - प्रभुका आपला चष्मा संभाळत म्हणाले.
बरोबर, तुम्हाला पाणी व बसण्याची सोय दोन्ही झाली - नाना नसलेली दाढी कुरवाळत म्हणाला.
काय म्हणायचं आहे ह्यांना कळाले नाही मला - परा गुडग्याला खाजवत म्हणाला.
प-या लेका ह्याला क्रिप्टिक म्हणतात तुला नाय समजणार - मी हसत म्हणालो.
कळाले हो राजे मी उगाच विचारले हो - परा खजिल होतं म्हणाला .
चला काय प्लान आहे पुढे - शेखर दात कोरत म्हणाला.
तु काय खल्ले बे ? - मी म्हणालो
अरे कोंब... गवताचा कोंब खल्ला.. आता आपण सन्यांसी आहोत ना - शेखर जिभ चावत म्हणाला.
सगळ्यांच्याच माना शेखर कडे वळल्या. कुणालाच पटले नाही पण उगाच पहिल्या दिवशी लोकसभा का करा ह्यासाठि गप्प बसले.
ए, जा जरा बघा झोपडी बांधायला काय लाकुडफाटा मिळतो का ते , फोकलीचे गप्पा मारत उभे आहेत. - आद्यपुरुष डोळे वटारुन म्हणाले.
ए राजा चल निघ, वर जाऊ लाखड घेऊन येऊ - नाना मला म्हणाला.
**
आम्ही चालत चालत नदि काठच्या जंगलात आलो.
राजा, लेका आलो खरं करणार काय बे आपण येथे ? - नाना वैतागून म्हणाला
अरे नाना, निसर्गाचा आस्वाद घे, ही खळखळ वाहत असलेल्या नदीचा नाद बघ.. हिरवळ बघ - मी म्हणालो
कुठ आहे पोरगी - नाना एकदम उत्साहाने म्हणाला.
ये.. ती कॉलेज वाली हिरवळ नव्हे, जंगलातली बघ. बघल तेव्हा पोरीचा इशय - मी वैतागून म्हणालो.
ह्म्म. ठिक. चल लाकडं गोळा कर - तो मला म्हणाला.
**
आम्ही लाकडं गोळा करुन आलो खाली सगळ्यांच्या जवळ. कोणि मासे मारत होता तर कोणी माश्या. कोणी जवळ असलेली ती पुस्तके वाचत होता कोणी दगडावर समाधी लावून बसलेला, कोणी बिडि कुठं मिळते का ते शोधत होतं तर कुणाचा घसा कोरडा पडला हुता त्यामुळे संत्री / देशी काही दिसतं का शोधत होता.
अरे हो, आपण हिमालयात आहोत, जंगलामध्ये तुम्हाला काय इथे संत्रा व देशी नाय मिळणार - मी वराडलो.
ज्यांच्या मनात दारुचे इचार होते त्यांचे चेहरे पडले.. बरोबर माझा पण पडला ही गोष्ट वेगळी.
अरे भुका लागल्या आहेत - एक कोणतरी चिरक्या आवाजात बोलला.
अरे जा रे कोणी तरी जंगलातून शोधा खाण्यासारखं काही तरी - समाधिस्थ विप्र आपला एक डोळा उघडून म्हणाले.
जी प्रभु, ए परा चल रे.. त्या डॉन्याला पण घे.. व टार्याला पण - मी म्हणालो
अबे, आमच्या कडे अस्तीदंताचा विमा करुन मिळतो ही माझी सही विसरलास काय बे जैना - टा-या दात ओठ घाऊन म्हणाला व आपले बलदंड वेडेवाकडे करुन दाखवू लागला.
नको रे भावा आम्ही आणतो की तुझ्यासाठी पण - मला ढकलत परा म्हणाला.
तो तुला चिपाड करुन टाकेल राजे, व्यक्ती बघून पंगा घेत जा राव हॅ हॅ हॅ - मागून धम्या म्हणाला.
**
आम्ही जंगलात आलो, फिरत फिरत व फळे शोधू लागलो.
अबे, हे बघ लै भारी वाटतय राव फळ, तोडू का ? - डॉन्या आनंदाने एका लालसर फळा कडे पाहत म्हणाला.
ए डॉन भाऊ, जे तोडायचं आहे ते तोड ना आपलंच आहे सगळं - परा हसत म्हणाला.
अरे जरा मदत करा रे हे कंदमुळ काढायला - मी जरा जोर लावत म्हणालो.
त्या टार्याचा इथं उपयोग झाला असता राव - जोर लावत डॉन्या म्हणाला.
मी मदत करु का पाटिल - धम्या परत मागून म्हणाला.
तुम्ही निवांत रहा सरकार आम्ही काढतो बाहेर - डॉन्या धम्याला वर पासून खाली पर्यंत पाहत म्हणाला.
**
चांगली टोपली भर फळं व कंदमुळं घेऊन आम्ही परत आमच्या जागी आलो.
सगळेच आनंदले व टोपली भोवती गोळा झाले.
माझ्या कडे येथे किचन चे सामान असतं ना सर्व तर मी, मस्त डिश तयार केली असती - फळाचा अस्वाद घेत पांतस्थ म्हणाले
जळवा, लावा आमची वाट , वाटी भर लाळ गळाली बघा - टार्या अजून महाजालावर प्रतिसाद देत आहोत असे वाटून उदगारला.
ये फोकलीच्या कार्टा.. मला मारायचा प्लान केला हायस काय रे - पिडाआ रागाने माझ्या कडे धावून येत म्हणाले.
क्रमश : - लै दिवसाने क्रमशः हा शब्द लिवला लै भारी वाटलं बघा... :D
**
टिप : हे सर्व फक्त विनोदी अंगाने आहे, वर उल्लेख केलेली नावं फक्त नावं आहेत त्या व्यक्ती नाहीत, महाजालावरील त्यांचे लेखन व प्रतिसाद ह्यातील भाषा बघून मी अंदाज केला आहे, काही मला आदरणिय आहेत, काही माझ्या पेक्षा मोठे आहेत त्यांचा अनादर करण्याची माझी काहीही मनिषा नाही आहे, जे लहान आहेत माझ्या पेक्षा त्यांनी उंकाचू केले तर बघा... आवाज नाय पाहीजे.. काय ;) , हा फक्त व फक्त विनोद आहे कुणाची भावना दुखवण्याचा ह्यात काही ही उद्देश नाही आहे, ज्यांना असं वाटतं की ह्यात माझं नाव नसावे त्यांनी मला खरडावे अथवा व्यनी करावे, मिपा प्रशासनाला ह्यात काही वागवे वाटले तर कृपया योग्य ति सुचना द्यावी. अजून काही आपेक्ष असेल तर व्यनी अथवा खरडा मला. कुणाला काहीच अडचण नसेल तर मग पुढील भाग पटापटा टाकेन व सलग टाकेन ही मी माझ्या विझत असलेल्या शिगरेटाची शपथ घेऊन सांगतो. =))
वाचने
11588
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
सॉल्लिड
हा हा हा
स्वर्गात?
In reply to हा हा हा by झेल्या
कल्पनाविश
In reply to स्वर्गात? by ब्रिटिश टिंग्या
एक बरे आहे
In reply to स्वर्गात? by ब्रिटिश टिंग्या
राजे लै
झकास ...
In reply to राजे लै by निखिल देशपांडे
ज्याला
In reply to झकास ... by टारझन
फुटले
असेच म्हणतो!
In reply to फुटले by ३_१४ विक्षिप्त अदिती
राजे
चांगले
सहमत. अजून
In reply to चांगले by लिखाळ
आरं
काका
In reply to आरं by प्रकाश घाटपांडे
तुम्ही
In reply to काका by दशानन
तु बि हायस
In reply to तुम्ही by मिंटी
हिमालयात आश्रम?
चांगली
आमी बी
अरे भावा,
In reply to आमी बी by खालिद
राजे!!
In reply to अरे भावा, by दशानन
>>>मस्त आहे
In reply to राजे!! by मृगनयनी
आमीबी
In reply to >>>मस्त आहे by दशानन
आणि हो
In reply to आमीबी by विनायक पाचलग
आमी बी येणार पण कोण कशी घेणार ?
In reply to आमीबी by विनायक पाचलग
हम्म... लेका
मागच्या बसनी
In reply to हम्म... लेका by अवलिया
बाटली साठी
In reply to मागच्या बसनी by प्रकाश घाटपांडे
लगे रहो !!
सही
थांब
नशिब
ये लै गडबड
In reply to नशिब by परिकथेतील राजकुमार
चांगल
राजे
अहो नाना,
In reply to राजे by अवलिया
ओ बाई...
In reply to अहो नाना, by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त
भले!!!!
करतो करतो
In reply to भले!!!! by पिवळा डांबिस
वा...राजे...
आर तूमच्या
प्रतिसाद
एक णंबर! -