लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
देव आणि धर्म नावाची संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे.यावर बर्याच थेअरीज आहेत.पैकी उत्क्रांतीवादानुसार देव आणि धर्म यावर बर्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत होत असताना त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार.आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक,बौद्धिक दरिद्री कल्पना विकसित केल्या त्यात देव आणि धर्म याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.पण ही पण एक थेअरी आहे,याला सर्वानुमते आधार नाही.
मग मनुष्याने मानसिक स्वास्थ देऊ शकणार्या पण बौद्धिक दिवाळखोरीकडे नेणार्या देवधर्मादी संकल्पना का विकसित केल्या असाव्यात?.एका क्षमतेच्या बदल्यात दुसरी क्षमता सोडून देणे हे होतच असते (trade off).पण देवधर्मादी गोष्टींनी असे काय दिले असावे जे फार गरजेचे होते?मला असे वाटते की देवधर्मादी संकल्पनांनी मनुष्याला भरपुर मनोरंजन दिले असावे.मी या निष्कर्षावर बर्याच वर्षांपुर्वी आलो होतो.२००२ साली स्पायडरमॅन हा सुपरहीरोपट बघायला गेलो असताना माझ्या मनात या देवधर्मादी गोष्टींच्या मनोरंजन मुल्याचा विषय आला.म्हणजे बघा,सुपरहीरो किंवा फिक्शन वर आधारीत नॉवेल वाचताना किंवा चित्रपट बघताना आपण लॉजिक रिजनिंग वगैरे सगळ्याचीच बोळवण करुन ते एंजॉय करतो.याचे कारण यागोष्टींना असलेले मनोरंजन मुल्य! देवधर्मादी गोष्टींचा विचार केल्यास आपल्याला चक्क त्यात सुपरहीरोज सापडतात आणि फिक्शन तर या गोष्टींचा बेसच आहे.आजपर्यंत लिहलेल्या कोणत्याही व्यावसायिक फिक्शनपेक्षा कैकपट अधिक मनोरंजन मुल्य या देवधर्मादी संकल्पनांचं आहे.आणि या संकल्पना लहानपणी मेंदूत पद्धतशीरपणे सोडल्या जातात ,मग सुरु होतो स्वमनोरंजनाचा लाईफटाईम गेम.यातून सुटका नसते.
काही दिवसांपुर्वी मदरश्यांवर एक डॉक्युमेंट्री बघत असताना या स्वमनोरंजनाचा चमत्कार पहायला मिळाला.कुराणातले आयते का काय ते म्हणत असताना त्या लहानग्या मुस्लिम मुलांना प्रचंड उन्माद चढलेला दिसत होता.आवाज टिपेला पोचुन जो तो त्या स्वमनोरंजनाचा आनंद घेत होता.नंतर मदरश्यातला शिक्षक काही धार्मिक गोष्टी सांगत असताना मुलांचे उन्मादी चित्कार मला सुपरहीरो मुव्ही बघताना थिएटरात होणार्या चित्कारापेक्षा फार वेगळे वाटले नाहीत.असाच अनुभव लहानपणी गणेशोत्सवात बर्याचदा घेतला आहे.गणपतीसमोर वेगवेगळ्या आरत्या म्हणताना अगदी डॉक्टर इंजिनिअर प्राध्यापक यांना आलेला युफोरीया बघितला आहे.गौरी गणपती,मंगळागौर अथर्वशिर्षपठण ,धर्मग्रंथपठण काय अन काय करताना स्त्री पुरुषादिंना होत असलेला आनंद,उन्माद युफोरीया हे अभ्यासाचेच विषय आहेत. धार्मिक ग्रंथ वाचताना काहिंना ऑर्गॅझमही येत असल्याचे काही ठिकाणी वाचले होते.कुठेतरी जामोप्यांनी युफोरीया इंडेक्स विषयी लिहले आहे तसा युफोरीया इंडेक्स या देवधर्मादी संकल्पनांच्या बाबतीत नक्कीच काढला पाहीजे.
तर जगातला सगळ्यात मोठा फिक्शनल सुपरहीरो म्हणजे देव ,मग तो अल्लाह असो वा ब्रह्मा विष्णु महेश.यांच्या एकसे एक स्टोर्या ऐकत आयुष्यभराचे मनोरंजन करुन घेणे म्हणजे धर्म पाळणे ही व्याख्या माझ्या पुरती मला मान्य झाली आहे.आपले काय मत आहे या लाइफटाइम एंटरटेनमेंट विथ लाइफटाईम व्हॅलीडीटी विषयी.
प्रतिक्रिया
"तूच" आहेस, "तुझ्या" जीवनाचा
K
OMG मधला संवाद आठवला.. धर्म
जगातला सगळ्यात मोठा फिक्शनल
ह्या ह्या ह्या ,डॉक्टर
तो "एस एस आर आय" चा इफेक्ट
एस एस आर आय चे आम्ही बघून घेऊ
..
तुम्ही कुठल्या पंथाचे?१सुन्नी
ते स्वघोषीत मुअझ्झीन आहेत.
अरेरे,डॉक्टर खालच्या पातळीवर
मला कधीचा
चुकीच्या व्याख्या आणि चुकिचे अनुमान
बाकी देवाचे म्हणाल तर आपल्या
फिक्शनल सुपरहीरो
बाकी देवाचे म्हणाल तर आपल्या
..
देव आहे की नाही या वादाला अंत
निशा ताई
खी खी खी
आमचे मत
व्यक्तिसापेक्षता
आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला
पैकी उत्क्रांतीवादानुसार देव
सतत असणार्या अनिश्चिततेवर
...
नोरअॅडरिल्यानिन ???
आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला
देव आणि धर्म यावर बर्याच
आजही माणसाचं उत्क्रांत होणं
याबद्दल अधिक माहिती द्याल का प्लीज
बॅक्टेरियांचा.
आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला
लेखक ,तुमचा देवा धर्माचा
गणपती अथर्वशीर्ष पठनाणे काय
एकप्रकारचा अलर्टनेस येतो बुद्धीला
काहि दिवस तसं प्रॅक्टीस करुन
मी सायकॉलॉजी दृष्टीकोनातुन सांगत नाहिए
तुमचा रोख अध्यात्मिक
अध्यात्म म्हणजे काय मला माहिती नाहि
>> त्याचे परिणाम तुम्हाला
माणूस उत्क्रांत झाला आहे हे
समजा उत्क्रांतीवाद वास्तव
सायंटिफिक अंधश्रद्धाच आहे कि
आणि तुम्ही अबायोजेनेसिस
सर्वानी स्वतः ला एकच प्रश्न विचारावा ..
मोठा इरेला पेटून देव आहे की
मिपाकरांची लाईफटाईम