Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १८

लेखक गॅरी ट्रुमन यांनी सोमवार, 11/12/2017 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडून आल्याचे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे. Rahul ते १६ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. राहुल गांधी गुजरातमधील मतदान पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष बनणार नाहीत असे वाटतच होते. तसेच होणार असे दिसते. अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणे गुजरात मधील मतदानापर्यंत लांबविण्यासाठी कोणी डमी उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभा केला जाईल असे वाटले होते तसे मात्र झालेले दिसत नाही. डमी उमेदवार उभा न करताही राहुल गांधी अध्यक्षपदाची सुत्रे गुजरातमधील मतदान होईपर्यंत लांबविणार आहेत. असो. राहुल गांधींचे अभिनंदन. त्यांची अध्यक्ष म्हणून पुढील वाटचाल बरीच खडतर असणार आहे हे नक्कीच. काँग्रेस पक्ष अभूतपूर्व संकटात सापडला आहे त्याला नवी संजीवनी द्यायचे आव्हान राहुल गांधींपुढे असेल.

वाचने 44895
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

आज न्यूयॉर्क मध्ये पाईप बॉम्ब स्फोट पोर्ट ऑथॉरिटी बस टर्मिनल मधील सबवे स्टेशन मध्ये झाला. त्यामुळे न्यूयॉर्क मध्ये जाणारे सर्वे रस्ते बंद केले आहेत. पण कोणीही दुर्घटना गस्त झाले नाही.

आज राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडून आल्याचे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे.
रागां यांचे अभिनंदन . काँग्रेस मध्ये उपाध्यक्ष जो बनेल तोच दिशा ठरवेल असे वाटते. बघू कोण होते ते.

In reply to by राघवेंद्र

काँग्रेसमधले उपाध्यक्ष पद बहुतेक राहुल गांधींसाठी खास तयार केलेले होते. त्यामुळे आता ते पद काढून टाकण्यात येईल असं वाटतंय. गांधी घराण्यातील व्यक्तीशिवाय कोणीही अध्यक्ष/ उपाध्यक्ष होऊ शकत नाही. फार फार तर प्रियंका तयार झाली तर तिला देतील.

मध्य-पूर्वेकडील देशान्मधे (विषेशतः सौदी अरेबियाला) धार्मिक कट्टरवादापासून दूर जावासा वाटतय ही चान्गली सुरूवात आहे. https://economictimes.indiatimes.com/news/international/world-news/saud…

ज्यांनी हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे आपल्याकडे आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी डल्ला मारलेले पुरावे गृहमंत्री या नात्याने ताबडतोब पोलिस किंवा न्यायालयाकडे दिले पाहिजेत आणि डल्ला मारलेल्यांना अटक केली पाहिजे. असे पुरावे संबंधित यंत्रणांकडे ना देता स्वःतकडे ठेवणे चुकीचे आणि पदाशी , जनतेशी द्रोह केल्यासारखे आहे.

In reply to by कपिलमुनी

सहमत आहे. फडणवीसांकडेही पुराव्यांनी भरलेले ३७० पानी आरोपपत्र तयार दिसत आहे. आता यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा असेल तर मग इतरांनी पुरावे आणून द्यावेत हे म्हटले की ते पक्के राजकारणी शोभतील.

In reply to by कपिलमुनी

आंदोलकांवर सारवासारव करुन भाजपात समावून घ्यायचे असेल. जाता जाता -सारवासारव याची व्युत्पत्ती-- घाण नजरेस पडू नये म्हणून शेणाबरोबर जमिनीत सारवून टाकणे .

In reply to by babu b

तुमचं मूलभूत (original) येउ द्या कि. उगाच आमचं कशाला वापरताय? बाकी व्हिसाचा फुलफॉर्म आणि पासपोर्टची व्युत्पत्ती सापडली कि पुढे चर्चा करू.

In reply to by कपिलमुनी

पुरावे असताना आणि पूर्ण अ‍ॅथोरिटी असताना अजुन पर्यंत फसणवीस पुरावे पोलिसां ना देत नसतील किंवा खटला दाखल करत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि न्यायालय ह्यात पुढाकार घेउ शकते. पेपर मधल्या बातमी चा दाखला देत न्यायालयानी फसवणीसांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे.

In reply to by गंम्बा

पुरावे असताना आणि पूर्ण अ‍ॅथोरिटी असताना अजुन पर्यंत फसणवीस पुरावे पोलिसां ना देत नसतील किंवा खटला दाखल करत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि न्यायालय ह्यात पुढाकार घेउ शकते. पेपर मधल्या बातमी चा दाखला देत न्यायालयानी फसवणीसांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे.
मा. चिदंबरम, मा. शिंदे. सेक्यूलर पुरोगाम्यांच्या गळ्यातले लाडके ताईत मा. राहुलजी, मा. भाषणवाचक सिंग इत्यादिंकडे भाजप आणि संघ हे अतिरेकी कारवाया करत असल्याचे पुरावे आहेत. आपण समजलं की असीमानंद, प्रज्ञा, पुरोहीत हे अतिरेकी आहेत ( हे ना संघाचे आहेत ना भाजपचे) तरी आज मिपावरच्या पुरोगाम्यांनी म्हटल्याप्रमाणे संघाचे सुनिल जोशी यांनी कट उघड करायची धमकी दिली होती. म्हणजे देशप्रेमी कामच केलं आहे. ================ तर काँग्रेसच्या या नेत्यांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित पुरावे समोर आणावेत. हे लोक पुरावे पोलिसां ना देत नसतील किंवा खटला दाखल करत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि न्यायालय ह्यात पुढाकार घेउ शकते. पेपर मधल्या बातमी चा दाखला देत न्यायालयानी फसवणीसांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. ======================= मार्मिक गोडसे त्यांच्या सुप्रसिद्ध फोकाने चौकात मारहाणविधी करू शकतात.

२००० पर्यंतच्या झोपडीधारकांना पक्की घरं देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता २००० ते २०११ या काळातील बेकायदा झोपडीधारकांनाही पक्की घरं देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. बांधकाम आणि तत्सम खर्च वसूल करून या झोपडीधारकांना पक्की घरं देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर आज हिवाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब करण्यात आलं. सरकारच्या या निर्णयाचा १८ लाख मुंबईकरांच्या साडे तीन लाख झोपड्यांना लाभ मिळणार आहे. ......... https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/… ...... हेच काँग्रेसच्या काळात घडले असते , तर इथले विचारवंत तुटून पडले असते ... करदात्यांच्या पैशाचा अपव्यय म्हणून ... आता हेच काम पवित्र झाले असेल

In reply to by babu b

राज्य सरकारचा निषेध. अत्यंत चुकीचा पायंडा पडतो अश्या गोष्टींमुळे. काँ-रा. काँ. पेक्षा नक्की काय वेगळे भव्य दिव्य काम भाजप सरकार करते आहे काही अंदाज लागत नाही. मुंडे- तावडे- गिरिश महाजन हे असले मंत्री!

कोळसा घोटाळ्याचा निकाल लागला. मधु कोडा , माजी मुख्यमंत्री दोषी आढळले म्हणे. कधी ते भाजपाचे समर्थक होते, कधी काँग्र्सचे ! ह्याना आता कोणच्या पक्षात धरायचे ?

In reply to by babu b

बाबुराव, कोळशाचे आवंटन कोर्टाने पिछवाड्यावर लाथ घालून कँसल केले. अगदी करारावर सह्या झालेल्या. कुठे कुठे काम चालू झाले होते. =================== हा टोटल घोटाळा आहे असे कोर्ट म्हणाले. त्यावेळचा कोळसा मंत्री सोनियागुलाम मनमोहन होता. आणि हां, तो १००% पुरोगामी सेक्यूलर काँग्रेसचा १००% आजीवन पाईक होता.

In reply to by श्रीगुरुजी

सारखा मन्दिरात जाण्याचा ढोन्ग करणारया कोन्ग्रेस च्या, डी.एम.के च्या नेत्यान्ना विचारावा कि ह्यावर त्यान्ना काय वाटत आहे. रामाने कोणत्या अभियान्त्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली होती अस विचारणार्या करूणानिधी आणि तो सेतू तोडण्यासाठी आतूर झालेल्या बालू च्या थोबाडात बसली बरा झाला.. लाज त्यान्ना अस बोलताना वाटायला पाहिजे होती..

In reply to by रामदास२९

ते मुरलेले पुरोगामी निधर्मांध राजकारणी आहेत. लाज हा शब्द अशा लोकांच्या शब्दकोशात नसतोच.

In reply to by रामदास२९

त्या सेतूसमुद्र प्रोजेक्टचीही गंमतच आहे. त्याचा मूळ प्लॅन शिजला बाजपेयींच्या काळात , तेंव्हा रामभक्त कुंभकर्णावस्थेत होते. ... http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/bjp-stalling-sethu-pro… ..... पुढे भाजप सरकार गेले. नवीन सरकार आले आणि मग हे भक्त लोक सेतू बचाव करत नाचू लागले.

In reply to by babu b

द हिंदू मध्ये आलेली करुणानिधीच्या तोंडची गोष्ट देता स्रोत म्हणून? काय राव...

In reply to by रामदास२९

श्रीराम ही काल्पनिक व्यक्ती आहे अशा अर्थाचे प्रतिद्न्यापत्र २००७ मध्ये तत्कालीन देशद्रोही सरकारने न्यायालयात दिले होते.

In reply to by प्रचेतस

आज ज्याला आपण इतिहास म्हणतो त्या शास्त्राच्या जन्मापूर्वीच्या घटनांना काल्पनीक ठरवणं हि त्या शास्त्राची आणि त्या घटनांची पायमल्ली नाहि काय ? सरकारचं नेमकं प्रतिज्ञापत्र काय आहे ठाऊक नाहि, पण "उपलब्ध साधनं आणि प्रचलीत शास्त्रकसोट्यांनुसार सिद्ध होत नाहि" असं काहि स्टेटमेण्ट देता आलं असतं.

In reply to by अर्धवटराव

नेमके स्टेटमेंट काय आहे , माहीत नाही. पण बाजपेयीच्या काळात जे काम बिनबोभाट होणार होते , त्याच कामाला काँग्रेसच्या काळात मात्र भक्तांचा विरोध अन मग राम असल्या / नसल्याचे पुरावे सरकारनेच शोधून द्यायचे , हे सगळे कसे घडले ?

In reply to by babu b

कोर्टाने सरकारकडे पुरावे मागितले (किंवा त्याबद्दल मत प्रदर्शन करायला सांगितलं असेल.. ठाऊक नाहि). त्यामुळे इच्छा असो/नसो, सरकारला स्टेटमेण्ट द्यावच लागलं. राहिला मुद्दा बिनबोभाटिचा... तर त्या तालाची सुरुवात काँग्रेसनेच केली, तो इश्यु सेटल करण्याऐवजी त्यावर राजकीय पोळी भाजण्याची अवदसा काँग्रेसलाच सुरुवातीला आठवली. आता त्यावर नाचण्यापलिकडे दुसरं ऑप्शन नाहि, शिवाय त्यात मजा देखील आहे काँग्रेसपार्टीसाठी. सो एन्जॉय द सीन.

In reply to by श्रीगुरुजी

याचाच अर्थ असा होतो की, ट्रम्पची गळाभेट घेवुन मोदींनी नासाला फितवले हे पक्के. नासा, ट्रम्प, अमेरिका, मोदी आणी श्रीगुरुजींचा कडकडीत निषेध. (आमी नाय ज्जा !!!!!).....अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र भाजपाचा निषेध राहिला होता.

अण्णा हजारे मार्च २०१८ पासून परत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनापासून राजकारणी दूर असावेत अशी अण्णांची इच्छा आहे. तसेच आंदोलनात सामील होणार्‍यांकडून कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेणार नाही आणि कोणत्याही पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणुक लढवणार नाही असे स्टॅम्प पेपरवर लिहून घेणार आहोत असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/no-any-kejriwal-will… सर्वात महत्वाचे म्हणजे या आंदोलनातून आणखी एखादा अरविंद केजरीवाल जन्माला येऊ नये असेही अण्णा म्हणाले आहेत. अण्णांच्या त्या अराजकतेने भरलेल्या आंदोलनाला माझा अगदी पहिल्यापासूनच विरोध होता आणि अजूनही आहे. अण्णांविषयी मत चांगले नव्हतेच पण तरीही अरविंद केजरीवाल या माणसाला पुढे यायला व्यासपीठ अण्णांनी दिले हा प्रकार तर अगदीच अक्षम्य होता असे मला वाटते. आता अण्णा केजरीवालांना कितीही विरोध करत असले तरी उपयोग नाही. शेवटी पश्चात्तापास काहीही अर्थ नसतो कारण घटना आधीच घडून गेलेली असते.

In reply to by गॅरी ट्रुमन

असे लिहून घ्यायचा अण्णाना कायदेशीर अधिकार आहे का ? समजा दिले लिहून आणि नंतर एखादा उभा राहिला निवडणुकीला , तर आण्णा काय करणार ? सगळी कामे सोडून त्याचे कोर्टकज्जे लढत बसणार ?

In reply to by babu b

असे लिहून घ्यायचा अण्णाना कायदेशीर अधिकार आहे का ?
लेकरांची शपथ खायचा केजरीवालला कायदेशीरा अधिकार होताच ना?

In reply to by arunjoshi123

रड्या आहे रे हा ! जे सध्याचा मंत्री पुड्या सोडतोय त्यावर बोला , कोणी अक्षता घेऊन आले नव्हते आश्वासन द्या म्हणून ! आता फेकताय तर लगेच 70 वर्षे आठवतात . मी काय 70 वर्षांचा नाही , त्यामुळे आधी काय झालं त्याचा देणंघेणं नाही. सध्याचा बोला

In reply to by कपिलमुनी

तुम्हाला बातमी क्वोट करून हसायला एक महिना लागतो हे तुमचं टाईमस्टँडर्ड. ====================== दीड महिन्यात राज्यातले सगळे खड्डे बुजवणं आरामात शक्य आहे. जगात हे सर्वत्र होतं.

In reply to by arunjoshi123

पार लॉजिक गंडला गड्या तुमचा ! बातमी जुनीच आहे पण 1-2 दिवसात 15 डिसेंबर येणार होती जी आज आहे, पण खड्डे तसेच आहेत. बोलाची कढी आणि बोलाचा भात हे सांगायचं होता . आता एकही खड्डा नाही असा सांगू नका ;)

In reply to by कपिलमुनी

लॉजिक कसा काय गंडला? मंत्री काय चंद्रावरचे खड्डे महिन्यात बूजवू म्हणले होते की काय? ============================== http://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtras-new-rs-1300… हा पुरोगामी पेपर. त्यातली बातमी. सरकारनं आपला रोड रिपेअरचा अप्रोच बदलला आहे. =============================== बाय द वे, तुम्हाला रस्त्यारस्त्यातला फरक कळतो का? कोणते खड्डे पाहून अजून खड्डे तसेच आहेत असं म्हणत आहात?

In reply to by arunjoshi123

खड्डेमुक्त रस्त्याच्या डेडलाईनचा आज शेवटचा दिवस बाकी PWD च्या अखत्यारीतील रस्त्यावर खड्डे आहेत की नाहीत हे मिपाकर पण सांगतील आणि मी इथे फोटो पण टाकतो. असे खोट बोलणे नेत्याचा काम आहे , पण लोकांनी त्याच्या मागे किती फरफटत जायचा हे समजलं पाहिजे. आता तुमचा प्रतिसाद वाचायला मज्जा येईल, वाट बघतोय

In reply to by कपिलमुनी

असे खोट बोलणे नेत्याचा काम आहे
नेता काँग्रेसचा असेल तर, होय. ==========================
मी इथे फोटो पण टाकतो.
टाका ना. =======================
PWD च्या अखत्यारीतील रस्त्यावर खड्डे आहेत की नाहीत
बघा हं, राष्ट्रीय महामार्ग, म्यूनिसिपल रोड्स, रुरल रोड्स आणि बॉर्डर रोड इ इ चे फोटो नका टाकू.

In reply to by कपिलमुनी

आता तुमचा प्रतिसाद वाचायला मज्जा येईल, वाट बघतोय
तुम्हाला वाचायला मज्जा देण्यातच आमच्या जीवनाची सार्थकता सामावली आहे हो साहेब.

In reply to by arunjoshi123

सरकारनं आपला रोड रिपेअरचा अप्रोच बदलला आहे.>> ==>> कसला अप्रोच बदलला?? मी ज्या राज्य महामार्गावरून रोज ये जा करतो तेथील खड्डे दगड मातीने बुजवले आहेत. चंद्रकांत पाटीलांनी एका चॅनेल वरील चर्चे मध्ये सांगितले होते कि कमीत कमी ८० कमी च काम टेंडर काढून फक्त एकाच कॉन्ट्रॅक्टर ला दिले जाईल ज्याच्या कडे खड्डे बुजवायचे अद्यावत यंत्रणा आहे. पण प्रत्येक्षात ह्या काँट्रॅक्टरानी लोकल ठेकेदारांना सब-काँट्रॅक्टस देऊन कामचलाऊ कामे केली आहेत. हे उदाहरण पालखी महामार्गावरील जेजुरी वाल्हे या गावातून जाणाऱ्या रस्त्यांबाबत अखोदेखी सांगतोय.

In reply to by विशुमित

मी ज्या राज्य महामार्गावरून रोज ये जा करतो तेथील खड्डे दगड मातीने बुजवले आहेत.
खड्डे बुजवलेत ना? ते महत्त्वाचं आहे. सरकारनं आता २ वर्षाचं कंत्राट (मॅनेजमेंट काँट्रक्ट) दिलं आहे नि अप्रोच बदलला आहे. तेव्हा माती हा टेंपररी उपाय असेल वा ती जितक्यांदा हटेल तितक्यांदा पुन्हा स्वतःच्या पैशाने कंत्राटदाराला भरून द्यावी लागेल. =========================
पण प्रत्येक्षात ह्या काँट्रॅक्टरानी लोकल ठेकेदारांना सब-काँट्रॅक्टस देऊन कामचलाऊ कामे केली आहेत.
कामाचा दर्जा हा आपला विषय नाही. ही ऐतिहासिक काँग्रेसी कीड आहे. ती अशी २-३ वर्षात जाणार नाही. बाकी सब-काँट्रक्ट देणे ही सिविल इंडस्ट्रीतली सामान्य गोष्ट आहे, लिगल आहे.

In reply to by arunjoshi123

मॅनॅजमेन्ट कॉन्ट्रॅक्ट असेल तर ओके...!! फक्त खड्डा दाखवा आणि हजार (?) मिळवा ही स्कीम चालूच ठेवावी लागेल. २ वर्षांनी जर Escalation Cost वाढली तर तेव्हा पुन्हा बोलू.

In reply to by arunjoshi123

तेव्हा माती हा टेंपररी उपाय असेल वा ती जितक्यांदा हटेल तितक्यांदा पुन्हा स्वतःच्या पैशाने कंत्राटदाराला भरून द्यावी लागेल. तरीच मातीने खड्डे बुजवलेल्या रस्त्याच्या कडेला जागोजागी मातीने भरलेली घमेली घेवून काही माणसं हल्ली दिसू लागलीयेत. अच्छा! म्हणजे ती कंत्राटदारांची माणसं असतात तर.

https://www.thequint.com/news/india/pm-modi-seaplane-flew-from-karachi सीप्लेन आले कराचीतून प्रॉडक्शन जपानचे रजिस्ट्र्व्शन अमेरिकेत ! त्यात बसून बोलायचे - फेक इन इंडिया ! http://www.business-standard.com/article/elections/modi-s-seaplane-flew… ४५ लाखाची उधळपट्टी. सिक्युरिटीचे नियम धाब्यावर !

In reply to by babu b

बब्बु राव, भारत आणि पाकिस्तान यांच्या मधे विमान सेवा बंद आहे का?

In reply to by babu b

आजच्या टाइम्सलाही बातमी आहे. अमेरिकन क्राफ्ट आणि अमेरिकन पायलट याना घेउन प्रवास करणारे मोदीजी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. मोदी , भाजपा , भक्तांचे अभिनंदन. ( इतक्या मोठ्या विक्रमाचा ४५ लाख इतका क्षुल्लक खर्च कोण करणार , हा क्षूद्र प्रश्न मला पडला होता . )

In reply to by babu b

वरचे १४.३२ लाख मी दिलेत काय प्रॉब्लेम आहे ????????

In reply to by babu b

क्विंट वाचणारांच्या अकलेचे दिवाळे वाजलेले असते, इथे तर पुरोगामीपणाच्या जोशात साला बिझनेस स्टँडर्ड ने देखिल क्विंटचाच हवाला देऊन बातमी पुढे रेटली आहे.
However, an aviation source said that these circulars are in nature of advisories though in 2014 DGCA said it will take action against pilots, engineers and operators for non-compliance.
=========================== सरकारमधे कोणी नसताना सोनियाबाई किती हजार कोटी खर्च व्हायचे?

चंपाबाईचा नारा मोदी हटवा देश वाचवा ओवैसी आणा देशाचा दार अल सलाम करा

महाराष्ट्रातील सत्तेतून शिवसेना याचवर्षी बाहेर पडेल असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. सत्तेतून बाहेर पडायचा २०१४ पासून शिवसेनेने हा दिलेला ६८ वा इशारा आहे असे म्हणतात.

In reply to by गॅरी ट्रुमन

ह्या बातमीत खालील वाक्य आहे
त्यामुळे यावर्षी ​ कदाचित सत्तेला लाथ मारू, असे सूतोवाच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अहमदनगरमध्ये केले.
कदाचित ? नक्की कधी ठरणार आहे ? ज्याप्रमाणे कृष्णाने शिशुपालाचे १०० अपराध होईपर्यंत वाट पहिली आणि मगच त्याला देहदंड केला त्याप्रमाणे हे बहुतेक १०० इशारे दिल्यानंतर ह्या सरकारमधून बाहेर पडून त्यांचा कोथळा बाहेर काढतील,कदाचित .

In reply to by तेजस आठवले

म्हणजे कदाचित आणखी ३२ इशारे द्यायला वाव आहे :) आणि तोपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ संपून निवडणुकांची वेळही आली असेल. म्हणजे प्रत्यक्ष सत्तेतून बाहेर पडावेही लागणार नाही :)

गुजरात आणि हिमाचल बीजेपी च्या विरोधात गेले तर हे बदलापूर प्रमाणे सेना राष्ट्रवादी समीकरण मांडू असा इशारा देत आहेत. साहेब ही तसेच काहीतरी बोलले...

पाक रुपया अनेक दिवस कॄत्रिमरित्या डॉलरला १०५ वर ठेवला होता, काल अचानक ११० रुपये झालाय. येत्या तीन महिन्यांत त्यांची अवस्था कठीण होणार आहे. पुढच्या कर्जासाठी नाणेनिधीची भेट आहे पुढच्या महिन्यात, त्याची तयारी चाललेली दिसते.

पुरोगाम्यांसाठी वाईट दिवस ______________________ तोंडी घटस्फोट दखलपात्र फौजदारी गुन्हा ठरविणारे विधेयक मंत्रीमंडळाने मंजूर केले आहे. https://news.rediff.com/commentary/2017/dec/15/cabinet-clears-triple-ta…

In reply to by श्रीगुरुजी

भाजप सरकारनं ट्रीपल तलाकची केस पुरोगामी बाजूनं इतकी नेटानं लढवली आणि जिंकली. मराठी संकेतस्थळावरच्या एकाही पुरोगामी सदस्यानं त्यांचं तोंडभर कौतुक केलं नाही. हे काय याच्या १/१०० पुरोगामी काम काँग्रेसने कधी केलं नाही. यांच्या बुद्धीला काय कीड लागली असावी? कोणता न्यूनगंड असावा?

In reply to by babu b

कोण कुराणाप्रमाणे वागले म्हणता? सुप्रिम कोर्ट? काय संबंध? अहो, तलाक देणारे कुराणाप्रमाणे नै वागले असे कोर्ट म्हणते. कोर्टाचा कुराणाप्रमाणे वागण्याचा काय संबंध येतो? उगाच काहिही.

तात्काळ तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारं विधेयक कॅबिनेटकडून मंजूर ! सरकारचे अभिनंदन !!

In reply to by कपिलमुनी

नक्कीच सरकारच अभिनंदन. सामाजिक समतेच्या आणि मुस्लिम महिलांच्या हक्काच्या दृष्टीने उपयुक्त असे पाऊल.

In reply to by अमितदादा

मुनी, अमितदादा असं नाही करायचा, चांगल्या कामाची प्रशंसा करण्याचा वाईट विचारकरू नका जळी स्थळी मोदी फडणवीस वाईट आहेत हे पहायला शिका, मिपा पुरोगामी सुधारक विचारवंत होऊन जाल. इतरांच्या मताला किंमत देण्याची श्रद्धा असलेला अंधश्रध्दाळू नाखु

In reply to by नाखु

त्याच्या मताला किंमत द्या

In reply to by babu b

तुम्ही नका विचार मौक्तिक टाकु, दरेकर अवतारात झालेली मूळव्याध बरी झाली की कळवा तर्रीबाज मिसळ खायला बोलावतो

In reply to by अमितदादा

डिसायसिव्ह अ‍ॅक्शन घेतल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन. निश्चितपणे तिहेरी तलाक(सर्व प्रकारचे. केवळ तलाक-ए-बिदतच नव्हे), निकाह हलाला, बहुपत्नीत्व हे प्रकार कायदेशीररित्या बंद व्हायला हवेत. घटस्फोट, मुलाची कस्टडी, पोटगी(माझा व्यक्तिशः पोटगी या संकल्पनेला विरोध आहे मात्र महिलांची सध्याची आर्थिक परिस्थिती पहाता पोटगी अत्यावश्यक वाटते), पैतृक संपतीवर हक्क या सर्व मुद्द्यांवर कुठल्याही धर्मातील स्त्रियांवर अन्याय होता कामा नये. तशा प्रकारे जेंडर न्युट्रल कायदे करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत.
मात्र, जर सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार तलाक ए बिदत यापुढे बेकायदेशिर ठरला आहे आणि तश्या पद्धतीने झालेल्या घ्टस्फोटाला कायदेशिर मान्यता नाही याचा अर्थ गुन्हा घडलाच नाही. तर मग या गुन्ह्याला शिक्षा कशी काय करता येईल?

गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये व्ही.व्ही.पी.ए.टी मधून मिळालेल्या किमान २५% पावत्यांची मतदानयंत्रांबरोबर पडताळणी करून बघावी ही काँग्रेस पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. एक गोष्ट कळत नाही. व्ही.व्ही.पी.ए.टी मधून मिळालेल्या पावत्यांमध्ये दुसर्‍या पक्षाला मत दिल्याचे नमूद झाले तर मतदार तिथल्यातिथे तक्रार करू शकतात. तसे काही झाल्याची एकही बातमी वाचनात आली नाही. काही ठिकाणी मतदानयंत्रेच चालत नव्हती म्हणून काही काळ मतदान थांबले होते पण निवडणुक आयोगाच्या प्रतिनिधींनी यंत्रे बदलली अशा बातम्या आल्या होत्या पण कोणी अशा पावत्यांची तक्रार केल्याचे वाचनात आले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे समजा पूर्ण गुजरातमध्ये २ कोटी मतदारांनी मतदान केले असेल तर त्याच्या २५% म्हणजे ५० लाख लोकांकडून पावत्या गोळा करणे आणि त्यांची मतदानयंत्रांबरोबर पडताळणी करणे म्हणजे मोठेच अपसव्य होईल. अशा मिळालेल्या पावत्या किती जण जपून ठेवतात ही शंकाच आहे. आणि या सगळ्या प्रकारात मतदान गुप्त ठेवायच्या प्रकारचे काय होणार? आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर अख्खे मतदानयंत्र हॅक करता येऊ शकत असेल तर त्याच मतदानयंत्रातून आलेल्या पावत्याही कशा विश्वासार्ह असतील? त्यामुळे या पावत्यांची पडताळणी मतदानयंत्राबरोबर झाली तर मग पावत्याही चुकीच्या होत्या अशी नवीच टूम निघणार नाही याची काय खात्री आहे?