Skip to main content

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शुक्रवार, 01/12/2017 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे. खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत. Gujarat (संदर्भः http://www.gujaratindia.com/images/guj-map-divied.jpg) खालील तक्त्यात या विभागांमध्ये येणारे जिल्हे आणि एकूण विधानसभा मतदारसंघ दाखविले आहेतः Regions खालील तक्त्यात या विभागांमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल कसे लागले हे बघता येईल. 1 २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामुळे २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील विभागांमधील मतदारसंघांच्या संख्येत फरक होता हे या तक्त्याच्या शेवटच्या दोन कॉलमवरून कळेलच. या तक्त्यावरून आपल्याला पुढील निष्कर्ष काढता येतातः १. राज्यात भाजप सर्व विभागांमध्ये बर्‍यापैकी शक्तीशाली आहे. अनेकदा राज्यात सत्तेत असले तरी राज्याच्या सर्व विभागांमध्ये एखाद्या पक्षाची ताकद असतेच असे नाही. गुजरातमध्ये भाजपची अशी स्थिती नाही. २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्येच भाजपने काँग्रेसपेक्षा दोन जागा कमी जिंकल्या होत्या. इतर सर्व विभागांमध्ये भाजपने काँग्रेसपेक्षा बर्‍याच जागा जास्त जिंकल्या होत्या. २. एकेकाळी दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष बर्‍यापैकी ताकद राखून होता. पण हळूहळू भाजपने काँग्रेसला तिथूनही हुसकावून लावले असे दिसते. ३. तक्त्यावरून कळेलच की मध्य गुजरातमध्ये २०१२ मध्ये २००७ च्या तुलनेत ४ विधानसभा जागा जास्त होत्या तर दक्षिण गुजरातमध्ये ३. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील जागांची संख्या अनुक्रमे ४ आणि ३ ने कमी झाली. यातही अजून महत्वाचे म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागातील विधानसभा जागांची संख्या वाढली आहे तर ग्रामीण भागातील जागांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील तीन सर्वात मोठी शहरे आहेत अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा. त्यापैकी दोन, अहमदाबाद आणि वडोदरा मध्य गुजरातमध्ये आहेत तर सुरत दक्षिण गुजरातमध्ये आहे. २००७ मध्ये अहमदाबाद शहरामध्ये १२, सुरत शहरामध्ये ७ तर वडोदरा शहरामध्ये ३ जागा होत्या. त्या २०१२ मध्ये वाढल्या आणि अहमदाबादमध्ये आता १७, सुरतमध्ये ९ आणि वडोदरामध्ये ५ जागा झाल्या आहेत. गुजरात हे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे त्या राज्यात शहरी भागातील विधानसभेच्या जागांची संख्या वाढणे क्रमप्राप्त होते. भाजप शहरी भागांमध्ये बर्‍यापैकी बलिष्ठ आहे. त्यामुळे शहरी भागामधील विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याचा फायदा २०१२ मध्ये भाजपलाच झाला होता. मी म्हणत आहे की भाजप शहरी भागांमध्ये बलिष्ठ आहे. वर दिलेल्या तक्त्यावरून ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यातील शहरांमध्ये २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे बघायला लागेल. ते खालील तक्त्यात दिले आहे. 1 यावरून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. २०१२ मध्ये भाजपने या शहरांमधील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या म्हणजे या शहरांमध्ये भाजपचा 'स्ट्राईक रेट' जवळपास ९०% होता. २०१२ मध्ये भाजपने पूर्ण गुजरातमध्ये १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ ही शहरे सोडून राज्याच्या इतर भागांमधून भाजपने १४१ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या म्हणजेच ही शहरे वगळता भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५५% म्हणजे त्या मानाने बराच कमी होता. उरलेल्या १४१ जागांपैकी अनेक जागा निमशहरी भागातील आहेत. या जागांवर भाजपचा स्ट्राईक रेट ९०% नसला तरी ५०% पेक्षा नक्कीच बराच जास्त होता. म्हणजेच ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५०% पेक्षा थोडा कमीच होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागांमधील जागा वाढल्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यातून समजू शकेल. गुजरात निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता लिहितो. २०१७ च्या परिस्थितीविषयीचे माझे मत राज्यात भाजप मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीतला खंड वगळता) सतत सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणे अपेक्षित आहे. त्यातच हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले होते. २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपने आपला बालेकिल्ला राखला पण ग्रामीण भागात मात्र बर्‍यापैकी पिछेहाट झाली होती. अशावेळी भाजपला या निवडणुका जड जाणार का या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा तौलनात्मक अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. याविषयी मला पुढील मुद्दे मांडायचे आहेतः १. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा लोकप्रिय स्थानिक चेहरा नाही हा पक्षापुढे असलेला मोठा अडसर आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केलाच पाहिजे ही गरज आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींचे स्थान आता इतके मोठे झाले आहे की मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री व्हायला जाणार नसले तरी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप मोदींच्या नावावर मते मागू शकतो. उत्तर प्रदेशात त्यातून मोठे यश पक्षाने मिळवले होते. पण जर विरोधी पक्षांनी स्थानिक लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर मात्र भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालातून कळतेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा चेहरा मुळातच नाही याचा त्रास काँग्रेसला होईल असे मला वाटते. २०१२ मध्ये मी गुजरात विधानसभा निवडणुकांचा बराच अभ्यास केला होता.तेव्हा जाणवले होते की स्थानिक उमेदवार कोणीही असला तरी मतदारांपुढे मोदींचा चेहरा आणि त्यांची लोकप्रियता हे मुद्दे महत्वाचे होते म्हणजे एका अर्थी सर्व १८२ जागांवर भाजपकडून नरेंद्र मोदीच निवडणुक लढवत आहेत अशी परिस्थिती होती. आज मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदावर गेले असले तरी या परिस्थितीत फार फरक पडलेला दिसत नाही. २. नोटबंदी आणि जी.एस.टी नोटबंदी आणि जी.एस.टी चा भाजपला त्रास होईल का? हे दोन्ही निर्णय घेताना मोदींनी मोठी राजकीय जोखिम उचलली होती. व्यापारी आणि छोटेमोठे व्यावसायिक हा जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचा पाठिराखा होता. गुजरातमध्ये या वर्गाचे प्रमाण बरेच मोठे आहे.या वर्गातून करचुकवेपणाचे प्रमाण मोठे होते हे अगदी उघडे गुपित आहे. पण जी.एस.टी मुळे यांनाही कर भरणे सक्तीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात भाजपविरोधी असंतोष असणे अपेक्षित आहे. तरीही याविषयी मला दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतातः २अ: नोटबंदीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि त्याचे प्रतिबिंब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये उमटणार असे चित्र उभे केले गेले होते. तसे काहीही झाले नाही. याचे कारण काय असावे? माझ्या मते नोटबंदीनंतर प्रथमच श्रीमंतांची तारांबळ उडत आहे, त्यांना बँकेपुढे रांगा लावाव्या लागत आहेत असे चित्र उभे राहिले. नाही म्हटले तरी गरीब वर्गात श्रीमंतांना असा त्रास द्यायचा निर्णय मोदींनी घेतला याचे समाधान वाटले असेल तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातूनच पूर्वी भाजपला कधीही मत न दिलेल्या वर्गानेही भाजपला मते दिली. म्हणजे नोटबंदी आणि जी.एस.टी मुळे भाजपचा पारंपारिक समर्थक वर्ग जरी दुखावला गेला असला तरी त्याची भरपाई भाजपला पूर्वी कधीही मत न दिलेल्या वर्गाच्या समर्थनातून होऊ शकेल असे मला वाटते. २बः दुसरे म्हणजे जरी नोटबंदी आणि जी.एस.टी हे निर्णय आवडले नसले तरी दुखावल्या गेलेल्या वर्गापुढे दुसरा कोणता समर्थ पर्याय आहे का? राहुल गांधींनी कितीही राणा भिमदेवी थाट आणला असला तरी त्यांच्या मर्यादा सर्वांनाच माहित आहेत. याविषयी भाऊ तोरसेकरांनी एका लेखात म्हटले आहे की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात एस.टी चा संप झाला त्यावेळेनंतर टमटम, खटारा इत्यादी स्थानिक वाहतुक सेवांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त बरकत आली का? तर तसे होऊ शकले नाही कारण शेवटी गावांमध्ये सेवा पुरविण्यात एस.टीचा हात कोणी धरू शकत नाही.त्यामुळे लोकांना एस.टी शिवाय पर्याय नव्हता. भाजपची गुजरातमधील स्थिती काहीशी तशीच आहे. ३. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश त्रिकूट हार्दिक पटेलने भाजपपुढे सुरवातीला मोठे आव्हान उभे केले ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसने त्याचा योग्य फायदा उचलला नाही असे म्हणावेसे वाटते. हार्दिक पटेलची मागणी आहे पाटिदार समाजाला आरक्षण द्यावे. आणि असे आरक्षण दिल्यास मुळात आरक्षण मिळणार्‍या ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी एक वाटेकरी येणार म्हणून ओबीसींचा या पाटीदार आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचे म्हणणे तेच आहे. म्हणजे हार्दिक आणि अल्पेश यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. या दोघांनाही काँग्रेसने एकाच वेळी एकत्र आणले असले तरी त्यामुळे त्यांचे समर्थक मात्र दुखावले गेले आहेत हे नक्कीच. सुरवातीला आपले आंदोलन गैरराजकीय असेल असे जाहिर करणार्‍या हार्दिकने नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली हे न आवडल्यामुळे हार्दिकच्या अनेक समर्थकांनी त्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे सुरवातीला हार्दिक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या होत्या. तसेच नंतर हार्दिक समर्थकांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये आधी जाहिर केलेले उमेदवार बदलले. काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर युती करताना जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे. जो काही निर्णय असेल तो पडद्याआड घेऊन मग जाहिर करणे श्रेयस्कर ठरले असते पण काँग्रेसने घाईघाईत निर्णय घेतला हे जाहिर केले आणि दुसर्‍या पक्षाच्या हातात जास्त बार्गेनिंग पॉवर आपण होऊन दिली. आता दलित नेता जिग्नेश मेवानीने काँग्रेसबरोबर निवडणुक न लढवता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवायचे ठरवले आहे. इतके दिवस या त्रिकूटाचा पाठिंबा आपल्याला असणार असे चित्र काँग्रेसने उभे केले होते. भाऊ तोरसेकरांनी हार्दिक पटेलविषयी एक म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात की २०१२ मध्ये पाटीदार समाजाचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून मोदींना आव्हान उभे करायचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? केशुभाईंच्या पक्षाला ३% मतेही मिळू शकली नव्हती. हार्दिक हा केशुभाईंपेक्षा जास्त लोकप्रिय आहे का? भाऊ तोरसेकरांनी आणखी एक मुद्दा मांडला होता. १९७० च्या दशकात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले होते त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांची नावेही आपल्या आता लक्षात आहेत का? असे नेते येतात आणि जातात. विशेषत: धरसोडपणा केल्यास अशा नेत्यांची विस्मृतीत अस्तंगत व्हायची शक्यताच सर्वात जास्त. ४. काँग्रेसमधील लाथाळ्या गुजरात निवडणुकांपूर्वी काही महिनेच शंकरसिंग वाघेला पक्षातून बाहेर पडले. वर दिलेल्या तक्त्यातून समजते की २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्याच भागात-- पंचमहल, दाहोद, गोध्रा शंकरसिंग वाघेलांना काही प्रमाणावर जनाधार आहे. वाघेलांनंतर काँग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलच्या समर्थकांना उमेदवारी द्यायला लागली म्हणून काँग्रेसने आधी उमेदवारी जाहिर केलेल्या काहींचे तिकिट कापले. हे सगळे प्रकार काँग्रेससाठी नक्कीच चांगले नाहीत. विशेषतः २२ वर्षांनंतर भाजपला हरवायची संधी प्रथमच चालून आलेली असताना एकदिलाने आणि व्यवस्थित आखणी करून निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे होते. तसे होताना मात्र दिसत नाही. काँग्रेस बर्‍यापैकी सुस्थितीत असलेल्या उत्तर गुजरातमध्ये (पाटण, बनासकांठा जिल्ह्यात) पूर आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगलोरला जाऊन बसले होते हे चित्र उभे करण्यात भाजप बर्‍यापैकी यशस्वी झाला. जर पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असेल तर त्याचा दोष राज्य सरकारला जायला हवा. पण नेमक्या त्याचवेळी काँग्रेस आमदार बंगलोरला जाऊन बसल्यामुळे राज्य सरकारला 'तुम्ही काय केलेत' हा प्रश्नही काँग्रेसला विचारायची कोंडी झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांविषयीचे माझे मत या सगळ्या परिस्थितीत मला वाटत आहे की भाजपला या विधानसभा निवडणुका जिंकायची चांगली संधी आहे. सुरवातीला अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसने नेहमीप्रमाणे सगळ्याचा विचका केलेला दिसत आहे. मला वाटते की भाजप १८२ पैकी १३० ते १३५ जागा जिंकेल. प्रत्यक्षात काय होईल हे १८ डिसेंबरलाच समजेल. राजदीप सरदेसाईंचे गुजरातमधील राजकीय परिस्थितीविषयी एक विधान देऊन हा लेख संपवतो. राजदीप सरदेसाई म्हणतातः “Only anger can unseat BJP in Gujarat. At the moment, there is disappointment with BJP but not outright anger” १४ डिसेंबरला दुसर्‍या फेरीतील मतदान झाले की नंतर एक्झिट पोल्सचे निकाल येतील. शक्य झाल्यास त्यापूर्वी मतमोजणीपूर्व धागा काढून कसेही निकाल लागल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझे मत मांडेन.

वाचने 83981
प्रतिक्रिया 310

प्रतिक्रिया

इंदिराजी जब मोरबी आयी थी तब उनके नाक पे रुमाल था. ( सांगणारे हे सांगायचे विसरले की तेंव्हा तिथे प्रेते हलवायचे काम सुरु होते, त्यामुळे तिथे उपस्थीत असलेल्या सर्वच लोकानी नाकावर रुमाल , मास्क लावले होते. ) http://indiatoday.intoday.in/story/yes-indira-gandhi-covered-her-nose-i… त्याच मोरबी जिल्ह्यात एका गावात भाषणबाजीचा काहीही उपयोग झाला नाही. पाणीप्रश्न न सोडवल्याबद्दल मोरबी मतदारसंघातील एका गावात एकाही व्यक्तीने मतदान केले नाही. अधिकार्यांच्या मनधरणीलाही लोकानी भीक घातली नाही. https://www.prabhatkhabar.com/news/other-state/gujarat-a-village-zero-p…

विशुमित / अँमिजी, तुम्हाला विनंती, तुमचे काही लेख/प्रतिक्रिया, खूप छान वाटल्या, आवडल्या, म्हणून तुमच्या बाद्दल एक प्रकारचा आदर व मैत्रभाव वाटतो, आणि त्या आत्मीयतेतून, तुम्हाला विनंती करतो... या अश्या ट्रोलिंग्ज च्याबाबतीत, "इग्नोरम सर्वार्थ साधनम", हीच पॉलिसी ठेवा. माझ्याही प्रतिक्रियेवर काहीबाही लिहून, मला प्रतिक्रिया देण्यासाठी उकसवत आहे, असे वाटल्यास, मी हेच धोरण ठेवतो... मोडस ऑपरेंडी ऑफ टिपिकल भक्त व्हाईल इंटरअँकटिंग ऑन सोशल मीडिया या संदर्भातील एक लिंक व्यनि करेन, सध्या नेमकी सापडत नाहीये...

In reply to by पगला गजोधर

तुम्हाला विनंती, तुमचे काही लेख/प्रतिक्रिया, खूप छान वाटल्या, आवडल्या, म्हणून तुमच्या बाद्दल एक प्रकारचा आदर व मैत्रभाव वाटतो, आणि त्या आत्मीयतेतून, तुम्हाला विनंती करतो...
वाईट दिस सरेपातूर असे हात हातात घिउन एकत्र राहायचेच दिस हैत हे.

आधी धादांत खोटं लिहायचं, आणि पुरावे मागितले की दुर्लक्ष करून नव्या जोमानं नवं खोटं बोलायचं... कधी सुधारणार हे लोक कोण जाणे!

अशीच जर घाण या धाग्यात आणखी होणार असेल तर हा धागा शिफारस मधुन काढुन टाका. इज्जत घालवली त्या शिफारसची अन धाग्याची...

गुजरात ची निवडणूक दिवसो दिवस तीव्र उत्सुकतेचे होत चाली आहे. मोदी आणि भाजप यांची भाषणे विकासापासून दूर जाऊन जातीय आणि धार्मिक आणि विशेतः भावनिक होऊ लागलेत. भाजप nervous होऊ लागलीय [अर्थात भाजप अजून ही जिंकू शकते] To keep Gujarat, Narendra Modi’s campaign detours from vikas to caste मोदी आता विकासाचे बोलत नाहीयेत तर मला किती त्रास झाला, माझा काँग्रेस ने किती अपमान केला, काँग्रेस च्या एका पदाधिकार्याने माझे आई वडील कोण असे विचारले इत्यादी मुद्दे घेऊन मोदी भाषण करतायत. अहो मोदी साहेब असे बोलणे चुकीचे असले तरी लोकांना एका लिमिट पेक्षा या गोष्टींची फिकीर नाहीये त्यांना विकास, आरक्षण, रोजगार, जमीन आणि शेती हे विषय महत्वाचे आहेत, उगाच मला कुणी चिमटा काढला, माझा अपमान झाला याबाबत ची रडा रडी बंद करा एका पंतप्रधानाप्रमाणे वागा आणि मुद्याच बोला, नाहीतर दिसला कॅमेरा की कर रडायला सुरू ही स्ट्रॅटेजी बंद करा. आता हळूहळू मोदी पाकिस्तान ला निवडणुकीत घेऊन येतील असे दिसतंय.

In reply to by अमितदादा

आता हळूहळू मोदी पाकिस्तान ला निवडणुकीत घेऊन येतील असे दिसतंय.>> ==>> सकाळ पासून तेच चालू आहे सगळ्या टीव्ही चॅनेल वर,, राहुल गांधी, मनमोहन, अर्षद., पाकिस्तान, गुजरात का बेटा वगैरे वगैरे .... घसा बसला पार. चॅनेल वाल्यानी लगेच जाहिराती चालू केल्या. तिकडे ते डिम्पल बॉय नी जिथे जिथे मंदिरे आहेत तिथे तिथे सभा आयोजित केले आहेत. एवढे व्रतवैकल्य आधी केले असते तर दोनाचे चार झाले असते. हार्दिक भाऊ ला मुख्यमंत्री होयचंय कि काय या थाटात वावरत आहेत. जिग्नेश/अल्पेश बद्दल अजून काही माहिती घेतली नाही. हीच गुजरातच्या जनतेची नस आहे का, कि जो कोणी ती पकडण्याची धडपड करत आहे? हेच गुजरात मॉडेल सगळ्या देशासाठी लागू करायचे होते म्हणून देशभर फिरवले होते का? या पेक्षा आपला महाराष्ट्र लाख पटीने वैचारिक गुणवत्तेने नटला आहे.

In reply to by अमितदादा

विरोधी पक्ष मोदींना का हरवू शकलेले नाहीत याचे उत्तरच तुम्ही तुमच्या या प्रतिसादातून दिले आहेत. मोदी इतकी वर्षे विकासाचा मुद्दा मांडत होते तेव्हा इतर सगळे पण २००२ चे काय हेच टुमणे लावून बसले होते. यावेळीही मोदींनी विकासाचाच मुद्दा सुरवातीला प्रचारांमध्ये आणला होता. सुरवातीची भाषणे कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकली तर ते समजेल. काँग्रेसनेही सुरवात 'विकास गांडा हुआ छे' म्हणून विकासाच्याच मुद्द्यावर केली होती. पण बहुदा त्या मुद्द्यावर आपण भाजपला हरवू शकत नाही हे लक्षात आल्यामुळे हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटाला बरोबर घ्यायच्या हालचाली सुरू झाल्या.या त्रिकूटाचा मुद्दा पूर्ण जातीयच आहे तेव्हा काँग्रेसला आता विकासाच्या मुद्द्यावर भाजपला घेरता येणे कठिण आहे. त्यातूनच काँग्रेसने मोदींना हातात आयते मुद्दे आणून दिले आहेत. चायवाला, नीच इत्यादी म्हणून. मोदींसारखा कसलेला राजकारणी आयत्या मिळालेल्या मुद्द्यांना थोडीच सोडणार आहे? एकूणच इतकी वर्षे मोदी विकासाचा मुद्दा मांडत होते तेव्हा विरोधकांनी त्याचा विरोध केला. आता मोदी देशभक्तीचा मुद्दा मांडत आहेत तेव्हा 'विकासाचे काय' हे नवेच टुमणे लावले आहे. म्हणजेच होत काय आहे की मोदींनी काहीही केले तरी त्याला विरोध करायचा हा विरोधकांचा कार्यक्रम आहे हे लोकांना समजले नाही असे वाटत आहे का? आणि दुसरे म्हणजे निदान २०१४ नंतर प्रत्येक वेळा मोदी खेळवणार आणि सगळे विरोधक मोदींना पाहिजे त्या पध्दतीने खेळणार अशीच परिस्थिती आहे. आपण ठरवू त्या अजेंड्याप्रमाणे मोदी पावले उचलतील हा भ्रम आहे विरोधकांचा. २००२ पासून सगळ्या विरोधकांनीच मोदींना या प्रकाराला तोंड कसे द्यायचे याची इतकी प्रॅक्टिस दिली आहे की त्याचा उपयोग मोदी करणार नाहीत का? अशा रिअ‍ॅक्शनरी वर्तणुकीतून मोदींना हरवायची शक्यता अधिकाधिक कमी होत जाणार आहे हे या विरोधकांच्या लक्षात कसे येत नाही हेच समजत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

विरोधी पक्ष अत्यंत हुशार किंवा विकास प्रेमी आहे हा माझा मुद्दा नाही. माझा मुद्दा हा आहे की भाजप हा सुद्धा काँग्रेस प्रमाणे जातीय आणि धार्मिक मुद्दे च निवडणुकीला वापरतो, आणि विकासाचा मुद्दा लोणच्या प्रमाणे तोंडी लावतो. भाजप हा काँग्रेस पेक्षा खूप वेगळा पक्ष आहे ह्या भाजप समर्थकांच्या दाव्याला माझा कायम विरोध आहे तेच मी माझ्या वरील प्रतिसादातून दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. सगळे किंवा इतर लोक काय म्हणतात याशी माझा संबंध नाही, मला वैयक्तिक रित्या भाजप च्या भूमिकेत खूप बदल दिसतोय. भावनिक मुद्यांचा भाजप ला किती फायदा होतो हे थोड्या दिवसात कळेल कारण याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे, यापूर्वीच्या निवडणुकीत भाजप आणि मोदींनी प्रचंड फायदा उठवला होता हे सत्य आहे पण प्रत्येक निवडणुकीत हे असेच होईल असे म्हणता येणार नाही। आतापर्यन्त मोदी action घ्यायचे आणि विरोधी पक्ष फक्त reaction ची भूमिका बजावायचे, परंतु आता काँग्रेस action मध्ये आहे आणि भाजप reaction मूड मध्ये आहे हे आपण मान्य कराल. जाहीरनामा प्रकरण, भावनिक मुद्दे, हार्दिक CD प्रकरण ह्याच गोष्टी सिद्ध करतय. पटेल आरक्षणावर न बोलणारे मोदी आता कुठे काँग्रेस ला प्रश्न विचारू लागलेत. हे होऊन ही काँग्रेस जिंकणे खूप अवघड आहे परंतु भाजप ला नक्कीच निवडणूक सोपी नाहीये चुरशी ची झालीय, आता आहेत त्या पेक्षा जागा कमी होणे भाजप साठी धक्का असेल. भाजप ने जागा वाढवल्या तर मात्र काँग्रेस आणखी दुबळी होईल जे होऊ नये अशी माझी इच्छा आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

"मोदींना हरवणे शक्य आहे"..... हा मेसेज जर या निवडणुकीतुन देशभर गेला, तर बीजेपी(एम) गटाचे धाबे दनानेल... या धाग्यावरील माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत जर काळजी पूर्वक वाचलेत, आणि निःपक्षपाती पणे जर मी काय म्हणू इच्छित आहे, हे समजावून घेतले तर पहा... आता बीजेपी(एम) गटापुढे काठावर जिंकणे हे म्हणजे, ए टी के टी सारखेच आहे, एम गटाला फक्त व फ़क्त स्वीपिंग व्हिक्टरी तारून नेईल, नाहीतर अंतर्गत लाथाळ्या, शिवसेने सारखे एन डी ए घटक, डोकेदुखी अजून वाढवतील... ज्याला पप्पू म्हणून हिनवले त्याच्या समोर जिंकण्यासाठी कुथाव लागत असेल अन तेही होमपिच वर तर मग, थोडंस अवघडच आहे.... धरतीपुत्र म्हणून सर्वोच्य पदी ज्या जनतेनं नेलं, त्या जनतेनं आपल्या आशा अंकांक्षेचा बळी द्यावा आणि त्यांचे सर्वोच्चत्व टिकवून ठेवावे , यासाठी गुजरातची जनता त्यांची वेठबिगर नाही, हाच मेसेज आता समोरचे देण्याचा प्रयत्न करतील...

In reply to by babu b

परसेप्शन... मोदी व राहुल, यांच्या पैकी गुजराती जनतेला मोदी आपल्या मातीतले वाटतात म्हणुन मोदींच्या पोळीवर अंमळ थोडी जास्त तुपाची धार धरतील, जर दोघे पंगतीला असतील तर....

In reply to by babu b

प्रतिभाताई पाटील उपा च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार... पण धरतीपुत्र म्हणून एन डी ए च्या शिवसेनेचे मत मिळाले....

In reply to by अमितदादा

अगदी खरे आहे.. सारखं पटेल, गांधी, नेहरू, सावरकर या आणि असल्याच मुद्द्यांच्या आधारावर प्रचार चालू आहे(सगळ्याच पक्षांचा). आता काय संबंध या लोकांचा आताच्या समस्यांशी. ते बिचारे गेले मरून. आता, त्यांचं कशाला उकरून काढायचं? शिक्षण, आरोग्य, सिंचन, आदीवासींचे प्रश्न, पर्यावरण, कुपोषण या मुद्द्यांच्या आधारावर काही बोलले पाहिजे तर असलं जुनं उकरून काढत आहेत. आता, मला नावं ठेवतात म्हणून तो तुमचा अपमान असलं विचित्र लॉजिक घेऊन पंप्र प्रचार करताहेत. हा काय खुळचटपणा आहे? आणि तुम्ही अंदाज बांधलेलात तसे पाकिस्तान सुद्धा गुजरात निवडणुकीतील मुद्दा झालेला आहे. असं करून माझ्या मनातून मोदी उतरत चाललेले आहेत. २०१४ साली भाजपला मत दिलेले ते विकासासाठी आणि केवळ विकासासाठी. शिक्षण, आरोग्य या मुद्द्यांच्या बाबतीत काही अमूलाग्र बदल व्हावेत म्हणून. हे असलं रडकं, भवनिक अन धार्मिक, जातिय मुद्द्यांना हात घालण्याचे प्रकार करत राहतील तर मोदी लोकांच्या नजरेतून उतरतील असे मला वाटते.

In reply to by पुंबा

... राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला प्रधानमंत्री, नगरपालिका प्रचाराला मुख्यमंत्री हे पण मला खटकलं... यांनी अनुक्रमे देशाचा आणि राज्याचा कारभार चालवण्याकडे लक्ष द्यायला हवं. प्रचाराला उरलेला पक्ष आहे की!

ओ साहेब गुजरात निवडणुकीचा प्रचार परवाच थांबला आहे. हे बाकी सर्व चालू आहे ते प्रेस्टिट्यूट लोकांचं टी आर पी साठी चालू असलेलं नाटक आहे.

In reply to by अमितदादा

ओ काका, दुसरा टप्पा बाकी आहे अजून, प्रचार आणि प्रचारसभा चालू आहेत अजून माहिती घेऊन बगा जरा. घ्या सांभाळून त्यांचा केविलवाणा विनोद.

ही निवडणूक एव्हीएमनेच आहे का? की ते , नवीन प्रिंट आउटची सोय असलेली मशीन आहे म्हणे, त्याने झाले आहे?

काल पहिल्या फेरीत झालेले ६८% मतदान आणि गुजरात मध्ये राहणारे नातेवाईक, मित्र व व्यावसायानिमित्ताने ओळखीचे झालेले काही व्यापारी ह्यांच्याशी झालेल्या बोलण्यावरुन असा अंदाज वर्तवायचे धाडस करतोय कि (अमित शहा व बाकीच्या कार्यकर्त्यांचा अंदाज १५०+ असला तरी) बीजेपी १४० चा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

आज दुपारी शिवसेना शिवसेना अस स्पीकरवर घोषणा देत जातानाचे ऐकु आले. पण जय महाराष्ट्र! असं काय ऐकु आल नाही, अस पण गुजरातमधे ते म्हटल तर कस होईल म्हणा. मुद्दे काय मांडताय मतांसाठी तपास करावा लागेल.

पगला गजोधर,
एम गटाला फक्त व फ़क्त स्वीपिंग व्हिक्टरी तारून नेईल, नाहीतर अंतर्गत लाथाळ्या, शिवसेने सारखे एन डी ए घटक, डोकेदुखी अजून वाढवतील...
या विधानास फारसा आधार नाही. गुजरात भाजपमध्ये फारशा लाथाळ्या नाहीत. शिवसेनेसारखे एनडीएचे घटक तसेही डोकेदुखी वाढवणारे आहेतंच. गुजरातेतल्या यशाने त्यांची मात्रा कमी होणार नाही. आ.न., -गा.पै.

गुजरात काँग्रेसच्या आय.टी. सेलचे प्रमुख आणि ए.आय.सी.सी चे मिडिया कोऑर्डिनेटर रोहन गुप्ता यांनी गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या जागांपैकी ६५ जागा काँग्रेस जिंकणार आहे असे चाणक्य या संस्थेच्या चाचणीत स्पष्ट झाले आहे असे खोटेच ट्विट केले. चाणक्यने त्याने लगोलग खंडनही केले आहे. एकूणच सोशल मिडियावर दोन्ही बाजूंनी असत्याचा भडिमार करायचा प्रयत्न केला जात आहे हे वाईट आहे. त्यात हौशे फेसबुकी लोक असे करत असतील तर ते एकवेळ तरी समजू शकतो. पण पक्षाने अधिकृत केलेले लोकही असे कसे करायला लागतात हे समजत नाही.

गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे , असे साक्षात मोदीजीच बोलले आहेत. त्याचेही पुरावे ते देतील तर बरे होइल. म्हणजे कोण कुठे कुणाला भेटला , व्हिसा तारीख इ इ .. विनाकारण आमच्या काँग्रेसवर किटाळ नको.

In reply to by babu b

बाबू बी, जरा टीवि बगा की ! काल मोदी झूट बोलतात आसं टीवीवर म्हण्णारा आनंद शर्मा, सोत्ता म्हंतोय की मणीच्या घरी पाकी अंबाशिट्टर, कसूरी, ममोसिंग, वग्रेवग्रेंची मिटिंग झाली. आनि काल टिवीवर काय झूट बोल्ला ते इसरून वर तोंड करून बोल्तोय की भेटले तर काय झालं सर्कार्ची परमिशन काढायला हवी होती काय. निर्लज्जपनाची पन एक शीमा आस्ती आसे तुमच्या शर्मा साय्बांन्ला सांगा, बबुवा ! =))

बाबू जी जरा गौर फर्माइये लोकमत मधील बातमी http://www.lokmat.com/national/modi-accuses-facts-aiyars-meeting-was-he… महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/former-army-chief-de…

In reply to by आकाश कंदील

पेप्रात छापलं म्हणजे खरेच का ? परदेशी माणूस येउन गेला याचे सर्वात विश्वासार्ह प्रूफ कोण् देउ शकेल ? सरकार उर्फ मोदी , मनमोहन की पेपरवाले ? मग सरकार स्वत:चा डेटा न देता पेप्रांचा संदर्भ का देत आहे ?

अग्गोबै म्हणजे नक्कीच माईसाहेब. सरकारच्या डेटावर तुमचा कुठे विश्वास बसणार काहीतरीच मागणी तुमची

In reply to by आकाश कंदील

बाकी , ते आले , कुठे राहिले , काय चर्चा केली , तो एक वेगळा भाग झाला. ( पण दुसर्या देशात गेले की सत्ताधीशाऐवजी विरोधी पक्षाकडे जेवायला जावे , हा तर हिंदू शिकवणुकीचाच भाग आहे ना ? महाभारतात उदाहरण आहे ना ? )

राहूल गांधी देवळात जातात की नाही? मंदीर-मस्जीद्,हार्दिक पटेलचे मनास न पटेल असे केलेले चित्रीकरण... सत्ताधारी भाजपाच्या जमीनीखालची वाळू सरकू लागली आहे असे ह्यांचे मत.

मोदीसोबत भ्रमनिरास झालेल्या लोकायहो, तुमाला ज्याला मत द्यायचं त्याला द्या. पण मागे तुम्हीच दिलेलं मत आजही वैध आहे असं वागा.

In reply to by arunjoshi123

पण मागे तुम्हीच दिलेलं मत आजही वैध आहे असं वागा.
ह्यामागे लॉजिक काय? तांत्रिक मुद्द्याचं म्हणत असाल तर आहेच वैध. वैध असल्यासारखे वागा म्हणजे काय? काय करायचं? प्रत्येक मुद्द्यावर सरकारची तळी उचलायची? जर राईट टू रिकॉल असता तर आज ते मत वैध नाही असे म्हणून काही अ‍ॅक्शन घेता आली असती. सध्या तसे करता येत नाही निव्वळ या कारणापायी ते वैध आहे.

In reply to by पुंबा

वैध असल्यासारखे वागा म्हणजे काय? काय करायचं?
चूक केली ना? मग भोगायची फळं. पुढच्या निवडणूकीपर्यंत दम धरायचा. ------------------------ आता विधानसभेला, ग्रामपंचायतीला बरोबर मतदान केलंत ना? मग सगळं व्यवस्थित होइल हळूहळू.

In reply to by पुंबा

जर राईट टू रिकॉल असता तर...
कभी कभी मेरे दिल में खयाल आता है राईट टू रिकॉल असता तर पता नहीं मैंने क्या क्या रिकॉल किया होता।

In reply to by पुंबा

प्रत्येक मुद्द्यावर सरकारची तळी उचलायची?
सरकारच्या प्रत्येक निर्णयाला तात्विक, कायदेशीर आणि नैतिक पातळीवर तुम्ही जबाबदार आहात. म्हणजे विद्यमान चुकाही तुम्हीच करत आहात आणि पश्चात्तापही तुम्हीच करत आहात असं वागायचं. इतर कोणी करत आहे अशी वाक्यरचना करायची नाही.

In reply to by arunjoshi123

हे सगळं सांगणारे तुम्ही कोण? आम्हाला संवैधानिक अधिकार आहेच विरोध करण्याचा किंवा कुठल्याही माध्यमातून आमचे मत व्यक्त करण्याचा. तो आम्ही बजावतोय. एकदा सरकार निवडून दिलं की झालं असं असतं तर मग आणिबाणीला विरोधच नव्हता करायला हवा जनतेने.

In reply to by पुंबा

हे सगळं सांगणारे तुम्ही कोण?
चर्चा अगोदर परिचय करून मग करायची असते हे विसरलोच एक मिनिट. हॅलो, मी अरुण जोशी. (अवांतर - यनावालांनी मी कोण चे उत्तर म्हणून आधार कार्ड वरचे नाव पुरेसे आहे हे मिपावर सिद्ध केले आहे. http://www.misalpav.com/node/41497 ओळ २७. त्या कृपाकणाचा लाभ घेत उत्तर दिले आहे.)
आम्हाला संवैधानिक अधिकार आहेच विरोध करण्याचा किंवा कुठल्याही माध्यमातून आमचे मत व्यक्त करण्याचा.
कोणत्या कायद्यानुसार तुम्हाला विरोध करायचा अधिकार आहे म्हणे? आम्हाला देखील सांगता का? आम्हाला देखील खूप गोष्टींचा विरोध करायचा आहे. शिवाय आपणांस मत व्यक्त करावयाचा अबसॉल्यूट अधिकार आहे का? आणि तो फक्त तुम्हालाच आहे का? मला नाही का? ---------------------- तुमचा कोणता अधिकार मी कधी अमान्य केला? प्रत्येक अधिकाराच्या वेळी संविधानाचा दाखला द्यायची काय गरज? आपण मनुश्ञ म्हणून संवाद करू शकत नाही का? --------------------------- तर थोडक्यात, प्रश्न हा मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा नसून मताच्या योग्यतेचा आहे. तुम्हाला मत व्यक्त करायचा १००% अधिकार असला तरी ते मत चुकिचे असू शकते म्हणून मी बापडा काहीतरी संवाद साधत आहे. ==================================
एकदा सरकार निवडून दिलं की झालं असं असतं तर मग आणिबाणीला विरोधच नव्हता करायला हवा जनतेने.
आणिबाणि असो नैतर मोदी, मत दिल्यावर जो विरोध करायचा आहे तो स्वतःच्या चुकिचा विरोध आहे अशा ग्लानीपूर्ण भावनेने करावा. घटनेने आपल्याला चुकिची सरकारे निवडून द्यायचा नि त्यानंतर त्यांच्या नावाने खडे फोडायचा अधिकार दिला आहे असा विपर्यास्त अर्थ काढू नये. मोदिंना शिव्या घालण्याअगोदर स्वतः काय चूका केल्या, मतदानावेळी कोणत्या गोष्टी नजरेआड केल्या त्या सांगा मंजे आमच्यासारख्यांना मार्गदर्शही होइल.

मोदी ज्या पद्धतीने पाकिस्तान चा प्रचारामध्ये उपयोग करून घेत आहेत किंवा ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत ते एका पंतप्रधानाला न शोभणारे आहेत, पंतप्रधान पदाची किमंत उतवणारे आहेत. कॉंग्रेस च्या लोकांची पाकिस्तानच्या अधिकारी शी झालेल्या मिटिंग बद्दल मोदी किंवा भाजप प्रश्न जरूर विचारू शकते , परंतु गुजरात च्या निवडणुकीत पाकिस्तान दखल देतोय किंवा तो कॉंग्रेस च्या बरोबर आहे असे direct किंवा indirect सुचवणे हे अत्यंत धोकादायक आहे, जर असा भीषण प्रकार होत असे तर पंतप्रधानाच्या पदावर ५६ इंच छाती घेवून अजून का बसून आहात, करा न कारवाई. तुमच्या देखरखीखाली हे होत असे तर तुमचा काय उपयोग? मुळात हे आरोप निवडणुकीपुरते आहेत ते एकवेळ अमित शाह यांनी केले असते तर ठीक होत परंतु पंतप्रधानांनी ते करण हे अत्यंत घाणेरड आहे, कारण हा राष्ट्रीय सुरक्षा आणि निवडणुकीची विश्वासाहर्ता याचा मुद्दा आहे. मोदि निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही पातळीला उतरू शकतात हे सिद्ध होतंय. Pakistan working with Congress to beat BJP in Gujarat polls: PM राष्ट्रीय निवडणुकीत पाकिस्तान चा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित म्हणून समजू शकतो पण गुजरात च्या निवडणुकीत काही वेळा त्याचा वापर समजू शकतो परंतु सगळी भाषणे पाकिस्तान भोवती फिरवणे, तेही कॉंग्रेस जिंकण्याची श्यक्यता कमी असताना , हे वैफल्याच लक्षण आहे. गुजरात च्या निवडणुकीत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बंगालदेश यावर नको तर लोकल मुद्द्यवर बोला. किती रोजगार निर्मिती केली, गरिबी किती दूर झाली, किती विकास झाला, पायाभूत सुविधा किती उभारल्या, नोटाबंधी आणि gst कसे चांगले हे सांगा. 'Reject PM Modi's falsehoods'

In reply to by अमितदादा

मोदींनी काहीही केले तरी ते अनेकांच्या दृष्टीने पंतप्रधानपदाची शान घालवणारेच असते. त्यामुळे असले कोणी काही बोलले तर माझ्यासारखे सामान्य लोकही फार दखल घेणार नाहीत. तेव्हा मोदी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतील हे नक्कीच. आणि मोदींनी कुठलेही मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात मांडले तरी ते सोडून इतर मुद्दे मांडा असेच विरोधक म्हणणार. म्हणजे इतकी वर्षे विकासाचा मुद्दा होता तेव्हा २००२ चे टुमणे, आता वेगळे मुद्दे आल्यावर 'अरे पण विकासाचे काय'. हा प्रकार विरोधक चालूच ठेवणार आहेत. त्यामुळे असले कोणी काही बोलायला लागले तर त्याची दखलही घेऊ नये. राहुल गांधी, केजरीवाल, कम्युनिस्ट आणि जवळपास सगळ्या विरोधकांनी अफजल गुरूच्या 'पुण्यतिथीनिमित्त' कार्यक्रम साजरा करणार्‍या कन्हैय्याकुमार आणि इतर जे.एन.यु च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे कॉंग्रेसचा जीव पाकिस्तानसाठी तीळ तीळ तुटतो असे कोणी म्हणत असेल तर मला तरी त्यात अजिबात म्हणजे अजिबात चुकीचे वाटत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

राहुल गांधी, केजरीवाल, कम्युनिस्ट आणि जवळपास सगळ्या विरोधकांनी अफजल गुरूच्या 'पुण्यतिथीनिमित्त' कार्यक्रम साजरा करणार्‍या कन्हैय्याकुमार आणि इतर जे.एन.यु च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे कॉंग्रेसचा जीव पाकिस्तानसाठी तीळ तीळ तुटतो असे कोणी म्हणत असेल तर मला तरी त्यात अजिबात म्हणजे अजिबात चुकीचे वाटत नाही.
इथ अफझल गुरु सारख्या अनेक दहशतवादी लोकांना direct किंवा indirect पाठींबा देणाऱ्या PDP बरोबर भाजप सत्तेत आहे हि तुमच्या दृष्टीने देशभक्तीच असेल असे मी समजतो. मेह्म्बुबा मुफ्ती मुख्यमत्री नसताना अनेक आतंकवाद्यांच्या दफनविधीला जातीने उपस्थित राहत होत्या. Read Here
त्यामुळे असले कोणी काही बोलले तर माझ्यासारखे सामान्य लोकही फार दखल घेणार नाहीत.
मोदींना विरोध करणारे सुधा आमच्यासारखे सामान्य लोकच आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

In reply to by अमितदादा

इथ अफझल गुरु सारख्या अनेक दहशतवादी लोकांना direct किंवा indirect पाठींबा देणाऱ्या PDP बरोबर भाजप सत्तेत आहे हि तुमच्या दृष्टीने देशभक्तीच असेल असे मी समजतो.
वाटलंच होतं हा मुद्दा कसा आला नाही ते. याविषयी माझ्या माहितीप्रमाणे मिपावरही बरीच चर्चा झाली आहे. सरकारमध्ये प्रवेश मिळवून प्रशासनावर काही प्रमाणात वचक बसवायला मदत मिळाली आहे. निर्मला सीतारामन यांनी मध्यंतरी जम्मू-काश्मीर पोलिसांचे दहशतवादविरोधी मोहिमेतील कारवाईबद्दल मुद्दामून अभिनंदन केले होते. आतापर्यंत काश्मीरात लष्कर आणि बी.एस.एफ यांनी दहशतवाद्यांविरोधात नेहमीच सक्रीय भूमिका घेतली आहे. पण काश्मीर पोलिसांनी पुढाकार घेऊन इतकी सक्रीय भूमिका कधी घेतली होती हे तपासून बघा. या वर्षी रेकॉर्ड प्रमाणावर दहशतवादी मारले गेले आहेत त्यात पोलिसांची भूमिका मोठी आहे. आता कनेक्ट द डॉट्स. दुसरी गोष्ट म्हणजे सरकार पी.डी.पी चे बनणे क्रमप्राप्त होते. कारण आकडेच तसे होते. अशावेळी सरकारमध्ये काँग्रेस जाऊन बसली असती तर पी.डी.पी ला त्यांच्या कारवाया करायला पूर्णच मोकळीक मिळाली असती. तिथे पी.डी.पी वर लगाम घालायला भाजप सत्तेत गेला आहे असे का म्हणू नये? १९४० च्या दशकात अगदी हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या परस्परभिन्न पक्षांनीही हातमिळवणी केली होती आणि काही प्रांतिक सरकारमध्ये मुख्यमंत्री लीगचा आणि काही मंत्री हिंदू महासभेचे अशीही परिस्थिती होती. त्या सरकारमध्ये हिंदू महासभा का सामील झाली? त्याचे कारणही तेच. लीगला सत्तेत राहून लगाम घालायचा प्रयत्न करायचा. तिसरे म्हणजे भाजप बरोबर सत्तेत राहण्यासाठी पी.डी.पीला त्यांचा अजेंडा डायल्युट करणे भाग पडले असे का म्हणायचे नाही? भाजपनेच सत्तेसाठी तडजोड केली असे का म्हणायचे? तेव्हा काश्मीरातील परिस्थिती वेगळी आहे. त्याला हे नेहमीचे मापदंड लावता येणार नाहीत.

In reply to by गॅरी ट्रुमन

तिसरे म्हणजे भाजप बरोबर सत्तेत राहण्यासाठी पी.डी.पीला त्यांचा अजेंडा डायल्युट करणे भाग पडले असे का म्हणायचे नाही?
पॉइंट है।

In reply to by गॅरी ट्रुमन

अगदीच ज्या न्यायाने भाजप PDP च्या फुटीरवादी मुद्यांना पाठींबा न देता , common ground वर किंवा common agreed agenda वर काम करतंय. तसेच गांधी किंवा केजरीवाल यांनी कन्हैयाकुमार च्या फुटीरवादी विचारांना पाठींबा न देता, आदिवासी, दलित, कामगार तसेच इतर गोष्टी बाबतची त्याची मते यांना पाठींबा देवू शकते ना=:) कि एखाद्याला पाठींबा द्यायला त्याच्या A to Z मताशी १०० % सहमत असावे लागते असे तुमचे मत आहे? कि देशभक्तीच certificate भाजप वाटत फिरणार आहे.

In reply to by अमितदादा

काश्मीरातील परिस्थिती वेगळी आहे आणि इतर ठिकाणचे निकष तिथे लावणे अयोग्य आहे हे वर लिहिलेच आहे.
तसेच गांधी किंवा केजरीवाल यांनी कन्हैयाकुमार च्या फुटीरवादी विचारांना पाठींबा न देता, आदिवासी, दलित, कामगार तसेच इतर गोष्टी बाबतची त्याची मते यांना पाठींबा देवू शकते ना
राहुल आणि केजरीवाल यांनी नक्की कोणत्या गोष्टीवर आणि कधी कन्हैय्याला पाठिंबा दिला आहे हे जरा तपासून बघा. उगीच काहीतरी लिहायचेच आहे म्हणून लिहू नका.

In reply to by गॅरी ट्रुमन

गांधी किंवा केजरीवाल यांनी कन्हैयाकुमार च्या फुटीरवादी विचारांना पाठींबा दिला आहे असे माझ्या वाचनात अजून तरी आले नाही, तरीही अधिक शोध घेवून पाहतो. बाकी तुमच्या मताशी सहमत नाही एवढ सांगतो. गुजरात मध्ये मोदीच्या चुकांना त्यांचे समर्थक ज्या पद्धतीने पाठीशी घालतायत ते पाहून आश्चर्य वाटल, असो बगुया १८ ला याचा किती फायदा होतोय भाजप ला ते.

In reply to by गॅरी ट्रुमन

तेव्हा काश्मीरातील परिस्थिती वेगळी आहे. त्याला हे नेहमीचे मापदंड लावता येणार नाहीत.
१००% सहमत .. सरकारला फक्त आपला विचार करून चालत नाही , सर्वान्गीण विचार करावा लागतो. काश्मिर मधे पी.डी.पी शी युती ही माझ्या मते आम्ही शान्तता प्रस्थापित करण्यासाठी आणि राखण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत हे जगाला दाखविण्याचा भारत सरकार( भा.ज.पा किन्वा कोन्ग्रेस) ची योजना आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मिर मधे लोकशाही कशी नाही आणि आम्ही कसा प्रामाणिक प्रयत्न करतो हे भारत दाखवतो. त्यामुळे बाकी देश पाकिस्तानवर दबाव टाकतात आणि त्यान्च्या सार्वमताच्या प्रस्तावाला विरोध करतात. नावापुरता नागरी सरकार आणि आतून लष्कर नियन्त्रीत कारभार अशी आत्ताची परिस्थिती आहे.त्यामुळेच काश्मिर मधील अतिरेकी मारले तरी जातात किन्वा शरण येतात.

In reply to by अमितदादा

आपल्या लिंकेतून...
In fact, Chief Minister Mehbooba Mufti is widely reg­arded as a pioneer in this. When she was an Opp­osition leader, she would visit the houses of militants who were killed and mourned their deaths. In 2002, when her party, the Peoples Democratic Party (PDP), won 16 of the 87 seats in the J&K assembly, it asked the militants to give up the gun as they now had “16 representatives in the assembly to plead their case”.
तेव्हा बाई नुकत्याच काँग्रेसमधून बाहेर पडल्या होत्या. अ‍ॅनी वे, भाजपने एका शांतीवादी पक्षाला राष्ट्रीय प्रवाहात आणले आहे. मंजे आता त्या अशा भेटी देत नाहीत. http://www.thecitizen.in/index.php/en/NewsDetail/index/3/10112/Mehbooba… आता त्या म्हणतात - “It gives me immense happiness to see that 12 youth, who had joined militants in the last year, have returned to their homes. Our government will see to it that more youths who have deviated from the path are returned to their families safely," Mufti said.

In reply to by अमितदादा

मोदी ज्या पद्धतीने पाकिस्तान चा प्रचारामध्ये उपयोग करून घेत आहेत किंवा ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत ते एका पंतप्रधानाला न शोभणारे आहेत, पंतप्रधान पदाची किमंत उतवणारे आहेत.
असेच वर्तन पुरोगामी क्लिंटनताई आणि ओबामाभाऊ करतात तेव्हा मात्र ते अत्यंत सुशोभनीय असते.

In reply to by अमितदादा

आणि निवडणुकीची विश्वासाहर्ता याचा मुद्दा आहे.
मग इ व्ही एम हॅक केलंय असं काँग्रेस १५ दा म्हणाली तेव्हा निवडणूकीची विश्वासहर्ता वाढवायची होती का?

In reply to by अमितदादा

कारण हा राष्ट्रीय सुरक्षा आणि निवडणुकीची विश्वासाहर्ता याचा मुद्दा आहे.
समजा मोदी खोटं बोलले असले तरी त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रीय सुरक्षा कशी बाधित होईल याचा मेकॅनिझम कळेल काय?

In reply to by अमितदादा

राष्ट्रीय निवडणुकीत पाकिस्तान चा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित म्हणून समजू शकतो पण गुजरात च्या निवडणुकीत काही वेळा त्याचा वापर समजू शकतो परंतु सगळी भाषणे पाकिस्तान भोवती फिरवणे, तेही कॉंग्रेस जिंकण्याची श्यक्यता कमी असताना , हे वैफल्याच लक्षण आहे. गुजरात च्या निवडणुकीत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बंगालदेश यावर नको तर लोकल मुद्द्यवर बोला. किती रोजगार निर्मिती केली, गरिबी किती दूर झाली, किती विकास झाला, पायाभूत सुविधा किती उभारल्या, नोटाबंधी आणि gst कसे चांगले हे सांगा.
खरंय म्हणा तुमचं, पण गुजराती लोकांना देशाची काळजी पडलेली असते हो.

In reply to by अमितदादा

@अजो साहेब तुमच्या अनेक प्रतिसादानं आणि प्रश्नांना एकत्रित प्रतिसाद देतो १. ओबामा आणि हिलरी याविषयी मी कोणतही मत प्रदर्शित केल नवते त्यामुळे मी त्याला उत्तर देवू शकत नाही २. EVM च्या बाबत विरोधी नेत्यांच्या भूमिकीशी मी सहमत नाही, निवडणूक आयोगावर माझा पूर्ण विश्वासआहे. EVM छेडछेडीच्या काही घटना मध्ये संशय असेल हि परंतु पूर्ण निवडणूक फिरवणे अश्यक्य आहे. EVM मुळे कॉंग्रेस पंजाब मध्ये जिंकली हे विसरता कामा नये. ३. पाकिस्तान चा मुद्दा गुजरात मध्ये अति प्रमाणात वापरणे मला योग्य वाटत नाही. तुम्ही एक ओळीचे प्रश्न विचारण्यापेक्षा तुमचे मत लिहित चला, मुद्देसुद्ध प्रतिसाद लिहून माझे मुद्दे खोडत चला हि विनंती.

In reply to by अमितदादा

पाकिस्तान चा मुद्दा गुजरात मध्ये अति प्रमाणात वापरणे मला योग्य वाटत नाही.
या पद्धतीने आपल्या मूळ भूमिका सोडून चार पक्ष/लोक एकत्र येऊन जातीपातीच्या राजकारणाने निवडणुका जिंकायचा प्रयत्न करत असतील तर भाजपने काय वाट्टेल ते करावे आणि ते हाणून पाडावेत असं माझं वैयक्तिक मत आहे. बिहार मध्ये झाले ते पुन्हा होऊ देऊ नये. काय आहे जातीची गणिते घातली की जिंकता येतं हा चुकीचा पायंडा मोडून काढायलाच हवा!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

काय आहे जातीची गणिते घातली की जिंकता येतं हा चुकीचा पायंडा मोडून काढायलाच हवा!
होय बरोब्बर आहे तुमचं, त्याऐवजी धर्मा धर्मांमधे पोलरायझेशन करून नाझी टाईप पोग्राम... असा नवा पायंडा पडायला हवा, असंच म्हणायचंय तुम्हाला सर....?

In reply to by पगला गजोधर

परत नीट वाचा! धर्मधर्माचं कौतुक हा देश 70 वर्षांपेक्षा जास्त काळ पाहत आहे त्यामुळे त्याचं एक राहुद्याच! बाकी धर्म वि. धर्म आणि जात वि. जात यापैकी जास्त घातक कोणतं याचा जरा शांततेने विचार करा आणि ठरवा!!