हल्ली हल्ली ऐकिवात आलेल्या दोन घटना.
१. आमच्या शेजारच्या गावात एक वेडसर गृहस्थ होते, त्यांना वेड कधी लागले माहीत नाही, त्यापूर्वी गडगंज श्रीमन्त, कराराने आंब्याच्या बागा घेउन लाखो कमवायचे त्या काळात (१९८०), पण नंतर अचानक वेड लागले, आणि मग ते वेडाच्या भरात कसेही वागू लागले.. दणकट शरीर, कमरेला कायम कोयती, आणि शिवराळ भाषा यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नसे. बाबा डोक्टर होते, आणि तसा त्यांचा आणि बाबांची जुनी ओळख, त्यामुळे ते १५ दिवस, महिन्यातून एक फेरी घरी टाकायचेच. बर यायचे ते पण सरळ नाही, त्यांच्या गाण्यांचा आवाज साधारण ५०० मीटरवरून ऐकायला यायचा, आणि मग आम्ही विचार करायचो, की आता हे कोणाकडे जाणार आहेत म्हणून.. आले की कोपभर चहा, आणि थोड्याश्या गप्पा (वेडसर झालेले असले तरी व्यवहाराचे भान सुटले नव्हते. भगत झाले, वैद्य झाले, अगदी मेंटल होस्पिटलपर्यण्त नेउन झाले, पण काही गुण नाही)
त्यांचे येणे म्हणजे सुट्टीला गावाला गेल्यावर थोडासा विरंगुळा होता आम्हाला.
मधे मी वर्षभर अमेरिकेत गेलो, त्यामुळे मग फारसा संबंध राहिला नाही. वर्षभराने परत आल्यावर घरी गेलो तेव्हा विचारले, क्ष्क्ष्काका येतात का नाही हल्ली? तर भाऊ म्हणाला, तुला माहीत नाही? ते बरे झाले. म्हटलं कसे काय? त्यावर त्याने एक गंमत सांगितली.
रत्नागिरीजवळ एका गावात कोणी गृहस्थ "बघतात", त्यांच्याकडे त्यांचा मुलगा विचारायला गेला होता. त्यांनी उपाय सांगितला. तर झालं होतं असं, की त्यांच्या घराच्या खाली एक पिंपळ होता, केव्हातरी रात्री यांनी त्या पिंपळाखाली आग घातली, त्यामुळे त्या मुंज्याने यांना पकडले होले म्हणे. उपाय काय सांगितला? तर सोपा उपाय, एका पानावर जेवण वाढून त्या पिंपळाखाली नेऊन ठेवा आणि प्रार्थना करा म्हणजे तो यांना सोडेल. त्याप्रमाणे यांनी केले, आणि ते गृहस्थ बरे झाले की हो..
पैसे किती घेतले? शून्य.
घटना २:
एक मुलगा ५-६ वर्षांचा, पोटात असह्य दुखते म्हणून त्याचे आईवडील त्याला रत्नगिरीतील एका चांगल्या डॉक्टरकडे घेउन गेले. शक्य त्या सगळ्या तपासण्या करून झाल्या, पण निदान होत नव्हते. पोटदुखी थांबेना.
एका मीटिंगच्या वेळेस डॉक्टरने सुचवले, तुमचा कदाचित विश्वास नसेल, आणि मी सुचवणे योग्य नाही, तरी पण मला एकदा असे वाटते की तुम्ही अन्य मार्गांचा विचार करावा. एव्हढ्या सूचनेवरून ते एका "जाणत्याकडे" बघायला गेले. त्यांनी काहीतरी उपाय सांगितला पण त्याने गुण आला नाही. मग ते दुसर्या एका भगताकडे गेले. आता खरी गंमत सुरू होते..
तो भगत म्हणाला, की मला असा आदेश झालेला आहे की तुमचे काम अमुक अमुक माणसाकडे सोपवले आहे (त्याच्याकडेच ते अगोदर गेले होते), तेव्हा मी यात पडणार नाही. तुमचे काय करायचे ते त्यांना सांगितलेले अहे, तेव्हा तुम्ही परत त्यांच्याकडेच जा.
त्याच्या सांगण्यावरून ते परत जुन्या माणसाकडे आले, तेव्हा त्याने म्हणे याच्या पूर्वजन्माची कथा सांगितली, की तो म्हणे दक्षिणेतील एका मंदिरात पुजारी होता, आणि काहीतरी पूजेची इच्छा मनात राहून गेलेली आहे, त्यामुळे त्याला हा त्रास होत आहे. तुम्ही त्या देवळात जा, आणि काही विधी सांगितले त्या देवळात करायला. (हे देऊळ तिरुपती सारखे कॉमन प्रसिद्ध देऊळ नव्हे) गंमत म्हणजे त्या मुलाची पोटदुखी त्या उपायाने गेली.
पैसे? तो माझा आणि त्या पुजार्याचा हिशोब आहे. तुमच्याशी काही संबंध नाही.
माझी तर्कबुद्धी मला या घटनांचे स्पष्टीकरण देत नाही.. नेमके काय झाले असेल? दोन्ही घटना माझ्या पडताळणीत तरी सत्य घटना आहेत.
वर्गीकरण
याद्या
16584
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
गूढ शास्त्र
हे दोन्ही अनुभव प्रत्यक्ष व
पहिल्या अनुभवातील व्यक्ती
In reply to हे दोन्ही अनुभव प्रत्यक्ष व by प्रकाश घाटपांडे
मला आलेले या वर्षातला दोन
In reply to पहिल्या अनुभवातील व्यक्ती by आनन्दा
हे खरे आहे, अश्या अनेक गोष्टी
In reply to मला आलेले या वर्षातला दोन by प्रकाश घाटपांडे
एक तर्क
In reply to हे खरे आहे, अश्या अनेक गोष्टी by आनन्दा
सांगणे कठीण आहे.. पण मी धुरी
In reply to एक तर्क by महेश हतोळकर
माझे एक अनुभव:
तुमचे आधीचे प्रतिसाद बघता,
In reply to माझे एक अनुभव: by विशुमित
<<<तुमचे आधीचे प्रतिसाद बघता,
In reply to तुमचे आधीचे प्रतिसाद बघता, by गंम्बा
प्रतिसाद
In reply to <<<तुमचे आधीचे प्रतिसाद बघता, by विशुमित
परसाला उघड्या ....
असं जर बरं वाटायचं असेल तर
In reply to परसाला उघड्या .... by दीपक११७७
त्या गोष्टीत.......
In reply to असं जर बरं वाटायचं असेल तर by आनन्दा
आमच्या शेजारच्या गावात एक
वेडसर हे कशावरुन ठरवले ? >>
In reply to आमच्या शेजारच्या गावात एक by मराठी_माणूस
विशुमित, पुतणीला अजून ब्रेस्ट
In reply to वेडसर हे कशावरुन ठरवले ? >> by एमी
लहान मुलांचा दवाखाना १०
In reply to विशुमित, पुतणीला अजून ब्रेस्ट by विशुमित
#1 - उत्तर खाली दिले आहे
In reply to वेडसर हे कशावरुन ठरवले ? >> by एमी
डॉक्टर अधिक सांगू शकतील. पण
In reply to #1 - उत्तर खाली दिले आहे by आनन्दा
वेडसर माणूस ओळखायला फारसे
In reply to आमच्या शेजारच्या गावात एक by मराठी_माणूस
एक अनुभव
सर्वसामान्य पालकांना आपले मूळ
In reply to एक अनुभव by मराठी कथालेखक
माझ्या मित्राची मुलगी त्याला
In reply to सर्वसामान्य पालकांना आपले मूळ by आनन्दा
हे खरे आहे, सर्वसामान्यपणे
In reply to माझ्या मित्राची मुलगी त्याला by मराठी कथालेखक
सांगावे की नाही, हा विचार करत
मला अनुभव आहे.
In reply to सांगावे की नाही, हा विचार करत by दशानन
दृष्ट काढणे
काढाच, वाचायला आवडेल. माझेही
In reply to दृष्ट काढणे by ट्रेड मार्क
माझ्या मुलीच्या पोटात अगदी
प्रतिसाद आवडला डॉक!
In reply to माझ्या मुलीच्या पोटात अगदी by सुबोध खरे
<<<मागून टूरूक करून आवाज येऊन
In reply to माझ्या मुलीच्या पोटात अगदी by सुबोध खरे
गॅस बाहेर पडला असेल तर संबंध
In reply to <<<मागून टूरूक करून आवाज येऊन by विशुमित
उकार अकार ई
In reply to <<<मागून टूरूक करून आवाज येऊन by विशुमित
आमच्याकडे हा गॅसेस चा
In reply to माझ्या मुलीच्या पोटात अगदी by सुबोध खरे
ती baby colic ची लिंक वाचली.
In reply to माझ्या मुलीच्या पोटात अगदी by सुबोध खरे
मी तरी तेच करतो.. लक्ष
In reply to ती baby colic ची लिंक वाचली. by एमी
Infantile colic मध्ये
In reply to मी तरी तेच करतो.. लक्ष by आनन्दा
बाळ दोन तास रडत राहिले तर
In reply to Infantile colic मध्ये by सुबोध खरे
हो, पण रोज रडे त्याला कोण डरे
In reply to बाळ दोन तास रडत राहिले तर by सुबोध खरे
धन्यवाद दोन्ही प्रतिसादासाठी
In reply to Infantile colic मध्ये by सुबोध खरे
<<<फक्त याचे खापर दुसर्या
In reply to धन्यवाद दोन्ही प्रतिसादासाठी by एमी
हेच माझ्या मनात होतं!
In reply to <<<फक्त याचे खापर दुसर्या by विशुमित
नेमका हाच अनुभव मला माझ्या मुलीच्याबाबत
In reply to माझ्या मुलीच्या पोटात अगदी by सुबोध खरे
कर्मकांड हे संकटकाळी मानसिक
In reply to माझ्या मुलीच्या पोटात अगदी by सुबोध खरे
अमंत्रम अक्षरं नास्ती
In reply to कर्मकांड हे संकटकाळी मानसिक by प्रकाश घाटपांडे
यस सर॑
In reply to अमंत्रम अक्षरं नास्ती by सुबोध खरे
2 मुलगे
In reply to माझ्या मुलीच्या पोटात अगदी by सुबोध खरे
रोचक अनुभव
मी पण अशा गोष्टी ऐकल्या आहेत
जगात दोन प्रकारची स्पष्टीकरणे
हि तात्विक पातळी काय असते ?
In reply to जगात दोन प्रकारची स्पष्टीकरणे by arunjoshi123
पैसे? तो माझा आणि त्या पुजार्
मी पुजाऱ्याला पैसे दिले +
In reply to पैसे? तो माझा आणि त्या पुजार् by पुंबा
हो पण हे आनन्दा का सांगताहेत?
In reply to मी पुजाऱ्याला पैसे दिले + by एमी
हिशोब देवळाचा पूर्वजन्मीचा
In reply to हो पण हे आनन्दा का सांगताहेत? by पुंबा