अलाहाबाद (उत्तर प्रदेश) महापालिकेत शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आल्याने युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी "करून दाखवले' असे ट्विट केले आहे. "शिवसेनेचा भगवा उत्तर प्रदेशात. करून दाखवलं. करून दाखवणार. ही तर सुरुवात आहे', असे ट्विट त्यांनी केले आहे. त्याचबरोबर हिंदीत मतदारांचे आभारही मानले आहेत.
http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-shivsena-one-…
पोकळ फुशारक्या मारण्याची ठाकरे घराण्याची उच्च परंपरा आदूबाळ सुरू ठेवणार हे नक्की!
. आवाज कोणाचा! शिवसेनेचा!!
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुक जिंकून सत्तेत आल्यास शिवसेना गुजरातमधील शेतकर्यांना कर्जमाफी देईल अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेना गुजरातमध्ये बहुमताला लागतील तितक्या जागांवर लढत तरी आहे का? आणि जरी सगळ्या जागांवर लढत असली तरी शिवसेनेचे ९२ आमदार गुजरातमधून कसे काय निवडून येणार आहेत? आणि ते ही मुंबईत आयुष्यभर गुजरात्यांना शिव्या घालायची परंपरा असताना?
राहुल गांधी यांना "कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या" बोहल्यावर चढायचा मुहुर्त शेवटी आज मिळालाच. सुरजेवाला, मनिष तिवारी व राजीव त्यांगी सारख्या कॉंग्रेजी प्रवक्त्या/भाटांचा आनंद आज अगदी ओसंडून वाहत आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी आज अर्ज भरला आहेच. त्यावर शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेसमध्ये लोकशाही नाही असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या टिकेमुळे अध्यक्षपदासाठी कोणी डमी उमेदवार उभा केला जाऊ शकतो असे पूनावाला यांनी म्हटले आहे.
Live on @abpnewstv at 10am on Rahul ji's "CROWNING" as President.. wonder why they want a dummy candidate when it is clear only one can be crowned ;) Don't fake it so much dynasty advisors please :) https://t.co/7JhyXsr0Jk
काँग्रेसने खरोखरच डमी उमेदवार उभा केल्यास त्याचे आश्चर्य वाटणार नाही. असा डमी उमेदवार म्हणून २००० साली जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधींविरूध्द अध्यक्षपदाची निवडणुक लढवली होती. गुजरात निवडणुकांपूर्वी अध्यक्ष बनणे टाळण्यासाठी डमी उमेदवार उभा केल्यास आश्चर्य वाटणार नाही असे मी मिपावर ताज्या घडामोडींच्या मागच्या भागात लिहिले पण होते. या शेहजाद पूनावालांना त्याच कारणासाठी काँग्रेसनेच प्लॅन्ट केले होते का अशीही शंका वाटत होती . कारण काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे हे अगदीच जगजाहिर आहे. त्यावर आवाज उठवून या पूनावालांनी नक्की काय मिळवले? आणि त्यातही कोणा मोठ्या नेत्याने त्यावर काहीही न बोलता पूनावालांसारख्या कनिष्ठ नेत्याने आवाज उठवणे, त्याला मिडियात प्रसिध्दी मिळणे हे आधीपासूनच ठरविलेले होते का असेही वाटत होते. पण त्यातच मोदींनी या पूनावालांच्या बोलण्याचा संदर्भ घेऊन काँग्रेसवर हल्ला केल्यामुळे अजूनच गुंतागुंत वाढली आहे असे दिसते. कारण जर डमी उमेदवार उभा करण्यासाठी कारण म्हणून कोणीतरी घराणेशाहीविरूध्द आवाज उठवायचा असा बेत असेल तर असा डमी उमेदवार उभा केला जायची शक्यता आहे हे जाहिरपणे बोलायचे कारण समजत नाही. की मोदींनी यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेतल्यामुळे पूनावालांच्या महत्वाकांक्षा वाढल्या आहेत हे पण समजत नाही.
असो. यात पुढे काय होते हे बघायचे.
अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांना टॅक्सकट (करसवलती) द्यायच्या आहेत आणि त्या दृष्टीने अमेरिकेच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विधेयके मंजूर केली आहेत.
यापूर्वी रॉनाल्ड रेगन आणि जॉर्ज बुश कनिष्ठ यांनी अशाप्रकारे टॅक्सकट केले होते. पण दोघांनाही सरकारी खर्चात मात्र कपात करता आली नव्हती. बुश कनिष्ठांच्या काळात तर दोन युध्दांमुळे सरकारी खर्च वाढला होता. त्यातून रेगन आणि बुश कनिष्ठ या दोघांच्याही काळात वित्तीय तूट वाढली होती. डॉनल्डतात्यांकडून सरकारी खर्च कमी केले जायची अपेक्षा कितपत करता येईल याची कल्पना नाही. त्यातूनच वित्तीय तूट आणखी वाढली तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतील.
मला स्वतःला रिपब्लिकन आर्थिक विचार पटतात (रिपब्लिकन म्हणजे रॉनाल्ड रेगनचे. डॉनल्डतात्या ट्रम्प नावापुरतेच रिपब्लिकन आहेत). त्यामुळे सरकारी खर्च कमी करणे आणि करही कमी करणे हे मला अधिक पटते. पण सरकारी खर्च कमी करणे म्हणजे अनेक कल्याणकारी योजनांना कात्री लावणे गरजेचे ठरेल. आणि कोणाही राजकारण्याला तसे करणे परवडणार्यातले नसते.त्यामुळे रॉनाल्ड रेगन यांनी अगदी शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणापासूनच सरकारी खर्च कमी करणे ही आपली प्राथमिकता असेल असे म्हटले तरी प्रत्यक्षात मात्र तसे केले नाही. याबाबतीत रेगन यांच्याविषयी "he talked better than he walked" (इंग्लिशमध्ये वॉक द टॉक या म्हणीला अनुसरून) असे म्हटले गेले होते. जर रेगनसारख्या प्रचंड लोकप्रिय अध्यक्षांना ते करणे जमले नसेल तर मोठ्या प्रमाणावर विरोध होत असलेल्या ट्रम्पतात्यांसारख्या अध्यक्षांना तसे करणे कठिणच जायची शक्यता बरीच जास्त.
या करतरतुदींमध्ये एक विचित्र तरतूद आहे असे माझ्या एका मित्राच्या फेसबुक भिंतीवर पाहिले. अमेरिकेत समजा पी.एच.डी विद्यार्थ्यांना दरवर्षी २५ हजार डॉलर्स शिष्यवृत्ती मिळत असेल तर आतापर्यंत त्यांचे करपात्र उत्पन्न २५ हजार डॉलर्स इतकेच असायचे. पण या तरतुदीनुसार त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आणि त्याचबरोबर ट्यूशन वेव्हर या दोन्ही गोष्टींचा समावेश करपात्र उत्पन्नात करण्यात येणार आहे. अमेरिकन विद्यापीठांच्या फी वर्षाला ५० हजार डॉलर्स पर्यंत असतात. निदान चांगल्या विद्यापीठांच्या तर नक्कीच. या विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्तीचे पॅकेज मिळते त्यात वर्षाला २५ हजार शिष्यवृत्तीबरोबरच ५० हजार डॉलर्स फीमाफी पण असते. या नव्या तरतुदीप्रमाणे मग त्या विद्यार्थ्यांचे उत्पन्न वर्षाला ७५ हजार डॉलर्स धरले जाईल असे त्या फेसबुक पोस्टमध्ये वाचले आणि त्याला काही अमेरिकनांनी दुजोराही दिला होता हे पण वाचले. याविषयी आणखी खोदाखोद केली तेव्हा https://www.cnbc.com/2017/11/16/house-gop-tax-plan-could-increase-taxes… यावर हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हजने पास केलेल्या बिलात ही तरतूद आहे (पण सिनेटच्या बिलात नाही) असे दिसते. हे खूपच धक्कादायक आहे. कारण करपात्र उत्पन्न ७५ हजार डॉलर्स असेल तर मुळातल्या २५ हजारांपैकी या विद्यार्थ्यांच्या हातात फार पैसे शिल्लक राहणार नाहीत. एकूणच पी.एच.डी करताना विद्यार्थ्याला आपला जेवाखायचा आणि राहायचा खर्च कसा भागवायचा ही चिंता करावी लागू नये आणि पूर्ण लक्ष संशोधनाकडेच देता यावे म्हणून या शिष्यवृत्तीच्या पॅकेजची रचना केलेली असते. मुळातल्या त्या कल्पनलेच ट्रम्पतात्यांच्या या तरतुदीमुळे सुरूंग लागू शकेल.
काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत अर्ज भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत (आज) केवळ राहुल गांधी यांचाच अर्ज दाखल करण्यात आला. डमी उमेदवार म्हणून कोणालातरी उभे केले जाईल ही शक्यता मला वाटत होती तसे काही झालेले दिसत नाही.
काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधी बिनविरोध निवडून गेल्याचे थोड्या वेळातच जाहिर केले जाईल.
https://www.ndtv.com/india-news/rahul-gandhi-could-be-congress-presiden…
राहुल गांधी यांचे अभिनंदन.
पाकिस्तानात 'हिंदुस्तान जिंदाबाद' म्हणणार्या तरूणाला अटक झाली आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-new…
आपल्या देशाचे तुकडेतुकडे व्हावेत आणि आपल्याच देशातील हजारो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या शत्रूदेशाचे गुणगान करणे याला आपल्याकडचे बुबुडाविपुमाधवि अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणतात. त्यातलेच काही बुबुडाविपुमाधवि भारतात मुख्यमंत्रीही बनतात. हे असले थर्डक्लास लोक पाकिस्तानात नसतील तर इतर कुठल्याही बाबतीत नसला तरी या बाबतीत मात्र पाकिस्तानचा हेवा वाटतो.
भारतात राहून व भारतीय नागरिकत्व असून भारताला शिव्या दिल्या नाही व पाकिस्तानचे कौतुक केले नाही तर निधर्मी, उदारमतवादी, पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकी, लोकशाहीवादी, मानवतावादी आणि विचारवंत तो फाऊल धरतात.
खांग्रेस आणि खांग्रेसी किती नीच आणि नालायक आहेत हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं. अनेक दशकांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल ३० सप्टेंबर २०१० या दिवशी उच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याविरूद्ध संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. तब्बल ७ वर्षे त्यावर काहीही हालचाल झाली नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न कायमचा सोडवायचा ठरविले आहे. त्यानुसार ५ डिसेंबर २०१७ पासून दररोज सुनावणी करून या प्रकरणावर निकाल द्यायचे सर्वोच्च न्यायालयाने निश्चित करून सर्व पक्षकारांना काल न्यायालयात बोलाविले होते.
परंतु सुनावणी सुरू झाल्यावर लगेचच मुस्लिम संघटनांचे वकीलपत्र घेतलेल्या कपिल सिब्बल नावाच्या अत्यंत नीच वकीलाने अनेक विचित्र प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी जुलै २०१९ पर्यंत पुढे ढकलावी अशीही मागणी त्याने केली. मुळात जे प्रकरण ५०-६० वर्षे प्रलंबित आहे त्याची सुनावणी अजून २ वर्षे का पुढे ढकलायची? आज मुस्लिम संघटनांनी हे स्पष्ट केले की त्यांनादेखील हा खटला लवकरात लवकर संपायला हवा आहे व सिब्बलने अशी विचित्र मागणी का केली हे त्यांच्या लक्षात येत नाही. हा प्रश्न कधीही सुटु नये व कायमच प्रलंबित रहावा हीच खांग्रेसची इच्छा आहे हे स्पष्ट आहे.
इतर अनेक प्रकरणांसारखे खांग्रेसी या प्रकरणातही डबलगेम खेळ्त आहे. एकीकडे पप्पू वेगवेगळ्या देवळांना भेटी देऊन मी जानवेधारी हिंदू आहे असे जाहीर सांगत आहे तर दुसरीकडे आपल्याच पक्षाच्या सिब्बलला मुस्लिम संघटनांची वकिली करायला लावून श्रीराम मंदीराला विरोध करीत आहे. काही महिन्यांपूर्वी मुस्लिम महिलांच्या तात्काळ तिहेरी घटस्फोट खटल्यातही तिहेरी घटस्फोट देण्याची क्रूर प्रथा रद्द करायला विरोध करणार्या मुस्लिम संघटनांचा वकील सिब्बलच होता. एकीकडे आम्ही मुस्लिम महिलांच्या हक्काच्या बाजूने आहोत असे सांगत फिरायचे व दुसरीकडे आपल्याच पक्षाच्या सिब्बलला न्यायालयात पाठवून मुस्लिम महिलांना त्यांचे हक्क मिळवून द्यायला विरोध करायचा. असा डबलगेम खेळून जनतेची फसवणूक करण्यातच इतकी वर्षे खांग्रेसींनी धन्यता मानली.
देशद्रोही घोषणा देणार्या कन्हैया कुमारचा वकील सिब्बलच, देशद्रोही चिथावणी देणार्या हार्दिक पटेलचा वकील सिब्बलच, केरळमधील अखिला लग्न व धर्मांतर करणार्या लव्हजिहाद प्रकरणातील अखिलाच्या मुस्लिम नवर्याचा वकील सिब्बलच, तिहेरी घटस्फोट रद्द करायला विरोध करणार्या मुस्लिम व्यक्तिगत मंडळाचा वकील सिब्बलच आणि आता अयोध्येतील श्रीराम मंदीर निर्माणाला विरोध करणार्या मुस्लिम संघटनांचा वकील सुद्धा सिब्बलच आहे. हा अत्यंत नीच माणूस अतिशय योग्य पक्षाचा प्रतिनिधी आहे. भारताला लागलेली ही खांग्रेसी कीड जितकी लवकर नष्ट होईल तितके ते भारतासाठी चांगले होईल.
वरच्या यादीत अजून एक भर.
गुजरातमधील २००२ च्या दंगलीतील साक्षीदारांना खोटी साक्ष द्यायला लावण्याचा आरोप असलेल्या तिस्ता सेटलवाडचा वकीलसुद्धा सिब्बलच आहे.
सुनावणीत केस हरण्याची शक्यता खूप जास्त वाटत असल्याने आणि त्याचा राजकीय फायदा भाजप ला होणार असा अंदाज आल्याने अतिशय हुशार पण धूर्त आणि पाताळयंत्री अशा कपिल सिब्बल यांनी हि सुनावणी २०१९ च्या निवडणुकी नंतर घेण्याची विनंती केली आहे असेच दिसते.
BJP received the highest amount of donations among national parties in 2014-2015 and declared a total of Rs 437.35 crore
या पैकी केवळ २.५ कोटी हे म्हशीचे मांस विक्रेत्याकडून आलेले आहेत.
केवळ मोदी द्वेषासाठी आपल्याला पाहिजे तेवढेच उचलून द्यायचे हि वृत्ती निम्न आहे.
मोगा खान
तुम्ही स्वतःला डॉक्टर म्हणवता मग राजकारणावर नुसत्या पिचक्या टाकण्यापेक्षा वैद्यकीय विषयावर काहीतरी विधायक लेख लिहा. चार लोकांचा फायदा तरी होईल आणि तुमचा न्यूनगंड पण कमी होईल.
भाजप राज्यावर आला आणि गोवंश हत्या बंदी झाली यामुळे यांच्या घरातील पैशाचे झाड वाळून गेले आहे म्हणून एवढा भाजप द्वेष आणि दाढी कुरवाळणे आहे
झाडाची 'काळजी ' आहे म्हटलं मायबाप सरकारला. https://www.google.co.in/amp/s/m.timesofindia.com/india/centre-to-withd…
तंतारल्यावर लागले दाढी कुरवळायाला.
केंद्र सरकारचा नोटाबंदी, बीफ बंदी आणि GST वर चाललेला 'चाचाचा' बघताना अंमळ करमणूक होत आहे.
मार्मिक गोडसे,
पहिल्याप्रथम तुमच्या करमणुकीवर पाणी फिरवल्याबद्दल क्षमा असावी.
हत्येसाठी पशूविक्रीवर असलेली बंदी सरकारने आपणहून उठवली नसून सदर शासकीय अधिसूचनेस (=नोटिफिकेशन) न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शासन तिची सुधारित आवृत्ती काढीत आहे.
आ.न.,
-गा.पै.
पशूविक्रीवर असलेली बंदी सरकारने आपणहून उठवली नसून सदर शासकीय अधिसूचनेस (=नोटिफिकेशन) न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शासन तिची सुधारित आवृत्ती काढीत आहे.
हे मला माहीत आहे हो, परंतू असल्या अधिसूचना काढताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती की 'चाचाचा' करायची हौस भागवून घ्यायची होती?
माझी कशाला माफी मागताय? ह्या सरकारच्या मूर्खपणामुळे ज्या निरपराध लोकांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबांची माफी मागा.
अरेरे मा.गो.!
तुमची माफी मागितल्याचा राग आलेला दिसतोय. काही हरकत नाही. माफी मागितल्याची माफी मागतो. दिल खुश? हां तर काय म्हणंत होतो आपण ! शासनाने अक्कल गहाण ठेवली होती का? ओके. बहुतेक हो. अन्यथा तुमचं अंमळसं मनोरंजन कसं झालं असतं? म्हंजे त्याचं काये की अक्कल आहे म्हणूनंच गहाण ठेवता येतेय नाही का? जर नसती तर काय गहाण ठेवणार होतं सरकार? मग तुमचं मनोरंजन देखील झालं नसतं ना. बघा सरकार कित्ती कित्ती काळजी घेतंय तुमची. शिवाय ही करमणूक वसेकमुक्त आहे बरंका.
आणि काय हो, सरकारच्या या तथाकथित मूर्खपणामुळे कुणाचे प्राण गेले? काही विदा मिळेल का? की आपलं रागाच्या ( = पप्पूच्या ≠ क्रोधाच्या ) भरात ठोकून दिलंय?
आ.न.,
-गा.पै.
https://thewire.in/200905/cattle-slaughter-ban-bjp/
Modi Government Likely to Withdraw Controversial Cattle Slaughter Ban.
गोव्यातील भाजपा सरकारने गोव्यात गोमांस कधीही कमी पडू देणार नाही , असे आधीच जाहीर केले आहे.
पूर्ण कविता द्या.
कविता कुठे आहे ती माहिती दिली आहे ना?
मग स्वतः पहा कि.
आणि कुठे ते केशव कुमार सार्थ जन्मले मी हिंदुकुळी
आले मोदी बसून कमळी
आणि कुठे हे केशव सुमार
हसून हसून मुरकुंडी वळली.
जेंव्हा ह्यांचे सरकार नव्हते , तेंव्हा ते बोल्ले की आमचा सत्ता नाही , नाहीतर लगेच मंदिर बांधून दाखवले असते.
मग ह्यांचे सरकार आले , तर बोलले की सरकार कडबोळे आहे , आमची पूर्ण सत्ता नाही.
आता पूर्ण सत्तेत आले , तर ह्यांचे मुखिया बोल्ले मंदिर नको , शौचालय बांधू.
आता बोलतात की कपिल सिब्बल आडवा येतोय म्हणून !
प्रत्येक वेळी नवे रूप ! मारिचही लाजून काळा झाला असेल !!
तरी तुमच्यासारखे लोक सेक्युलॅरिजम राहिला नाही म्हणून कोल्हेकुई चालू करतील. शिवाय एवढे पैसे असतील तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं म्हणणारे राजे असतीलच. त्यापेक्षा शौचालय बांधलेलं बरं. तुमच्यासारखे लोक मिपा वरची हाXXXदारी तरी बंद करतील!
तुम्ही कशाला पिचकाऱ्या मारत आहात???
ज्या तुम्ही कोल्हेकुई म्हणत आहात त्याला आपले लष्करप्रमुख धर्मनिरपेक्ष वातावरणात कार्यरत असताना संरक्षण दल उत्तम काम करतात असे म्हणतात.
बघा पटतय का ?
पंप्र ना नीच बोलल्याबद्दल मणिशंकर काँग्रेसमधून निलंबित.
भाजप आणि पंतप्रधानांकडून पातळी सोडून टीका होत असली तरी त्यावर अशा भाषेत प्रत्युत्तर देणे ही काँग्रेसची संस्कृती आणि परंपरा नाही. मणिशंकर यांनी जी भाषा वापरली आहे, त्याबद्दल माफी मागायला हवी, अशा शब्दांत राहुल यांनी मणिशंकर यांना बजावले होते. त्यानंतर मणिशंकर यांनीही माध्यमापुढे बोलताना माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणाने पक्षाचे समाधान झाले नसून मणिशंकर यांना थेट कारणे दाखवा नोटीसच बजावण्यात आली आहे. त्यासोबतच मणिशंकर यांचे प्राथमिक सदस्यत्वही काँग्रेसने निलंबित केले आहे.
या मणीशंकर अय्यरना काँग्रेसने निलंबित करण्याइतके महत्वाचे प्रकार अनेकदा झाले होते. पाकिस्तानात जाऊन मोदी सरकारला हटवायला मदत मागणे, पॅरीसमध्ये चार्ली हेब्डो हत्याकांडासारख्या घृणास्पद घटनेचे समर्थन करणे वगैरे गोष्टी यापूर्वीही झाल्या होत्या. तरी त्यावेळी अय्यरना हाकलावेसे असे काही काँग्रेसला वाटले नव्हते. पण आता गुजरात निवडणुकांच्या तोंडावर हाकलले जात असेल तर अय्यर बरळले त्याचा आपल्याला नक्कीच फटका बसू शकेल हे लक्षात येऊन काहीतरी करून दाखविले पाहिजे म्हणून काँग्रेसने त्यांना हाकललेले दिसते.
अन्यथा काँग्रेस 'नीच' या एका उद्गारावरून कोणाला हाकलणारा सुसंस्कृत पक्ष नक्कीच नाही.
सगळ्यात जास्त संताप, त्याने जेन्व्हा स्वातंत्र्यविरांचा अपमान केला होता तेंव्हा आला होता. पण तेंव्हा काहीच झाले नाही, त्यामुळे तर अजुनच उद्वीग्न व्हायला झाले होते.
भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले भाजप खासदार नाना पटोले यांनी पक्षाचा आणि लोकसभा सदस्यत्वाचा अखेर राजीनामा दिला आहे. ते गेल्या अनेक महिन्यांपासून नाराज होते आणि त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली पण होती. त्यामुळे त्यांची गच्छंती अपेक्षित होती. तरीही त्यांनी राजीनामा दाखवायचे धैर्य दाखविले. मी राजीनामा खिशात घेऊन फिरत आहे असे काही नुसते बोलत राहिले नाहीत.
आता सिन्हाद्वय-- यशवंत आणि शत्रुघ्न नाना पटोलेंचा आदर्श ठेवतात का हे बघायचे.
मणीशंकर अय्यर यांनी टाकलेल्या फुलटॉसवर मोदी तुटून पडले आहेत. अहमदाबादमध्ये प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले: "त्यांनी काल मला पहिल्यांदाच 'नीच' म्हटलेले नाही. सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही असे केलेले आहे. मी नीच का आहे?, कारण मी गरीब म्हणूनच जन्मलो, कारण मी खालच्या जातीतील आहे, कारण मी गुजराती आहे? ते माझा द्वेष करण्याचे हेच कारण आहे का?"
ही संधी मणीशंकर अय्यर यांनी स्वतःच्या कर्माने मोदींना दिली आहे. आता तक्रार करून उपयोग होणार नाही :) हे प्रकरण काँग्रेसला महागात पडू दे ही सदिच्छा.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pm-modi-attacks-cong…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग झाले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलेच होते. सुदैवाने ते हेलिकॉप्टर फार उंच गेले नव्हते त्यामुळे अनर्थ झाला नाही. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन भरले गेल्यामुळे हा प्रकार झाल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांसारख्या महत्वाच्या व्यक्तीच्या हेलिकॉप्टरबाबत असा हलगर्जीपणा होणे अक्षम्य आहे.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बरोबरच्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी.
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-mahara…
चरबी वाढली होती ना? अजुन १४-१६ किलो कमी करायचे टारगेट आहे. हेलिकॉप्टरने तीच सूचना केली. आणि कसला द्वेष घेवून बसलाय. विनोदावर फक्त तुमचीच मक्तेदारी आहे का? इतका हळवेपणा बरा नाही.
रिपब्लिक टिव्हीवर बातमी आली आहे की ६ तारखेला मणीशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानी हायकमिशनरची आणि २६/११ च्या वेळचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी 'गुप्त' भेट घेतली. http://www.republicworld.com/s/15256/meeting-between-pak-and-congress-r…
एका माजी पंतप्रधानाने पाकिस्तानसारख्या देशाच्या हायकमिशनरची आणि माजी परराष्ट्रमंत्र्याची गुप्त भेट का घेतली असावी? समजत नाही. आणि ही भेट गुप्त ठेवायची काय गरज होती? अशा मोठ्या पदावर गेल्यावर स्वतःचे खाजगी आयुष्य असे काही राहात नाही आणि अशा लोकांचे आयुष्य हीच एक 'खुली किताब' बनते. त्यातही डोकलाम प्रकरण गरम असताना राहुल गांधींनी चीनच्या वकिलांना भेटायच्या पार्श्वभूमीवर आता मनमोहनसिंग पाकिस्तानच्या हायकमिशनरला भेटले अशी बातमी आली आहे. काय चालू काय आहे?
या प्रकाराचा उलगडा झाला नाही तर मनमोहनसिंग यांच्याविषयी जो काही थोडाथोडका आदर शिल्लक होता तो पण धुळीला मिळेल हे नक्कीच.
आणि मनमोहनसिंग यांच्यासारख्या विद्वानाला त्या मणीशंकर अय्यर सारख्या माणसाचे इतके प्रेम का असावे हेच समजत नाही.युपीए सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये मणीशंकर अय्यर यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा यासाठी मनमोहन आग्रही होते असे त्यावेळी पेपरात आले होते.
गंमतच बुवा ! पाकिस्तानचा माणूस बिन व्हिसाचा येउन गेला का ? आणि व्हिसा जरी दिला होता तरी इतका महत्वाचा माणूस कोणत्याही सिक्युरिटीशिवाय फिरला ? आणि सरकारला पत्ताच नाही , टीव्हीवाल्याना मात्र समजले !
मोगा खान
कोणताही मागचा पुढचा विचार न करत केवळ पिचक्या टाकायचा हा तुमचा खाक्या आहेच.
पण एखाद्या व्यक्तीला व्हिसा दिला म्हणजे त्याने येऊन तुमच्या राजनैतिक व्यक्तीला भेट द्यायची परवानगी दिली ती सुद्धा त्याच्या घरी असे होत नाही.
कोणत्याही सिक्युरिटीशिवाय फिरला ?
हा निवृत्त माणूस आहे त्याला पाकिस्तान सरकारने विनंती केली तरच सुरक्षा पुरवली जाईल.
सरकारला पत्ताच नाही.
हे अनुमान कसे काढले आपण ?
रिकाम्या डोक्यात येईल ते लिहीत सुटता तुम्ही.
लष्करात असलेला काश्मिरी अधिकारी सुद्धा सुटीवर गेला तर त्याच्यावर पाळत ठेवणारी गुप्त हेर यंत्रणा निवृत्त पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री कुठे जातो काय करतो इतक्या साध्या गोष्टीवर लक्ष ठेवणार नाही का?
केवळ टीका करायची म्हणून काहीही?
पाकिस्तानचा कुणीतरी सर्वेसर्वा मोदींच्या कार्यकाळात दिल्लीत येउन फिरून गेला , कुणाला पत्ताच नाही.
याचा जाब कुणी कुणाला विचारायचा ?
मनमोहननी मोदींना की मोदींनी मनमोहनना ?
भक्तो ! कोई तो जबाब दो !!
प्रतिक्रिया
अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
आदूबाळ म्हणू नका...
In reply to अलाहाबाद (उत्तर प्रदेश) by श्रीगुरुजी
गुजरातमध्ये सत्तेत आल्यास शिवसेना कर्जमाफी देणार
In reply to अलाहाबाद (उत्तर प्रदेश) by श्रीगुरुजी
राहूल गांधी यांचं काँग्रेस अध्यक्षपदासाठीचं आवेदन आज भरलं जाणार
राहुल गांधी यांना "कॉंग्रेस
शेहजाद पूनावालांचे ट्विट
अध्यक्ष झाल्यानंतर तरी
In reply to शेहजाद पूनावालांचे ट्विट by गॅरी ट्रुमन
अमेरिकेतील करसवलती
काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधी
...
In reply to काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधी by गॅरी ट्रुमन
लोकशाहीचा संबंध नाही
In reply to ... by babu b
कशाला उगीच म्हशीला काळं
In reply to लोकशाहीचा संबंध नाही by गामा पैलवान
कशाला उगीच म्हशीला काळं
In reply to कशाला उगीच म्हशीला काळं by सुबोध खरे
राहूल गान्धीन्चा 'गणित' चुकला
पाकिस्तानात 'हिंदुस्तान जिंदाबाद' म्हणणार्या तरूणाला अटक
बुबुडाविपुमाधवि
In reply to पाकिस्तानात 'हिंदुस्तान जिंदाबाद' म्हणणार्या तरूणाला अटक by गॅरी ट्रुमन
भारतात राहून व भारतीय
In reply to पाकिस्तानात 'हिंदुस्तान जिंदाबाद' म्हणणार्या तरूणाला अटक by गॅरी ट्रुमन
हाच तो कुचकटपणा ..
In reply to भारतात राहून व भारतीय by श्रीगुरुजी
शॉर्टफॉर्म
विज्ञानवादी...
In reply to शॉर्टफॉर्म by गॅरी ट्रुमन
आयला
In reply to शॉर्टफॉर्म by गॅरी ट्रुमन
म्हणे बाबरी पडली
खांग्रेस आणि खांग्रेसी किती
गुरुजी
In reply to खांग्रेस आणि खांग्रेसी किती by श्रीगुरुजी
वरच्या यादीत अजून एक भर.
In reply to गुरुजी by सुबोध खरे
सुनावणीत केस हरण्याची शक्यता
In reply to वरच्या यादीत अजून एक भर. by श्रीगुरुजी
सिब्बलचा बीफ व्यवसाय वाळला.
In reply to गुरुजी by सुबोध खरे
इतर निर्यातदारांचा
In reply to सिब्बलचा बीफ व्यवसाय वाळला. by babu b
असतील.
In reply to इतर निर्यातदारांचा by गामा पैलवान
BJP received the highest
In reply to असतील. by babu b
...
In reply to BJP received the highest by सुबोध खरे
मोगा खान
In reply to सिब्बलचा बीफ व्यवसाय वाळला. by babu b
भाजप राज्यावर आला आणि गोवंश
In reply to गुरुजी by सुबोध खरे
हत्यार्थी गोवंशविक्री
In reply to भाजप राज्यावर आला आणि गोवंश by मार्मिक गोडसे
पशूविक्रीवर असलेली बंदी
In reply to हत्यार्थी गोवंशविक्री by गामा पैलवान
माफी मागितल्याबद्दल माफी
In reply to पशूविक्रीवर असलेली बंदी by मार्मिक गोडसे
...
In reply to गुरुजी by सुबोध खरे
व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी
पूर्ण कविता द्या.
In reply to व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी by सुबोध खरे
पूर्ण कविता द्या.
In reply to पूर्ण कविता द्या. by babu b
...
<<<मारिचही लाजून काळा झाला
In reply to ... by babu b
मंदिर बांधलं,
In reply to ... by babu b
तुम्ही कशाला पिचकाऱ्या मारत
In reply to मंदिर बांधलं, by mayu4u
लैच मळमळतंय तुम्हाला!
In reply to तुम्ही कशाला पिचकाऱ्या मारत by विशुमित
ते काम त्यांनी १९९२ मधेच
In reply to ... by babu b
...
अरेरे वाईट झालं.
In reply to ... by babu b
मणिशंकर अयर,
In reply to ... by babu b
चूकून "पंतप्रधानांना नावे
In reply to ... by babu b
@@@ :: पंप्र ना नीच
गा पै :-)
....
लढवलेल्या केसेसचे असे प्रकार
In reply to .... by babu b
अय्यर
सगळ्यात जास्त संताप, त्याने
In reply to अय्यर by गॅरी ट्रुमन
सहमत आहे
In reply to अय्यर by गॅरी ट्रुमन
नाना पटोलेंचा राजीनामा
दुरूस्ती
In reply to नाना पटोलेंचा राजीनामा by गॅरी ट्रुमन
मणीशंकर अय्यर यांचा फुलटॉस
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग
श्री देवेंद्र फडणवीस यांनी
'चरबीने' वजन वाढलं असेल तर
कमी केलेलं वजन हे "चरबीचंच"
चरबी वाढली होती ना? अजुन १४
..
In reply to चरबी वाढली होती ना? अजुन १४ by मार्मिक गोडसे
मनमोहन- मणीशंकर अय्यर-कसुरी गुप्त भेट
...
In reply to मनमोहन- मणीशंकर अय्यर-कसुरी गुप्त भेट by गॅरी ट्रुमन
मोगा खान
In reply to ... by babu b
...
In reply to मनमोहन- मणीशंकर अय्यर-कसुरी गुप्त भेट by गॅरी ट्रुमन