Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वैभवदातार on Tue, 12/05/2017 - 11:04
अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे खूप पाऊस पडतो आहे. अवकाळी पावसाचा पिकांवर वाईट परिणाम होईन खूप नुकसान होते आहे. बळीराजाच्या मनातील व्यथा मी शब्दबद्ध केली आहे... नको नको रे पावसा घालू अवेळी धिंगाणा नको हिरावून नेऊ माझा मोतियाचा दाणा कष्ट करुनि शनिवारी येते मातीतून पीक थांब थांब रे पावसा माझी हाक तू ऐक छोटी छोटी माझी पिल्ले उभी भुकेली माझ्या दारी पोट भरीन मी त्यांचे दाणे विकून बाजारी वर्ष भर मी राबून सोने शेतात उगले तुझ्या अवेळी येण्याने कोळसे त्याचे झाले तुझ्या अवेळी येण्याला माणूस कारण आहे निसर्ग संपत्तीचा ऱ्हास त्याने केला आहे आता येतील शेतात समाजावण्या मंत्रीगण दाखविती जागा सारे कसा नाही शिल्लक कण कोटी कोटी उड्डाणे होती आता पैशाची दाखविती मंत्री सारे किती काळजी शेताची त्यांचे पैसे आश्वासने हवेत विरून जाती रिकामी माझी झोळी नाही दमडी माझ्या हाती विनवितो मी बळीराजा थांबव वर्षांबाण पुन्हा उठून उभा राही भरून काढण्या नुकसान --शब्दांकित (वैभव दातार ) ५ डिसेंबर २०१७

Submitted by कपिलमुनी on Tue, 12/05/2017 - 14:10

Permalink

छान कविता

सध्या द्राक्षाबाग मालकांची अवस्था अशीच आहे . बाकी ही कविता वाचून ||नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी : घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली || या इंदिरा संतांच्या कवितेची आठवण झाली
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Tue, 12/05/2017 - 14:20

Permalink

ती शनिवारी कष्ट करण्याची काय

ती शनिवारी कष्ट करण्याची काय भानगड आहे? अन् ते मीटरचं तेवढं मनावर घ्या राजे..!
  • Log in or register to post comments

Submitted by गबाळ्या on Wed, 12/06/2017 - 00:52

In reply to ती शनिवारी कष्ट करण्याची काय by खेडूत

Permalink

सहज वाटले म्हणून...

अन् ते मीटरचं तेवढं मनावर घ्या राजे..!
केवळ हे वाचल्या वाचल्या मनात आले म्हणून लिहितोय. मूळ कवी आणि कवितेवर कोणत्याही प्रकारची टीका करण्याचा उद्देश नाही. "अन् ते मीटरचं तेवढं मनावर घ्या राजे..!" हेच कोणी कोणी कशा शब्दात सांगितले असते? निळू फुले : "भाई, मीटरवर या!" कवी वा. भा. पाठक : "खबरदार जर चाल सोडुनी ल्ह्याल पुढे 'मुखड्या' वाचीन कधी कधीच थोड्या" आणखी कोणी ?
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त्_यात्री on Tue, 12/05/2017 - 15:32

Permalink

||कधी तरी रे पावसा घाल धिंगाणा अवेळी ||

||कधी तरी रे पावसा घाल धिंगाणा अवेळी || ईक्षुदंडातुनी बघ झाली प्रतिभा मोकळी..........
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 12/05/2017 - 17:06

Permalink

शनवारी कष्ट करुन पीक येण्याचं

शनवारी कष्ट करुन पीक येण्याचं जरा बैजवार सांगा राव!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 12/05/2017 - 17:48

In reply to शनवारी कष्ट करुन पीक येण्याचं by सूड

Permalink

त्यांच्या म्हणण्याचा अर्थ

त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असावा की शनि म्हणजे दि. २ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पीक बाहेर काढून ठेवले आणि रविवारी म्हणजे दि. ३ डिसेंबर रोजी ते पीक ओखी चक्रीवादळाच्या कचाट्यात सापडून होत्याचे नव्हते झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 12/05/2017 - 18:50

In reply to त्यांच्या म्हणण्याचा अर्थ by प्रचेतस

Permalink

खिक्क...

.....ते दिसे वल्लीला. =)) Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 12/05/2017 - 22:24

In reply to खिक्क... by चांदणे संदीप

Permalink

संदीपा

तुझी माझी निव्वळ धूरदृष्टी, यांची (सर्व) दूर.... पिटातल्या प्रेक्षकांना साक्षीदार नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 12/06/2017 - 12:33

In reply to त्यांच्या म्हणण्याचा अर्थ by प्रचेतस

Permalink

असंय होय. आज तर मला चतुर

असंय होय. आज तर मला चतुर चाणक्य यांची उणीव अगदीच प्रकर्षाने जाणवत्ये.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2073 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com