infinity
त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते. दूरवर कुत्री भुंकत होती. मधूनच एक रानडुक्कर पळालं आणि मी सिगारेट काढली.
सिगारेट! एक सिगारेट! बस एक सिगारेट! सालं पेटवायला माचीस नाही.
चरफडत चालत राहिलो. इथली शांतता किती भयाण आहे. कुण्या एकेकाळी वापरात असलेली आणि जिचा भयानक अपघात झाला असावा अशी वाटणारी एक मालगाडी यार्डात उभी होती. प्लॅटफॉर्मवर एक माणूस दिसेल तर शप्पथ. दिवे मात्र अजूनही जळत होते. लख्ख प्रकाश.
बघितलं तर एक छोटसं स्टेशन पण टापटीप दिसत होतं. मी प्लॅटफॉर्मवर चढलो. एका बाकड्यावर एक मुलगी बसलेली आढळली. पॉश वाटत होती. मोठ्या शहरातली असावी. कानात हेडफोन घालून गाणी ऐकत बसलेली.
"ओ मॅडम.." मी आवाज दिला. पण ढिम्म हलली नाही.
मग मी बराच जवळ गेलो. एक उच्च पर्स तिच्या जवळ होती. विशेष म्हणजे एवढ्या थंडीत तिने जॅकेट घातले नव्हते.
"ओ मॅडम... कुठं जायचंय..?" यावेळी मी जरा जोरातच आवाज दिला.
अचानक तिनं माझ्याकडे बघितलं. "what the hell. कौन है आप?" कानातले हेडफोन काढून तिनं विचारलं.
"क्या चाहिए?"
"कुछ नही बस, आप अकेली यहा नजर आयी. सोचा कुछ प्रॉब्लेम है.." मी एका खांबाला रेलून उभारलो.
"नही तो. मगर आप यहा क्या कर रहे है?" बाकड्याजवळ उभी राहून ती थेट माझ्या डोळ्यात बघत होती.
"सॉरी मै भूल गया मै यहा क्यू आया था.. आप कही जा रही है?"
"हा. रात देड बजे की ट्रेन है.."
"यानी की अभी एक घंटा बाकी है.." मी घड्याळाकडे बघितलं.
"वो तो है.." ती आता सावरली असावी.
"देखा जाए तो, ऐसे सुनसान जगापे अकेले रहना ठिक नही है.. " मी मगाचीच ती सिगारेट बाहेर काढली.
"जानती हू.. मगर क्या करे.." ती खांदे उडवत म्हणाली. थोडीशी हसलीही. असं वाटत होतं ती डोळ्यांनीच बोलत होती. थेट धडक पाहत होती.
"अगर आप चाहे तो मै यहा रूक सकता हू. आपकी ट्रेन जो है.." कळस आहे हा. एवढ्या थंडीत एक गोड मुलगी पुढे आहे. आणि सिगारेट पेटवायचा माचीस नाही.
"नहीं उसकी कोई जरूरत नही. मगर आपके पास अगर वक्त है तो आप रूक सकते है.."
"अगर आप चाहे, तो मै पूरी रात यहा रूक सकता हू..." मी तिच्या नजरेला नजर भिडवत म्हणालो. थेट. धडक.
तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला गेला. रूमालाने तोंड पुसत आतून एक हँडसम वाटावा असा एक तरुण बाहेर आला.
"कुछ प्रॉब्लेम है?" त्यानं तिच्याकडेच बघत विचारलं. तिचे डोळे मात्र थेट माझ्या काळजाला भिडत होते. मी हाताची घडी करून खांबाला रेलून तसाच उभा होतो.
"टिया, क्या वो यहा है?" अतिशय दबक्या आवाजात तो पुटपुटला. तीनं केवळ मान हलवली.
"कहॉ? कहॉ खडा है वो?" आजूबाजूला नजर फेकत तो म्हणाला. एक बोट माझ्याकडे दाखवत ती स्तब्ध हसली.
त्याने भेदक नजरेनं माझ्याकडे पाहिलं. "क्या वो हमे देख रहा है?"
"जी" तिच्या चेहऱ्यावर अजूनही हास्य कायम होते.
"क्या बातचित हुयी तुम्हारी.. कुछ बोल रहा था?"
"बस.. यूही.. जान पहचान थोडा टाईमपास.." किती मनमोकळं बालते ही.
"क्या तुम जानती हो उसे?"
"नही विक्रम. जिंदगीेमे पहली बार इसे देखा है.." कुठेतरी हरवत चालल्यासारखी ती म्हणाली.
"मुझे लगता है अब हमे यहॉसे चलना चाहिए..." तिची पर्स उचलत तो म्हणाला "लेटस ग... लेटस गो.."
दूरवर पसरलेल्या प्लॅटफॉर्मवर ते सरळ चालत निघाले.तिच्या सँडलचा आवाज स्टेशनवर घुमत राहिला. टक ..टक ..... टक.. टक.. "ओ मॅडम... आपकी ट्रेन?" खांबाला रेलूनंच मी म्हणालो. तिनं मागं वळून केवळ एक हास्य दिलं.
पुन्हा एकदा स्टेशन शांत झालं. अवजड बोजड मालगाडीचे डबे अंधारात किती विचित्र दिसतात. तो तरूण, विक्रम का कुणी किती विचित्र होता. त्याला मी दिसतंच नव्हतो. म्हणजे मी काय त्या मुलीलाच फक्त दिसू शकतो? कसं शक्य आहे? कोण आहे मी? तिचा केवळ एक भ्रम?
माझी छाती धडधडू लागली. पाय लटपटायला लागले. थंडी एवढी वाजायला लागली की मेंदू गारठून गेला. मी सिगारेट काढली. एक माचीस! एक माचीस नाही हिला पेटवायला....
"गेली का ती?" मला अगदीच जवळून आवाज आला. मी बघितले. माझी बायको जवळ उभी होती.
"तू इथं कधी आली?"
"मी इथेच आहे. पूर्णवेळ मी इथेच उभी होते. तुझ्या शेजारी.." खांद्यावरची पर्स सावरत ती म्हणाली.
"तू माझा पाठलाग केलास.." मी नापसंती दर्शवत म्हणलो.
"त्याशिवाय इलाज नाही." ती माझ्या समोरंच येऊन उभी राहिली. दबक्या आवाजात डोळे भिडवत म्हणाली. "ती अजून इथेच आहे की गेली?"
ती नक्की कशाबद्दल विचारत होती याची मला पूर्ण कल्पना होती.
"त्या तिथे.. प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला गेलीय. तिच्याबरोबर.. एक तरूणपण होता " मी बोट दाखवत म्हणालो.
"बघताहेत का ते आपल्याकडे?" तो तरूण आणि ती मुलगी आता प्लॅटफॉर्मवरून उतरून पटरीवर चालत असल्याचे मला दिसत होते.
"मागे वळून बघितलं तिनं आत्ताच..."
"Don't worry विक्रम. it will be fine. आपल्याला आत्ता निघावं लागेल. लेटस गो. लेटस गो.." ती माझ्या हाताला ओढतंच म्हणाली. आम्ही चालत पोर्चमध्ये आलो.
"ऐक. माझी तुला एक रिक्वेस्ट आहे. मी एक माचीस विकत आणतो. मग आपण लगेच निघूया. सिगारेट न पिल्याने मला खूप विचित्र वाटतंय.."
"अरे इथे कुठे माचीस भेटणार?"
"डोन्ट वरी. आय वील बी राइट बॅक" रूळाच्या त्या बाजूला तरी एखादी पानटपरी असेलंच. मी पटरीवर उडी घेतली.
एक माणूस दिसेल तर शप्पथ. त्या बाजूला एकही दुकान उघडे नव्हते. मालगाडीचे तुटके फुटके डबे मात्र चौफेर पसरले होते. दूरवर थोडासा उजेड दिसत होता. किमान तिथेतरी मिळेल.
"मी तिकडे जाऊन येतो. तू इथेच थांब." मी पटरीवर चालत बायकोला म्हणालो.
"ओके.." प्लॅटफॉर्मवर ती शांतपणे उभी राहून म्हणाली.
मग मात्र मी चालतंच राहिलो. एक दोन वेळा मी मागे वळून पाहिलेसुद्धा. मला उगाचच वाटलं कि ती पाठीमागून येतेय.
त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते.
मी चालतंच गेलो. चालतंच राहिलो. चालून चालून पाय तुटायला आले. हा थेट लोहमार्ग आयुष्याचा सारीपाट बनून गेला आहे.
एक स्टेशन दिसलं .... तुटक्या फुटक्या मालगाडीचं.... स्टेशनवर बसलेली एक मुलगी....कानातले हेडफोन.... लख्ख प्रकाश..... मी खांबाला रेलून विचारलं....."मॅडम"
"what the hell. कौन है आप?"
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त!
वाह. मॅट्रिक्स?
सिझोफ्रेनियाच्या रुग्णांमधे,
भन्नाट कन्सेप्ट.
मस्तच .. मायाजाल
भन्नाट!
छान.
लय भारी :D
भन्नाट जव्हेरभाऊ
तंतोतंत सहमत
कसलं भारी सुचतं तुम्हाला..
जबरदस्त!!!
सही...
मस्त...
लूप???
ग्रेट!
छान
मस्स्त हो...
मस्त
मोजके शब्द + भन्नाट वातावरण
मस्तच!
ग्रेट
लै जबरदस्त .!!
अतिशय आवडली.
१ नं.
मला तर भूतच दिसते तुमची कथा
भारीच!
town of cats
ज!!!! ब!!!! र!!!!द!!!!स्त!!!
ज!!!! ब!!!! र!!!!द!!!!स्त!!!
जबरदस्त... एकदम आवडली!!! खूप
भारीच!
भारी
जबरीच एकदम