मैत्रिणीचा नवरा
परवा मैत्रिणीकडे गेलो होतो, तिचं लग्न ठरल्याचं कळलं होतं. तीने भेटायला सहजचं बोलावलं होतं, पण गाठ पडली तिच्या भावी नवऱ्याशी. बऱ्याच गप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या. मला फार प्रश्न पडतात बोलताना, की हं, हे झालं; आता काय बोलायचं? त्याला तसले काही प्रश्न पडत नव्हते. मुळात स्वत:बद्दलच फक्त बोलायचं असेल तर असले प्रश्न पडत नाही साधारणपणे.
तिच्या वडिलांना भेटलो नंतर. काका एकदम खुश. माझ्या पाठीवर गुद्दा मारत म्हणाले, “मग? कसा वाटला आमचा जावई?”
जे वाटलं ते सांगण्यासारखं नव्हतं आणि त्या ऐवजी वेगळं काही सांगण्याइतकी प्रतिभा नव्हती. त्याच्याशी झालेलं सगळं संभाषण नजरेसमोरून जायला लागलं.
पूर्णत: unbiased असा त्याला भेटलो. माझ्याशी होणाऱ्या पहिल्याच भेटीत साहेब तिच्या खांद्यावर हात टाकून बसले होते. मला ते जsssssरा खटकलं आणि मी biased झालो.
तो- मी अमुक अमुक ठिकाणी तमुक काम करतो.
मी- अरे वा, छानच. {मग?? विशेष काय त्यात}
तो- मला हे आवडतं, मला ते बनवायला येतं आणि हे फारंच छान जमतं.
मी- वा, अगं भारीचे तुझा मित्र. (त्या क्षणी देखील मी त्याला भावी नवऱ्याचा दर्जा दयायला तय्यार नव्हतो)
{ते बनवायला येत? लग्नानंतर तिलाच करायला लावशील ना पण??, छान जमतं? करून दाखव मग, तोंडची हवा कशाला दवडतोस}
हे आणि असं बरंच काही. शेवटी काकांना मी म्हणालो. “ती आनंदात राहील”. कारण तो कसा आहे हे मी सांगूच शकलो नसतो. का कोण जाणे, तो मला व्यक्ती म्हणून पटलाच नव्हता.
पण तीला हवं ते सगळं देऊ शकेल तो तीला; अशी एक समजूत मी करून घेतली.
त्यानंतरचा पुन्हा एक प्रसंग. दुसरी मैत्रीण. खूप वर्षांनी लग्न ठरलेली. मस्त स्वभाव. हुशार. मनात आणेल तर कुणीही पट्कन लग्नाला तयार होईल असं एकंदर व्यक्तिमत्व. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटलो.
अरे कसा आहे हा?? दुसरा कुणी मिळाला नाही का हीला इ. उद्गार नंतरच्या चहापानात मित्रांकडून उमटले (म्हणजे फक्त मलाच तो खटकला नव्हता तर).
म्हटलं असं का होतं? मैत्रिणीचा नवरा कायम व्हिलनच राहणार का आपल्या मनात. मी त्याला सहजासहजी accept का करू शकत नाही. त्याच्यातला खाचाखोचा का दिसतायत?
बर ह्या मैत्रिणींशी माझी फक्त मैत्रीच होती, आजही आहे. त्यामुळे “हृदयावर ठेच” सारखा प्रकार नव्हता.
मग मी जोरदारच विचार सुरु केला, ह्या माझ्या वागण्यावर.
अरे बारीक सारीक गोष्टी मला विचारणारी ही, एक दोन भेटीत त्याची झालीय. त्याने सांगितला तो मोबाईल फोन घेतला. मागच्या वेळी माझा फोन लागला नाही तर हीच laptop च्या दुकानात बसून राहिली होती. मी घे म्हणाल्यावरच laptop घेतला. तीच्यासाठी ट्युशन क्लासच्या शोधात मी वेड्यासारखा उन्हात फिरलो होतो. मी आहे म्हणून काकांनी बिन्धास्त लांबच्या ट्रीपला पाठवलं होतं.
आणि ही, रोज संध्याकाळी माझ्याशी गप्पा मारणारी, वेळ प्रसंगी हक्काने माझे कान ओढणारी, आज काल स्वत:हून एकही मेसेज करीत नाही. उपदेशाचे डोस पाजणारी, आयुष्यातील सौंदर्याबद्दल बोलणारी आता फक्त त्याच्याच बद्दल बोलत राहते. भेटूया म्हटल्यावर, त्याची ऑफिसची वेळ पाहून आमची वेळ ठरवते, का तर घरी एकटीने जायला नको. अगं आठव. पाहते ४ वाजता तुला वाट वाकडी करून सोडायला आलोय.
छे, जवळच्या मैत्रिणीच लग्न ठरण हे जेवढं तिच्यासाठी आनंददायी तेवढंच मित्रासाठी क्लेशदायी. एक नकोसं, दुराव्याची जाणीव करून देणारं वलय तिच्याभोवती दिसू लागतं. पूर्वी जिच्यासोबत एका गाडीवरून भटकलो, तिच्याशी हस्तांदोलन करताना पण जरा कचरायला होतं. “त्याला आवडलं नाही तर?”. दुराव्याच्या नियमांची जाणीव करून देणारी घंटा क्षणोक्षणी मनात वाजायला लागते. पूर्वी जिला “ए पळ, मला काही सांगू नकोस, आत्ता भेट मला” असं म्हणायचो, तिला “बघ म्हणजे, भेटावसं वाटतंय, तुला जमलं तर भेटू” असं म्हणावं लागतं.
आता तो पहिल्या प्रसंगातला मुलगा, तो चांगला असेलही पण मनात जो ग्रह झाला तो झालाच. किंवा हा दुसरा टिकोजीराव. त्याच्यासोबत ती सुखात राहीलही, पण माझ्या मैत्रिणीला माझ्यापासून दूर नेणारा व्यक्ती “हा” आहे ही जाणीव कदाचित फार जोर धरते. त्याच्या प्रत्येक बोलण्याचा मनात विपर्यास केला जातो, त्याची प्रत्येक सवय ही चुकीचीच वाटू लागते.
बापरे, माणूस म्हणून विकसित होऊन आपण आपल्या भावभावनांनी सगळं फारच क्लिष्ट करून ठेवलंय. अजून लग्न व्हायचीयत. नंतर किती त्रास करून घेणारे मी कुणास ठाऊक. ह्यावर सोपा उपाय म्हणजे त्या जशा नवरामय झाल्यात तसं मी देखील बायकोमय होऊन जाणं. हे एक बरं आहे मात्र, एक अत्यंत जवळची मैत्रीण माझी बायको होणारे. तेवढाच त्रास कमी.
आता सहज म्हणून त्याच्या दोघांच्या खांद्यावर दोस्तीची थाप मारली असती, एखादा चहा पाजला असता तर क्षणात हा दुरावा थोडा तरी कमी झाला असता की नाही... पण सुचत नाही असलं काही त्यावेळी. च्यायला. आणखी एक मैत्रीण लवकरच तिच्या घरी announcement करणारे. तेव्हा तीही भेटायला बोलवेलच तिच्या भावी नवऱ्याला. तेव्हा हे सगळं मंथन आठवून नीट वागण्याची सुबुद्धी व्हावी.
- (हळवा) केदार पाध्ये
याद्या
12284
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रामाणिक लेखन आवडलं. असा
धन्यवाद रेवतीताई
In reply to प्रामाणिक लेखन आवडलं. असा by रेवती
प्रेमापेक्षा मैत्रीच जास्त
correct
In reply to प्रेमापेक्षा मैत्रीच जास्त by भीमराव
छान लिहिलंय...
अरेरे, म्हणजे असं काही सुद्धा पचवावं लागू शकतं तर
In reply to छान लिहिलंय... by मराठी कथालेखक
हं.. म्हणजे मी तिला
In reply to अरेरे, म्हणजे असं काही सुद्धा पचवावं लागू शकतं तर by आगाऊ म्हादया......
लेखन आवडलं. वर रेवा म्हणतेय
धन्यवाद
In reply to लेखन आवडलं. वर रेवा म्हणतेय by पद्मावति
सुंदर मनोगत ! मनातिल भावना
धन्यवाद डॉक्टरसाहेब
In reply to सुंदर मनोगत ! मनातिल भावना by डॉ सुहास म्हात्रे
गेल्या 6 वर्षात मला कुणी नवीन
In reply to धन्यवाद डॉक्टरसाहेब by आगाऊ म्हादया......
छान लिहिलंय...
आल इस वेल
In reply to छान लिहिलंय... by पगला गजोधर
all is well
In reply to छान लिहिलंय... by पगला गजोधर
बायकी लेख आहे
बायकी लेख ? बर मग असला तरी
In reply to बायकी लेख आहे by गामा पैलवान
वाईट काहीच नाही.
In reply to बायकी लेख ? बर मग असला तरी by उपेक्षित
जाऊ द्या हो आगाऊ महादयाजी,
In reply to बायकी लेख ? बर मग असला तरी by उपेक्षित
ह्यागे प्रकारचे लेख
In reply to जाऊ द्या हो आगाऊ महादयाजी, by पगला गजोधर
हिहीही
In reply to जाऊ द्या हो आगाऊ महादयाजी, by पगला गजोधर
तुम्हाला नक्की काय हवंय माहीत नाही
In reply to बायकी लेख आहे by गामा पैलवान
छान लिहिलं आहे !
धन्यवाद
In reply to छान लिहिलं आहे ! by चौथा कोनाडा
त्रिकोण सदृश पण नाही काहीच.
In reply to धन्यवाद by आगाऊ म्हादया......
छान लिहिलंय तुम्ही...
हाहाहा
In reply to छान लिहिलंय तुम्ही... by पिशी अबोली
हं. शुद्ध मैत्रीण.. मस्त
गहन विषय
In reply to हं. शुद्ध मैत्रीण.. मस्त by गवि
आमच्या मेक इंजि च्या(पक्षी:
आमच्या सोसायटीत आम्ही १६
असंही घडलंय एकीच्या बाबतीत
In reply to आमच्या सोसायटीत आम्ही १६ by सुबोध खरे
एक उपाय
हं, फॅसिनेशन
In reply to एक उपाय by फारएन्ड
हं, फॅसिनेशन
In reply to एक उपाय by फारएन्ड
सुंदर लेखन
बापाचे काळीज
?? गृहीतकं सगळीच चुकीची आहेत
मेंदू
In reply to ?? गृहीतकं सगळीच चुकीची आहेत by आगाऊ म्हादया......
प्रामाणीकपणे छान लिहील आहे.
धन्यवाद
In reply to प्रामाणीकपणे छान लिहील आहे. by जागु
हळवं मन
छान लिहिलय
@सुबोध खरे प्रतिसाद आवडला
तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे
हो,तिला आठवतंय ही एक फुंकर आहे खरी
हो,तिला आठवतंय ही एक फुंकर आहे खरी
आणखी एक मुद्दा
मनापासून ..मनातलं
धन्यवाद
In reply to मनापासून ..मनातलं by माझिया मना