शिवमानसपूजा
शिवमानसपूजा
आपण घरी देवाची पूजा करतो तेव्हा शक्य असेल त्याप्रमाणे देवाला अंघोळ घालतो, गंध लावतो, फुले वाहतो, उदबत्ती लावतो, घंटा वाजवतो एखाद दुसरे स्तोत्र म्हणतो. व हे सर्व आपल्या सोयिस्कर वेळेनुसार.करतो. खरी पंचाईत होते जेव्हा आपण सहली निमित्त बाहेरगावी जातो व एखाद्या देवळात जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा. तेथे ह्यापैकी काहीच शक्य नसते. अशा वेळी काय करावे ? आद्य शंकराचार्यांनी तुमची सोय करून ठेवली आहे. मानसपूजा. ईश्वराला बाह्योपचाराची अपेक्षा नाही. हे सर्व तुम्ही केवळ मनातल्या मनातही करू शकता. क्से ? बघा.
रत्नै:कल्पितमासनं हिमजलै: स्नानं च दिव्याम्बरं
नानारत्नविभूषितं मृगमदामोदांकितं चन्दनम् !
जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च् धूपं तथा
दीपं देव् दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् !!१ !!
हे देवा, मी माझ्या कल्पनेनेच तुझ्यासाठी रत्नक्जचित आसन मांडले आहे. थंडगार पाण्याने स्नान घालतो आहे नानाविध रत्नांनीसजवलेले दिव्य वस्त्र हे पशुपति, तुझ्यासाठी आनले आहे. कस्तूरीगंधयुक्त चंदन,जुई, चाफा, बेलाचे पान यांनी गुंफलेला फुलांचा हार, धूप, दीप, हे सर्व पूजासाहित्य मी अगदी मनापासून कल्पनेनेच आणिले आहे. हे देवा, त्याचा स्विकार कर.
सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे धृतं पायसम्
भक्ष्यं पंचविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् !
शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलम्
ताम्बुलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरू !!२!!
नवरत्नजडित असे हे सोन्याचे ताट, त्यात तूप घातलेली खीर, दुधादह्यासहित बनवलेले पंचामृत, केळे, सरबत
तू खाव्या म्हणून, नाना प्रकारच्या भाज्या आणि कापराने सुगंधित केलेले पाणीसुद्धा आणिले आहे. मी
अतिशय भक्तीने स्वत: तयार केलेला हा विडा, हे देवा, तू ग्रहण कर.
छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं
वीणाभेरिमृदंकाहलकला गीतं च नृत्यं तथा !
साष्टांगं प्रणति:: स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया
संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो !!३!!
तुझ्या डोक्यावर छत्र, दोन्ही बाजूला ढलणार्या चवर्या, पंखा, चकचकित आरसा, वीणा, मृदंग, भेरी यांची साथ असलेले तुझे भजन आणि नृत्य, अनेक प्रकारची तुझी स्तोत्रे, तुला घातलेला दंडवत, हे सारे ज्यांत आहे अशी ही मी मनापासून सादर केलेली काल्पनिक पूजा, देवा, तू तिचा स्विकार कर.
आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं
पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिति: !
संचार: पदयो: प्रदिक्षणविधि: स्तोत्राणि सर्वा गिरो
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् !!४!!:
अरे देवा, तूच तर माझा आत्मा, माझी बुद्धी म्हणजे माता पार्वती, माझे प्राण म्हणजे तुझे सोवती आहेत तर माझे शरीर हेच तुझे घर आहे. माझ्या इंद्रियांनी घेतलेले सारे भोग ही तुझी पूजा तर माझी निद्रा ही तुझ्यासाठी लावलेली समाधीच ! मी जिथे जिथे जातो तो माझा संचार ही तुझी प्रदक्षिणा होवो. माझी वाणी हे तुझे स्तवन व माझे प्रत्येक कृत्य तुझीच आराधना आहे रे !
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् !
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व
जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो !!५!!
माझे हात, पाय, वाणी, कान, डोळे यांच्याकडून, शरीराने वा मनाने केलेल्या कुठल्याही कृतीतून, कळत नकळत, काही अपराध घडला असेल तर हे दयानिधे, मला क्षमा कर. हे करुणासागर शंभो, महादेवा, आपला जयजयकार !
श्रीमत् शंकराचार्य
या निष्कांचन संन्याशाने आपल्या आराध्य देवतेची पूजा बांधली ती सम्राटाला साजेल अशी व आपले भाग्य हे की ती आपल्यासारख्या सर्वसामान्यांना उपलब्धही करून दिली
मानसपूजा आपण मनातल्या मनात म्हणू शकता वा आजूबाजूला थोडी गर्दी असेल तर मोठ्यानेही म्हणू शकता. लोक आदराने हा भक्त संस्कृतचा पंडित आहे अशा भावनेने आपल्याकडे पाहतील. ते सोडा. महत्वाचे हे की थोड्या वेळात, कुठलाही वशिला नसतांनाही, बिनखर्चात आपण पूजा केयाचे समाधान मिळवू शकता. आणि प्रत्यक्ष आद्य शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे ही पूजा असल्याने ती नक्कीच ईश्वराला पोचत असणार.
( हे झाले शिवमानसपूजेसंबंधी. आता श्रीमत् शंकराचार्यांची क्षमा मागून
समजा तुम्ही विष्णूच्या मंदिरात असाल तर ? तेथे शिवमानसपूजा म्हणणे थोडे अनुचित वाटेल. मग असे करावेव कां ? पहिल्या श्लोकात "पशुपते" च्या ठिकाणी "रमापते ", चौथ्या श्लोकात ’गिरिजा" च्या ऐवजी "धनदा";"शंभो" ऐवजी "विष्णो" व शेवटच्या श्लोकात "श्रीमहादेव शंभो":ऐवजी "श्रीरमावर विष्णो" असा थोडासा फरक करून " विष्णूमानसपूजा " म्हणावी ?)
शरद
याद्या
3004
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
कस्तूरीगंधयुक्त चंदन,जुई,
आचार्यांच्या रचना खूप लयबद्ध
हे आद्यशंकराचार्यच का?
सगुण भक्ती
In reply to हे आद्यशंकराचार्यच का? by अरविंद कोल्हटकर
चांगला लेख चांगली चर्चा
मी काय म्हणतो, हिंदुत्वाची
काय हरकत अाहे?
In reply to मी काय म्हणतो, हिंदुत्वाची by जेम्स वांड