Skip to main content

इंडीयन डिमन डे -३०१६ कहाणी एका सणाची !

लेखक रामदास यांनी बुधवार, 08/11/2017 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
१००० वर्षांनंतर भारतात साजरा होणार्‍या एका सणाचे हे वर्णन आहे." मुलांच्या पुस्तकातला हा धडा अर्थातच इंग्रजीत आहे. मुलांनो, आपण दरवर्षी इंडियन डीमन डे साजरा करतो. खरे म्हणजे हा डीमन डे म्हणजे दैत्याचा दिवस असा गैरसमज तुमच्या मनात झाला असेल तर तो काढून टाका. या सणाचे मूळ नाव ’इंडियन डीमॉनीटायझेशन डे’ असे आहे.हा सण दरवर्षी ८ नोव्हेंबरपासून तीन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबरला नवर्‍याने उशीरा घरी यायचे असते. बायकोने दार न उघडता नवर्‍याला (भटो ,भटो कुठे गेला होता या चालीवर ) विचारायचे असते "नमो, नमो कुठे गेला होतात"? नवर्‍याने यावर काही उत्तर न देता गप्प उभे रहायचे असते. त्यावर दार उघडताना बायकोने "असला कसला रोज नवा जुमला? "असे म्हणून त्याला घरात घ्यायचे असते. नवरा येताना एक पांढर्‍या दाढीवाल्याचा फोटो घेऊन आला असतो, तो डायनिंग टेबलवर ठेवून घरातल्या सगळ्यांनी त्यासमोर उभे रहायचे असते. घरच्या लक्ष्मीने म्हणजे बायकोने फोटोसमोर बँक पासबुक ठेवून "अच्छे दिन आयेंगे कब? " असे विचारायचे असते. बाकीच्यांनी मोठ्यानी हसून "Rejoice, For worst is yet to come" असे म्हणायचे असते. त्यानंतर रात्रभर चिंताक्रांत राहून नवर्‍याने उपाशी झोपायचे असते. दुसर्‍या दिवशी सकाळी बायकोने घरातल्या नोटा नवर्‍यासमोर समोर ठेवून त्या बँकेत जमा करायला सांगायच्या असतात. मुलांनो सण म्हणजे बँकेत गर्दी असणारच नाही का ? या दिवशी बँका नव्या नोटा छापतात आणि ग्राहकांना देतात. नोटा देण्यापूर्वी ग्राहकांनी "BIG BROTHER IS WATCHING YOU…" हा फॉर्म भरून घरी जायचे असते. लहान मुले या दिवशी रिकाम्या डब्यात खोटी नाणी भरून त्याचा खुळखुळा बनवून वाजवतात आणि जोरजोरात "छन छन लक्ष्मी नमोस्तुते "असे म्हणतात. या दिवशी सरकारने विशेष सरकारी सुट्टी दिलेली असते. तिसर्‍या दिवशी सकाळी पुढार्‍यांनी राजकारणाला, उद्योगपतींनी उद्योगाला. बिल्डरानी नव्या प्रोजेक्टला सुरुवात करून नव्या खोट्या हिशोबाच्या चोपड्यांचा शुभारंभ करायचा असतो आणि इतरांनी आपापल्या कामाला जायचे असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10569
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

भारीये ! इतर सणांच्या प्रतीक्षेत !

हा... हा... :-)) एक नंबर ! ह्या नविन सणासाठी रामदासजींना मानाचा मुजरा !

भारी आयडिया आहे. तसं पण वर्षश्राद्ध/ काळा पैसा विरोधी दिन असे दोन दिन झालेच या दिवसाचे.

;) तुम्ही एकदम देशद्रोही आहात..

=))

अरेरेरेरे !! आता फुरोगामी, सिक्युलर, लिबटर्ड अशा विशेषणांचा पाऊसच पडेल इकडं. "काय मग तुमचा काळा पैसा किती गेला?" आणि तत्सम कुजकट प्रश्न फेकले जातील. "कुठे काय ? मस्त चाललंय की सगळं" असे सकारात्मक विचार ऐकायचा लाभ होईल.

१००० वर्षांनी इंडियन डीमॉनीटायझेशन डे साजरा होईल....सुजलाम सुफलाम....म्हणजे, मग डीमॉनीटायझेशन मुळे सगळ बरबाद झालं, देश खड्ड्यात गेला असे म्हणना-यांच बोल खोटे ठरतीलं......, कारण फ्लॉप झालातर साजरा कसा होईल.....,अरे बापरे...,

In reply to by दीपक११७७

काळजी करू नका ... एखादा मनमोहन/रघुराम येऊन .... सावरेल हो .... रेफेर : यदा यदा ही इकॉनॉमीस्य ग्लानिर्भवति भारत ! अभ्युत्थानमइकॉनॉमीस्य तदात्मानम सृज्याहम ।।

In reply to by पगला गजोधर

@ पग जी आपल्या भावना मी समजु शकतो पण.... नोटबंदीचा सण साजरा होणे हे त्याचे फेलुअर दर्शवत नाही..... असे वाटते

In reply to by दीपक११७७

काळजी करू नका ... एखादा मनमोहन येऊन .... सावरेल हो .... रेफेर : यदा यदा ही इकॉनॉमीस्य ग्लानिर्भवति भारत ! अभ्युत्थानमइकॉनॉमीस्य तदात्मानम सृज्याहम ।।

In reply to by पगला गजोधर

बार बार फेकों, हज़ार बार फेकों । के फेकनेंमें तेज है, विकासके पिता ।। भक्तो.... मित्रो.... नमोनमो .....

तुलना १) मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना वि. ममो पंतप्रधान असताना वि तुलना २) रामदास - शिंपीणिचं घरटं लिहिणारे वि. रामदास - "इंडीयन डिमन डे..." लिहिणारे... असो :)

रामदास साहेबांचा लेख म्हणून मोठ्या आशेने उघडला पण निराशा झाली. मोदीभक्त म्हणून आरोप असण्याचा धोका स्वीकारून म्हणतो कि यावेळेस तो "खास रामदास टच" कुठेच जाणवला नाही असो

खरे तर नोटबंदी ही काही जगात पहिलीच नव्हे. दुसरे असे की आताच त्यात समर्थक ( निरर्थक) व विरोधक( हे ही निरर्थकच ) यात पुरेसे डोळस युद्ध चालू नाही. त्यामुळे हा दिवस लक्षांत ठेवणे फार तर २०१९ पर्यंत टिकेल. २०१९ ला राहुल गांधी प्रधानमंत्री होतील व सन्मानाने १००० व ५०० च्या नोटाना परत आणतील. सर्व इतिहास पुसला जाईल.

In reply to by चौकटराजा

इतिहास हा पुसण्यासाठी (विचारण्यासाठी असतो, विचार करण्यासाठी नसतो. वरील डॉ यांच्या प्रतिसादाशी सहमत नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

इतर लेख वाचतांना हा सापडला..बाकी निश्चलीकरणाचे फायदे दाखवणारी जनता गायब झालीय, १९% जास्त चलन आले मार्केटला 2 वर्षात, आणि निवडणूक प्रचारात हा ठोकून सांगायचं मुद्दा नाही म्हणजे फेल गेले हे निश्चितच!