Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १५

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शुक्रवार, 03/11/2017 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकूल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच असंतुष्ट होते अशा बातम्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर भारत अगदी पूर्ण स्वीप केला होता. अनेक राज्यांपैकी सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये त्यात वाढ होणे नाही आणि होईल ते नुकसानच होईल. त्यामुळे पूर्वापार कधीच शिरकाव करता न आलेल्या राज्यांमध्ये (बंगाल, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी) बर्‍यापैकी जागा जिंकून इतरत्र पडझड झाल्यास ती भरून काढण्याकडे भाजपचा कल असेलच. त्या दृष्टीने मुकूल रॉय यांचा भाजप प्रवेश ही पक्षासाठी उत्साहवर्धक घडामोड आहे.

वाचने 45131
प्रतिक्रिया 212

प्रतिक्रिया

In reply to by मार्मिक गोडसे

बड्या बड्या नोटा रद्द झाल्यावर छोट्या छोट्या मतांना किंमत येणारंच ना? -गा.पै.

तुम्हाला वर्धापन दिन साजरा करायचा आहे कि वर्षश्राद्ध हा तुमचा प्रश्न आहे. म्हणून "जो तुम कहो" आम्हाला काय घेणं देणं आहे?

काळ तिघांत एक खंबा घेतला तीन तीन पॅक येणार होते वाट्याला पण एक जण दोन पॅक मधेच आउट झाला आणि मग तो पॅक मला मिळाला होय मी लाभार्थी हे माझं सरकार हाय

In reply to by श्रीगुरुजी

DM च्या खर्च लाभ विश्लेषण (cost benefit analaysis ) बाबत अजून कोणीच लेख पाडले मला दिसले नाहीत. माझा DM बद्दलचा पहिल्यापासून एकच सवाल आहे ज्याचे समाधानकारक उत्तर कोणताच लेख अद्याप तरी देऊ शकला नाही. DM चा "फायनल औटकॉम" काय असणार हे निर्णायकर्त्याने रोड मॅप बनवला होता का? त्यानुसार त्याचा फरक विश्लेषण (Variance Analysis) कोणी देऊ शकले तर योग्य ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

सुरजित भल्ला हे आता मोदींच्या इकॉनॉमिक अ‍ॅदव्हायझरी कौन्सिलचे सदस्य आहेत. त्यांनी नोटबदल कार्यक्रमाची स्तुती न करणे अपेक्षित नाही.

In reply to by नितिन थत्ते

हो ते तर आहेच .. मला वाटतय .. तटस्थ पणे पाहिला तर काही चान्ग्ल्या आणि वाईट गोष्टी आहेत .. http://indianexpress.com/article/opinion/columns/demonetisation-anniver…

In reply to by नितिन थत्ते

पूर्वग्रहदुषीतपणाचा चष्मा घातला आहे हे लपून नसलेले गुपीत असले तरी असे उघड उघड अमान्य न करणेही अपेक्षित नाही.

दिल्लीमध्ये प्रचंड बहुमत असल्यामुळे दिल्लीतील तीनही राज्यसभेच्या जागांवर आम आदमी पक्षाला आपले उमेदवार निवडून आणता येतील. राज्यसभेवर अराजकिय व्यक्तींना पाठवावे असे पक्षाचे मत आहे असे https://www.ndtv.com/india-news/raghuram-rajan-offered-rajya-sabha-seat… वर लिहिले आहे. आणि त्यात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव आघाडीवर आहे असेही लिहिले आहे. राज्यसभेवर अराजकीय व्यक्तींना पाठवायची कल्पना चांगलीच आहे. ज्यांना निवडणुकांचे राजकारण झेपणार नाही पण तरीही आपले योगदान देऊ शकतील अशा व्यक्तींना संसदेत जायला मिळावे यासाठी राज्यसभा या सभागृहाचे अस्तित्व ठेवावे यामागच्या कारणांपैकी एक कारण होते. पण गेल्या ६७ वर्षात नेहमीप्रमाणे आपल्या लोकांनी त्या चांगल्या कल्पनेचेच वाटोळे केले. जर कोणीही रघुराम राजन सारख्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. फक्त अपेक्षा ही की एकदा आआपचे उमेदवार म्हणून तिथे निवडून गेल्यावर स्वतःचा स्वतंत्र बाणा विसरून परत त्याच पक्षाची री ओढण्यात आली तर मात्र मुळातल्या कल्पनेलाच धक्का पोहोचेल. आणि मला स्वतःला आआपचा कमालीचा तिटकारा असल्यामुळे राजनसाहेबांनी परत आआपच्या माकडचाळ्यांचीच री ओढली तर मात्र त्यांच्याविषयीचा जो काही आदर आहे तो पूर्ण लयाला जाईल.

In reply to by गॅरी ट्रुमन

रघुराम राजन भारताचे नागरिक आहेत.. का अनिवासी नागरिक आहेत .. मला वाटतय कुमार विश्वास सारख्या पक्षान्तर्गत प्रतिस्पर्ध्यान्ना सम्पविण्याची केजरीवाल खेळी आहे ..

In reply to by रामदास२९

मला वाटतय कुमार विश्वास सारख्या पक्षान्तर्गत प्रतिस्पर्ध्यान्ना सम्पविण्याची केजरीवाल खेळी आहे ..
हो तसेच वाटते आहे. राज्यसभेच्या तीन जागांवर आशुतोष, आशिष खैतान आणि कुमार विश्वास यांचा डोळा आहे हे उघड आहे. कविराजांशी केजरीवालांचे जमत नाही. तेव्हा त्यांचा पत्ता कापायचा इरादा केजरीवालांनी केलाच असेल. पण त्याबरोबरच आशिष खैतान आणि आशुतोषही दुखावले जातील ही शक्यता आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमधून पक्षाने उमेदवारी दिलेल्या ७ नेत्यांपैकी राजमोहन गांधी वृध्द झाले आहेत आणि जरनेल सिंग स्वतःच्या कर्माने पंजाबमध्ये निवडणुक लढवायला जाऊन राजौरी गार्डनमधील विधानसभेची जागा गमावून बसले. आनंद कुमार या तिसर्‍या नेत्याचे नक्की काय झाले हे माहित नाही. पण राखी बिर्ला आणि देविंदर सेहरावत यांना २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेत प्रवेश मिळाला (आणि सेहरावत यांचे केजरीवालांशी बिनसले सुध्दा). उरलेल्या उमेदवारांपैकी आशुतोष आणि आशिष खैतान या दोन मिडिया सॅव्ही उमेदवारांना मात्र त्यानंतर आमदार/खासदार पदे मिळालेली नाहीत. त्यातल्या त्यात आशिष खैतानना दिल्ली डायलॉग कमिशनचे अध्यक्षपद (आणि मंत्र्याचा दर्जा) मिळाला पण त्या माणसाची महत्वाकांक्षा जास्त असावी असे वरकरणी वाटते. तेव्हा कुमार विश्वासचा पत्ता कापायच्या या भानगडीत इतरही नेते दुखावले जायची शक्यता आहे.

In reply to by पुंबा

खैतान, आशुतोष आणि तो कवडा कुमार विश्वास तिघेही डोक्यात जातात, ह्यांच्यापेक्षा कुणीही परवडेल.
मला पंजाबमधील फुलका, कमांडो सुरिंदरसिंग इत्यादी सोडून आआपशी संबंधित असलेला प्रत्येक माणूस डोक्यात जातो. अजून एक चांगला माणूस डॉ. धरमवीर गांधी यांना केजरीवालांनी पक्षातून काढले. त्यामुळे आआपशी संबधित असूनही डोक्यात न जाणार्‍या लोकांच्या यादीत फार लोक राहिलेले नाहीत :)

In reply to by गॅरी ट्रुमन

त्यातही एक अडचण येऊ शकेल असे वाटते . एखाद्या राज्यातून राज्यसभेवर निवडून पाठवायचे असेल तर तो मनुष्य त्या राज्यात १५ वर्षांपासूनचा रहिवासी आहे हे सिध्द करावे लागते. अनेक नेते (उदाहरणार्थ मनमोहनसिंग आसाममधून, पर्रीकर उत्तर प्रदेशातून, चिदंबरम महाराष्ट्रातून इत्यादी) ते रहिवासी नसलेल्या राज्यातून राज्यसभेवर वेळोवेळी निवडून गेले आहेत. पण हे सगळे नेते १५ वर्षांपासून भारतातच वास्तव्य करत होते. तेव्हा ही १५ वर्षांसाठीची अट पूर्ण करायला खोट्या भाड्याच्या पावत्या वगैरे बनविल्या जातात हे जगजाहिर असले तरी या पावत्या खोट्या आहेत हे सिध्द करता येणे सोपे नसल्यामुळे अशा नेत्यांची निवड न्यायालयाकडून अवैध सिध्द करता येणे कठिण होते. पण रघुराम राजन यांची गोष्ट तशी नाही. ते गेल्या १५ वर्षांपासून (खरं तर जास्तच) भारताबाहेर राहात आहेत हे त्यांच्या पासपोर्टवरील नोंदींवरून सिध्द करता येईलच. तेव्हा राजन १५ वर्षांपासून दिल्लीमध्ये वास्तव्य करून आहेत हे सिध्द कसे करणार? कारण भाड्याच्या पावत्या खोट्या दिल्या तरी राजन तिथे राहात नव्हते हे अगदीच उघड होईल. राजन यांच्याऐवजी कोणी लो प्रोफाईल अगदी ग्रीन कार्ड असलेला मनुष्य राज्यसभेवर पाठवायचा असेल तर त्यात फार अडचण येणार नाही. पण राजन यांची गोष्ट वेगळीच असेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

मला वाटतय राज्यसभेतून निवडून जाण्यासाठी
राजन यांच्याऐवजी कोणी लो प्रोफाईल अगदी ग्रीन कार्ड असलेला मनुष्य राज्यसभेवर पाठवायचा असेल
तसा झाला तर इतर पक्ष कोर्टात जातील आणि मग उपराष्ट्रपती (राज्यसभा अध्यक्ष) वेन्कय्या नायडू त्यावर निर्णय घेतील. सुप्रीम कोर्ट पण राज्यसभा अध्यक्ष्यान्च्या अधिकारात हस्तक्षेप नाही करणार मला तरी वाटतय केजरीवालान्ना काही जरी वाटला तरी राजन राज्यसभेवर जायला तयार पाहिजेत कारण सदस्य बनायचा असेल तर सम्पत्ती जाहिर करण आला आणि मग त्याचे स्त्रोत जगजाहिर होणार .. त्यापेक्षा ते नोबेल साठीच्या रान्गेत उभा राहण पसन्त करतील. पुन्हा मधून मधून मीडीया, कोन्ग्रेस, आआप त्यान्चा सरकार विरुध्द वापर करून घेईल , जे पक्षाचा शिक्का लागल्याने राज्यसभा सदस्य म्हणून त्यान्ना करणे अवघड जाईल ..

In reply to by रामदास२९

हो बरोबर. कुणाही एन.आर.आय ला राज्यसभेवर पाठवायचे असेल तर ही अडचण येईलच. त्यातल्या त्यात फारसा परिचित नसलेला चेहरा असेल तर कदाचित तितक्या प्रमाणात बारकाईने छाननी होणार नाही. पण राजनसाहेबांच्या बाबतीत त्यांनी कधी काय केले आणि ते कधी कुठे होते ही 'खुली किताब' असल्यामुळे नक्कीच छाननी होईल.
मला तरी वाटतय केजरीवालान्ना काही जरी वाटला तरी राजन राज्यसभेवर जायला तयार पाहिजेत कारण सदस्य बनायचा असेल तर सम्पत्ती जाहिर करण आला आणि मग त्याचे स्त्रोत जगजाहिर होणार
हो राजन केजरीवाल आणि आम आदमी पक्ष या सर्कशीत कुठल्याही अ‍ॅन्गलने फिट बसणारे नाहीत. तसेच आआपचे अमुक फुकट देऊ, तमुक अर्ध्या किंमतीत देऊ हे प्रकार राजन सारख्यांना मान्य असतील असे वाटत नाही. पण मनमोहनसिंगांनी विद्वत्ता असूनही राजकारणासाठी स्वतःचा वापर करून दिला त्याप्रमाणे राजन यांना वाटत असले तर गोष्ट वेगळी.

In reply to by गॅरी ट्रुमन

हे म्हणजे असं होईल, प्रसिद्ध तलवारबाजाला युद्धासाठी न वापरता स्वयंपाकघरात तलवारीने भाजी चिरायला ठेवण्यासारखे आहे.

In reply to by रामदास२९

हे इथे पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. राजन यांच्या उंचीच्या प्राध्यापकाला युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगोसारखे त्यांच्या कामाला पोषक वातावरण सोडून राज्यसभेत यावेसे वाटले नाही तर ते अगदी समजण्यासारखे आहे. तरीही मनमोहन सिंग यांचे उदाहरण बघून अशी विद्वान मंडळी कसा विचार करत असतील असे आपल्याला वाटते त्याप्रमाणेच प्रत्यक्षात ते तसाच विचार करत असतील याची खात्री वाटत नाही. तसेच मणीशंकर अय्यर, कपिल सिब्बल, पी.चिदंबरम अशी हुषार मंडळीही आपल्या बुध्दीचा वापर एकाच कुटुंबाची री ओढायला (किंवा बहुदा काही गैरकारभार करायलाही) करत असतील तर अशी खात्री अजूनच कमी होते. विद्वान मंडळी केवळ आपल्याच प्राध्यापकी पेशाशी आणि आपल्या कामाशीच इमान राखून असतात आणि ते सोडून त्यांना इतर कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी महत्वाकांक्षा नसतात हे नेहमीच खरे नसते. याविषयी कधीतरी लिहायचे आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

सत्तेपुढे विद्वत्ता गहाण टाकली कि वरील मन्डलीन्प्रमाणे होता ..
विद्वान मंडळी केवळ आपल्याच प्राध्यापकी पेशाशी आणि आपल्या कामाशीच इमान राखून असतात आणि ते सोडून त्यांना इतर कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी महत्वाकांक्षा नसतात
तत्कालीन नेर्तुत्वामुळेच ह्या लोकान्ना किम्मत होती.

मनमोहनसिंगांनी विद्वत्ता असूनही राजकारणासाठी स्वतःचा वापर करून दिला त्याप्रमाणे राजन यांना वाटत असले तर गोष्ट वेगळी
मनमोहन हे अत्यन्त हुशार माणूस जर धोरणी माणसाच्या ( नरसिन्ह राव) सम्पर्कात आला तर काय चमत्कार करू शकतो (१९९१ आठवा) आणि जर मुर्खान्ना शरण गेल तर कसा हतबलतेने पगारी नोकरासारखा घोटाळ्यान्ना सामोरे जातो त्याचे उत्तम उदाहरण आहे. असो भारतातले मुरब्बी राजकारणी आणि मुजोर नोकरशाही हुशार लोकान्ची पण वासलात लावतात .. उ.दा. राजा रामण्णा, श्रीकान्त जिचकार, शशी थरूर , अशी बरीच ..

In reply to by रामदास२९

सहमत. मनमोहन सुद्धा स्वतःची विश्वासार्हता गमावून बसलेत की काय इथपर्यंत शंका येतेय. त्यांच्या अर्थकारणावरील मतांकडे अजूनही बारकाईनं बघावंच लागतं.. पण तरीही ते फक्त काँग्रेसला समर्थन करण्यासाठी काहीही बोलतील असंही वाटतं. बाकी रघुराम राजन राज्यसभेवर जातील असं काही वाटत नाही. त्यांचं नाव पुढं करून स्वतःची टी.आर.पी. ची पोळी फुकट भाजून घ्यायची चाल आहे असं दिसतंय! ;-)

In reply to by रामदास२९

केवळ राजकारण्यांच्या आहारी जाऊन डॉ मनमोहन सिंह यांनी निश्चलनीकरण म्हणजे Organised loot, legalised plunder (संघटित दरोडा आणि कायदेशीर लुबाडणूक) आहे असे म्हटले आहे. निश्चलनीकरणाचा निर्णय त्यांच्या मते चुकला असेल (तो चूक कि बरोबर हे ठरवण्याची माझी कुवत किंवा लायकी नाही) आणि त्यावर टीका करणे हे हि समजू शकतो. पण संघटित दरोडा आणि कायदेशीर लुबाडणूक असे म्हणणे हे मात्र पटले नाही.यात कुणाच्या अधिकृत उत्पन्नावर दरोडा पडला किंवा चोरी झाली आहे. दरोडा कुणावर आणि लुबाडणूक कुणाची झाली आणि त्यात फायदा कुणाचा झाला? एक वर्षपूर्वी असेच म्हणाले इतपतही मान्य करता येईल पण काल परत तेच म्हणाले आणि जर सरकारने हा संघटीत दरोडा काळ्या किंवा भ्रष्टाचाराच्या पैशावर टाकला असेल आणि तो मनमोहन सिंहांना मान्य नसेल तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या/ अवैध संपत्तीला त्यांची मान्यता आहे असाच अर्थ निघतो. किन्वा केवळ "बोलवित्या धन्याची" री ओढणे चालू आहे. जे काही असेल ते असो. पण या वाक्यांमुळे डॉ. मनमोहनसिंहांबद्दल असलेल्या आदराला एकंदर उतरती कळा लागली आहे असेच म्हणतो.

In reply to by सुबोध खरे

सिंगांनी स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी व एका कुटुंबाची सेवा करण्यासाठी देशहिताचा बळी दिला. आता तेच सिंग, नोटाबंदी म्हणजे संघटित लूट व कायदेशीर लुबाडणूक, असे आरोप असलेली भाषणे वाचून दाखवित आहेत. ते हाडाचे राजकारणी नाहीत असे मत असलेल्यांचे हसू येते कारण ते अत्यंत धूर्त राजकारणी आहेत. त्यांचा साळसूद व केविलवाणा चेहरा हा फक्त मुखवटा आहे. Manmohan Singh has been a highly overrated economist and highly underrated shrewd politician.

In reply to by श्रीगुरुजी

@श्रीगुरुजी -
highly overrated economist and highly underrated shrewd politician
खरे आहे .. तसे नसते तर .. कोन्ग्रेस च्या प्रणव मुखर्जी, अर्जुन सिन्ह, नटवर सिन्ह, नारायणदत्त तिवारी यान्ना बाजूला सारून पन्तप्रधान झाले नसते .. पध्दतशीर पणे एकेकाला त्यान्नी बाजूला केले आणि घराण्यावरची निष्ठा वाढवली .. जो माणूस स्वतः सूरू केलेल्या प्रकल्पान्ना नावा ठेऊ शकतो.. त्याला काय म्हणावा .. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bullet-tr…

In reply to by श्रीगुरुजी

मोदींच्या बाबतीत खालील वाक्य नक्कीच सूट होईल. Narendra Modi has been a highly overrated administrator and highly underrated malefactor, and correctly rated exaggerator.

In reply to by सुबोध खरे

@सुबोध खरे - खर आहे .. निश्चलनीकरणाबाबत डॉ. मनमोहनसिन्ह यान्ना आक्षेप असतीलही किन्वा ते राबविण्यात सरकारी यन्त्रणा कमी पडली असेलही पण
Organised loot, legalised plunder (संघटित दरोडा आणि कायदेशीर लुबाडणूक) आहे असे म्हटले आहे.
हे धादान्त खोटे आहे आणि मनमोहनसिन्ह यान्ना ते शोभत नाही ..
पण या वाक्यांमुळे डॉ. मनमोहनसिंहांबद्दल असलेल्या आदराला एकंदर उतरती कळा लागली आहे असेच म्हणतो.
सत्तेपुढे बुध्दी गहाण टाकली कि असा होता ..

डॉ. खरे, पंतप्रधानपदासारख्या घटनात्मक पदावरुन सातत्याने धादांत खोटे बोलणार्‍या, बनवाबनवी करणार्‍या, भ्रष्टाचार्‍यांना सामिल असणार्‍या, निवडणुका जिंकण्यासाठी सैनिकांच्या बलिदानाचा अक्षम्य राजकिय वापर करणार्‍या माणसाबद्दल मात्र तुमच्या मनात अपरंपार श्रद्धा आहे. ती कशी काय?

In reply to by तर्राट जोकर

तजो, हे नरेंद्र मोदींना उद्देशून आहे का? तसं असल्यास कृपया खालीलप्रमाणे विदा देणे : १. सातत्याने धादांत खोटे बोलणे २. बनवाबनवी करणे ३. भ्रष्टाचार्‍यांना सामिल असणे ४. निवडणुका जिंकण्यासाठी सैनिकांच्या बलिदानाचा अक्षम्य राजकिय वापर करणे आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पहले का, दुसरे का, तिसरे का, चौथे का, सबका जवाब देगा रे तेरा जोकर. =)) पुराव्यांसाठी डिश कोणती हवी तेही सांगून ठेवा. नाहीतर हे चॅनल असेच, तो माणूस तसाच, ढमकी वेबसाईट अ‍ॅन्टीमोदी वगैरे नखरे चालणार नाही. काय की टंकायला फार श्रम लागतात. आणि कुणाकडून आम्हाला त्यासाठी पैसे मिळत नाहीत. :-)

In reply to by तर्राट जोकर

ही जळजळ आहे होय? ठीकाय मग. आणि गा पै ना टंकायला पैसे मिळतात ही माहिती कुठून मिळ्वळीत ते ही सांगा. नै, मलाही माझ्या फावल्या वेळेचा अर्थार्जनासाठी सदुपयोग करता येईल.

In reply to by तर्राट जोकर

जोकर बुवा मी फक्त डॉ. मनमोहन सिंहांबद्दल बोलत होतो. येथे श्री मोदी याना आणण्याचे कारण समजले नाही. त्यांच्याबद्दल असे गलिच्छ आरोप करण्याचे इथे प्रयोजन काय आणि का आहे? चष्मा घातलाय हे मी जे म्हणत होतो ते हेच. आपण जे आरोप करताय त्या सर्व आरोपांबद्दल आपण नक्की आणि ठाम पुरावा द्याल अशी अपेक्षा करतो.

सहमत. आणि तोंडावर आपटले की वैयक्तीक टिप्पणी करून ही ही ही करून दात काढायला आख्खा कंपू हजर असतो.

In reply to by lakhu risbud

येथे खांदेकरी कोण कोण येतात हा प्रश्न नाही विचारला एका निपक्ष सदस्याने? http://www.misalpav.com/comment/969390#comment-969390

In reply to by श्रीगुरुजी

जाऊद्या हो , कशाला सांत्वन करता त्यांचे. अस्पृश्यता पाळन्याची परंपरा अजून ते विसरले नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

उत्तराची प्रतीक्षा आहे. इथे कोण अस्पृश्यता पाळतो ते स्पष्ट करावे ही नम्र विनंती.

In reply to by मार्मिक गोडसे

जाऊद्या हो , कशाला सांत्वन करता त्यांचे. अस्पृश्यता पाळन्याची परंपरा अजून ते विसरले नाहीत. इथे कोण अस्पृश्यता पाळतो/ते/तात ते सांगाल का?

In reply to by श्रीगुरुजी

भाट धारातीर्थी पडायाला लागले मग त्यांना योग्य त्या ठिकाणी पोचवायला कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा ना?

In reply to by mayu4u

तो आला तर तुमची पानपट्टी झाकली जाईल की?एकतर तुमच्या गिऱ्हाईकांची तोंडे आपटून लाल झाली त्यामुळे तुमचा धंदा कमी त्यात हा भलामोठा ट्रक उभा राहिल्यावर अजुनच प्रोब्लेम होईल.

In reply to by मार्मिक गोडसे

शेवटचा मुद्दांना धरुन असणारा प्रतिसाद कधी दिला होता वगैरे काही अंधुकसं आठवतंय का प्रयत्न करुन बघा ना.

टेलिकॉम कंपनीना फेका फेकीचा रोग लागलेला दिसतोय. ४ जी देतो म्हणून प्रत्येक्षात २ जी किंवा काही प्रमाणात ३ जी च नेटवर्क पुरवत आहेत. कसा काय होयचा देश डिजिटॅलिज? https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/no-four-g…

या पक्षातील बहुतेक जणांना खोट्या डिग्र्या घायचा छंद जडला का काय ते समजत नाही. मी म्हणतो १२ वी नापास तर १२ वी नापास, त्यात काय एवढे ? इलेक्शनला उभे राहायला आणि निवूडून यायला शैक्षणिक पात्रतेची अट नसताना असले उद्योग कशासाठी करतात देव जाणे? https://www.loksatta.com/pune-news/high-court-rejected-anticipatory-bai…

ताज्या घडामोडी या धाग्यात बहुतेक वेळी राजकिय झंगाडपाखाडच चालू असते. खेळाडुही तेच तेच आणि वादाचे मुद्देदेखिल तेच तेच. हट्टाने स्वतःच्या हळदकुंकुचुडाछाप निष्ठा कवटाळून विरोधकाला चोची मारीत बसलेले असतात. याचा कंटाळा येतो(आम्हाला, ते मजेत चालू असतात). अराजकिय घडामोडींसाठी वेगळा धागा काढल्यास ह्या धाग्यातील स्पेस झंगाडपखाडप्रेमी लोकांसाठी मोकळा सोडता येईल. अर्थात ही केवळ सुचनाच. कुणी वैयक्तिक घेऊ नये.

In reply to by पुंबा

ताज्या घडामोडी हा प्रकारच एकूण भाजपचा प्रचार आणि इतर पक्षांवर आगपाखड यासाठी सुरु केलेला प्रकार आहे. बाकी सगळं उघड आहेच. नॉन-राजकिय चालू घडामोडींसाठी तुम्हीच नवीन प्रकार सुरु करा. पण त्याला रिस्पॉन्स मिळणार नाही हे आधीच सांगून ठेवतो. :-)

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही नसणार तर आम्ही नसणार. . . . न्युटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही होता/नव्हता तेव्हा आम्ही होतो आणि तुम्ही असाल/नसाल तेव्हाही आम्ही असूच.