||तुलसी विवाह ||
आजपासून सुरू झालेल्या तुलसी विवाहासाठी मी खालील कविता लिहिली आहे...
||तुलसी विवाह ||
चला चला रे आता होऊया
सोहळ्यात रे मग्न
वाद्ये वाजवू नाचू गाऊ
असे हे तुळशीचे लग्न ||धृ ||
जालंदर दैत्य मातला
सुरगण करिती त्यासवे युद्ध
वृंदा भार्या त्याची असे ही
पतिव्रता अन् शरीरशुद्ध ||१ ||
जालंधर रूप घेऊनी श्रीहरी
नष्ट करी तिच्या पातिव्रत्यासी
दैत्य संहारी हरी वदे वृंदे
होशील तू पृथ्वीवरी तुळशी ||२ ||
अर्पिती भक्त मज विविध पुष्पे तरी
तुळशी आवडे मज सर्वांहूनी
कार्तिक मासे लग्न होई आपुले
अजून काय हवे तुला याहूनी ||३ ||
अन्न शुद्ध होई तुझा स्पर्श होता
प्राणवायू सदा देसी जीवांसी
अंगणी वृंदावनी स्थापिती तुजला
करिती तुझिया पूजनासी ||४||
आयुर्वेदामध्ये अग्रस्थान तुझे
तुलसी सेवने रोग नष्ट होती
देसी आरोग्य 'वैभव' मानवा
'तुलसी विवाह' साजरा करिती ||५||
--शब्दांकित (वैभव दातार )
कार्तिक शुद्ध द्वादशी
तुलसी विवाह
तुळशीच्या लग्नात कविता
साध्याही विषयात...
उत्कृष्ट कविता
+१ आगोबाोशी सहमत. आगोबा
धन्यवाद प्रचेतस
सडेतोड प्रतिवाद !
कविता आवडली.
वाह, आम्हाला तर बुवा चतुर
अतिशय मस्त.... आवडली
बुवा
वारलो हो नाखू(न) अंकल. =))
या गोंधळात ती
तुमचे कवितेचे विषय अगदी वेगळे