मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

याद किया दिल ने

sayali · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पु.ल यांनी इटलीतल्या सोरेन्तो गावातल्या समुद्राच्या निळाईच वर्णन करताना लिहिलं आहे. हूरहूरत्या सांजेचं ते सौंदर्य बघताना जर चांगला पुरिया धनश्री ऐकायला मिळता तर न जाणो आनंदाने कोंदल्यामुळे माझ्या प्राणांनी कुडीचा निरोप घेतला असता. तसा अनुभव लडाखचा पंगॉंग लेक बघितल्यावर आला. एखाद्या सरोवरत आल्यासारखे वाटले. विशाल असा निळाशार लेक दिसला त्याला चार शेड्स होत्या. हिरवा, राखाडी, फेंट निळा आणि डार्क निळा. थंडी व वारा झॉंबत होते. देवाच्या करणीने क्रुतद्न्यता दाटून आली. कॅण्टीन मधील चायनीस पदार्थ रासना तृप्त करत होती. तेवढ्यात पन्चेन्द्रियान्ना तृप्त कॅरणारी दूर रेडिओ वर लागलेली लताबाईनची ओ....ओ.....ओ...., कही दीप जले कही दील.... ही लकेर ऐकू आली. जीवाचे कान करून आम्ही दोघांनी गाणे ऐकले. असेच आनंदातीरेकाने स्तब्ध होऊन अद्न्यात शक्तिपुढे आम्ही नतमस्तक होत होतो.

वाचने 3857 वाचनखूण प्रतिक्रिया 10

पुंबा Fri, 10/27/2017 - 17:14
तुम्ही आठ ओळी लिहिल्या आहेत त्यातल्या २ पुलंच्या लिखाणातल्या आहेत. एवढ्या लहान लिखाणातून काही फार पोचत नाही असे वाटते. दीर्घ लिहाल तर निश्चित काही तरी प्रत्यय येऊ शकेल.

तिमा Fri, 10/27/2017 - 23:52
त्या लेकच्या पाण्याचा रंग, आकाशातल्या ढगांवर अवलंबून असतो. स्वच्छ निळं आकाश असेल तर निळा असतो, ढग आले तर निरनिराळ्या छटा दिसतात. त्याशिवाय, तिथे जाण्याचा रस्ताच किती रोमांचकारी आहे. त्याबद्दलही लिहा.