एक्सपायरी डेट.
रेशमी साड्यांच्या बासनात
मोरपिशी साडीच्या घडीत
अलगद ठेवलेलं, ते पत्र..
तिथून बाहेर नाही काढत कधी
हलकेच चाचपडते अधूनमधून
त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे...
त्यातला शब्दंशब्द पाठ आहे
लिहून खोडलेला ,
पाण्याने पुसटलेला...
किती मिनतवा-या. हट्ट,
रुसवे फुगवे काय अन् काय
हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी..
आपल्यामधे जे काही होतं नव्हतं,
(नव्हतं तेच जास्त खरंतर)
ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र...
तू शिताफीने न लिहिलेलं तुझं नाव
(ते तेव्हांही खटकलेलं थोडं)
एका अधमु-या नात्याची एकमेव खूण..
का कोण जाणे पण आज अचानक वाटलं,
हर रिश्ते की एक उमर होती है तशी,
पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?
खूपच छान. 'मेरा कुछ सामान...'
विस्मृतीचा अभिशाप....
विस्मृतीचा उःशाप....
पत्राला पण एक्सपायरी डेट असते
पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?असायला हवी खरतर. लेट गो करणं सोपं नसतं पण आवश्यक असतं. कविता आवडलीच.अहाहाच!
सुरेख!
रुपी,सत्यजित, पद्मावति, एस,_/
सुंदर!
पैताई, खरंच.
बरी आठवण केलीस
+1111
आपल्यामधे जे काही होतं नव्हतं
खरंय.
छानच हं !
:)
क्या बात है !
रुते कुणाला
खुपच चटका लावून जाणारी कविता.
Time is the best remedy.
छान कविता.
सर्वांनाच धन्यवाद!
सुंदर...
वेळ झाली भर माध्यान्ह... :-)
प्रॅक्टीकल आणि थेअरी - माझे (जरासे वेगळे) मत
बापरे, तुम्ही फारच
बापरे, तुम्ही फारच