Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १३

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 11/10/2017 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा

वाचने 34461
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

In reply to by गॅरी ट्रुमन

. हिंदु-मुस्लिम धृवीकरणाची सुरवात भाजपने केली हा पुरोगाम्यांचा आवडता सिध्दांत असतो.
असेलही,माझा तो आवडता सिद्धांत नाही. माझा मुद्दाच मुळात वर्तमाणकाळातील आहे. भाजप हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करतो का? करत असल्यास योग्य आहे का याचे सुस्पष्ट आणि प्रामाणिक उत्तर द्यावे. हे जरी काँग्रेस ने सुरू केले असले तरी चुकीचे आहे मला त्यांच्याविषयी ममत्व नाही.
विकास आणि गव्हर्न्सन्सच्या मुद्द्यावर आपण भाजपला राजकीय विरोध करू शकत नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेसने उघडपणे हार्दिक-अल्पेशचे समर्थन सुरू केले, त्यांना बरोबर घेतले असे का म्हणू नये?
नक्कीच तुम्ही असे मत मांडू शकता परंतु भाजप जेंव्हा उत्तर प्रदेश आणि केरळ मध्ये लव्ह जिहाद, ताजमहाल आणि काब्रिस्तान की स्मशान हे मुद्दे चर्चित होता त्याविषयी ही तुमची मते ऐकून घ्यायला आवडतील. भाजप ला काँग्रेस पेक्षा जास्त वेगळा समजू नका.
महादेव जानकरांच्या पक्षाला भाजपने महाराष्ट्रात बरोबर घेतले त्यात या सगळ्या गोष्टी होत्या का?
महादेव जानकर, मेटे, राणे आणि अलपेश, हार्दिक या ठराविक जातीच पुरस्कार आणि प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांमध्ये मला काडीचा ही फरक वाटत नाही, इतर लोकांना तो वाटतो याच मला आश्चर्य वाटत. काँग्रेस गुजरात जिंकेल असे वाटत नाही मात्र जागा वाढवेल असा अंदाज आहे. बागूया.

In reply to by अमितदादा

माझा मुद्दाच मुळात वर्तमाकाळातील आहे.
असा एकच काळ वेगळा कसा करून चालेल? जर का जे काही चालू आहे त्याची सुरवात काँग्रेसने पूर्वीच केली आहे. तेव्हा त्या सगळ्या स्पेक्ट्रममधून २०१७ वेगळा कसा काढणार? बाकी 'न' च्या ठिकाणी 'ण' चा वापर केल्यामुळे भलतीच शंका आली बघा. भलतीच शंका म्हणजे असा प्रकार करणारे एक मिपाकर होते. त्यांची फार पूर्वी मिपावरून हकालपट्टी झाली. तुम्ही त्यांच्यामुळे प्रभावित झालाय की काय असे वाटायला लागले :)
भाजप जेंव्हा उत्तर प्रदेश आणि केरळ मध्ये लव्ह जिहाद, ताजमहाल आणि काब्रिस्तान की स्मशान हे मुद्दे चर्चित होता त्याविषयी ही तुमची मते ऐकून घ्यायला आवडतील.
लव्ह जिहाद आणि ताजमहालच्या प्रश्नावर मांडलेल्या मतांमध्ये काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही. कब्रस्तान की स्मशान हा मुद्दा नव्हता तर कब्रस्तानला काही सुविधा (बहुदा वीज) दिल्या जात असतील तर त्याच स्मशानालाही दिल्या गेल्या पाहिजेत हा मुद्दा होता. प्रत्यक्षात अखिलेशच्या युपीमध्ये काय परिस्थिती होती हे मला माहित नाही. त्याकाळात मी युपीमध्ये एकदाही गेलो नव्हतो. त्यामुळे त्याविषयी बोलता येणार नाही. पण जर का सगळ्यांना सारखा न्याय हे मत मांडले असेल तर त्यात काही चुकीचे वाटत नाही.
महादेव जानकर, मेटे, राणे आणि अलपेश, हार्दिक या ठराविक जातीच पुरस्कार आणि प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांमध्ये मला काडीचा ही फरक वाटत नाही,
प्रत्येकाला आपले मत ठेवायचा अधिकार आहेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुमच्याकडून ठोस उत्तराची अपेक्षा होती जी फोल ठरली.
बाकी 'न' च्या ठिकाणी 'ण' चा वापर केल्यामुळे भलतीच शंका आली बघा. भलतीच शंका म्हणजे असा प्रकार करणारे एक मिपाकर होते. त्यांची फार पूर्वी मिपावरून हकालपट्टी झाली. तुम्ही त्यांच्यामुळे प्रभावित झालाय की काय असे वाटायला लागले :)
बाकी ह्या वाक्यांची काहीही आवश्यकता न्हवती. तुमच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीने विषयाशी संबंधित नसणाऱ्या गोष्टी लिहण्याची काही गरज नाही.

In reply to by अमितदादा

अजून काय ठोस उत्तर हवे आहे? लव्ह जिहाद आणि ताजमहालच्या प्रश्नावरील मतांमध्ये मला काहीही चुकीचे वाटत नाही हे वर लिहिलेच आहे. आणि भाजप वर्तमानकाळात ध्रुवीकरण करतो का हा प्रश्न केवळ वर्तमानकाळ वेगळा करून विचारणेच मुळात अप्रस्तुत आहे हे पण वर लिहिलेच आहे. त्याहून जास्त ठोस उत्तर मला तरी लिहिता येत नाही. असो.

जम्मू-काश्मीर प्रश्नावर आम्ही कोणाशीही चर्चा करणार नाही असा अनाकलनीय ताठा जवळपास साडेतीन वर्षे दाखवल्यानंतर आता सरकारने या प्रश्नावर आम्ही वाटेल त्याच्याशी चर्चा करू अशी भूमिका घेतली असून गुप्तचर खात्याचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची या प्रश्नावर चर्चक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. आजच्या लोकसत्ता मधील ह्या विषयावरचा लेख फारच उत्तम आहे. http://www.loksatta.com/agralekh-news/kashmir-conflict-between-india-an… सरकारच्या भूमिकेतील हा बदल सकारात्मक आहे. कारण इतके तितके दहशतवादी ठार मारले किंवा अमुक इतके सैन्य काश्मीरमध्ये तैनात केले म्हणून काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही हे वास्तव आहे. ते मान्य करून शेवटी चर्चेचा पर्याय खुले करणे अतिआवश्यक होते.

In reply to by अभिजीत अवलिया

ते मान्य करून शेवटी चर्चेचा पर्याय खुले करणे अतिआवश्यक होते.
काश्मीरचा प्रश्न जुना असला तरी तिथे दहशतवाद उफाळून आला राजीव गांधींच्या कारकिर्दीच्या शेवटी. वि.प्र.सिंगांच्या कारकिर्दीत काश्मीर खोर्‍यातून जवळपास सगळ्या हिंदूंना हाकलून देण्यात आले. वि.प्र.सिंगांनी त्यांच्या कार्यकाळात कोणाशी चर्चा करण्यात पुढाकार घेतल्याचे माझ्या तरी लक्षात नाही. त्याची सुरवात केली चंद्रशेखर यांनी. त्यांनी पंजाब, आसाम, काश्मीर या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. काश्मीरात चर्चेसाठी कोणाला आमंत्रित केले होते याची कल्पना नाही. पण त्यांना कार्यकाळ कमी मिळाला. पी.व्ही.नरसिंहरावांनी ही चर्चा करायची प्रक्रीया सुरूच ठेवली होती. राव १९९५ मध्ये बुर्किना फासोला गेले होते तिथून 'काश्मीर प्रश्नावर स्काय इज द लिमिट' असे वक्तव्य त्यांनी केले होते. अर्थातच स्काय इज द लिमिट असली तरी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच. वाजपेयी सरकारनेही शेवटी शेवटी हुर्रियत कॉन्फरन्सशीही बोलणी केली होती. त्याविषयी अडवाणींच्या माय कन्ट्री माय लाईफ या पुस्तकात उल्लेख आहे. अगदी चंद्रशेखर सरकारपासून मनमोहन सरकारपर्यंत कोणीही बोलणी करायची ती राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच हीच अट ठेवली होती. आणि कोणत्याही सरकारला त्यापेक्षा वेगळी अट ठेवता येणारही नाही. या सगळ्यात गोम ही की फुटिरतावादी जी मागणी करतील ती भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत मान्य करता येणे शक्यच नसल्यामुळे या चर्चांमधून अजूनपर्यंत फार काही साध्य झालेले नाही. आणि जर फुटिरतावादी भारतीय राज्यघटना (म्हणजेच काश्मीर हा भारताचा भाग आहे हे) मान्य करतील तर मग सगळ्याच समस्येचे मुळापासून निराकरण होईल आणि असल्या चर्चा कराव्याच लागणार नाहीत. तेव्हा या चर्चेच्या गुर्‍हाळातून फार काही साध्य होईल अशी अपेक्षाही नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

चर्चेच्या गुर्‍हाळातून काही साध्य होणार नाहीच आहे. फुटीरतावाद्यांनी कितीही मागणी केली तरी काश्मीर आता भारत कधीच सोडणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच ती केली जावी. निदान आपण चर्चा करतोय/मागण्या काय आहेत हे ऐकतोय हे तरी दाखवता येते. पण उगाच फुटीरतावाद्यांना बघून घेऊ, सगळ्यांना पाकिस्तानात हाकलू, पाकधार्जिण्या लोकांना गोळ्या घाला असला बिनकामाचा जोश काही उपयोगाचा नाही. काश्मीरचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू हे विधान टाळ्या किंवा मते घ्यायला ठीक आहे. पण प्रत्यक्षात ते चुटकीसरशी होणार नाही हे समजून घ्यायला हवे.

असं अल्पेश, हार्दिक, मेटे, आणखी कोण भुजबळ वगैरे लोक ज्या पक्षाशी संधान बांधून आहेत त्यांना त्या त्या जाती- जमातींचे लोक एकगठ्ठा मतदान करण्याचे दिवस गेले आहेत असे मला वाटते. गुजरात जिंकण्याची उत्तम संधी काँग्रेसला होती जर त्यांनी विकास गांडो थयो छे, उत्तम वक्तृत्व असणारा तरूण लोकल नेता आणि शिक्षण, आरोग्य असे तळागाळातले प्रश्न घेऊन प्रचार केला असता तर. सध्या तरी भाजपचा विजयरथ सुसाट धावेल असेच दिसते. निदान संख्याबळ कमी होऊन लोक आपली नाराजी दाखवतील असे वाटते.

मला वाटते की भाजपा गुजरात निवडणुक हारेल. आणि २०१९ ची निवडणुकही ते जिंकु शकतील असे वाटत नाही. राहुल गांधि कधि नव्हे ते गुजरात प्रचारात प्रभावि वाटतायत. त्यांनी उठवलेल्या एखाद्या प्रश्नावर पंतप्रथानांसकट अर्ध्या मंत्रिमंडळाची पळापळ होतेय. युपितील मुख्यमंत्र्याला मोदी असतानाही आणावे लागले यातच सर्वकाही आले. मोदी मन कि बात बोलतात पण महत्वाच्या प्रश्नांवर त्यांची चुप्पि असते. जय शहा प्रकरणात तर त्यांनी बोलण्याची आत्यंतिक आवड असुनही तोंडही उघडले नाही.जनतेला हे सर्व खटकतेय. मागे एका दलित अत्याचार प्रकरणात त्यांनी 'उन्हे मत,मारो मुझे मारो' असे काहीतरी भावनिक विधान केले होते खरे तर तेथे त्यानी खंबिर प्रधानमंत्र्याची भुमिका घ्यायला हवी होती.जिग्नेश मवानिला दलित नेता म्हणुन तेथे मोठा मान आहे.काँग्रेसला त्या तिन नेत्यानी मदत केली नाही तरी काँग्रेसच गुजरात जिंकेल. मोदी शिखरावर पोहोचले होते पण आता उतरणिचा प्रवास सुरू होतोय त्यातिल पहिला थाबा हा गुजरात असेल.

In reply to by मोदक

सोशल मिडियाचा हा जो भस्मासुर भाजपने निर्माण केलाय तोच त्यांच्या डोक्यावर हात.ठेवणार हे नक्की.

In reply to by प्रतापराव

...म्हणूनच भाजपाला पर्याय हवा आहे. पण तो पप्पू काँग्रेस किंवा डावे किंवा लालू हा नक्कीच नसावा.

In reply to by प्रतापराव

सामाजिक माध्यमातील अपप्रचाराचा भाजपला तोटा व कॉंग्रेसला फायदा हैणार नाही. नकारात्मक प्रचाराचा कायम तोटाच होतो.

In reply to by प्रतापराव

ज्या उत्साहाने राहुल गांधी,तथाकथित धर्मनिरपेक्ष माध्यमे,पुरोगामी जनता स्वतःचे थोबाड फोडून घेण्यासाठी नव्यानव्या भूमी शोधत असतात त्या आशावादाची तुलना In pursuit of happiness मधील नायकाबरोबरच होऊ शकेल. त्या चित्रपटाच्या शेवटी तो नायक यशस्वी होतो तरी. या प्रकरणात राहुल चे यश म्हणजे काँग्रेस चे विसर्जन !

आताच टाईम्स नाऊवर जनमतचाचणीचे आकडे प्रसिध्द झाले आहेत. त्याप्रमाणे गुजरातमध्ये भाजपला ५२%, काँग्रेसला ३७% तर इतरांना ११% मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तर जागांमध्ये भाजपला ११८ ते १३४, काँग्रेसला ४९ ते ६१ आणि इतरांना ० ते ३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

२२ वर्षे झालीय भाजपला गुजरातेत. मोदी सतत टिका करुन काँग्रेसचे पुनरुज्जिवनच करत आहेत.२२ वर्षात गुजरातमध्ये जो अफाट विकास झालाय त्याबद्दलच त्यांनी बोलले तर योग्य झाले असते.मला तरी ह्या वेळी भाजपा हादरलेली दिसतेय.

अनुत्पादित कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या सार्वजनिक बँकांची स्थिती सावरण्यासाठी केंद्र सरकारने २.११ लाख कोटींचे अर्थ सहाय्य करण्याचा निर्णय काल घेतला. अपेक्षेप्रमाणे ह्याचे पडसाद आज शेअर मार्केट मध्ये पडले आणि सार्वजनिक बँकांचे शेअर २० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढले. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/bank-recap-hig… हे २.११ लाख कोटींचे ठिगळ किती काम करेल ह्याविषयी मला शंका आहे. कारण एकूण अनुत्पादित कर्जे ८ लाख कोटींच्या आसपास आहेत अशी बातमी काही दिवसांपूर्वी वाचली होती. तसेच दुसरे एक म्हणजे बहुतेक पुढच्या वर्षीपासून बँकांसाठी बासेल ३ स्टॅंडर्ड कंपलसरी होणार आहे. आणि सध्या भारतातील कोणतीही बँक बासेल ३ चा क्रायटेरिया पूर्ण करत नाही असे वाचल्याचे आठवते.

राजस्थानमध्ये सध्या माध्यमांवर बंधने घालण्यासाठी जो कायदा आणायचा प्रयत्न केला जात आहे त्याला वेगवेगळ्या संस्था-समूहांमधून विरोध होतच आहे. आता त्या विरोधापायी एक समिती नेमून त्याचे "अवलोकन" करण्याचा विचार आहे पण प्रत्यक्षात असा कायदा करायचा हेतूच शंकास्पद आहे. राजस्थानमध्ये होणारे हे नाट्य "पायलट प्रोजेक्त" देखील असू शकतो. जो पुढे देशात देखील लागू करता येईल. "क्रिमिनल लॉज (राजस्थान अमेंडमेंट) ऑर्डिनन्स २०१७ असे या विधेयकाचे नाव. ते मंजूर झाल्यास १९७३ सालच्या क्रिमिनल कोड ऑफ प्रोसिजर या कायद्यात सुधारणा होईल. तीन विभाग आणि पाच उपविभाग यात मांडल्या गेलेल्या या विधेयकामुळे गुन्हे, कथित गुन्हे, त्यांची चौकशी आणि या सगळ्याचे वार्ताकन या सर्वच पद्धतीत आमूलाग्र बदल होईल. त्यामुळे न्यायदंडाधिकारी पातळीवरील अधिकाऱ्यांना सरकारी सेवक, न्यायव्यवस्थेतील कर्मचारी आदींच्या भ्रष्टाचाराबाबत गुन्हा नोंदवता येणार नाही. सरकारने अनुमती दिली तर आणि तरच यापुढे या गटातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून घेता येईल. अशी अनुमती देण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तींस १८० दिवसांत त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. या काळात संबंधितांनी निर्णय न दिल्यास अशी अनुमती दिली गेली असे गृहीत धरून पुढील कारवाई सुरू करता येईल. तसेच या काळात सदर व्यक्तीविरोधात काहीही मजकूर प्रसिद्ध करण्यास वा प्रक्षेपित करण्यास प्रसारमाध्यमांना मनाई असेल. ज्यांच्या भ्रष्टाचार वा गैरव्यवहारांची चौकशी करण्याचा अधिकार सरकारने दिला असेल त्यांच्याच विषयीचे वृत्त माध्यमांना प्रसृत करता येईल. कहर म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित पत्रकारांस दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल." आले राजे, गेले राजे सध्या काँग्रेसनी या विधेयकाविरोधात स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. सचिन पायलट सारखे तरुण नेतृत्व खरेतर पक्षाने प्रसिद्धीला आणले पाहिजे पण अजूनही त्यांची धोरणे फक्त एकाच व्यक्तीला प्रसिद्ध करण्याची आहेत! We will move court if Rajasthan ordinance is not scrapped: Sachin Pilot

In reply to by शब्दबम्बाळ

शब्दबम्बाळ, या कायद्यानुसार विरोधी वार्तांकनावर बंदी फक्त सहा महिन्यांसाठी आहे. नंतर कोणीही काहीही लिहू शकतो. फक्त सुरुवातीला गदारोळ उडवता येणार नाही असा उद्देश असावा. याचं कारण म्हणजे मीडिया ट्रायल हे होय.याबद्दल २०१४ साली न्यायमूर्ती लोढा यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. अर्थात या विधानांची पार्श्वभूमी ही माध्यमांनी आसारामबापूंवर केलेल्या बेछूट आरोपांची आहे. एकंदरीत त्यांची माध्यमांनी जी अवस्था केली त्यावरून माध्यमांवर चाप लावायची गरज स्पष्ट दिसून येते. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने गळे काढले जातील. काढूद्या. पण त्याआधी माध्यमांच्या आचारसंहितेचं काय म्हणून जनतेने प्रश्न विचारला पाहिजे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साहेब निदान बातमी नीट पहा!
त्यामुळे न्यायदंडाधिकारी पातळीवरील अधिकाऱ्यांना सरकारी सेवक, न्यायव्यवस्थेतील कर्मचारी आदींच्या भ्रष्टाचाराबाबत गुन्हा नोंदवता येणार नाही. सरकारने अनुमती दिली तर आणि तरच यापुढे या गटातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून घेता येईल.
आसाराम बापू यापैकी कुठल्या विभागात येतात? सामान्य जनता यापैकी कुठल्या विभागात येते? या कायदा बदल फक्त सरकारी सेवकांसाठी आहे! आणि ६ महिन्यात जर "सरकारने" परवानगी दिली तरच गुन्हा नोंदवला जाईल आणि मग बातमी होऊ शकते. मुळात सरकार कोण परवानगी देणारे? ते देखील जनतेचे सेवक आहेत. त्यांना हा अधिकार कशाबद्दल? जर गुन्हा उपमुख्यमंत्री अथवा मुख्यमंत्री यांवरच असेल आणि त्याचे वार्तांकन करण्याची पण मनाई असेल तर या ६ महिन्यात तो गुन्हा सहजपणे दाबला पण जाऊ शकतो. हे अत्यंत वाईट आहे आणि दडपशाही करणारे आहे. तुम्हाला तिथून अभिव्यक्तीचे गळे निघालेले दिसत असले तरी भारतात लोकशाही मूल्य टिकण्यासाठी ते आवश्यकच आहे. मीडियावर जबाबदारी असणे गरजेचे आहे पण त्यासाठी नियमावली बनवून, समिती गठीत करून चर्चा होऊन ते ठरवले गेले पाहिजे. जनतेच्या सेवकांनी स्वतःची कातडी वाचवायला केलेल्या कायद्याचे बदल उधळून लावले गेले पाहिजेत.

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/on-a-roll…
भाषण हा लोकांशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे हे मान्य आहे. पण, हा एकतर्फी संवादाचा मारा असतो असे वाटते. शिवाय यातली बहुतांश भाषणे प्रचार्की ढंगाची होतात(लोकशाहीत याला इलाज नाही). मात्र, पंतप्रधानाने लोकांशी संवाद साधण्यासाठी पत्रकार परिषदा, मुलाखती यांसारखे मार्ग देखिल वापरावयास हवेत असे मला वाटते. विशेषतः खुली पत्रकार परिषद इतर मंत्रीगण घेतात तशीच मोदींनी देखिल का घेऊ नये?(ठराविक कालावधीने) परदेशात हेड ऑफ द स्टेटच्या पत्रकार परिषदांची उत्तम परंपरा आहे.

In reply to by पुंबा

पूर्वी पत्रकार मोदींना त्यांच्या कोणत्याही कामाविषयी न विचारता फक्त गुजरात दंगलीविषयीच विचारायचे. त्यामुळेच त्यांनी पत्रकारांशी संवाद बंद केला असावा.

In reply to by श्रीगुरुजी

आता पत्रकार मोदींना त्यांच्या कोणत्याही कामाविषयी न विचारता फक्त नोटबंदीबद्दल विचारतील. त्यामुळेच त्यांनी पत्रकारांशी संवाद बंद केला असावा.

In reply to by विशुमित

पत्रकारांशी संवाद टाळणे हे चतुर धोरण आहे. त्यामुळे अडचणीत टाकणारे प्रश्न टाळता येतात. अनेक पत्रकार मुद्दाम खोचक प्रश्न विचारून विषय भरकटत नेतात. मुख्य विषयाऐवजी व्यक्तिगत मुद्द्यांवर गॉसिप करायचा प्रयत्न करतात. अनेक पत्रकार उत्तरातून स्वतःच्या मनाने सोयिस्कर अर्थ काढतात. हेसुद्धा टाळता येते. विकाऊ असलेल्या माध्यममाफियांना टाळून त्यांची विश्वासार्हता कमी करता येते. असे अनेक फायदे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पत्रकारांशी संवाद टाळणे हे चतुर धोरण आहे>> ===>>खिक्क खिक्क . . . फिदी फिदी . . . ख्यँ ख्यँ . . . हा प्रतिसाद हुजरेगिरीचा उत्तम नमुना आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पत्रकारांशी संवाद टाळणे हे चतुर धोरण आहे. त्यामुळे अडचणीत टाकणारे प्रश्न टाळता येतात.
कहर आहे राव! मला नापास व्हायची भीती वाटते म्हणून मी परीक्षाच देणार नाही हे धोरण असणे पण चतुरपणा असतो हे नव्यानेच कळले. रेटा काहीपण असेच चाललंय सध्या! :D मग तर ममो तुमचे आदर्श असायला हवेत. 'हज़ारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी।' हे वाक्य आठवतंय का? असेही गैरसोयीच्या मुद्द्यांवर उत्तर येतच नाही पंप्र कडून आता... पण ते जे काही करतील त्याच आम्ही डोळे बंद करून समर्थनच करणार ही समर्थकांची विचारसरणी कौतुकास्पद आहे!

In reply to by शब्दबम्बाळ

चुकीची तुलना आहे. विद्यार्थी म्हणजे मोदी नाहीत, शिक्षक म्हणजे पत्रकार नाहीत व परीक्षा म्हणजे पत्रकार परीषद नाही. विकाऊ व पक्षपाती माध्यमांना दूर ठेवण्याचे धोरण योग्यच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बरोबर मोदी प्रधान सेवक आहेत, सगळे पत्रकार बिकाऊ आहेत आणि पत्रकार परिषद म्हणजे सरकारचा अमूल्य वेळ बिनकामाच्या लोकांच्या प्रश्नांवर वाया घालवणे आहे. असेच ना? पण मग २०१४ निवडणुकांच्या अगोदर झाडून सगळ्या पत्रकारांना मुलाखती वगैरे दिल्या होत्या तेव्हा ते बिकाउ नाही वाटले? मन कि बात, भाषण, ट्विटर, फेसबुक वरून फक्त "वन वे कम्युनिकेशन" सुरु आहे. कारण ते एक्दम सोप्प आहे. कोणी प्रश्न विचारायचा प्रश्न नाही. प्रतिसादांमध्ये कोणी विचारला तरी त्याकडे लक्ष न दिलेले चालते त्यामुळे त्यात रिस्क अशी काही नाही! किती चतुर ना!

In reply to by श्रीगुरुजी

२०१४ ची एक मुलाखत आठवा. ती मुलाखत प्रदर्शित झालेली नसताना व ती कोणत्याही पत्रकाराने पाहिलेली नसताना सुद्धा "प्रियांका मला मुलीसारखी आहे असे मोदी मुलाखतीत म्हणाले" असे अनेक वाहिन्यांनी प्रसिद्ध करून त्यावर चर्चासत्रे घडविली. काही पत्रकारांनी थेट प्रियांकाला प्रतिक्रिया विचारल्यावर तिने संताप व्यक्त करून "मी राजीव गांधींची मुलगी आहे" असे रागारागात सांगितले. त्यामुळे भाजपने आपल्याकडे असलेले मुलाखतीचे व्हर्जन तातडीने प्रसिद्ध केले. मोदी तसे किंवा त्या अर्थाने एक शब्द सुद्धा बोलले नव्हते. त्यामुळे पत्रकारांचा खोटारडेपणा उघड झाला. मोदींचे १५ लाखांचे विधान, शहांचे भारत २५ वर्षात विश्वशक्ती होईल हे विधान, २-३ महिन्यांपूर्वी माधव भंडारींनी न केलेली विधाने त्यांच्या तोंडात टाकणे . . . काही नेत्यांची विधाने मुद्दाम विपर्यस्त स्वरूपात प्रसिद्ध करून अपप्रचार करणे असे प्रकार सातत्याने सुरू आहेत. पत्रकारांनी मोदींचा विश्वास गमाविला आहे. पत्रकार तो विश्वास परत मिळवितील तेव्हा मोदी त्यांच्याशी संवाद सुरू करतील.

In reply to by विशुमित

आता पत्रकार मोदींना त्यांच्या कोणत्याही कामाविषयी न विचारता फक्त नोटबंदीबद्दल विचारतील. त्यामुळेच त्यांनी पत्रकारांशी संवाद बंद केला असावा. असं १८० च्या कोनात विचारायचं नसतं.

In reply to by पुंबा

परदेशात हेड ऑफ द स्टेटच्या पत्रकार परिषदांची उत्तम परंपरा आहे.
तिकडे बरखा दत्त, राजदीप सरदेसाई सारखे पत्रकार नसावेत :)

In reply to by गॅरी ट्रुमन

काय हे? पत्रकार परिषदेत फक्त राजदीप, बरखाच येणारेत का? शिवाय फक्त टिव्ही मिडियाच आहे का? प्रिंट मिडियादेखिल आहेच की. मला स्वत:ला पत्रकार परिषदा न घेणं हे भ्याडपणाचं लक्षण वाटतं. असो, मी नरेंद्र मोदी अ‍ॅपवर तसे सुचवून आलो आहे.

In reply to by पुंबा

सौरा, मोदींना पत्रकारांची गरज नाही, हे बरखा दत्त यांचं विवेचन पटलं. पाहिजे असेल तर पत्रकारांनी मोदींचा विश्वास संपादन करून दाखवावा. आ.न., -गा.पै.

थायलंडचे राजे "अतुल्यतेज भूमिबोल" अनंतात विलीन... गेल्यावर्षी १३ ऑक्टोबरला वृद्धापकाळाने निधन झालं होतं.

शब्दबम्बाळ,
साहेब निदान बातमी नीट पहा! या कायदा बदल फक्त सरकारी सेवकांसाठी आहे!
माझा इथला प्रतिसाद मीडिया ट्रायल बद्दल आहे. कायद्याच्या व्याप्तीबद्दल नाही. आ.न., -गा.पै.