Skip to main content

ती.

लेखक बोलघेवडा यांनी सोमवार, 23/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
ती गेली. अगदी नक्की. ऑफिसची बॅग उचलताना खात्रीच पटलीये तशी. पण मन मात्र अजूनही तिच्याच आठवणीत रमलय. ऊन ऊन गरम पाण्याने आंघोळ करून, नवीन कपडे घालून, मुलाबरोबर फटाके उडवायला सोकावलेल्या मनाला आता ऑफिस नावाच्या चौकोनी खोक्यात नाईलाजाने कोंबावं लागेल. जिभेवर अजूनही फराळाची चव रेंगाळतीय. तिला ऑफिस मध्ये जाऊन पोळी भाजीचा डबा खायची सवय करायला थोडा वेळ द्यावा लागेल. आकाशकंदील, पणत्यांतून झिरपणारा तो पिवळा प्रकाश आता भकास ट्युबलाईटच्या पांढऱ्या प्रकाशात विरघळून जाईल. मुलांत मुल होऊन सजवलेली ती किल्ल्याची मोरपंखी दुनिया आता नुसतीच मातीची ढेकळं बनून जाईल. "आत्ताशी गणपती गेलेत, अजून दिवाळी बाकी आहे!!" असं म्हणत कामं रेटणाऱ्याला मात्र आता काडीचाही आधार राहिला नाही. जगाच्या रामरगाड्याची सवय व्हायला अजून काही दिवस जातील. सुगंधी तेलानं मऊ पडलेलं मन हळूहळू निबर होत जाईल. तशी फार हुरहूर वाटू देऊ नका. ती येईलच लवकर परत, अजून 12 महिन्यांनी !!! ( बोलघेवडा, 2017)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2256
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

वा..! छान लिहलंय. दिवाळी संपवून ऑफिसला जाताना माझ्याही मनाची अशीच काहिशी अवस्था झाली होती.