Skip to main content

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - मिसळलेला काव्यप्रेमी ह्यांच्या काही कविता

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी गुरुवार, 19/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

लेखक :- मिसळलेला काव्यप्रेमी

अभिवाचन :- मोनु



मिपाच्या लाडक्या कवीं पैकी एक - मिसळलेला काव्यप्रेमी उर्फ मिका. या सुंदर कवितांना तितक्याचा सहजपणे अभिवाचनात उतरवणार्‍या मोनुचे देखील कौतुक करावं तितकं कमी. घरातल्या जबाबदार्‍या, दिवाळी सांभाळुन न कंटाळता फक्त भावार्थासाठीच नाही तर तांत्रिक दृष्ट्या ही उत्कृष्ट उतरावं म्हणुन ३-४ दा रेकॉर्डिंग करुन तिने पाठवलं आहे. दोघांना ही मनापासून दाद द्या. नेहमीसारखे शुभ्र मोगर्‍याची कळी Footer

वाचने 3488
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

वा! अतिशय छान. दोन्ही कविता आवडत्या आहेत. विशेषतः 'शुभ्र मोगऱ्याची कळी' ऐकताना मागे रातकिड्यांचा आवाज ऐकू येतो, त्याने रात्रीचा माहोल उभा राहतो. कवितेच्या मूडला परफेक्ट शोभतो. खूप छान अभिवाचन.

भारी वाटलं एकदम. म्हणजे या कविता माझ्याच आहेत हे लक्षातच नाही राहिल ऐकतांना. मस्त मस्त मस्त

आणि त्या कवितांचे सुरेख वाचन, कविता ऐकताना जर लॅपटॉप दूर असला तर टिव्हीवर कवितांचा कार्यक्रम सुरु आहे असे वाटते इतके सुंदर वाचन केले आहे. 'ती खोली' या कवितेची आठवण झाली तिचेही वाचन झाले असते तर आणखीन मजा आली असती. यावेळेस दृक श्राव्य प्रकाराने मजा आणली आहे, पुढे जाउन हेच मिपाच्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट असनार आहे.

सुंदर कविता आणि तितकंच सहज वाचन... दोघांचहि कौतुक आणि धन्यवाद देखील..