मिपाकरहो, आपल्या सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
दिवाळी म्हणजे घरोघरी फराळ, फटाके आणि पाहुणे या बिग थ्रीचे आगमन झाले असेलच. तर घरी येणार्या पाहुण्यांना फराळाबरोबर वाढायला आणि बच्चेकंपनीला येता जाता तोंडात टाकायला एक झटपट पाककृती आपण बघणार आहोत.
साहित्य -
- कणीक २ वाट्या
- मीठ,
- हळद
- लाल तिखट
- तीळ
- किंचित ओवा
- १ लहान चमचा साखर विरघळलेले पाणी
- तेल - साधारण अर्धी वाटी किंवा किंचित कमी
अगदी दहा- बारा दिवसही पुर्यांना काहीही होत नाही. छान राहतात. साखरेच्या पाण्यामुळे पुर्या क्रिस्पी होतात. टेक्श्चरही छान येते. गुजराती घरांमध्ये तर हा पदार्थ दिवाळीत हमखास बनवला जातो.
दिवाळीतच नाही, तर इतर वेळीही या पुर्या कधीही करून ठेवण्यासारख्या आहेत. चहाच्या वेळी खायला आणि प्रवासाला नेण्यासाठी उत्तम. दिवाळीच्या गोडाधोडाच्या जेवणावर उतारा म्हणून आणि दगदगीचा श्रमपरिहार म्हणूनसुद्धा या पुर्या आयत्या वेळी मस्त कामाला येतात. कुठलीही चटकन होणारी रस्साभाजी किंवा घट्ट दाल फ्राय बनवा आणि त्याबरोबर या खुसखुशीत पुर्यांचा आस्वाद घ्या.

वाचने
12543
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास! मस्त दिसत आहेत पुर्या.
मस्तच
झटपट पाकृ!!
सुरेख
मस्त!!
किचन मधली स्वच्छता पाहून
In reply to मस्त!! by बाजीप्रभू
तोंपासु............!! मस्त
धन्यवाद राघव. मऊ पुर्या
कडकपणासाठी रवा थोडा टाकला तर
In reply to धन्यवाद राघव. मऊ पुर्या by पद्मावति
एक विचारायच होत..ह्या पुर्
गजोधर आणि रायनची आई- अनुक्रमे
नै नै चवीसाठी नाही विचारलं ..
In reply to गजोधर आणि रायनची आई- अनुक्रमे by पद्मावति
मस्त!
झकास दिसताहेत पुऱ्या.
फोटू व पाकृ मस्त.
खारी पुरी
मस्तच दिसताहेत पुर्या!छान
खार्या पुर्या.
मस्तच, मला आवडतात ह्या पुऱ्या
फोटू व पाकृ मस्त.
पाकृ आवडली
झकास फराळ !
नाही .
In reply to झकास फराळ ! by सस्नेह
पुरी करुन बघितली.. आवडली.
आहा... मस्तच
अग काय भारी आहे हि पुरि यम