कासव बघितला. बघताना बोरकरांची 'जेथे जातो तेथे' आठवत राहिली.
जेथे जातो तेथे मी माझा सांगाती
पुढे आणि पाठी मीच माझ्या
मीच माझी वाट मीच माझा दिवा
हि-याचा ताजवा मीच माझ्या
मीच माझी रुपे पाहतो पाण्यात
आणितो गाण्यात मीच त्यांना
मीच मला कधी हासडितो शिव्या
कधी गातो ओव्या मीच मला
अशी माझी चाले नित्य मम पूजा
लोकी माझ्या ध्वजा मिरवितो
नाही कधी केली तुझी आठवण
म्हणालास पण मीच तू रे
कधीतरी मन आजारतं. कधी नुसत्या सर्दी-पडश्यावर भागतं, कधी दीर्घ मुदतीचा ताप येतो. फतकल मारून बसतो, हटत नाही. अश्यावेळी हायबरनेट व्हावंसं वाटतं. तेव्हा आपापली एखादी जानकी, अशी एखादी कविता, डॉक्टर, जरूर तेव्हा औषधं, आवडतं काम, घ्यावं मदतीला. हळूहळू ताप उतरत जातो. मनाचीही निगा राखावी. कशी, ते कासव बघून नीटसं लक्षात येईल. हेही दिवस जातील, मला वाटतंय ते खरं आहे का, तेवढंच खरं आहे का, हे स्वतःला विचारण्याचं भान कुणाकडून तरी घ्यायचं. ते आपलं आपल्याला नसतं. कान-डोळे असतात, बघायला ऐकायला शिकायचं. स्वतःसाठी. स्वतःसाठी जगायचं, स्वतःवर प्रेम करायचं.
कडकडीत उन्हाळ्यात आपल्याला जागोजाग फुललेले बहावे दिसतात. नुसतं बघूनही आपलं मन धमक होऊन जातं. किती पडझड होते, जीवनाचा एक अंशदेखिल शिल्लक उरत नाही. तरी निसर्ग फुलायचा थांबत नाही. पावसाची केवळ एक शिंपड जमिनीला हलकं फुलकं होऊन दरवळायला पुरेशी होते. भूकंप, वणवे, काहीही होवो, कोरडंठक्क पडलेलं झाड पालवणं थांबवत नाही की बी फळायचं विसरत नाही. निसर्ग मोठा अद्भूत समुपदेशक, डॉक्टर आहे. एरवी आपल्या हाताच्या स्पर्शाचा दाह सहन करू न शकणारी बहाव्याची झुंबरं रणरण उन्हाच्या धगीत दिवसेंदिवस मजेत तग धरून झुलत असतात. आधीच्या पडझडीची, सोसलेल्या तगमगीची कोळिष्टकं त्या रसरशीत पिवळेपणाला काळवंडायची हिंमत करू शकत नाहीत. त्या नाजूक जीवांना जे जमतं, ते आपल्याला का जमू नये? जमतं, जमवायला हवं.
कासवही हेच सांगतो, कासवांच्या गोष्टीतून. फार छानपैकी. शब्दांचं वायफळ पाल्हाळ न लावता. कासवं, मानव, जानकी, परशू, यदू, दत्ताभाऊ, समुद्र, अनेक वाटा असलेलं मोकळं ढाकळं घर, सुकथनकरांचे शब्द, कॅमेरा असे सगळे मिळून सांगतात. खरंतर आपलीच असलेली ती गोष्ट मग जास्त चांगल्या प्रकारे समजते. खूप उत्तरं मिळतात. न मिळालेल्यांची उत्तरं शोधण्याचा हुरूप मिळतो. यदू सांगतो तसं झडझडून कष्ट करावेत, भरभरून जगावं, जीवाला जीव लावावा हे पटतं. भजी खावी वाटली तर भजी खावी, चहा प्यावा वाटला तर चहा प्यावा, दोन्ही एकदम कोंबलं तर ठसका लागतो हे तत्वज्ञान परशूकडून ऐकल्यामुळे जास्त अपील होतं. मानवच्या हातात गाडीची किल्ली सोपवून जानकी त्याच्याबरोबर निघते तेव्हा गोल वळण घेणारा रस्ता दिसतो. मानवचा योग्य दिशेनं सुरू झालेला प्रवास दाखवणारा. असं खूप आहे. प्रत्येकानं बघायला हवा कासव, आपापल्या नजरेनं.
खुपसे लोकं मला शाळेत शिकवायला का नव्हते असं वाटतं. त्यात सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर पण आहेत. सतत सोडवावे लागणारे कठीण विषय सोपे करून समजावतात ते. कासवही तसाच आहे. मी त्या दोघांचे त्यासाठी मनापासून आभार मानले. असे चित्रपट वरचेवर येत रहाणं आणि ते आपण सगळ्यांनी आवर्जून पहाणं खूप आवश्यक आहे. तुम्हीसुद्धा सगळ्यांनी कासव नक्की पहा.
वाचने
16356
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद लिहील्याबद्दल.
राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या
In reply to धन्यवाद लिहील्याबद्दल. by सूड
तरी मागच्या आठवड्यात कासवचे
In reply to राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या by अभिजीत अवलिया
अतिशय सुंदर लिहिलंय.
नुसताच राष्ट्रीय पुरस्कार विजेता नाही,
सुंदर लिहिलय!
खरंय
छान लिहिलय. परवाच हा चित्रपट
चपखल लिहिलंस सई. आवडलं.
सुंदर लिहिलंत
बघायची इच्छा आहे पण ...
पिंचिं मध्ये पहिल्या आठवड्यात
In reply to बघायची इच्छा आहे पण ... by मराठी कथालेखक
कासव हळूहळू सरकेल. ( माबोवर
बघणार हाय.
कंजूस, तुम्ही नक्की कोणत्या टोनमधे
हाहाहा! सईताई, ती कंकाकांची
In reply to कंजूस, तुम्ही नक्की कोणत्या टोनमधे by सई कोडोलीकर
कासवात करमणुकीशिवाय इतर
In reply to कंजूस, तुम्ही नक्की कोणत्या टोनमधे by सई कोडोलीकर
प्रतिभासुद्धा “unlock” व्हायला हे मिपा सारखे platforms खूपच मदत
In reply to कासवात करमणुकीशिवाय इतर by कंजूस
मिपावर कासवबद्दल कुणाचाच काही
In reply to कंजूस, तुम्ही नक्की कोणत्या टोनमधे by सई कोडोलीकर
यानिमित्ताने ...
इरावती, मृणाल कुलकर्णी,
In reply to यानिमित्ताने ... by मराठी कथालेखक
... + देविका दफ्तरदार, अमृता
In reply to इरावती, मृणाल कुलकर्णी, by सूड
स्मिता तांबे?
In reply to ... + देविका दफ्तरदार, अमृता by एस
का नाही? '७२ मैल - एक प्रवास'
In reply to स्मिता तांबे? by सूड
नाही बघितला अजून.
In reply to का नाही? '७२ मैल - एक प्रवास' by एस
खूप सुंदर लिहिलं आहे! हा
छान लिहिलंय
अतिशय आवडलाच अर्थात... हे
मस्त लिहिलय. कासव बघणार.
पुर्वी दुरदर्शनवर शांती या
In reply to मस्त लिहिलय. कासव बघणार. by रेवती
पुर्वी दुरदर्शनवर शांती या
In reply to मस्त लिहिलय. कासव बघणार. by रेवती
खूप सुंदर लिहिलंय!
एस, स्पेशल थँक्स :-)
वा..
छान लिहिलंय
अफलातून वाक्य आहे
In reply to छान लिहिलंय by भ ट क्या खे ड वा ला
अगदी मनातली कमेंट दिली आहे...
In reply to छान लिहिलंय by भ ट क्या खे ड वा ला
खुपच सुंदर चित्रपट आहे,
सुरेख परीक्षण
हो, लहर समंदर खूपच सुंदर आहे
In reply to सुरेख परीक्षण by अजया
सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.
शनवारी बघून आलो. अत्यंत सुंदर
विषय मस्त जमलाय..
नाही आवडला
ती स्वत:ला डिप्रेशन मध्ये
In reply to नाही आवडला by मराठी कथालेखक
खुप छान लिहील आहेस सई.
कासव पाहिला.. अत्यंत सुंदर
अखेर कासव पाहिला. पण निराशा झाली.>>