पोस्टरबाजी - ऐक दिखाऊपणाची गरज
तुम्ही शहराबाहेर, गावाबाहेर बाईकने, कारने, अथवा अन्य वाहनाने जात असतांना ,बाहेर रस्त्याच्या कडेला हास्यमुद्रेत असलेले ४,५ किंवा जास्त जणांचे टोळकं दिसतच. अर्थात हे टोळकं असत पोस्टरवर..कोणाचा वाढदिवस, किंवा कोणाची कुठेतरी लागलेली वर्णी ह्या साठी हे सर्वजण पोस्टरवर, शुभेच्छा देण्यासाठी किंवा अभिनंदन करण्यासाठी , विराजमान झालेले असतात. हे तुम्हांला तुमच्या शहरात, गावात पण मोक्याच्या ठिकाणी पण हास्यवदन करीत असतात.
बर ,नाही बघायचे ठरवले तरी ते अशाप्रकारे लावलेले असतात की त्यांचे मुखदर्शन ओझरते का होईना होतेच. ऐकवेळ देवळात नाही गेलो तर देवाला टाळता येईल.पण ह्या हसतमुख टोळक्यांना तुम्ही टाळू शकत नाही. :-)
मग मी या पोस्टरांचा स्टडी चालु केला.
अशी पोस्टर बहुधा राजकीय असतात. ही पोस्टर नवशिक्या पण राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या उत्सवमुर्तींची असतात. ह्यात गल्लीतील शेंबड्या पोऱ्यापासून थेट राज्यपातळीवरील वा राष्ट्रपातळीवरील नेते ऐकमेकांशेजारी हसतखेळत ऊभे़ असतात. तो आनंददायी सोहळा बघत बघत भान हरपून जाते राव !
ह्यात बहुतेकवेळेस ऐखाद्याचा फोटो फारच मोठा व सूचक हास्य करणारा असतो..हीच ती आपली ऊत्सवमुर्ति होय.. बाकी राज्यपातळीवरील, राष्ट्रपातळीवरील नेते कोपऱ्यात आकाराने छोटे होऊन असतात.तरी ते पण बिचारे हसतच असतात.
सर्वात मानले पाहिजे ते पेंटर लोकांना.अगदी जसेच्या तसे ते भाव चेहेऱ्यावर उतरवतात.छदमीपणा,कणखरपणा,चतुरता, कोडगेपणा, मुजोरीपणा, करारीबाणा असे कितीतरी भाव तो चेहेऱ्यावर दर्शवितो..त्याच माणसाचे ३,४ ठिकाणचे पोस्टर पाहिले तरी स्वभावाचा प्राथमिक अंदाज करता येतो.
गमंत म्हणजे प्राण्याची अभिनंदन वर पोस्टर लावणारी कमी नाहीत. मात्र प्राणी व माणुस असे एकत्रित फोटो असतात. ती कधी कधी नीट काळजी घेतली नाही तर हास्यापद दिसतात.
गावातील पोस्टरबाजी :- भावी वर / वधू यांचे हिरो/हिरॉइन स्टाइल फोटो असतात. मोठ्या कापडी फलकावर हे हास्यवदनाने आल्या गेल्याचे स्वागत करत लग्नाची तारीख व वेळ ( ज्यात कमीतकमी दिड तास मिळवावा.) सांगत असतात. मी अश्या पोस्टरकडे बघून मनात म्हणतो, हसा लेकांनो हसा , काही काळ आहे अजून असा मोठा ' हा' करून हसण्याचा ...
शहरातील पोस्टरबाजी :- ह्यात मुख्य करून ,राजकीय नेते मंडळी आघाडीवर असतात. तसे ते गावात पण असतात पण फारसे 'शब्द' बंबाळीत नसतात . शहरात , मात्र अनेक वजनदार शब्दांचे 'पेव' फुटलेले असते. 'आदर्श ' , 'हुरहुन्नरी' 'तरुण' ( पन्नाशीला पण हा शब्द चालतो.) 'खंबीर' , 'तडफदार' (मला तर तडफडणारा मासाच आठवतो.) ' साहेब' 'धुरंधरी' .....
याशिवाय गावात, निमशहरी व शहरी भागात दहीहंडी व गणेशोत्सव हे पोस्टरबाजी साठी सुगीचे दिवस असतात. दहीहंडी मध्ये 'मुख्य आकर्षणा' बरोबर नेहमीचे हसतमुख दर्शन पण असते. जसे गल्लीतील कुत्रांचा एक एक भाग असतो तसाच भाग 'राजकीय नवशिके' पोस्टरसाठी गणेशोत्सवासाठी वाटुन घेतात.
यात पण दोन बॅग पडतात . अधिकृत व अनाधिकृत
नगरपालिका, महानगरपालिका किंवा 'आकाश परवाना विभाग' फार ओरड झाल्यावर काही अनाधिकृत फलक काढते पण त्यात फारसा दम नसतो
ता.क :- लाइटली घेणे विशेषतः राजकीय गोष्टींची आवड असणाऱ्यांनी .
याद्या
6679
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
अभ्यास करुन लिहा.
आता तुमीच लिवा
In reply to अभ्यास करुन लिहा. by अभ्या..
शुभेच्छांबद्दल धन्यवाद, पण
In reply to अभ्यास करुन लिहा. by अभ्या..
अधिक माहितीपुर्वक लेख
In reply to शुभेच्छांबद्दल धन्यवाद, पण by ओरायन
अभ्यासपूर्ण प्रतिसाद.
In reply to अधिक माहितीपुर्वक लेख by अभ्या..
ज ब र द स्त....
In reply to अधिक माहितीपुर्वक लेख by अभ्या..
चौफेर पोस्टरबाजी.!!
In reply to अधिक माहितीपुर्वक लेख by अभ्या..
रुलायेगा क्या पगले...
In reply to अधिक माहितीपुर्वक लेख by अभ्या..
अरे भाई
पेंटर लोक ??
मान्य , पेंटरलोक
In reply to पेंटर लोक ?? by रानरेडा
काय असे वाचावे
मजेशीर
धन्यवाद सकारात्मक प्रतिसादाबद्दल
In reply to मजेशीर by पैसा
लेख चांगला आहे
धन्यवाद!
In reply to लेख चांगला आहे by एस
लेख वाचला नाही.
फ्लेक्स
ताजा ताजा
फोटो कुठाय
In reply to ताजा ताजा by इरसाल
(No subject)
In reply to फोटो कुठाय by टवाळ कार्टा
कोणीतरी विचारेल अस वाटलच होतं
In reply to फोटो कुठाय by टवाळ कार्टा
लेख ठीकठाक.
धन्यवाद!
In reply to लेख ठीकठाक. by पुंबा
खरंतर या विषयावरचा लेख
तयारी करण्याबाबत सहमत
In reply to खरंतर या विषयावरचा लेख by दुर्गविहारी
आमचाही एक फ्लेक्स :-)
लेख आवडला.
In reply to आमचाही एक फ्लेक्स :-) by बबन ताम्बे
लेखाचा उद्देश आवडला .
आभारी आहे.
In reply to लेखाचा उद्देश आवडला . by सिरुसेरि