Skip to main content

पुणे सम्मेलन

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 23/09/2017 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या सायंकाळी साडे पाच वाजता पुण्यातील मिपाकरांचे संमेलन भरवण्याचे ठरले आहे. सर्व मिपाकरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. सध्या तरी मी ( डॉ सुबोध खरे), मोदक, मृत्युंजय. श्री प्रसाद भागवत, बिहाग, सागर, प्रशांत, सौरभ असे काही लोक येणार आहोत. तरी ज्यांना जमेल त्यांनी येऊन आणि जितक्या लोकांना जमेल तितक्यात कळवून संमेलनाची शोभा वाढवावी हि नम्र विनंती. अनाहितांनाही सस्नेह आमंत्रण आहे. ज्यांना जितका वेळ जमेल तितका वेळ जमल्यास पूर्ण वेळ येण्याची कृपा करावी. स्थळ --संभाजी उद्यान वेळ १७. ३० तेथे भेटून पुढचा कार्यक्रम (उदरभरणाचा)ठरविण्यात येईल माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९

वाचने 6877
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

उदरभरणावरून.. पूर्वीच्या राजधानी थाळीच्या जागेत "द लीफ" नामक नवीन खादाडीची जागा सुरू झाली आहे. त्याचे अनुभव आहेत का कोणाचे..?

In reply to by मोदक

जेवण नावाचं रेस्टॉरंट आहे जवळ , थोडा महाग आहे पण चांगला आहे

डॉक तुम्हाला आणि प्रसाद भागवताना प्रत्यक्ष भेटायला मनापासून आवडेल , पण मुंबईवरून पुणे थोडं अवघड आहे, पण नजीकच्या काळात नक्की भेटू

एवढ्या कमी वेळात मंचर हुन येणे शक्य नाही. तुम्हाला भेटने नक्कीच आवडले असते.

पुणे कट्टयाचा एकच धागा आल्याबध्दल डॉक्टर साहेबांचा निषेध. र.च्या.क.ने मागच्या कट्टयाचा व्रुतांत कोठे आहे ?☺

कट्ट्याला सम्मेलन असे सोज्वळ नाव दिलेले पाहून अंमळ ड्वाले पाणावले ! जरा आधी सूचना मिळाली असती तर आम्ही पण आलो असतो की. ..पण अर्र, पुणेकरांना च तेवढं आमंत्रण दिसतंय ;) मग असो..

संमेलनास शुभेच्छा यायची इच्छा आहे पण प्रकृती स्वास्थ्यामुळे जमत नाही आहे. डॉक्टर खरे व इतरांना भेटण्याची खूप इच्छा आहे , बघू परत कधीतरी. अनिवासी

मिपा आले का वयात ? किंवा प्रस्थापित झाले? "कट्टा"वाटे का टपोरी? "संमेलन"का हो केले? :)

पुणे व त्यात मिपाकर.. म्हणजे वाफाळलेला चहा,कांदाभजी,मिसळपाव व चटपटीत गप्पा.