समांतर विश्व : ऐक तर्क ( Parallel Universe)
आपल्याला जवळपास सर्वांनी मानलेला वा गृहित धरलेला ' महास्फोटातून विश्वनिर्मिती ' ( Big bang theory)हा सिद्धांत माहिती आहे. ऐका बिंदुवत जागेतून महा प्रचंड स्फोट होऊन , प्रचंड उर्जा निर्माण झाली व त्याचबरोबर विश्व( Universe) निर्माण झाले. म्हणजेच अवकाश (Space) व काळ ( Time ) हे आस्तित्वात आले. ही क्रिया संपली का हो ? नाही..विश्व ( Universe) अजूनही वृद्धिंगत होत आहे. Universe is expanding.म्हणजे नविन अवकाश व वेळ निर्मिती चालुच आहे..त्याचा वेग संशोधकांना माहित झाला असून तो Hubble Constant मध्ये मोजतात. आपल्याला हे काहीच जाणवत नाही , कारण हे आपल्यापासून कित्येक कोट्यावधी प्रकाशवर्ष (Light year ) दुर वर हे घडत असते. ( १ Light year = प्रकाशाने ऐका वर्षात कापलेले अंतर..प्रकाश १ सेकंदात ३ लाख kms जातो.).विश्वाचा वृद्धिंगत होण्याचा वेग (Expansion Rate ) अचाट व अफाटच आहे. ही तुमची ओळ वाचेपर्यंत विश्व ( पर्यायाने आकाश) लाखो प्रकाशवर्षाने विस्तारलेले असेल..हे विस्तारणे विश्व निर्मितीपासून अव्याहातपणे सुरू आहे. यामुळे विश्वातील कोणत्याही दोन खगोलीव गोष्टी (जसे, तेजोमेघ- Nabula , आकाश गंगा समूह -cluster of galaxies ) ह्या ऐकमेकांपासून दुर जात आहेत.
हे समजण्यासाठी ईथे नेहमी ऐक काही प्रमाणात साध्यर्म असलेले उदाहरण देतात. ( Analogy )
ऐक मोठा बलुन आहे. जसा हवामानबदल वा वातावरणाचा मगोवा घेण्यासाठी जो उंच आकाशात सोडतात तसाच. हा बलुन सुरवातीला हवा वा गॅस भरलेला नाही.ह्या बलुन मध्ये ४ मुंग्या ४ दिशांना त्यात (वलूनच्या आतून) चिकटवून ठेवल्या आहेत.सुरूवातीला मुंग्या ऐकमेकांना जवळ असल्यामुळे पाहू शकतात.आता बलूनमध्ये हवा / गॅस भरण्यास सुरवात करा. जसजसा बलून फुगत जाईल तसतसे मुंग्यांमधील अंतर वाढत जाईल. आता मुंग्याच्या जागी दिर्घिका समजा ( दिर्घिका म्हणजे अनेक आकाशगंगांचा समूह.....जसे आपली आकाशगंगा मंदाकिनी - Milky way Galaxy , शेजारील आकाशगंगा देवयानी-Andremoda Galaxy व ईतर अनेक आकाशगंगा मिळून ऐक दिर्घिका बनते. ऐक दिर्घिका कोट्याविधी प्रकाशवर्ष दुर पसरलेली असते. म्हणजे जो प्रकाश सुर्यापासुन पृथ्वी वर यायला केवळ ८ मिनिटे व प्लुटोवर पोहचायला ५ तास लागतात , त्याला आपली Milky Way Galaxy पार करण्यासाठी १ लाख वर्ष तर आपली दिर्घिका पार करण्यासाठी कोट्यावधी वर्ष लागतील....) अशा अनेक दर्घिका ऐकमेकांपासून दुर दुर जात आहेत. बलुन फुगत होता हवेत ...पण विश्व निर्माण होत. आहे वा वृद्धिंगत होत आहे...पण कशात ? .......
कशातच नाही कारण नविन आकाश निर्माण होत आहे.अगोदर काहीच नसते. अगदी पोकळी पण नाही.
आता दुसरा बलुन घ्या. त्यात नविन मुंग्या घ्या व तो पण फुगवा...आता पहिल्या बलुन मधील मुंग्यांना दुसरे बलून ( विश्व ) व आतील मुंग्यांची कधीच कल्पना येणार नाही....This is called Parallel Universe Concept. ..ह्यात असा तर्क करण्यात आलेला आहे की जसे आपले विश्व निर्माण झाले तसे अजून पण अनेक विश्व निर्माण झाले असतील पण ते आपण अनुभवू शकणार नाही कारण आपण ह्या विश्वामध्ये बद्ध झालेलो आहोत. (We all are bound to space- time of this universe. )..
अर्थात हा केवळ तर्क. आहे. अजून तरी असा काही पुरावा मिळालेला नाही. या संकल्पवनेवर आधारित चिञपट पण आहेत जसे...The big time , It's wonderful life.
माञ हा तर्क/ कल्पना खरोखर रोमांचकारी व रोचक आहे.
वाचने
9158
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लेख आहे!
खतरनाक काँसेप्ट आहे
असं कसं, असं कसं
In reply to खतरनाक काँसेप्ट आहे by नेत्रेश
हे तुम्ही स्थीर असाल
In reply to असं कसं, असं कसं by चामुंडराय
आवडला लेख. अस काहीतरी imagine
बहुविश्व (मल्टिव्हर्स)
MIB
कधी कधी असं अनुभवायला येतं की,
पूर्वसंवेदन
In reply to कधी कधी असं अनुभवायला येतं की, by चष्मेबद्दूर
या अनुभवाला "Déjà vu" म्हणतात
In reply to कधी कधी असं अनुभवायला येतं की, by चष्मेबद्दूर
देजा वू
खरंच हि कल्पना रोमांचक आहे.
आपल्या सर्वांचे प्रतिसाद माहितीपूर्वक
"Quantum Mechanics" ला मराठी
इंसेप्शन नावाचा एक सिनेमा
नाही
In reply to इंसेप्शन नावाचा एक सिनेमा by चष्मेबद्दूर
वाढते विश्व
थोडा और भी ,
आकुंचन शक्य नाही
कौतुक
In reply to आकुंचन शक्य नाही by आदिजोशी
विश्वाचे आकुंचन नवीन संशोधनानुसार जवळपास होण्याची शक्यता धूसर
रोचक चर्चा...
धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
In reply to रोचक चर्चा... by शब्दबम्बाळ