Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उदय आगाशे on Sun, 09/17/2017 - 12:23
लेखनविषय (Tags)
मुक्तक
तंत्र
प्रवास
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
तसा माझ्याकडे DSLR कॅमेरा 2010 पासून होता आणि त्यावर वेगवेगळे फोटो मी काढतही असे. पण मागच्या वर्षी (2016) मधे हा विषय जरा seriously घ्यावा असे वाटू लागले. मग त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. अर्थात ह्या बरोबर थोडी जास्त investment सुद्धा लागणार होती हे लक्षात आल. २०१६ च्या मे महिन्यात मग नवीन advanced कॅमेरा घेण्यापासून सुरूवात केली. लगेच जून मध्ये माथेरान येथे फोटोग्राफी विशेष ट्रिप ला गेलो. ही अर्थात मॅक्रो विशेष सहल होती आणि मला तर ह्या विषयाची काहीच माहिती नव्हती. पण जाउन तर बघू म्हणून गेलो. सकाळी लवकर उठून लोकल ने नेरळ गाठल आणि जवळच न्याहारी करून तुफान पावसातच माथेरान येथे पोहोचलो. दस्तूरी नाक्यावरून मग चालत चालत हॉटेल पर्यंत निघालो. पाउस नुसता कोसळत होता त्यामुळे रेनकोट छत्रि जे काही मिळेल ते वापरुन कॅमरा बॅग सांभाळत चालत होतो. पण आजूबाजूला वातावरण अतिशय सुंदर होते. छान घनदाट झाडी आणि धुक्याची ओढलेली चादर म्हणजे केवळ अप्रतिम कॉंबिनेशन. त्या वेळेपर्यंत युवराज गुर्जर हे फक्त नाव ऐकल होत पण त्या पायी प्रवासात ह्या व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला लागली. रस्त्यातच वेग वेगळे कीटक किवा मशरूम दिसायला लागले (म्हणजे त्याने दाखवले म्हणून कळले). शिवाय बरोबर मकरंद ही होताच आणखी माहिती द्यायला. (पुढे जाण्यापुर्वी, मकरंद आणि युवराज म्हणजे "विहंग travels" चे सर्वे-सर्वा. त्यांच्याच बरोबर ही ग्रूप ट्रिप होती). काही बेडूक किवा साप सुधा दिसले रस्त्यात. अर्थात हे हिरवे साप म्हणजे green vine snake किवा हरणटोळ ही माहिती नंतर कळली. हॉटेल मध्ये गेल्यावर थोडे स्थिरस्थावर झालयावर आधी मॅक्रो फोटोस ची थोडी माहिती युवराज ने दिली आणि काही अप्रतिम फोटोस सुद्धा दाखवले. इतर सर्व मंडळी त्या विषयाशी सुपरिचित होती, त्यांचा कॅमेरा किवा बरोबर असलेला फ्लॅश सुद्धा स्पेशल होते. जरा कुतुहलानेच मी ह्या गोष्टी बघत होतो. तिथेच रिंग फ्लॅश हा प्रकार पहिल्यांदा बघितला. हा नक्की काय प्रकार आहे असे कुतूहल असेल तर हे फोटो बघा म्हणजे थोडी कल्पना येईल.  मॅक्रो स्पेशल फ्लॅश (Macro Special Flash)

 रिंग फ्लॅश (Ring Flash)

मग सुरू झाला पहिला ट्रेल.. बाहेर पाउस जोरदार होता, क्षणाचीही उसंत न घेता नुसता तुफान बरसत होता. पण मंडळींचा उत्साह अजिबात कमी नव्हता. पाय वाटेवरून जातांना कितीतरी वेग-वेगळ्या झाडे-फुले आणि कीटक ह्या प्रकारांची माहिती मिळत होती. एवढा पाउस बघून मी तर बॅग मधून कॅमेरा काढला देखील नाही. फक्त मोबाइल कॅमेरयाने जे काही जमले तेवढेच. पण बरोबरीचे सर्वच सरावलेले होते. त्यांचा कॅमरा सतत खटखटत होता, साप, बेडूक, छोटे कीटक सर्व काही त्यांच्या कॅमेरा मध्ये टिपले जात होते. मग मला मॅक्रो स्पेशल लेन्स आणि स्पेशल फ्लॅश ह्या गोष्टींची थोडी माहिती कळली. छोट्या गोष्टींचे मोठे दिसणारे फोटो काढायचे तर त्यासाठी ह्या स्पेशल लेन्स ची गरज असते. माथेरान ला मी पुर्वी २-३ वेळा आलो होतो पण जळवा (leeches) हा प्रकार काय असतो, हे प्रथमच कळले. माथेरांच्या दमट ओलसर हवेत त्यांचा सुळ्सुळात असतो नुसता. आणि आपल्या पायाच्या उबेने जळवा लगेच आकर्षित होतात आणि लगेच compulsory रक्तदानाचा कार्यक्रम सुरू करतात. मग त्या कशा हाताने उचलून किवा त्यावर मिठाचे पाणी टाकून काढता येतात ह्याचे on-the-job ट्रेनिंग झाले. आणि पुढच्या ट्रिप ला गमबूट किवा तत्सम उंच बूट आणायचेच हे नक्की ठरवल (आधीच मॅक्रो लेन्स ची इनवेस्टमेंट त्यात ही भर) दुपारी आणि संध्याकाळी अशी भटकंती केल्यानंतर मी रात्रीच्या ट्रेक ला जायचे टाळले आणि त्यामुळे काही निशाचर प्राण्यांचे (bamboo pit viper, toads, etc.) दर्शन झाले नाही. रविवार सकाळी उठून ब्रेकफास्ट साठी आलो तर तिथेच युवराज ने छताजवळ एक पान दाखवले. ह्या फोटोत दिसताय ते..  केटिडिड (Katydid)

फसलात ना? हे कुठले झाडाचे पान नाही तर हा आहे katydid नावाचा कीडा. आपले पाय शरीराच्या मागे दडवून किती सहज साधलाय हे camouflage. अजुन एक ट्रेल करून मग आम्ही घरी यायला निघालो. अर्थात पावसाने जराही उसंत घेतली नव्हती, त्यामुळे फोटोस च्या बाबतीत निराशाच पदरी पडली पण ज्ञानात मात्र भरपुर भर पडली. आता एक लक्षात आल की ह्या प्रकारच्या फोटोस साठी मॅक्रो लेन्स must आहे. मग थोडी आजुन चौकशी केली तेव्हा समजल की हे लेन्स tamron ह्या ब्रँड चे थोडे स्वस्त मिळते (म्हणजे फक्त Canon पेक्षा) पण तरीही निदान काही हजारांची investment नक्की. मग थोडे प्रयोग केले. Revers-ring नावाचा एक प्रकार मिळतो. जो वापरुन आपले आहे ते लेन्स उलट्या बाजूने कॅमेरयाला जोडता येते. आणि मग आपल्याला हवे तसे magnification मिळू शकते. अर्थात ह्या प्रकारात बरेच अडथळे सुधा आहेत, हे थोडे टेक्निकल होताय पण त्यातल्या त्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे कॅमरा ऑटो-फोकस करत नाही, म्हणजे ते पूर्णपणे मॅन्यूयल. मग "aperture-width" बदलता येत नाही (म्हणजे फोटोचा किती भाग हा फोकस होईल हे ठरवणे कठीण होते). थोडे दिवस हे असेच प्रयोग केले. ह्या दरम्यान माझा योग-शिक्षक अभ्यासक्रम चालू होता वर्षभर त्यामुळे फोटोस साठी वेळ देता आला नाही. पण २०१७ च्या पावसाळयापासून परत एकदा लक्ष फोटोग्रफी कडे वळवले. जुलै मधे अजुन एक मॅक्रो टूर केली आणि परत एकदा मॅक्रो लेन्स शिवाय गेलो. (ह्या ट्रिप विषयी नंतर सविस्तर लिहिनच .. अर्थात कोणी वाचणार असेल तर) आणि इथे मात्र मी नक्की ठरवल की आता मॅक्रो लेन्स ला पर्याय नाही. मग त्यानंतर च्या ट्रीप केल्या त्या नवीन लेन्स घेउनच. त्याविषयी विस्ताराने नंतर लिहिता येईल पण उदाहरणा दाखल काही फोटो इथे दाखवतो की जे त्या लेन्स मुळे शक्य झाले.  जंपिंग स्पायडर

 भक्ष्यासह कोळी (Spider with kill)

 कासवपाठीचा बिट्ल (Tortoise Shell Beetle)

चतूर चतूर

फूलपाखरू फूलपाखरू

  • Log in or register to post comments
  • 9002 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 09/17/2017 - 12:26

Permalink

फोटो

फोटो दिसत नाहीत. फोटो लिंक गंडल्या आहेत असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by उदय आगाशे on Sun, 09/17/2017 - 12:36

In reply to फोटो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

पहिलाच प्रयोग आहे त्यामुळे काही उमगत नाहीये

फोटोस गुगल फोटोस मधे आहेत पण इथे दिसत नाहीत..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 09/17/2017 - 14:06

In reply to पहिलाच प्रयोग आहे त्यामुळे काही उमगत नाहीये by उदय आगाशे

Permalink

तुम्ही टाकलेल्या लिंक्स

तुम्ही टाकलेल्या लिंक्स फोटोंच्या नाहीत तर त्यांच्या थंबनेल्सच्या आहेत, त्यामुळे फोटो दिसत नाहीत. १. प्रथम फोटो असलेल्या अल्बमला पब्लिक अ‍ॅक्सेस आहे याची खात्री करा. २. त्यानंतर प्रत्येक फोटो (आल्बममध्ये दिसणार्‍या थंबनेलवर डबल क्लिक करून) पूर्ण आकारात उघडून दिसणार्‍या इमेजची लिंक मिपात टाका. *************** ते सगळे फोटो आता इथेच एका प्रतिसादात टाकू शकलात तर ते लेखात हलविण्याची व्यवस्था करता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by समाधान राऊत on Sun, 09/17/2017 - 13:39

Permalink

फोटोचा कोपरासुद्धा दिसत नाही.

फोटोचा कोपरासुद्धा दिसत नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Sun, 09/17/2017 - 16:45

Permalink

धाग्यावरचे फोटो बघायला

कुठली लेन्स वापरावी?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Sun, 09/17/2017 - 19:30

Permalink

असे टाकुन पहा फोटो.

Image removed. -- Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 09/17/2017 - 19:30

Permalink

फोटो पब्लिक नाहीत.

फोटो पब्लिक नाहीत. बाकी उत्सुकता वाढली.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 09/17/2017 - 20:49

Permalink

दिसलेत फोटो. छान. :)

दिसलेत फोटो. छान. :) लेख पुन्हा वाचेन.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 09/17/2017 - 21:35

Permalink

छान फोटू!

छान फोटू!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 09/17/2017 - 23:37

Permalink

छान आहेत फोटो. टॅमरॉनची

छान आहेत फोटो. टॅमरॉनची 90मिमी लेन्स घेतलीत का तुम्ही?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 09/18/2017 - 06:50

Permalink

फोटो दिसले. छान प्रयत्न आहेत.

फोटो दिसले. छान प्रयत्न आहेत. फ्लॅश न वापरता किटकांचे फोटो येतात का पाहा. ---- मोबाइल फोटो प्रयत्न Image removed. या छोट्या चतुराला आम्ही सुई म्हणतो. फक्त तोंड, डोळे आले तर मायक्रो Micro म्हणता येईल. दोनचार सेंमिचे चित्र म्हणजे Macro तुमच्या लेन्झने किती दूरून किती लहान ( सेंमि,मिमि) चे चित्र मिळते?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Mon, 09/18/2017 - 11:44

In reply to फोटो दिसले. छान प्रयत्न आहेत. by कंजूस

Permalink

आम्ही टाचणी म्हणतो.

आम्ही टाचणी म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by दुर्गविहारी on Mon, 09/18/2017 - 18:05

Permalink

उत्कॄत्ष्ठ फोटो आणि छान

उत्कॄत्ष्ठ फोटो आणि छान माहिती. केटिडिडचा एक व्हिडिओ व्हॉटस अ‍ॅपवरती फिरत होता. खुपच जबरदस्त छ्द्मकला निसर्गाने या किड्याला दिली आहे. कासवपाठीचा बिट्ल हा किडा अनेक वेळा गारवेलीच्या पानांवर बघितला आहे. सुरवातीला केशरी रंगाचा आणि पाठिवर काळे ठिपके असणारा हा किडा नंतर सोनेरी रंगाचा होतो. फारच सुंदर दिसतो हा. मि.पा.कर एस यांनी फोटोग्राफीविषयी लिहीलेल्या मालिकेत या विषयी लिहीलेले आहेच. तरीही तुमचे अनुभव लिहा.
मग त्यानंतर च्या ट्रीप केल्या त्या नवीन लेन्स घेउनच. त्याविषयी विस्ताराने नंतर लिहिता येईल
याविषयी नक्की लिहा. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 09/18/2017 - 18:10

Permalink

फोटो आवडले

लिहीत राहा
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Tue, 09/19/2017 - 00:44

Permalink

छान फोटो

थोडे टेक्निकल डिटेल्स पण टाका , आणि लेन्स बद्दल पण लिहा
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/19/2017 - 14:30

Permalink

ह्याला मॅक्रो फोटोग्राफी

ह्याला मॅक्रो फोटोग्राफी म्हणता येईल काय ? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 09/19/2017 - 14:56

Permalink

छान आलेत फोटो. चतुराचा विशेष

छान आलेत फोटो. चतुराचा विशेष आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्थितप्रज्ञ on Tue, 09/19/2017 - 15:24

Permalink

ओळखा पाहू कशाचा फोटो आहे?

Image removed. सदर फोटो माझ्या Asus Zenfone Max मोबाईल्यातुन काढलेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्थितप्रज्ञ on Tue, 09/19/2017 - 15:25

Permalink

रच्याकने

फोटो सुंदर आलेले आहेत!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com