Skip to main content

'पुरुष' ... हवा आहे पण कशाला !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी बुधवार, 13/04/2016 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषाचा नराचा खरंच काय उपयोग असतो पुरुषाचा उपयोग काय तर फक्त मुलांना जन्म देण्यापुरताच... एका अभिनेत्रीचे वाक्य ऐकले. मोठी गंभीरपणे घेण्याजोगी ही गोष्ट आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरते आहे. काही ठिकाणी तर पुढेही गेलेली आहे. आजच कशाला जुन्या काळीही झाशीच्या राणीने उत्तम युद्ध नेतृत्त्व करून दाखवले होते. तिच्या सैन्यात अनेक स्त्रिया लढत होत्या. अशी अनेक उदाहरणे दाखवून देता येतील. कुठलेही क्षेत्र स्त्रीने सोडलेले नाही. पोलिसात ती आहे. विज्ञानात ती आहे. ती डॉक्टर आहे. ती इंजिनीयर आहे. ती सॉफ्टवेयर मधे आहे. तिथे 'ती' 'त्या'ची बॉसही आहे. या जगाचे पुरुषावाचून फारसे काहीही अडत नाही. याला कारणेही असंख्य आहेत. स्त्रीकडे मूळात सर्व क्षमता आहेत. आजवर केवळ त्याला वाव दिला गेलेला नव्हता. पण स्वतःच्या अंगभूत दुर्गुणांमुळेही पुरुष मागे पडतो आहे किंवा नाकारला जातो आहे. गाडी चालवणे हे आजवर मुख्यतः पुरुषाचे काम होते. प्रवासी वाहतूक असेल नाहीतर शाळकरी मुलामुलींची ने-आण करणारे व्हॅन काका असतील हे काम आजवर पुरुषच करीत होते. पण या सगळ्याला पुरुषाने आपल्या दुर्गुणांची जोड दिली. कॉल-सेंटरच्या गाड्यांच्या ड्रायव्हरचे किस्से तर भारतभर अगणित आहेत. प्रवासी बसमधल्या महिलांशीही गैर वर्तनाच्या घटना घडल्या. स्कूलबसमधल्या लहान मुलींशीही गैर वर्तनाच्या बातम्या आल्या. पुरुष गाडीचालकावर असलेला विश्वास मग कमी होवू लागला. कॉल-सेंटरच्या गाडीमधे महीला कर्मचारी असेल तर तिचा शेवटचा ड्रॉप असता कामा नये. असा नियम करण्यात आला. गाडीचालक पुरुषावर दाखवलेला हा अविश्वासच होता. यावर एक उपाय म्हणून स्कूलबसमधे एक स्त्री कंडक्टर नेमली जाऊ लागली. निदान तिच्या उपस्थितीमुळे तरी गाडीचालकामधला पुरुष नियंत्रणात राहील आणि शाळकरी मुली सुरक्षित राहतील. असा पालकांचा अंदाज होता. पण एक अधिक कर्मचारी नेमण्यामुळे खर्चही वाढू लागला. त्यामुळे काही ठिकाणी याला पुन्हा काट देण्यात आली. यामुळे पालक अस्वस्थच राहीले. यातही एक उपाय पुढे आला आणि स्कूलबसवर स्त्री ड्रायवर नेमली जाऊ लागली. पालक निर्धास्त झाले. शाळेला जाणार्‍या आपल्या मुली आता सुरक्षित. या पलिकडचाही एक वेगळा मुद्दा लक्षात घेतला पाहीजे. असंख्य अडचणींना तोंड देत शेतकरी शेती करतो. कधी कधी या अडचणी वाढतात. शेती तोट्याचा व्यवहार ठरते. मग तणाव असह्य होवून तो आत्महत्या करतो. मागे राहीलेल्या त्याच्या कुटूंबाचा गाडा त्याची पत्नी हाकायला सुरुवात करते. ती मात्र या सगळ्या तणावांचा व्यवस्थितरित्या सामना करते असे दिसून आले आहे. अनेकदा तर असेही पहायला मिळाले आहे की जेव्हा तोटा होतो तेव्हा पुरुष शेतकरी तोट्यामधे सगळ्या कुटूंबाला सामील करून घेतो पण फायदा झाला तर मात्र तो उधळपट्टी करतो. चैन करतो. घरातली माणसे मात्र फाटकीच राहतात. कधी कधी तर याही पुढचे पाऊल म्हणजे तो दारुच्या आहारी जातो, घरच्या लक्ष्मीला बडवतो. कुटूंबाच्या अशांततेला कारण ठरतो. शेतकर्‍याचे दारुच्या आहारी जाणे सरसकट नाही पण काही ठिकाणी पहायला मिळते. पती काहीही काम करत नाही. उलट व्यसने मात्र करतो. अशा वेळी घराची जबाबदारी घरातल्या स्त्रीला उचलावी लागते. असे दारुडे पुरुष कुटूंबावर भार ठरतात. त्यांचे खाणे पिणे आणि दारु याचा खर्च घरच्या स्त्रीच्या कष्टातून भागवला जातो. व्यसने करून स्वतःची तब्येत बिघडवलेला पुरुष जर मरण पावला तर कुटूंब सुटकेचा निश्वास टाकते. याबाबतचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. ते पुढे चर्चेच्या ओघात येइलच. काही शेतीसंपन्न राज्यांमधे पुरुष फक्त बाजेवर पडून ऐष आराम करतो. स्त्रीया मात्र शेतीची सर्व कामे पार पाडतात. झालंच तर हा पुरुष कुठल्या तरी मुद्यावर आंदोलन करतो. झुंडशाहीने सगळ्या राज्याला वेठीला धरतो. जोडीला स्त्रियांवर अत्याचारही करतो. व्हिडियोमुळे देशाला हे माहीत होते. मनुष्य प्राणी जाऊ द्या. सगळ्याच जीव सृष्टीमधे हेच दिसते का. एकटी स्त्रीच पुरेशी असते आणि जीवसृष्टीचे पुरुषावाचून फारसे काही अडत नाही. असाच निष्कर्श काढायचा का ! मधमाशांचे उदाहरणही आपण पाहूया... चर्चेच्या ओघात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20907
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

काहीही. स्त्रियांना बॉयटॉय म्हणूनच पुरुष हवे असतात. बाकी पिशव्या उचलणं, झाकणं उघडणं वगैरे सेकंडरी सगळं.

कृपया नेहमीच्या स्त्री पुरुष आणि तेच तेच खटकेबाज संवाद या पद्धतीने हा विषय करू नये पुरुष हा नर या अर्थाने घेतला पाहिजे केवळ माणूस नव्हे तर सगळी सजीव सृष्टी अपेक्षित आहे

जैविक वैविध्य( BIOLOGICAL DIVERSITY) यासाठी नाते नसलेले नर आणि मादी यांचा संबंध येतो. त्यातून निर्माण झालेली संतती हि काळाच्या ओघात टिकून राहण्यासाठी जास्त योग्य असते अन्यथा खालच्या प्राण्यात अलैंगिक पुनरुज्जीवन होतच असते. (PARTHENOGENESIS)https://en.wikipedia.org/wiki/Parthenogenesis पण यात स्त्री अपत्य जन्मास येते त्यात आणि आईमध्ये गुणसूत्रात काहीच वैविध्य नसल्याने त्यांची वंश वृद्धी चांगल्या तर्हेने होत नाही. सस्तन प्राण्यांमध्येही अशा तर्हेने अलैंगिक संततीनिर्माण करण्यात अली परंतु त्यात बहुसंख्य वेळेस बरेच गंभीर दोष आढळून आले. Induced parthenogenesis in mice and monkeys often results in abnormal development. This is because mammals have imprinted genetic regions, where either the maternal or the paternal chromosome is inactivated in the offspring in order for development to proceed normally. A mammal created by parthenogenesis would have double doses of maternally imprinted genes and lack paternally imprinted genes, leading to developmental abnormalities. It has been suggested that defects in placental folding or interdigitation are one cause of swine parthenote abortive development.

विषय चांगला आहे. २१व्या शतकाच्या उत्तरार्धात नवीन कायदे नक्कीच निर्माण होतील...थोडेबहुत पुरुषांच्या बाजूने! स्त्रीसक्षमीकरणाची चळवळ जवळून अनुभवली... आणि त्याला पूर्णत: पाठींबा आहे. पण आसपासच्या मित्रांना जेंव्हा भयानक मानसिक आणि घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागले तेंव्हा त्यांना ना सामाजिक आधार मिळू शकला ना कायदेशीर!!! (पुरुषांवर अत्याचार होतो हेच मुळात विनोदाने घेतले जाते ...) संवेदनशील पुरुषांच्या वाट्याला असे दु:खं यावे याचे वाईट वाटते आणि केवळ समुपदेशन एव्हडाच पर्याय शिल्लक राहतो. १०० मधील ५ घटनेत ९५ घटना स्त्री अत्याचाराच्या आहेत हे मान्य करूनही ५ पुरूषांवरील अत्याचाराच्या घटना कमी निंदनीय आहेत असे मुळीच नाही. संवेदनशील माणसाच्या वाट्याला असंवेदनशील सहचारी ही नैसर्गिक रचना आहे का!!! पुरुषांनी बदलणे खूपच आवश्यक आहे. आदर्श पुरुष म्हणून मला नेहमीच महात्मा फुलेचे स्मरण होईल. त्यामुळे "...कशाला" पेक्षा "...कसा" पुरुष हवा हे महत्त्वाचे!!!