'पुरुष' ... हवा आहे पण कशाला !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
पुरुषाचा नराचा खरंच काय उपयोग असतो
पुरुषाचा उपयोग काय तर फक्त मुलांना जन्म देण्यापुरताच... एका अभिनेत्रीचे वाक्य ऐकले. मोठी गंभीरपणे घेण्याजोगी ही गोष्ट आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरते आहे. काही ठिकाणी तर पुढेही गेलेली आहे.
आजच कशाला जुन्या काळीही झाशीच्या राणीने उत्तम युद्ध नेतृत्त्व करून दाखवले होते. तिच्या सैन्यात अनेक स्त्रिया लढत होत्या. अशी अनेक उदाहरणे दाखवून देता येतील. कुठलेही क्षेत्र स्त्रीने सोडलेले नाही. पोलिसात ती आहे. विज्ञानात ती आहे. ती डॉक्टर आहे. ती इंजिनीयर आहे. ती सॉफ्टवेयर मधे आहे. तिथे 'ती' 'त्या'ची बॉसही आहे. या जगाचे पुरुषावाचून फारसे काहीही अडत नाही.
याला कारणेही असंख्य आहेत. स्त्रीकडे मूळात सर्व क्षमता आहेत. आजवर केवळ त्याला वाव दिला गेलेला नव्हता. पण स्वतःच्या अंगभूत दुर्गुणांमुळेही पुरुष मागे पडतो आहे किंवा नाकारला जातो आहे.
गाडी चालवणे हे आजवर मुख्यतः पुरुषाचे काम होते. प्रवासी वाहतूक असेल नाहीतर शाळकरी मुलामुलींची ने-आण करणारे व्हॅन काका असतील हे काम आजवर पुरुषच करीत होते. पण या सगळ्याला पुरुषाने आपल्या दुर्गुणांची जोड दिली.
कॉल-सेंटरच्या गाड्यांच्या ड्रायव्हरचे किस्से तर भारतभर अगणित आहेत. प्रवासी बसमधल्या महिलांशीही गैर वर्तनाच्या घटना घडल्या. स्कूलबसमधल्या लहान मुलींशीही गैर वर्तनाच्या बातम्या आल्या. पुरुष गाडीचालकावर असलेला विश्वास मग कमी होवू लागला. कॉल-सेंटरच्या गाडीमधे महीला कर्मचारी असेल तर तिचा शेवटचा ड्रॉप असता कामा नये. असा नियम करण्यात आला. गाडीचालक पुरुषावर दाखवलेला हा अविश्वासच होता.
यावर एक उपाय म्हणून स्कूलबसमधे एक स्त्री कंडक्टर नेमली जाऊ लागली. निदान तिच्या उपस्थितीमुळे तरी गाडीचालकामधला पुरुष नियंत्रणात राहील आणि शाळकरी मुली सुरक्षित राहतील. असा पालकांचा अंदाज होता. पण एक अधिक कर्मचारी नेमण्यामुळे खर्चही वाढू लागला. त्यामुळे काही ठिकाणी याला पुन्हा काट देण्यात आली. यामुळे पालक अस्वस्थच राहीले.
यातही एक उपाय पुढे आला आणि स्कूलबसवर स्त्री ड्रायवर नेमली जाऊ लागली. पालक निर्धास्त झाले. शाळेला जाणार्या आपल्या मुली आता सुरक्षित.
या पलिकडचाही एक वेगळा मुद्दा लक्षात घेतला पाहीजे. असंख्य अडचणींना तोंड देत शेतकरी शेती करतो. कधी कधी या अडचणी वाढतात. शेती तोट्याचा व्यवहार ठरते. मग तणाव असह्य होवून तो आत्महत्या करतो. मागे राहीलेल्या त्याच्या कुटूंबाचा गाडा त्याची पत्नी हाकायला सुरुवात करते. ती मात्र या सगळ्या तणावांचा व्यवस्थितरित्या सामना करते असे दिसून आले आहे.
अनेकदा तर असेही पहायला मिळाले आहे की जेव्हा तोटा होतो तेव्हा पुरुष शेतकरी तोट्यामधे सगळ्या कुटूंबाला सामील करून घेतो पण फायदा झाला तर मात्र तो उधळपट्टी करतो. चैन करतो. घरातली माणसे मात्र फाटकीच राहतात. कधी कधी तर याही पुढचे पाऊल म्हणजे तो दारुच्या आहारी जातो, घरच्या लक्ष्मीला बडवतो. कुटूंबाच्या अशांततेला कारण ठरतो. शेतकर्याचे दारुच्या आहारी जाणे सरसकट नाही पण काही ठिकाणी पहायला मिळते.
पती काहीही काम करत नाही. उलट व्यसने मात्र करतो. अशा वेळी घराची जबाबदारी घरातल्या स्त्रीला उचलावी लागते. असे दारुडे पुरुष कुटूंबावर भार ठरतात. त्यांचे खाणे पिणे आणि दारु याचा खर्च घरच्या स्त्रीच्या कष्टातून भागवला जातो. व्यसने करून स्वतःची तब्येत बिघडवलेला पुरुष जर मरण पावला तर कुटूंब सुटकेचा निश्वास टाकते. याबाबतचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. ते पुढे चर्चेच्या ओघात येइलच.
काही शेतीसंपन्न राज्यांमधे पुरुष फक्त बाजेवर पडून ऐष आराम करतो. स्त्रीया मात्र शेतीची सर्व कामे पार पाडतात. झालंच तर हा पुरुष कुठल्या तरी मुद्यावर आंदोलन करतो. झुंडशाहीने सगळ्या राज्याला वेठीला धरतो. जोडीला स्त्रियांवर अत्याचारही करतो. व्हिडियोमुळे देशाला हे माहीत होते.
मनुष्य प्राणी जाऊ द्या. सगळ्याच जीव सृष्टीमधे हेच दिसते का. एकटी स्त्रीच पुरेशी असते आणि जीवसृष्टीचे पुरुषावाचून फारसे काही अडत नाही. असाच निष्कर्श काढायचा का ! मधमाशांचे उदाहरणही आपण पाहूया... चर्चेच्या ओघात.
प्रतिक्रिया
काही शब्द राहिले काय
ते दुसर्या
हे मी नाही जगाने ठरवून टाकले
ज्या प्रमाणे एखाद्या पुरुषाला
काय ठरलं मग? पुरुष हवाय की
हवे आहेत.
काही ठिकाणी मात्र पुरुषाची
मधमाशांना हे पक्के ठाऊक असते
ह्याच्या अगदी उलट घटनाही
अधिक माहिती द्या
पेंग्विन. मागे नॅटजिओवर
'पुरुष' ... हवा आहे पण कशाला ! »
Save Father ! Save Family !!
बाप --- हवा आहे पण कशाला?
अवश्य.
इथे तुम्ही दमलेल्या बाबाची
असे एका नराने दुसर्याला
पुरुषाचा उपयोग काय तर फक्त
मनुष्य प्राणी जाऊ द्या.
कुणाचंच काही अडत नाही >>> हेच
काहीही. स्त्रियांना बॉयटॉय
कृपया
जैविक वैविध्य( BIOLOGICAL
म्हणजे नराचा उपयोग
तुम्हाला काय अपेक्षित होतं?
!!
रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये
..."कशाला" पेक्षा "कसा" हे महत्त्वाचे
Pagination