✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाबडबडगीत

अ — अनन्त्_यात्री, Wed, 09/13/2017 - 16:11
वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन व्योमी धग सूर्याची परिटघडीला येईल माझ्या कामी कधि चंद्राचा घेउनी चेंडू करेन क्रीडा गगनी चांदणमेवा थोडा थोडा चाखिन अधुनी मधुनी प्रकाशवर्षांचे अंतर मी तोडिन प्रकाश वेगे अंतरिक्ष लंघून संपता कशास येईन मागे? भव्य स्वप्न हे माझे कधितरी येईल का सत्यात? ठाऊक नाही, पण तोवर मी झोपून पाहीन वाट!

प्रतिक्रिया द्या
4157 वाचन

💬 प्रतिसाद (11)

वाह!चांदणमेवा :) खुप मस्तं

पद्मावति
Wed, 09/13/2017 - 18:02 नवीन
वाह! चांदणमेवा :) खुप मस्तं कल्पना.
  • Log in or register to post comments

सुरेख!

रुपी
Wed, 09/13/2017 - 23:40 नवीन
सुरेख! शीर्षक मात्र कवितेला तेवढा न्याय देणारे नाही असे वाटले..
  • Log in or register to post comments

मस्त!!!

पुंबा
गुरुवार, 09/14/2017 - 11:11 नवीन
मस्त!!!
पण तोवर मी झोपून पाहीन वाट!
हे आमचे ब्रिद असल्याने अधिक आवडले.. :))
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अनन्त्_यात्री
Fri, 09/15/2017 - 09:22 नवीन
पद्मावति, रुपी, सौरा - आपल्या प्रतिसादांबद्दल.
  • Log in or register to post comments

छान . मस्त

लाल गेंडा
Fri, 09/15/2017 - 16:20 नवीन
छान . मस्त शार्दूलविक्रीडित का हा अलंकार?
  • Log in or register to post comments

लाल गेंडा, धन्यवाद

अनन्त्_यात्री
Fri, 09/15/2017 - 19:47 नवीन
शार्दूलविक्रीडित हा अलंकार नसून ते वृत्त आहे. ' आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक" ही आचार्य अत्र्यांची कविता या वृत्तात आहे. माझे बडबडगीत लयबद्ध आहे (असे वाटते) पण वृत्तबद्ध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल गेंडा

परत माती खाल्ली

लाल गेंडा
Fri, 09/15/2017 - 20:43 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

परत माती खाल्ली

लाल गेंडा
Fri, 09/15/2017 - 20:43 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

परत माती खाल्ली

लाल गेंडा
Fri, 09/15/2017 - 20:43 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

परत माती खाल्ली

लाल गेंडा
Fri, 09/15/2017 - 20:43 नवीन
मी मराठीकडे परत येतोय, डोक्यात जरा गोंधळ आहे. त्यामुळे अस घडतंय. मी माझी कविता शार्दूलविक्रीडीत मध्ये लिहायचा प्रयत्न केला म्हणून तेच डोक्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

लाल गेंडा भौ

नाखु
Mon, 09/18/2017 - 22:40 नवीन
कवीची वृत्ती बघायची, वृत्त शल्यचिकित्सक वाचकांच्या बसकी बात नाही मिपा आद्य चारोळी कार आत्मुदा यांच्या "कवि-काकवी" या समिक्षा ग्रंथातुन साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल गेंडा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा