Skip to main content

दिवाळी अंक २०१७ - दृकश्राव्य विभाग - आवाहन

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी सोमवार, 11/09/2017 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! "गोष्ट तशी छोटी.." आणि मिपा दिवाळी अंकाचे काही तरी ऋणानुबंध असले पाहिजेत. मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात "गोष्ट.."ची घोषणा झाली होती. यंदा सुद्धा दिवाळी अंकासाठी सासं आणि "गोष्ट ..." टीम पुन्हा एकत्र आले आहेत. आजकालच्या डिजिटल युगात लेखनासोबतच व्हिडीओ ब्लॉगिंग आणि पॉडकास्ट सारखे उपक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत चालले आहेत. मिपानेही मागच्या दिवाळीत आपले यू ट्युब चॅनल सुरू करून नव्या अभिव्यक्तीची दारे उघडली होती. यंदाच्या दिवाळी अंकात आपण एक संपूर्ण विभाग दृकश्राव्य माध्यमाकरिता राखून ठेवत आहोत. "गोष्ट..." च्या टीम वर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे आणि आम्ही पुन्हा एकदा तुमच्या बरोबर फटाके फोडायला सज्ज आहोत. आपण आपली डिजिटल दिवाळी अगदी धूमधडाक्यात साजरी करायची. दर्जेदार लेखन हा आपल्या मिपा दिवाळी अंकाचा यु एस पी! लेखनाच्या बरोबरीनेच आता आपण आपल्या अंगचे इतरही गुण उधळायला तयार व्हायचं. आता तुम्ही म्हणाल नेमकं काय करायचं बुवा? तर त्याचे तपशील खाली दिले आहेतः १. दिवाळी पहाट महाराष्ट्रात दिवाळी पहाट हा दिवाळीचा अविभाज्य भाग आहे. मिपाकरांनी एक अशीच मैफिल जमवली तर? आपल्यापैकी अनेक जण उत्तम गायक अथवा वादक असतील. आपण सर्व मिळून एक डिजिटल दिवाळी पहाट साजरी करु शकतो. आपल्या गायन अथवा वादनाच्या ऑडिओ फाईल्स आम्हाला पाठवा. चला मग, मिपाच्या दिवाळी अंकात आपण सुरांनी रंग भरुया! २. अभिवाचन आपल्या नवीन कथा, कविता इ. चे अभिवाचन आपण ऑडिओ स्वरुपात देऊ शकता. आपला आवाज चांगला असेल तर लेखकाची परवानगी घेऊन मिपावरच्याच एखाद्या उत्तम कलाकृतीचे अभिवाचनही आपण करु शकता. ह्यानिमित्ताने वाचकांनी त्यांना ऑडीओ बुकमध्ये ऐकायला आवडतील अशी मिपावरची रत्ने शोधून द्यावीत. आम्हाला मिपा मौक्तिकं सुचवा, आपण ती दिवाळी अंकाच्या नियमात बसत असतील तर जरुर या विभागात आणून सजवू. ३. व्हिडीओ दंगा दिवाळीच्या फराळाच्या पाककृती, एखाद्या हटके ठिकाणी केलेली भटकंती अशा गोष्टी आता व्हिडीओ स्वरुपातही देता येतील. फोटोंच्या स्लाईडशोवर आपले निवेदन टाकून असे व्हिडीओ बनवणं अगदी सोप्पं आहे. त्यासाठी मिपा फिल्लम इन्स्टीट्युटचा क्रॅश कोर्स करुन टाका! - व.. व... व्हिडिओचा! ऊर्फ मिपा फिल्लम इन्स्टिट्युट! ४. दिवाळी देशो देशीची मिपाकर अख्ख्या जगभर पसरले आहेत. आपल्या गावातील, शहरातील ( भारतात आणि परदेशात) दिवाळीची लखलख तुम्ही घेऊन या. तुमच्या शहराचे दिवाळी फोटोज, सांस्कृतिक कार्यक्रम इ. चे फोटोज / कव्हरेज करुन आम्हाला पाठवा. आपण ते चॅनल वर टाकूयात. दिवाळी अंकाला ही देशोदेशीची झळाळी शोभून दिसेल. तर मग लागताय ना कामाला?! दिवाळी अंकासाठी असणारे सर्व नियम इथेही लागू आहेतच. त्यासाठी दिवाळी अंक-२०१७ चा आवाहनाचा धागा एकदा जरूर बघून घ्यावा. आपले व्हिडीओ / ऑडीओ आपण - misalpav.channel@gmail.com इथे पाठवू शकता. साहित्य पाठवण्याची शेवटची तारिख ३० सप्टेंबर २०१७. कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी आपण पिलीयन रायडर किंवा स्रुजा ह्यांच्याशी संपर्क साधू शकता. मंडळ सेवेस तत्पर आहे! धन्यवाद! टीम दिवाळी अंक २०१७
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8209
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

कल्पक उपक्रम होईल.

In reply to by विनिता००२

अहो आम्ही वेगळ्या टाझो मध्ये आहोत, आमचा दिवस सुरु व्हायला वेळ लाग्तो. गृप मध्ये म्हणजे कसं म्हणताय? सांवादात्मक का?

In reply to by विनिता००२

१. १० ते जास्तीत जास्त १५ मिनिटे चालेल. २. २-३ जणांनी मिळून केलेले अभिवाचनही चालेल.

मिपा दिवाळी अंका च्या प्रतिक्शेत.

In reply to by दशानन

हो अर्थातच! अभिवाचन हे ऑडीओ फाईल मध्येच द्यायचे आहे. पाककृती , भटकंती सारख्या प्रकारांना फोटो आणि निवेदन असल्याने तिथे व्हिडीओ लागेल.

जे कुणी इच्छुक असतील त्यांनी आम्हाला तसे कळवले तर येणार्‍या साहित्याचा अंदाज घ्यायला बरे पडेल. पुनुरावृत्ती टाळायलाही त्याने मदत होईल. त्यासाठी स्रुजा, पिरा किंवा गोष्ट तशी छोटी.. पैकी कोणत्याही आयडीला कळवावे. मिपावरचे जे जुने लेख ऑडीओ स्वरुपात यावे असे वाटते, त्यांचे नोड इथे दिलेत तरी चालतील. मात्र दिवाळी अंकात शोभेल असे लिखाण असावे. अर्थात जे दिवाळी अंकात घेता येणार नाही ते आपण दिवाळी नंतर प्रकाशित करु शकतोच.

मिसळपावची सदस्य नुकतीच झाले तरी जुनी वाचक आहे मी. एकदा झालेला प्रयोग मिसळपाव साधारण त्याच स्वरूपात परत आणते आहे असे वाटले वाचून. विषय पण अगदीच बाळबोध वाटले . शाळेचा अंक उत्साही मुले करतील तसे काही खरंतर कोणत्याही अंकाचा मग तो डिजिटल असो किंवा प्रिंटेड स्वरूपातला ,त्यातले लिखाण हे बलस्थान हवे. दृकश्राव्य माध्यमात हे वरचे विषय समहाऊ अंकाला कनेक्ट न करता समांतर राहिल असे वाटत नाही का ? अर्थात मी फारच नवीन आहे मत द्यायला पण 'राजहंसाचे चालणे , भूतली जालिया शहाणे ,आणिके काय कोणे , चालावेची ना ? '

का इथे मत देणे हा अपराध आहे? विरोधी असेल तर ग्रुप करुन संशय घेतात का? आपल्याला माझे इतर प्रोफाईल हवे आहे का मिपाचे जे कोणी असतील चालक त्यांना? हा काय प्रकार आहे? सरळ नियमात लिहून टाका इथे विरोधी मत देणे नियमबाह्य आहे. नविन लोकांनी लिहिणे तर अपराध आहे. प्रत्येक नविन आय डी हा दुसराच कोणीतरी मोरु का कोण आहे असे असते. म्हणजे इथे सदस्यत्व घेणे दुसर्याला अपमानकारक वाटायला लावता आपण.

In reply to by मियामी

कसले फटाफट निष्कर्ष काढता बै तुम्ही!! मी म्हणणार होते, नाटक पाहिलं असेल तर त्याचं अभिवाचन करून तुम्ही सुद्धा का पाठवत नै? मज्जा येईल! तुम्ही तर एखादया सराईत आयडी सारखे निष्कर्ष काढले ब्वॉ उगाच.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवांच्या आवाजात जीवनकथा ऐकायला आवडेल, बुवा मणावर घ्या डस्टी वगैरे पात्रांच्या आवाजांकरिता हिरवे पारवे कंपनी सहकार्य करेल कथाकथनी नाखु

मिपावर अभिवाचनाच्या काही फाईल्स होत्या. कुठे सापडतील? मी दिवाळी अंक पाहिला त्यात दिसत नाहीयेत.

In reply to by विनिता००२

अनाहिता अंक २०१७ 'उंच माझा झोका' मध्ये http://www.misalpav.com/node/39075 या धाग्यात आणि विशेषांक टॅब खाली मराठी भाषा दिन २०१७ मध्ये काही धाग्यांच्या ऑडिओ फाइल्स आहेत.

In reply to by विनिता००२

नमस्कार विनिता! आपला ऑडिओ मिळाला. त्यावर अभिप्रायही दिला आहे. आपल्या मदतीसाठी ज्या दर्जेदार अभिवाचनांचा आदर्श ठेवून आपण वाचन करू शकता अशा काही लिंक्स सुद्धा पाठवत आहोत. अजून काही मदत लागल्यास कळवावे. धन्यवाद!