दिवाळी अंक २०१७ - दृकश्राव्य विभाग - आवाहन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मिपाकरहो!
"गोष्ट तशी छोटी.." आणि मिपा दिवाळी अंकाचे काही तरी ऋणानुबंध असले पाहिजेत. मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात "गोष्ट.."ची घोषणा झाली होती. यंदा सुद्धा दिवाळी अंकासाठी सासं आणि "गोष्ट ..." टीम पुन्हा एकत्र आले आहेत.
आजकालच्या डिजिटल युगात लेखनासोबतच व्हिडीओ ब्लॉगिंग आणि पॉडकास्ट सारखे उपक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत चालले आहेत. मिपानेही मागच्या दिवाळीत आपले यू ट्युब चॅनल सुरू करून नव्या अभिव्यक्तीची दारे उघडली होती. यंदाच्या दिवाळी अंकात आपण एक संपूर्ण विभाग दृकश्राव्य माध्यमाकरिता राखून ठेवत आहोत. "गोष्ट..." च्या टीम वर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे आणि आम्ही पुन्हा एकदा तुमच्या बरोबर फटाके फोडायला सज्ज आहोत.
आपण आपली डिजिटल दिवाळी अगदी धूमधडाक्यात साजरी करायची. दर्जेदार लेखन हा आपल्या मिपा दिवाळी अंकाचा यु एस पी! लेखनाच्या बरोबरीनेच आता आपण आपल्या अंगचे इतरही गुण उधळायला तयार व्हायचं. आता तुम्ही म्हणाल नेमकं काय करायचं बुवा? तर त्याचे तपशील खाली दिले आहेतः
१. दिवाळी पहाट
महाराष्ट्रात दिवाळी पहाट हा दिवाळीचा अविभाज्य भाग आहे. मिपाकरांनी एक अशीच मैफिल जमवली तर? आपल्यापैकी अनेक जण उत्तम गायक अथवा वादक असतील. आपण सर्व मिळून एक डिजिटल दिवाळी पहाट साजरी करु शकतो. आपल्या गायन अथवा वादनाच्या ऑडिओ फाईल्स आम्हाला पाठवा.
चला मग, मिपाच्या दिवाळी अंकात आपण सुरांनी रंग भरुया!
२. अभिवाचन
आपल्या नवीन कथा, कविता इ. चे अभिवाचन आपण ऑडिओ स्वरुपात देऊ शकता. आपला आवाज चांगला असेल तर लेखकाची परवानगी घेऊन मिपावरच्याच एखाद्या उत्तम कलाकृतीचे अभिवाचनही आपण करु शकता. ह्यानिमित्ताने वाचकांनी त्यांना ऑडीओ बुकमध्ये ऐकायला आवडतील अशी मिपावरची रत्ने शोधून द्यावीत. आम्हाला मिपा मौक्तिकं सुचवा, आपण ती दिवाळी अंकाच्या नियमात बसत असतील तर जरुर या विभागात आणून सजवू.
३. व्हिडीओ दंगा
दिवाळीच्या फराळाच्या पाककृती, एखाद्या हटके ठिकाणी केलेली भटकंती अशा गोष्टी आता व्हिडीओ स्वरुपातही देता येतील. फोटोंच्या स्लाईडशोवर आपले निवेदन टाकून असे व्हिडीओ बनवणं अगदी सोप्पं आहे. त्यासाठी मिपा फिल्लम इन्स्टीट्युटचा क्रॅश कोर्स करुन टाका! - व.. व... व्हिडिओचा! ऊर्फ मिपा फिल्लम इन्स्टिट्युट!
४. दिवाळी देशो देशीची
मिपाकर अख्ख्या जगभर पसरले आहेत. आपल्या गावातील, शहरातील ( भारतात आणि परदेशात) दिवाळीची लखलख तुम्ही घेऊन या. तुमच्या शहराचे दिवाळी फोटोज, सांस्कृतिक कार्यक्रम इ. चे फोटोज / कव्हरेज करुन आम्हाला पाठवा. आपण ते चॅनल वर टाकूयात. दिवाळी अंकाला ही देशोदेशीची झळाळी शोभून दिसेल.
तर मग लागताय ना कामाला?! दिवाळी अंकासाठी असणारे सर्व नियम इथेही लागू आहेतच. त्यासाठी दिवाळी अंक-२०१७ चा आवाहनाचा धागा एकदा जरूर बघून घ्यावा.
आपले व्हिडीओ / ऑडीओ आपण - misalpav.channel@gmail.com इथे पाठवू शकता. साहित्य पाठवण्याची शेवटची तारिख ३० सप्टेंबर २०१७.
कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी आपण पिलीयन रायडर किंवा स्रुजा ह्यांच्याशी संपर्क साधू शकता. मंडळ सेवेस तत्पर आहे!
धन्यवाद!
टीम दिवाळी अंक २०१७
प्रतिक्रिया
छान
छान होईल अंक, नव्या कल्पना आहेत सगळ्या.
अरे वा! मस्तच!
भारीच.
अभिवाचन एकट्याचे की ग्रुपचे
अभिवाचन एकट्याचे की ग्रुपचे
अहो आम्ही वेगळ्या टाझो
हो म्हणजे कथेत जसे वेगवेगळी
अभिवाचनाचा वेळ साधारण किती
१. १० ते जास्तीत जास्त १५
धन्यवाद!
अरे वा! परत एकदा यशस्वी मंडळ
छान कल्पना आणि शुभेच्छा !!
लय भारि!
शुभेच्छा!!
उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा
ऑडिओ चालेल का?
हो अर्थातच!
झकास!!!!
जे कुणी इच्छुक असतील त्यांनी
मिसळपावची सदस्य नुकतीच झाले
"तुम्ही जुने वाचक असून मत
मोरू परतोनी आला हे नाटक
हो तुमचं परिकथेतलं राज्य कसं
का इथे मत देणे हा अपराध आहे?
कसले फटाफट निष्कर्ष काढता बै
लै लै भारी उपक्रम!
मला
मिपावर अभिवाचनाच्या काही
दिवाळी अंकात नाही
खूप खूप आभार पैसाताई :)
नमस्कार विनिता!
लिंक्स साठी धन्यवाद!