निरभ्र आकाशातील ' मृग नक्षत्र'
'ओरायन ' म्हणजे खगोलीय भाषेत काय ?
आपणांस माहित असेल कि जागतिक मान्यतेनुसार एकूण ८८ तारकासमूह (Constellation)आहेत.
जगात वेगवगेळ्या पुरातन संस्कृतीमध्ये, (जसे ग्रीक, प्राचीन सुमेरियन, चिनी, भारतीय) अनेक तारकांचा बनलेल्या समूहाला वेगवेगळी नावे आहेत. तसेच त्यांची संख्या वेगवेगळी आहे. शिवाय तारकासमूहांतील ताऱ्यांची संख्या पण कमीअधिक आहे. आपल्याकडे नाही कां २७ नक्षत्रे आहेत ?
आता सर्वाना मान्य होतील व जे सर्वसमावेशक असतील, असे तारकासमूह करण्याची वेळ आली होती. कारण सोईसाठी व सहजतेसाठी जगभर खगोलीय भाषा एकच हवी. या कामी अमेरिकन व युरोपीय खगोल संस्था यांनी पुढाकार घेतला व १९२२ ला तारकासमूहांची (Constellation) नवीन यादी तयार केली.
आज International Astronomical Union (IAU, जागतिक खगोलीय संस्था), ८८ तारकासमूहांना मान्यता देते. या मध्ये जी नावे तारकासमूहांना देण्यात आली आहेत त्याच्यावर अर्थातच ग्रीक, लॅटिन नावांचा पगडा जास्त होता. तेथील दंतकथेनुसार नावे देण्यात आली. यामध्ये दंतकथेतील प्राणी, माणसे यांची नावे आहेत.
आता 'ORION CONSTELLATION ' याविषयी....
'Orion Constellation ' म्हणजे आपल्याकडील 'मृग नक्षत्र'. 'Orion' याचा मराठीत उच्चार 'ओरायन' असाच होतो. परंतु बरेच जण ओरिओन किंवा ओरिन असा चुकीचा करतात. या तारकासमूहास रात्रीच्या निरभ्र आकाशात ओळखायला एकदम सोपे. आकाशनिरक्षण व अभ्यास करताना, सुरूवात, शक्यतो इथून करतात. 'ओरायन' हा शब्द, दंतकथेवरुन आला आहे. ओरायन नावाचा शक्तिमान व मायावी शिकारी होता.
आता हा ओळखायचा कसा ? १३ ते १७ डिसेंबर च्या दरम्यान, रात्री १२ च्या सुमारास गच्चीवर, माळ्यावर जावे. २-३ मिनिटे डोळे मिटून पाठीवर पडून रहा. (डोळे मिटायचे यासाठी कि आपण एकदम उजेडातून अंधारात येत आहोत. डोळ्यांना काळोख्या वातावरणाशी समरस होण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल). आता तुम्ही पाठीवर पडून आकाशाकडे बरोबर वर बघत आहात. आकाश निरभ्र आहे. डोळ्याच्या एकदम समोर, एका डोळ्यावर दोन बोटे (अंगठ्याशेजारील) ठेवा. बास, ही दोन बोटे मिळून जो भाग होतो, तेवढाच आपला 'निरीक्षण पट्टा' (Viewing Area ). आता या पट्ट्यात तुम्हांला ४ तारे मिळून एक जवळपास चोकोनी आकार दिसेल. यातील दोन तारे ठळक दिसतील व दोन तुलनेत मंद. शिवाय, या चौकोनाच्या आत तीन तारे ओळीत दिसतील. हा झाला 'ओरायन बेल्ट' (ओरायन याने परिधान केलेला पट्टा ). या बेल्ट खाली व चौकोनाच्या आत अजून काही बेल्ट कडे दिशा करून तारे दिसतील. हे आहे नवीन ताऱ्यांचे 'प्रसूतिगृह'. म्हणजे इथे नवीन तारे जन्माला येतात. खगोलीय भाषेत याला ' M-४२' या नावाने ओळखतात.
तुम्हांला रात्री १२ वाजता तारे बघण्याची वेळ योग्य वाटत नसेल तर , नंतर पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी १३ ते १७ दरम्यान हेच तारकासमूह तुम्ही रात्री १० वाजता त्याच ठिकाणी बघु शकता (म्हणजे डोक्याच्या बरोबर वर). त्यापुढील महिन्यात, फेब्रुवारी १३ ते १७ तारखेदरम्यान रात्री ८ वाजता. याला कारण म्हणजे एखादा तारा आदल्या दिवशीच्या वेळेपेक्षा साधारण ४ मिनिटे उशिरा उगवतो. महिन्याला २ तास होतात. ह्या वेळा आपण साधारण धरलेल्या आहेत. अचूक वेळा वेगळ्या आहेत.
बाकी तुम्ही गुगल करा ओरायन म्हणून, तुम्हाला त्याचा फोटो दिसेल. तो तुम्हांला निरीक्षणापूर्वी नक्कीच उपयोगी पडेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
फोटो द्या की ओ.
चित्रं हवंच.
मस्त माहिती...
चित्रे (जालावरून साभार)...
मृग नक्षत्रातील ओरायन तेजोमेघ
क्रॅब नेब्युला बद्दल अजून
व्याध हा तारा ओरायन तारकासमुहाचा भाग नाही
खालील माहिती फोटो मिपावर
मस्त माहिती.. सुंदर पद्धतीने
अजून थोडे काही माझ्याकडून
आपल्या हिंदू पुराणानुसार
व्याध आणि मृगनक्षत्राची देखील एक कथा आहे
हि कथा माहीत नव्हती बुआ ,
गुगल फोटोवरचे फोटो/अल्बम
मान्य , अंक चुकले माझे
लाल गेंडा, आपण देत
हा पहा तुमचे चित्र... छान
चित्रासाठी उत्तम उंची अथवा रुंदी कशी निवडायची
लेखात चित्राचा योग्य आकार...
चित्रासाठी उत्तम उंची अथवा रुंदी कशी निवडायचीलेखात चित्राचा योग्य आकार ठरवताना अगोदरच्या एका प्रतिसादात दिलेल्या मिपावर चित्रे टाकण्याची कृती या दुव्यातल्या ५ ते ७ व्या परिच्छेदांत दिलेली कृती वापरा... ५. दिसू लागलेल्या Insert/edit image टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा: ......अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V) ......आ) Width X Height: कोरे ठेवा. ......इ) Alternate Text: इथे तुम्हाला हवे ते चित्राचे नाव टाका अथवा फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका. ६. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल. ७. चित्र "पूर्वपरिक्षण" करुन पहा : ......अ) चित्र लेखनाच्या चौकटीत योग्य जागी दिसत असल्यास टाकलेला कोड योग्य आहे. ......आ) चित्र लेखनचौकटीबाहेर जात असल्यास आणि/किंवा उजव्या बाजूच्या मिपासंबधीच्या माहितीवर आक्रमण करत असल्यास Width मध्ये ६६० ते ३०० यामधला एक पर्याय वापरून "पूर्वपरिक्षण" करुन पहा व योग्य तो पर्याय स्विकारा. सर्वसाधारणपणे आडव्या (लॅड्स्केप) चित्रांना ६०० ते ६६० व उभ्या (पोर्ट्रेट) चित्रांना ३०० ते ४५० Width योग्य होते. ......इ) Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा तुम्ही स्विकारलेल्या Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते. (अंदाजे Height टाकण्याच्या प्रयत्नात बहुदा चित्र वेडेवाकडे दिसते, तेव्हा ते टाळा.) ======= अवांतर : t + r = त्र.तसेच...
उपयुक्त माहिती
तुमचे दोन्ही लेख वाचले। खूप