✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

यांगोंमधलं श्री. मोदी यांचं भाषण : भाग १

आ
आतिवास यांनी
Tue, 09/05/2017 - 14:30  ·  लेख
लेख
जून २०१६ मध्ये मी यांगोंला आले. तेव्हापासून दोन वेळा इथल्या भारतीय दूतावासात जाणं झालं. २०१६ चा स्वातंत्र्यदिन समारंभ आणि २०१७ चा प्रजासत्ताक दिन समारंभ या निमित्ताने जाणं झालं होतं. बाकी तसा माझा दूतावासाशी काही संबंध येत नाही. दूतावासाला फेसबुकवर ‘लाईक’ केलं होतं, त्यामुळे घडामोडी कळत राहतात. ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात कधीतरी ‘पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्यानमा भेटीवर येत आहेत आणि यांगोंमध्ये ते जनतेशी संवाद साधतील’ असं फेसबुकवर कळलं. ‘अधिक माहितीसाठी दूतावासाशी संपर्क साधावा’ असंही एक आवाहन जाहीर झालं. मग मी दूतावासाशी संपर्क साधला. ऑगस्टच्या अखेरीस पंतप्रधानांच्या भेटीची तारीख जाहीर झाली. ६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांगोंमधल्या Thuwunna Indoor Stadium (तुवन्ना स्टेडियम) मध्ये जनतेशी संवाद साधतील असं जाहीर झालं. या स्टेडियमची आसनक्षमता बत्तीस हजार आहे (Economic Times च्या पाच सप्टेंबरमधल्या बातमीनुसार मात्र ही क्षमता आठ हजार आहे.) आणि एरवी या स्टेडियममध्ये ‘युवा क्रीडा प्रशिक्षण केंद्र’ चालतं. इथं फुटबॉलचे सामने होतात, ऍथलेटिक्सच्या स्पर्धा होतात. २०१३ मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेतले फुटबॉल सामने इथं झाले होते. स्टेडियम अद्ययावत आहे असं ऐकून होते. म्यानमामध्ये फुटबॉल सामन्यांना स्त्रिया हजेरी लावत नाहीत, त्यामुळे माझंही तिथं अद्याप जाणं झालं नव्हतं. १ सप्टेंबर रोजी दूतावासाकडून आमंत्रण पत्रिका आली. invite प्रत्येक व्यक्तीला एक आमंत्रण क्रमांक दिला होता. गंमतीची गोष्ट अशी की दूतावासाकडं माझे दोन इमेल पत्ते होते – पर्यायी पत्ता त्यांनीच मागितला होता, त्यामुळे दोन पत्ते होते. मला या दोन्ही पत्त्यांवर आमंत्रणं आली आणि दोन्ही ठिकाणी वेगळे आमंत्रण क्रमांक होते. एक क्रमांक होता १२००० + तर दुसरा होता २३,००० +. इतके लोक भाषण ऐकायला खरंच येणार होते की नंबर दहा हजारपासून द्यायला सुरूवात केली आहे – असा एक प्रश्न मनात आला. पण गर्दी असण्याची शक्यता भरपूर आहे कारण यांगोंमध्ये भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे म्यानमा नागरिक मोठ्या संख्येने आहेत. पंतप्रधानांचं भाषण मी अलीकडं फारसं ऐकत नाही. शिवाय या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचं मी समर्थन करत नाही. वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला मी इमेल करून माझी विरोधी मतं कळवलेली आहेत. (त्या विरोधी मतांना पंतप्रधान कार्यालय काही दाद देत नाही हा भाग वेगळा!) हे ज्यांना माहिती आहे त्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी पंतप्रधानांचं भाषण ऐकायला चालले आहे याबद्दल आश्चर्य वाटत होतं. माझी भूमिका स्पष्ट आहे (होती आणि राहिलही). मी सध्या यांगोंमध्ये राहते आहे. भारतीय पंतप्रधानांचा यांगोंमध्ये जाहीर कार्यक्रम आहे. मी त्याला जात आहे कारण ते आपल्या देशाचे लोकनियुक्त पंतप्रधान आहेत. अन्य कोणत्याही पक्षाचे पंतप्रधान असते आणि त्यांच्या निर्णयांना माझा कितीही विरोध असला असता तरीसुद्धा मी भाषण ऐकायला गेलेच असते आणि जाईनही. आपले आपापसात कितीही मतभेद असले तरी आपण ‘एक’ आहोत, आपण एकमेकांचे शत्रू नाही याचं भान जपणं महत्त्वाचं आहे. ‘अरे वा, मोदी साहेबांना मानलं पाहिजे. चीनचा धोका लक्षात घेऊन म्यानमाला भेट देण्याची दूरदृष्टी दाखवणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ना ते’ असे गौरवोद्गार दोन-तीन लोकांनी काढल्यावर मी चकित झाले. मोदींनी काहीही केलं तरी अनेक भारतीय लोकांना ‘हे पहिल्यांदाच घडतं आहे’ असं वाटतं. (सोशल मीडिया झिंदाबाद किंवा जनतेची विस्मरणशक्ती झिंदाबाद!) पण भारत आणि म्यानमा यांच्यात गेली अनेक वर्ष सातत्याने ‘स्टेट विजिट्स’ होत आहेत. विद्यमान पंतप्रधानांची ही काही पहिली म्यानमा भेट नाही, स्टेट विजिट मात्र पहिली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये आसिआन (ASEAN- Association of South-East Nations) आणि अन्य बैठकांच्या (ASEAN Summit and Related Summits) निमित्ताने श्री. मोदी म्यानमामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी नेपिटॉ (Nay Pyi Taw) या राजधानीच्या शहरात सुमारे तीनशे भारतीय नागरिकांशी संवादही साधला होता. किंबहुना म्यानमाला भेट देणारे मोदी काही पहिले भारतीय पंतप्रधान नाहीत, ते पाचवे पंतप्रधान आहेत. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी म्यानमाला भेट दिली होती. मे २०१२ मध्येही डॉ. सिंह म्यानमात आले होते. उपराष्ट्रपती श्री. हमीद अन्सारी २००९ मध्ये आले होते तर राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्च २००६ मध्ये तीन दिवसांच्या म्यानमा दौऱ्यावर आले होते. श्री. राजीव गांधी १९९८७ मध्ये बर्मात (बर्माचं म्यानमा असं नामांतरण १९८९ मध्ये झालं.) येऊन गेले. तत्पूर्वी श्रीमती इंदिरा गांधी जून १९६८ आणि मार्च १९६९ अशा दोनवेळा बर्मामध्ये येऊन गेल्या आहेत. त्याच्याही आधी श्री. लालबहादुर शास्त्री १९६५ मध्ये आले होते तर श्री. नेहरू १९५४ मध्ये आले होते. फेब्रुवारी २०१३ मध्ये लोकसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाने म्यानमाला भेट दिली होती. श्रीमती सुषमा स्वराज २०१७ मध्ये आल्या होत्या तर श्री अजित डोवल २०१५ मध्ये आले होते. श्रीमती निर्मला सीतारामनही येऊन गेल्या आहेत. अशा भेटींची मोठी यादी देता येईल. म्यानमा (बर्मा) नेत्यांच्याही अनेक भारतभेटी झाल्या आहेत. जुलै २०१७ मध्ये म्यानमाचे लष्करप्रमुख मी आँग लाय (Min Aung Hlaing) आठ दिवसांच्या भारतभेटीवर आले होते. म्यानमाच्या परराष्ट्रमंत्री आणि स्टेट कौन्सेलर आँग सान सू ची (Aung San Suu Kyi) ऑक्टोबर २०१६ मध्ये तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. ऑगस्ट २०१६ मध्ये म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष ठिन च्यो (Htin Kyaw) भारतात येऊन गेले. लष्करप्रमुख तान् श्वे (Than Shwe) (तान हा शब्द चुकीचा आहे खरं तर – Tha चा उच्चार देवनागरीत कसा करायचा ते मला माहिती नाही) हे २००४ मध्ये आणि जुलै २०१० मध्ये भारतात आले होते. ऑक्टोबर २०११ आणि डिसेंबर २०१२ मध्ये म्यानमा राष्ट्राध्यक्ष तै सै (Thein Sein) भारतभेटीवर आले होते. १९८० मध्ये ने विन भारतात येऊन गेले. साधारणपणे प्रत्येक स्टेट विजिटमध्ये दोन-तीन करार होतात असं दिसतं. उदाहरणार्थ डॉ. सिंह यांच्या २०१२ च्या भेटीत बारा द्विपक्षीय करारांनर सह्या झाल्या. म्यानमा आणि भारत यांच्यात आजवर किती करार झाले हे शोधायला लागेल. १९८७ ते २०१२ या कालखंडात फारशा भेटी झाल्या नाहीत हे खरं, पण त्याला ऐतिहासिक कारणं आहेत. म्यानमामध्ये १९६२ मध्ये लष्करी उठाव झाला होता आणि त्यानंतर थेट २०१६ मध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर आलं (निवडणूक नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली) हे आपल्याला माहिती असेलच. ‘लोकशाही मार्गाने निवडून न आलेल्या सरकारशी जवळीक निर्माण न करण्याचं’ भारत सरकारचं धोरण त्या काळात होतं असं वाटतं. लष्करी दडपशाहीमुळे जगाने या काळात बर्मा-म्यानमाला वाळीत टाकलं होतं हे विसरता कामा नये. याचा पुरेपूर फायदा चीनने घेतला. आणि हे लक्षात घेऊन की काय पण १९९० मध्ये भारताच्या धोरणात बदल होऊन म्यानमामधल्या लष्करी सरकारशी भारत सरकारने संपर्क वाढवला. भारत-म्यानमा संबंधांवर काही लिहिण्याचा मोह टाळून मी परत पंतप्रधानांच्या भाषणाकडं येते. J पंतप्रधानांचा म्यानमा दौरा अडीच दिवसांचा आहे. त्यात नेपिटॉमध्ये म्यानमा सरकारबरोबर अधिकृत बैठका, बगान परिसरात आनंद मंदिराला भेट (२०१६ च्या भूकंपानंतर या मंदिराच्या पुनरूज्जीवनाचं काम Archeological Survey of India करत आहे) आणि मग यांगोला आगमन. यांगो शहरात श्वेडगो पगोडा, बोज्या आँग सान म्युझियम आणि संध्याकाळी नागरिकांशी संवाद असा कार्यक्रम आहे. दरम्यान दूतावासाकडू उद्याच्या कार्यक्रमाविषयी सविस्तर सूचना आल्या आहेत. त्यानुसार दुपारी साडेतीनला प्रवेशद्वार उघडेल, खाण्या-पिण्याचे पदार्थ, कॅमेरा वगैरे गोष्टी आणायला परवानगी नाही (पाणीही नाही), ओळखपत्र आणि दूतावासाचं आमंत्रणपत्र सोबत आणावं .. वगैरे अकरा सूचना आहेत. साडेसहाला नागरिकांना प्रवेश बंद केला जाईल आणि सात वाजता पंतप्रधानांचं भाषण सुरू होईल असं दिसतं आहे. दूतावासाकडून आमंत्रण आलेल्या सर्व व्यक्तींना पंतप्रधान कार्यालयाकडून इमेल पाठवण्यात आली. हे पत्र मात्र मला एकाच इमेल पत्त्यावर आलं -) ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- From: Narendra Modi | Add to Address book |This is not spam To: ------------------- ........... Subject: Namaste from Narendra Modi! Date: Mon, 04 Sep 2017 17:07:23 IST Dear Savita .......Ji, It is with great delight and enthusiasm that I begin my Myanmar visit from 5th September 2017. This two-day visit is my first bilateral visit to Myanmar, a valued neighbour and a close friend of India’s. My visit to Myanmar includes programmes in the historic city of Bagan and Yangon. On the evening 6th September, I will be addressing the Indian community in Yangon, where I look forward to seeing you. We take immense pride in our diaspora, which has made India proud on the global stage. The Indian diaspora in Myanmar has brought India and Myanmar a lot closer in the past decades. Do write to me on a specially created open forum on the Narendra Modi Mobile App with your thoughts and ideas. I would refer to some of the ideas received during my speech at the community programme. See you in Yangon on the 6th! Yours, Narendra Modi ---------------------------------------------------------------------------------------------------------------- मी ‘नरेंद्र मोदी’ अॅपवर ‘भारतात शिकणा-या म्यानमा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने विशेष शिष्यवृत्ती जाहीर कराव्यात’ असं सुचवलं. यातून दोन देशातल्या नव्या पिढ्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतील असं मला वाटतं. अशी योजना अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे मला माहिती आहे आणि त्यातून अफगाण-भारत संबंध स्थिरावायला मदत होते असं मला अफगाणिस्तानमध्ये आलेल्या अनुभवांवरून वाटतं. Sir, we need to declare special scholarships for Myanmar students studying in India. It will help to build bridges between the young generations of both the countries. In addition to this Myanmar needs a good pool of trained Civil Servants, which will help strengthening democracy. (via NMApp) माझ्याकडून तयारी सगळी झाली आहे. आता सहा सप्टेंबरची वाट पाहते आहे. :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
26435 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

ह्म्म्म

वरुण मोहिते
Wed, 09/06/2017 - 09:28 नवीन
जगभरातील ज्यू विविध देशात काय कामे करतात , कसे एजंट असतात माहित असेलच कि . भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला हे शक्य नाही त्यामुळे उदाहरण गैरलागू आहे .प्रतिसाद मोदीप्रेमापोटी आहे आपला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा प्रतिसाद निवासी

सुबोध खरे
Wed, 09/06/2017 - 09:46 नवीन
हा प्रतिसाद निवासी भारतीयांबद्दल नसून अनिवासी भारतीयांबद्दल आहे. यातून आपला फक्त मोदी द्वेष दिसत आहे. वर मी म्हणालोच आहे कि परराष्ट्रीय धोरण हे पक्षातील असते म्हणजेच सरकार कोणत्याही पक्षाचे असो परराष्ट्र धोरण देश हिताचेच असते. मोदी साहेब जास्त सक्रिय आहेत एवढेच. भारताचे "पूर्वेकडे पहा"(LOOK EAST) हे धोरण श्री नरसिंह राव यांच्या सरकारपासून चालू झाले आहे आणि तेच धोरण श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी हिरीरीने राबविले. आता याच धोरणाचे पुढचे पाऊल म्हणून मोदी सरकारने पूर्वेकडे सक्रिय व्हा (ACT EAST) हे धोरण चालू केले आहे. https://en.wikipedia.org/wiki/Look_East_policy_(India)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

पक्षातीत

सुबोध खरे
Wed, 09/06/2017 - 09:47 नवीन
पक्षातीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रोचक लेख. पुभाप्र

प्रचेतस
Wed, 09/06/2017 - 06:47 नवीन
रोचक लेख. पुभाप्र
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Wed, 09/06/2017 - 08:19 नवीन
चांगली सुरुवात. अफगाणिस्थानप्रमाणे म्यानमारबद्द्लही लेखमाला लिहावी, ही विनंती.
  • Log in or register to post comments

वाचतोय..

बाजीप्रभू
Wed, 09/06/2017 - 08:32 नवीन
पुढल्या भागांसाठी शुभेच्छा... मोदींसोबत म्यानमारचीही माहिती लिहा... स्पेशली म्यानमारवासीयांच्या नजरेतून मोदी भेट.
  • Log in or register to post comments

छान !!

वरुण मोहिते
Wed, 09/06/2017 - 09:05 नवीन
अजून लिहा ताई आणि मुळात तुमच्या दृष्टिकोनातून .
  • Log in or register to post comments

वाह. मोदींनी म्यानमार सुद्धा

मृत्युन्जय
Wed, 09/06/2017 - 10:40 नवीन
वाह. मोदींनी म्यानमार सुद्धा काबीज करायचे ठरवलेले दिसते आहे आता. गुड. बाकी मोदींचे भाषण कसे झाले, त्यांनी भाषणात तुम्ही दिलेल्या सूचनेबद्दल गौरवपर उद्गार काढले की नाही, भाषणात कुठले मुद्दे अंतर्भूत होते हे नक्की सांगा. आणि हो हे पण नक्की सांगा की नंबरांची सुरुवात १०००० पासुन केली होती की १२००० पासुन की २३००० पासुन.
  • Log in or register to post comments

@ आतिवास,

अनिंद्य
Wed, 09/06/2017 - 11:36 नवीन
@ आतिवास, तुमचे लेखन वाचले आहे. तुमच्या संवेदनशील मनाने टिपलेल्या घटना आणि त्यावरचे तुमचे सहज-समर्पक भाष्य ह्या तुमच्या फॉरमॅटचा मी चाहता आहे. आजच्या कार्यक्रमाबद्दल तुमचे प्रत्यक्ष वर्णन आणि मत वाचायची प्रतीक्षा आहे, अवश्य लिहा. - अनिंद्य
  • Log in or register to post comments

लेख आवडला मला तुमचा.

यशवंत पाटील
Wed, 09/06/2017 - 11:47 नवीन
लेख आवडला मला तुमचा. सरकार लोकांशी किती बोलतं आहे अस चांगल वाटल वाचताना. (पण बाकिचे काही प्रतिसाद वाचुन बिचकलो आहे.)
  • Log in or register to post comments

तुमचे लेख वाचण्यास कायमच

निशदे
Wed, 09/06/2017 - 21:22 नवीन
तुमचे लेख वाचण्यास कायमच उत्सुक असतो. तुमचे विचार माझ्या राजकीय व सामजिक विचारसरणीबरोबर दरवेळी जुळतात असे नाही पण तुमच्या लेखनातील संवेदनशीलता आणि बहिर्मुखी विचार करण्याची पद्धत मला आवडते. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

कसे झाले भाषन?

तिता
गुरुवार, 09/07/2017 - 00:08 नवीन
कसे झाले भाषन?
  • Log in or register to post comments

ताई तुम्हि गेल्या होता,

थिटे मास्तर
Fri, 09/08/2017 - 02:40 नवीन
ताई तुम्हि गेल्या होता, सविस्तर लिहा ना. आंजी तरी येवुद्या ;)
  • Log in or register to post comments

यशस्वी माघार

गामा पैलवान
Fri, 09/08/2017 - 02:41 नवीन
अतिवासताई, माझा हा प्रतिसाद म्हणजे सरळसरळ लहान तोंडी मोठा घास आहे. कारण की कर्तृत्वाने मी तुमच्या पासंगालाही पुरणारा नाही. तुमचा लेख आणि त्यावरची मतमतांतरे वाचली. लेख बराचसा पटला. विशेषत: मोदी आपले शत्रू नाहीत हा भाग अधिकंच समर्पक वाटला. पण गाडी एका वाक्यापाशी अडली. हेच ते वाक्य :
मोदींनी काहीही केलं तरी अनेक भारतीय लोकांना ‘हे पहिल्यांदाच घडतं आहे’ असं वाटतं.
हे असं का वाटतं यामागील कारण तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? केला असल्यास विचारप्रक्रिया व/वा निष्कर्ष वाचायला आवडतील. लोकं अज्ञ आहेत हे खरं कारण नव्हे, हे तुम्हाला माहिती आहे. असो. मोदींना विरोध करणे चुकीचे नाही. मात्र यासाठी भरभक्कम वैचारिक चौकट हवीच. तुम्ही ज्या डाव्या वैचारिक भूमिकेतून मोदींना विरोध करू पाहताहात, ती वैचारिक चौकट नसून शुद्ध भंपकपणा आहे. तुम्हाला मोदींना विरोध करायचा असेल तर हिंदुत्ववादी भूमिकेतूनंच करावा लागेल. डावी भूमिका या बाबतीत पूर्णपणे निरुपयोगी आहे. वैचारिक चौकटीच्या अभावामुळे तर उपरोक्त प्रथमघटनाविधान जन्माला आलं नाहीये? माझी आपली उगीच शंका! तसं असेल तर हा धोक्याचा इशारा समजा. ही घसरगुंडी नाही, पण सुरुवात नक्कीच आहे म्हणून समजा. तुम्हाला बरंच आत्मचिंतन करावं लागेल. डाव्या वैचारिक चौकटीचा कसा व का बोजवारा उडाला हे जाणून घ्यावं लागेल. हा खडतर प्रवास आहे. बऱ्याच ठिकाणी यशस्वी माघारही घ्यावी लागेल. वेळ पडली तर घ्या बिनधास्त. तुमचा म्हाग्रू होऊ नये इतकीच इच्छा आहे. अर्थात म्हाग्रू पार पुढची स्थिती आहे हे मान्य. पण म्हणतात ना मम मन चिंती ते वैरी न चिंती .... ! शुभास्ते पन्थान: सन्तु. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

तुम्हाला मोदींना विरोध करायचा

मोदक
Fri, 09/08/2017 - 08:28 नवीन
तुम्हाला मोदींना विरोध करायचा असेल तर हिंदुत्ववादी भूमिकेतूनंच करावा लागेल. डावी भूमिका या बाबतीत पूर्णपणे निरुपयोगी आहे. असहमत. तटस्थ राहूनही विरोध करता येईल की. अर्थात यामध्ये मोदींनी केलेल्या कामाचे श्रेय त्यांनाच देण्याची आणि फिरवाफिरवी न करता कन्स्ट्रक्टिव्ह विरोध करण्याची तयारी हवी - ही गोष्ट वरवर पाहता साधीसोपी वाटली तरी सर्वच विचारवंतांना जमेल असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

भूमिका आणि वैचारिक चौकट

गामा पैलवान
Fri, 09/08/2017 - 13:36 नवीन
मोदक, तटस्थ राहून विरोध केला तर तो केवळ मोदी या माणसाचा विरोध होईल. जर विचारसरणीला विरोध करायचा असेल तर वैचारिक पाठबळ हवंच. तिथे तटस्थता कामाची नाही. माझ्या मते लेखिकेचा विरोध दुसऱ्या (= वैचारिक) प्रकारचा आहे. पण वैचारिक रसद नसल्यामुळे पहिल्या प्रकाराकडे (= व्यक्तीविरोधाकडे) झुकतो आहे. आपण मोदींना विरोध कशासाठी करायचा यावर लेखिकेस बरंच विचारमंथन करावं लागेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

गापै.. तुमच्या मतावर थोडा

मोदक
Fri, 09/08/2017 - 13:58 नवीन
गापै.. तुमच्या मतावर थोडा विचार करून व्यक्त होईन. पण वरील प्रतिसाद वाचून असे वाटत आहे की सगळे तुम्हीच ठरवत आहात आणि सरळ सरळ निर्णय देत आहात. आपण एक काम करूया - लेखिकेची या धाग्यावर उत्तरे येऊदेत. मगच आपण त्यांच्या भूमीकेविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

वैचारिक चौकटीच्या अभावामुळे

मराठी कथालेखक
Fri, 09/08/2017 - 17:22 नवीन
वैचारिक चौकटीच्या अभावामुळे तर उपरोक्त प्रथमघटनाविधान जन्माला आलं नाहीये?
बाकी सगळं ठीक आहे.. पण मला तुमची ही स्वतःच्याच पोस्टमधील विधानाला केलेली लिंक आवडली. कसं करायचं हे ?मी पण प्रयोग करुन बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

माझा प्रयोग फसला.. तुम्ही

मराठी कथालेखक
Fri, 09/08/2017 - 17:24 नवीन
माझा प्रयोग फसला.. तुम्ही सांगाल काय , कसं केलं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

अतिवास

मनिमौ
Fri, 09/08/2017 - 06:42 नवीन
ताई. भय ईथले पासुन मला तुमची लेखन शैली आवडते. पुढच्या भागात मोदींच्या भाषणात काय झाले हे वाचण्यास उत्सुक आहे. त्याचप्रमाणे नंतरच्या काही महिन्यात पंतप्रधान भेटी मुळे म्यानमार मधे जर काही बदल घडले तर तःही वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments

सविता ताई,

चामुंडराय
Fri, 09/08/2017 - 07:25 नवीन
सविता ताई, भाषणाचा वृत्तांत जरूर लिहा. वाचायला आवडेल. बाकी भाषण ऐकून ब्रह्मदेशातील लोकांची अजि म्या ब्रह्म पाहिले अशी अवस्था झाली असेल कि काय न कळे.
  • Log in or register to post comments

तुमचे लेख नेहमीच आवडतात, पण,

यशोधरा
Fri, 09/08/2017 - 07:30 नवीन
तुमचे लेख नेहमीच आवडतात, पण, ह्या लेखात भट्टी जरा जमली नाही, असं कुठेतरी वाटत राहिलं. आतापर्यंत तुमचं लेखन वाचलं आहे ते बर्‍यापैकी तटस्थ भूमिकेतून लिहिल्याचं जाणवतं, पण ह्या लेखात मात्र तसं वाटलं नाही. अर्थात, तुमची मतं लिहायचा तुम्हांला अधिकार आहेच पण वाचताना मला काहीतरी खटकत राहिलं हे मात्र निश्चित.
  • Log in or register to post comments

मी काही सल्ले द्यायला फार लायक आहे असं नाही

जेम्स वांड
Fri, 09/08/2017 - 09:03 नवीन
पण, ऐकणार असाल तर एकच सल्ला देतो ताई, नका लिहू. पुढं काय होणार माहिती असताना त्यात ठरवून उडी घेण्यात काय पॉईंटे? मी विकाससमर्थक पर्यायाने मोदी समर्थक आहेच, पण म्हणून मी वरच्या काही विचित्र अन औचित्यहीन कॉमेंट्सना सपोर्ट करणार नाही. तुम्ही अफगाणिस्तानमध्ये काम केल्याचं भय इथले वाचून कळले, त्याबद्दल कौतुक, बाकी मनापासून सांगता, लिहू नका पुढला भाग.
  • Log in or register to post comments

मोदक, यू आर ....

गामा पैलवान
Fri, 09/08/2017 - 14:35 नवीन
मोदक,
पण वरील प्रतिसाद वाचून असे वाटत आहे की सगळे तुम्हीच ठरवत आहात आणि सरळ सरळ निर्णय देत आहात.
यू आर अब्सोल्यूटली राईट! हे सगळं मीच करंत असून मीच माझा निर्णय देत आहे. नेमकं हेच मला अतिवासताईंनी त्यांच्या स्वत:च्या बाबतीत करायला हवंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

पुलेप्र!

चांदणे संदीप
Fri, 09/08/2017 - 16:35 नवीन
पुलेप्र! Sandy
  • Log in or register to post comments

लेखिकेची उत्तरे

गामा पैलवान
Sat, 09/09/2017 - 21:23 नवीन
मोदक,
आपण एक काम करूया - लेखिकेची या धाग्यावर उत्तरे येऊदेत. मगच आपण त्यांच्या भूमीकेविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल.
कार्रेक्ट ! लेखिकेची उत्तरे आली तर स्वागतच आहे. मात्र तशी येण्याची अपेक्षा नाही. कारण की माझ्या कथनाचा भर आत्मचिंतनावर आहे. ते केल्यावर मिळालेली उत्तरं इथे थेटपणे मांडण्याची गरज लेखिकेला नसावी. पण मांडलीच तर स्वागत आहे. :-) कदाचित स्वतंत्र धाग्याच्या स्वरूपातही येऊ शकतात. पण जे काही येईल ते कसदार असेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

भाषण भाग १

आदिजोशी
Tue, 09/12/2017 - 15:56 नवीन
भाषण भाग १ मधे भाषणाविषयी काहीच नाही? असो. मुळात मोदी आवडत नसल्याने बर्‍याच न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात पहिला भाग खर्ची पडलाय. काँग्रेस जसं मोदींनी काहीही केलं तरी आम्ही पण हे करत होतो... हे असलं काही पहिल्यांदाच होत नाहीये... वगैरे वगैरे बोलून घेतं तसा हा भाग वाटला. असं असलं तरी दुसर्‍या भागाविषयी उत्सुकता आहे. होपफुली त्यात भाषणाबद्दल थोडं फार असेल. नाही तर ३:३० ते ७:०० पर्यंतचा वॄत्तांत असायचा.
  • Log in or register to post comments

दुसर्‍या भागाविषयी उत्सुकता

कपिलमुनी
Tue, 09/12/2017 - 18:56 नवीन
भलतेच आशावादी तुम्ही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

आहेच

आदिजोशी
Wed, 09/13/2017 - 12:04 नवीन
ओरिगिनल मिपाकर आहे मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

दुसरा भाग वाचण्यासाठी

मार्मिक गोडसे
Tue, 09/12/2017 - 20:07 नवीन
दुसरा भाग वाचण्यासाठी त्यांच्या अनुदिनीला भेट द्या.
  • Log in or register to post comments

:(

पैसा
Wed, 09/13/2017 - 12:18 नवीन
तिथे ७ तारखेला आलंय. वाचलं. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

होय तेव्हाच वाचलं होतं

संग्राम
Wed, 09/13/2017 - 14:17 नवीन
उगाच लेखिकेला आवडणार नाही असा समज करून इथे सांगणे टाळले :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वाचा इथे..

बाजीप्रभू
Wed, 09/13/2017 - 12:42 नवीन
दुसरा भाग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

इथे टाकू द्या मग वाचूच

आदिजोशी
Wed, 09/13/2017 - 13:25 नवीन
इथे टाकू द्या मग वाचूच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

सध्या होत असलेल्या विचारवंताच्या हत्या आणि

कपिलमुनी
Wed, 09/13/2017 - 15:04 नवीन
सध्या होत असलेल्या विचारवंताच्या हत्या आणि मिपा वरील मोदी विरोधी लिखाण केल्यावर आयडीच्या झालेल्या हत्या किन्वा सन्यास यात कमालीचे साम्य जाणवत आहे.
  • Log in or register to post comments

आयडीची हत्या..??

मोदक
Wed, 09/13/2017 - 15:19 नवीन
आयडीची हत्या..?? आयडीची उडवण्याचे अधिकार संपादक मंडळाकडे आहेत -तुम्ही संपादक मंडळावर पक्षपातीपणाचे आरोप करत आहात याचे भान आहे ना..? संपादक मंडळ - कृपया लक्ष घालावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आयडी

कपिलमुनी
Wed, 09/13/2017 - 15:45 नवीन
काही आयडी कैलासवासी झाले , काही वामा झाले तर काहींनी लिहिणे बंद केले आहे. इथे उगाच सं मं चा नाव घेऊन शिमगा क्रू नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

म्हणजे त्यांनी आपणहून संन्यास

मोदक
Wed, 09/13/2017 - 15:47 नवीन
म्हणजे त्यांनी आपणहून संन्यास घेतला ना..? हत्या कुणाच्या झाल्या ते बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

यालाच जालीय हत्या म्हणतात

कपिलमुनी
Wed, 09/13/2017 - 16:49 नवीन
आयडी उडवला तर दुसरा घेता येतो आणि बरेचजण घेतात पण लिहिणे बन्द करयला भाग पाडणे यालाच जालीय हत्या मी मानतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बरोबर.. कन्हैय्या आणि उमर

मोदक
Wed, 09/13/2017 - 16:57 नवीन
बरोबर.. कन्हैय्या आणि उमर खलिद पण तुमच्या लेखी क्रांतीकारक असतील, आता यावर आंम्ही आक्षेप घेतला तर लगेच भावना दुखवून लिखाण बंद करू नका इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

असतील नसतील

कपिलमुनी
Wed, 09/13/2017 - 17:14 नवीन
असतील ,नसतील, जर तर अशा हवाबाण गोळ्या मारत नाही! कन्हैय्या आणि उमर खलिद शी काही देणे घेणे नाही. माझ्या लेखी जे आहे ते मी लिहितो , त्याच सन्धर्भाने चालावे. बाकी लिखाण बंद करणार नै ! कल्जी क्रू नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सध्या कोणकोणत्या

श्रीगुरुजी
Wed, 09/13/2017 - 17:24 नवीन
सध्या कोणकोणत्या "विचारवंतांच्या" हत्या होत आहेत म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सन्धर्भ म्हणजे काय..?

मोदक
Wed, 09/13/2017 - 17:35 नवीन
सन्धर्भ म्हणजे काय..? निधर्मांधच्या विरोधी अर्थाचा शब्द आहे काय..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मुनीवर,

श्रीगुरुजी
Wed, 09/13/2017 - 20:35 नवीन
मुनीवर, सध्या कोणकोणत्या "विचारवंतांच्या" हत्या होत आहेत म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

गप्प का मुनीवर? तिकडे खफवर

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/14/2017 - 14:16 नवीन
गप्प का मुनीवर? तिकडे खफवर कोणीही विचारले नसताना तोंड वर करून संपादकांच्या थाटात शहाजोगपणे सल्ले देत होतात. पण इथे अनेकवेळा विचारूनसुद्धा उत्तर न देता काढता पाय का घेतलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सहमत आहे.

राही
गुरुवार, 09/14/2017 - 10:43 नवीन
इथे काही आय्डी शड्डू ठोकून आखाड्यात उतरल्यासारखे लिहितात. त्यांच्या मताच्या जराही विरुद्ध लिहिले की टोमणे, टिंगल टवाळी सुरू होते. मुद्दे कमी आणि गुद्दे जास्त अशी स्थिती होते. मग लिहिण्याची इच्छाच नाहीशी होते. खुल्या संस्थळावर अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावे आणि आहे हे ठीकच आहे . ' आम्ही हे असेच आहोत, पटलं तर या ' ही लेखकांची भूमिकासुद्धा ठीक आहे . पण हाणामारी करून लिहिण्याची सवय आणि आवड नसल्याने लिहू नये असे वाटते खरे. अर्थात वैयक्तिक माझ्याबद्दल लिहायचे तर मुळातच लिखाण कमी केले असल्याने मला फारसा फरक पडला नाही. संस्थळाला आणि वाचकांना फरक पडण्याचे कारणच नव्हते. त्यामुळे विन विन सिट्युएशन. मात्र माझा मिपावरचा वाचनमात्रतेचा काळही आकसत चालला आहे असे मला जाणवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सहमत आहे.

अभ्या..
गुरुवार, 09/14/2017 - 23:17 नवीन
सहमत आहे. त्यातल्या त्यात "आमची भूमिका हीच संस्थळाची भूमिका" असा आव आणून ज्या पद्धतीने विरोधी मताला कॉर्नर केले जातेय ते अधिक त्रासदायक आहे. स्वयंघोषित गोरक्षकांपेक्षा हे तसूभरही कमी नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

ह्या धाग्यावर जे काही झाले

दशानन
गुरुवार, 09/14/2017 - 23:27 नवीन
ह्या धाग्यावर जे काही झाले आहे ते पहाता मी देखील, वरील प्रतिसादाशी सहमत आहे. वाईट वाटले व पटले नाही. विरोधाला विरोध ही नीती योग्य असेल काही जागी पण समोरच्याची दुसरी बाजून न तपासताच विरोध हा अभिव्यक्तीवर अतिक्रमण आहे असे मला वाटते. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

असहिष्णुता हो.. दुसरे काही

मोदक
Fri, 09/15/2017 - 10:39 नवीन
असहिष्णुता हो.. दुसरे काही नाही. मिपावरही आयडीवापसीचा दौर २०१९ च्या आधी एखादे वर्ष सुरू होईल असे यापूर्वी कुठेतरी बोललो आहेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

गैरलागू

प्रदीप
Fri, 09/15/2017 - 10:53 नवीन
आतिवास ह्यांनी पहिला भाग टाकल्यानंतर जे काही प्रतिसाद आले, त्यात कोंबडा व मराठी कथालेखक ह्यांचे टोकाचे प्रतिसाद सोडल्यास कुणीही त्यांच्या लेखावर तुटून पडलेले दिसत नाही. उलट सगळ्यांनीच, भाषणानंतरचा पुढील भाग यावा, असेच लिहीले आहे. मुळात आतिवास येथे अजिबात नवीन नाहीत, तेव्हा इथे, त्यांच्या दृष्टीकोनातून, कशा प्रकारचे प्रतिसाद येणार ह्याचा त्यांना , हा पहिला भाग टाकायच्या वेळीच कल्पना असावीच आसे म्हणणे वावगे ठरू नये.,आणि हा भाग टाकल्यावर येथील सभासदांच्या प्रतिसादात काही विलक्षण गुणात्मक बदल झाला आहे असे मलातरी दिसलेले नाही. तेव्हा इथे त्यांनी दुसरा भाग टाकणे रास्त ठरले असते, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा