Skip to main content

मोडीची_गोडी

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 08/09/2017 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
फारा वर्षाच्या अंतराने पुन्हा विद्यार्थी दशेत गेलो, ते ब्राह्मि अन् मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने. महिनाभर रोजचा दोन तासाचा वर्ग, दुसरा दिवस सुरु व्हायच्या आत दिलेला होमवर्क पुर्ण करण्यासाठी जागरणे.... एकरेघी, दुरेघी, चाररेघी वह्या, शाईपेनाचा तपानंतर लाभलेला सहवास, शाळेतल्या बाकांवर अजुनही मावत असलेल्या देहाचं अपार कौतुक साधत झालेल्या नव्या ओळखी अन् विस्तारलेला परीघ.... प्रशिक्षकांच एक वाक्य ठसलयं मात्र, ' हे शिकलाय, याचा तुम्हाला काही उपयोग नाही असं जेव्हा वाटेल तेव्हा अजुन कोणाला तरी वाटुन टाका!' माझं ते माझं, तुझं तेही माझंच, असं गोळा करायच्या रुढीत ही नवी दिशा आहे माझ्यासाठी. लेकीला इतिहास विषय रटाळ वाटतो असं कळाल्यानं सुरू केलेला हा अट्टहास, नवी कवाडं मात्र उघडी झाली माझ्यासाठी! CDAC ने बनवलेलं Android App सोबतीला घेतलय आता. सराव करण्यासाठी . जरा थोडा अजुन सराव करतो मग तुम्हाला पण शिकवीन मोडी वाचायला....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4495
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मस्त..

मस्त..

मस्त..

मस्त..

एक मदत ट्राय करुन पहावयास आवडल्यास पहावे मराठी विकिस्रोत प्रकल्पात या दुव्यावर विल्यम केरी लिखीत मराठीतील पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश आहे. त्यातील मराठी बहुधा मोडी लिपीत असावे. सरावा साठी सवड आणि आवडीनुसार जमतील तेवढ्या शब्दांचे देवनागरीकरण करून मिळाल्यास हवे आहे.
लेकीला इतिहास विषय रटाळ वाटतो असं कळाल्यानं
How to develop curiosity असा गूगल सर्च केल्यावर काही उपयूक्त लेख येतात , ते वाचण्यास देण्याचा मी माझ्या पाल्यांवर हा प्रयोग करुन पाहीला आहे.

In reply to by माहितगार

(हळू घेणे )
How to develop curiosity असा गूगल सर्च केल्यावर काही उपयूक्त लेख येतात , ते वाचण्यास देण्याचा मी माझ्या पाल्यांवर हा प्रयोग करुन पाहीला आहे.
how to avoid traps laid by parent असा गूगल सर्च करून पाल्याने प्रयोग फोल ठरवले तर ?

मी सुद्धा शिकतोय. अजून बाराखडी गिरवतोय. छोटे छोटे लेख, पत्र वाचतोय. लिहायला अजून नीट येत नाहीये. पण सॉलिड मज्जा येते

उत्तम प्रयत्न!! तुम्हाला या दोन पि.डी.एफ. स्वरुपातल्या पुस्तकाचा काही उपयोग होतो का ते पहा. Modi prashikshan Pustika Modi Vachan Saraav

In reply to by दुर्गविहारी

उद्या दोन्ही पुस्तके प्रिंट करून घेतो मला हे पुस्तक मोडी शिकण्यासाठी फार उपयोगी पडले चला शिकूया मोडी आपण https://archive.org/details/ChalaShikuyaModiAapan

आवडेल शिकायला...

हा पूर्ण धागाच बुकमार्क केलाय

मोडी लिपी शिकुन सराव करायचा राहिला तर लगेच विसरायला होतं ..... आजचा ताजा अनुभव