काजू मोदक
गणपतीसाठी खास सोपी आवडती झटपट आणि घरी केल्यामुळे खूपच स्वस्त अशी रेसिपी!
साहित्य:
एक वाटी काजूगर,
अर्धी वाटी साखर,
पाव वाटी पाणी,
वेलची पावडर,
अर्धा चमचा तूप,
मोदक साचा
कृती:
काजूगर मिक्सरला थांबून थांबून फिरवावे, आणि पावडर करावी. सलग फिरवले तर तेल सुटेल पण पावडर बारीक होणार नाही.
कढईत अर्धा चमचा तूप घ्यावे. गॅस मंद ठेवावा. आता त्यात साखर आणि पाव वाटी पाणी घालून साखर विरघळेपर्यंत ढवळत राहावे.
साखर पूर्ण विरघळली की काजू पावडर मिसळावी. पाच मिनिटे शिजवावे. वेलची पावडर घालावी.
गोळा होऊ लागला की खाली उतरून घोटावे. घट्ट गोळा झाला की साच्याला तूप लावून त्यात छोटे गोळे भरून मोदक करावेत.
.
.
.
.
.
.
.
तेव्हढाही वेळ नसेल तर ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण थापावे. काजूकतली तयार आहे.
.
.

.
.
.
.
.
.
तेव्हढाही वेळ नसेल तर ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण थापावे. काजूकतली तयार आहे.
.
.

वाचने
9877
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अल्लड सीनू... ;):- Alludu Seenuमस्त!
वा..
वा
+१, अगदी, हेच म्हणणार होतो,
In reply to वा by सविता००१
साचा आवडला. एकाच वेळी सिक्सर
छोटे क्यूट मोदक आवडले.
खुपच आवडले
वाह किती मस्त आहे ही रेसेपी..
थँक्स सगळ्यांना
थँक्स सगळ्यांना
किती निगुतिन करतै ग ताई जाम
मस्तं दिसतायेत मोदक.
तुझी रेसिपी देखणी असते गं
मस्त प्रकार आहे. सुबक आणि
झकास!!
काय कल्पक
थँक्स सगळ्यांना
खुपच सोपी दिसत्ये.. नक्की