Skip to main content

बाप्पाचा नैवेद्यः काजू मोदक आणि काजूकतली

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 27/08/2017 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
काजू मोदक गणपतीसाठी खास सोपी आवडती झटपट आणि घरी केल्यामुळे खूपच स्वस्त अशी रेसिपी! साहित्य: एक वाटी काजूगर, अर्धी वाटी साखर, पाव वाटी पाणी, वेलची पावडर, अर्धा चमचा तूप, मोदक साचा कृती: काजूगर मिक्सरला थांबून थांबून फिरवावे, आणि पावडर करावी. सलग फिरवले तर तेल सुटेल पण पावडर बारीक होणार नाही. कढईत अर्धा चमचा तूप घ्यावे. गॅस मंद ठेवावा. आता त्यात साखर आणि पाव वाटी पाणी घालून साखर विरघळेपर्यंत ढवळत राहावे. साखर पूर्ण विरघळली की काजू पावडर मिसळावी. पाच मिनिटे शिजवावे. वेलची पावडर घालावी. गोळा होऊ लागला की खाली उतरून घोटावे. घट्ट गोळा झाला की साच्याला तूप लावून त्यात छोटे गोळे भरून मोदक करावेत. . 1 . . 1 . . 1 . . तेव्हढाही वेळ नसेल तर ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण थापावे. काजूकतली तयार आहे. . . 1

वाचने 9877
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

सोपी आणि टेस्टी पाककृती!

छानच झालेत काजू मोदक आणि काजूकतलीही.. स्वाती

झक्कास गं अनन्न्या. ते मोदकांनी काढलेले २१ खूप आवडले.

मस्तं दिसतायेत मोदक. मी सुद्धा यावर्षी आमच्या घरच्या गणपतीला खवा-पिस्त्याचे मोदक बनवले होते. पायरी-पायरीचे फोटो नाही काढले पण पाकृ देईन नक्की.

काजूचे मोदक पहिल्यांदाच पाहत आहे. सजावटही कल्पक आहे!!

सजावट. तुझ्या रेसिपी वाचल्या की करून बघता येईल असा विश्वास वाटतो