लहानपणची गोष्ट आहे. कुठल्याशा सुटीत एका कौटुंबिक सहलीसाठी लोणावळ्याला जाणे झाले होते. विविध स्थलदर्शनांच्या यादीत "कार्ले" येथिल लेण्यांचा समावेश होताच. तेथिल एकविरा देवीच्या मंदिरात गेल्यावर माहिती कळली की, ही कोळी समाजातील लोकांची देवता. मला कुतुहल वाटले. कोळी समाज हा समुद्रकिनार्यावरील. मग त्यांची देवता अशी समुद्रकिनार्यापासून इतकी दूर, अगदी घाटापलिकडे देशावर कशी? वडिलधार्यांना विचारले पण कोणाकडेच समाधानकारक उत्तर नव्हते. आजही नाही. अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या ढिगार्याखाली ते कुतुहल आजदेखिल पडून आहे!
मिपावर मराठीच्या अनेक बोलींतील लेखन वाचायला मिळते. त्यात एक आहे आगरी बोली. अगदी बालपणापासून बर्याचदा कानावर पडलेली ही बोली. माझे वडिल ज्या कारखान्यात काम करीत तेथिल बरेच कामगार आगरी. त्यांचे घरी येणे-जाणे होत असे. तशी ती मंडळी आमच्याशी अगदी प्रमाणित मराठीत बोलायचा प्रयत्न करीत पण त्यांचा तो एक विशिष्ठ आगरी हेल काही लपत नसे. फार गोड वाटे ऐकायला.
नुकतेच वाचनात आले. १३ व्या शतकात देवगिरीचा पाडाव झाला आणि त्याच सुमारास पैठण प्राताचा सुभेदार असलेला बिंब राजा पैठण सोडून उत्तर कोंकणात आला. तेथे त्याने आपले राज्य स्थापले. महिकावती (केळवे-माहिम) ही त्याने वसलेली राजधानी. पैठणहून येताना बिंब राजाने काही लोकसमुहच्या समूह कोकणात स्थलांतरीत केले. त्यातील दोन प्रमुख लोकसमूह होते - आगरी आणि पाठारे प्रभू!
मूळच्या मराठवाड्यातील ह्या दोन जमाती आज मुंबई परिसरात पूर्णपणे मिसळून गेल्या आहेत. इतक्या की, मूळस्थानाशी त्यांचा काही संबंधच उरलेला नाही!
इ.स.पू ९ ते ६ या शतकात असीरीयन साम्राज्य पार इराणपासून इजिप्तपर्यंत पसरले होते. ह्या असीरीयन राजांचे वैशिष्ठ्य म्हणजे साम्राज्यांतर्गत विविध लोकसमुहांची जबरदस्तीने घडवलेली घाऊक स्थलांतरे. भारतातील एक बिंब राजा सोडला तर, अशी घाऊक स्थलांतरे घडविणारा राजा झाला नसावा!
अलिबागहून मुरुड-जंजिर्याकडे जाताना वाटेत रेवदंड्याची खाडी लागते. ती पार करून, मुरुडला जाण्यासाठी उजवीकडे वळले, की पहिलेच गाव लागते - कोरलई.
मुरुडकडे सुसाट न पळता थोडे ह्या गावात रेंगाळा. फार मजेशीर गोष्टी समजतील. हे गाव बहुतांशी ख्रिस्ती. गावकर्यांचा तोंडावळादेखिल थोडा वेगळा. आणि भाषा? ती तर फारच वेगळी!! म्हणजे तुमच्या-आमच्याशी अगदी व्यवस्थित मराठीत बोलतील पण आपापसात ती मंडळी काय बोलतात याचा तुम्हाला थांगपत्ता लागणार नाही! कारण ती भाषा आहे जुनी पोर्तुगिज - मराठी मिश्रित.
चौल ही चिमुकली पोर्तुगिज वसाहत. १६८३ साली संभाजी महाराजांनी एका झडपेत चौल काबीज केले. त्यावेळी चौलमधिल काही पोर्तुगीज कुटुंबे जीव वाचवण्यासाठी खाडी ओलांडून कोरलईला आली आणि तिथेच स्थायिक झाली. उत्तरेला वसई आणि दक्षिणेला गोवा येथे मोठ्या पोर्तुगिज वसाहती होत्या पण त्यांचा कुणाशीच संबंध राहिला नाही आणि एक चिमुकला पण वेगळाच समाज निर्माण झाला!
कोकण किनार्यावर असे बरेचदा घडले. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्रायलहून आलेले ज्यू नागावच्या किनार्यावर येऊन थडकले तर इराणहून आलेले पारशी संजाणच्या किनार्याला लागले. आपल्या मूळ स्थानापासून दूरावलेले हे समाज नव्या ठिकाणी अगदी पूर्णपणे रुजले - फेरलावणी केलेल्या पिकासारखे!
वाचने
22940
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम लेख !
एक फकिर
In reply to उत्तम लेख ! by मुक्तसुनीत
दोन
उत्तरे
In reply to दोन by नीधप
तपशीलात थोडी चूक वाटतेय.
In reply to उत्तरे by सुनील
बिंब राजा
In reply to तपशीलात थोडी चूक वाटतेय. by केदार
गोनीदांच्
In reply to दोन by नीधप
गौड सारस्वत ब्राह्मण आणि गौड बंगाल
हे मीही
In reply to गौड सारस्वत ब्राह्मण आणि गौड बंगाल by बेसनलाडू
मीही
In reply to हे मीही by सुनील
गौड सारस्वत
In reply to गौड सारस्वत ब्राह्मण आणि गौड बंगाल by बेसनलाडू
चांगला लेख - सारस्वत ब्राह्मण
In reply to गौड सारस्वत ब्राह्मण आणि गौड बंगाल by बेसनलाडू
आणि
In reply to चांगला लेख - सारस्वत ब्राह्मण by प्रियाली
नाही
In reply to आणि by रामदास
माझाही एक प्रश्न
कोब्रा..
In reply to माझाही एक प्रश्न by मुक्तसुनीत
त्याची फोड
In reply to कोब्रा.. by सुनील
खंडोबा
In reply to माझाही एक प्रश्न by मुक्तसुनीत
देशस्थ लोक म्हणजे ब्राह्मणातले मराठा असेच वाटायचे.
In reply to खंडोबा by प्रकाश घाटपांडे
सुनीलनी
In reply to देशस्थ लोक म्हणजे ब्राह्मणातले मराठा असेच वाटायचे. by रामदास
लेख आवडला
अत्यंत सुंदर लेख
असेच म्हणतो
In reply to अत्यंत सुंदर लेख by प्रदीप
हबशी आणि सिद्दी
अतिशय सुरेख मांडणी.
याची
In reply to अतिशय सुरेख मांडणी. by प्राजु
छान लेख.
कोळ्यांची देवी डोंगरावर
अवांतरः
In reply to कोळ्यांची देवी डोंगरावर by रामदास
नाय तर काय!
In reply to अवांतरः by भडकमकर मास्तर
कोकणस्थां
In reply to कोळ्यांची देवी डोंगरावर by रामदास
अवांतर: महाराष्ट्रियांचे बाहेर स्थलांतर
In reply to कोकणस्थां by नीधप
>>भय्या व
In reply to अवांतर: महाराष्ट्रियांचे बाहेर स्थलांतर by प्रदीप
सुंदर..
अरे हो
फारच
अत्यंत रोचक व माहितीपुर्ण लेख
सुंदर
आणि हो
In reply to सुंदर by विनायक प्रभू
वेगळा विषय, छान मांडणी...
असं
In reply to वेगळा विषय, छान मांडणी... by बिपिन कार्यकर्ते
असं
In reply to वेगळा विषय, छान मांडणी... by बिपिन कार्यकर्ते
सुरेख लेख
+१
In reply to सुरेख लेख by सहज
स्थलांतरित आणि फिरस्ते
सरकारी गॅझेटाप्रमाणे
In reply to स्थलांतरित आणि फिरस्ते by विसुनाना
सुनीलभो
सुंदर लेख!
नगरला हे कोष्टी साड्या सुंदर विणतात
In reply to सुंदर लेख! by चतुरंग
new असेच
ग्रंथ?
भारतीय
In reply to ग्रंथ? by चित्रा
धन्यवाद!
गावगाडा -
In reply to धन्यवाद! by सुनील
गावगाडा - त्रिंबक नारायण आत्रे